एका लेखाची चाळीशी
मुक्काम पी. एच. सी.
जेव्हा शासकीय महाविद्यालयातून थर्ड एमबीबीएस पास झालो तेव्हा असे सांगण्यात आले, की तुम्हाला आता एक वर्ष सक्तीने सरकारसाठी राबावे लागणार आहे व त्याबद्दल पोटापाण्यापुरते पैसे मिळतील. त्यापैकी सहा महिने खेड्यात जावे लागणार होते. “शिरूर घ्या अन ऐश करा”, असे सिनिअर लोकांनी सांगितले. परंतु आपल्याला हवे ते केंद्र मिळण्यासाठी ‘जे काही करावे लागते’, ते न जमल्याने मला शिरूर मिळाले नाही. अखेर माझी अन्य एका खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक झाली. मग दुसऱ्या दिवशी प्रवासास निघालो. एसटीचा प्रवास संपल्यानंतर खडकाळ रस्त्यावरून पायपीट चालू झाली. चालता चालता असे जाणवले की बरेच लोक कुतूहलाने माझ्याकडे बघत होते. टेरीकॉटचे कपडे व बूट एवढ्या दोन गोष्टी सुद्धा इथे लक्ष वेधून घ्यायला पुरेशा होत्या. आता त्या केंद्राचा पत्ता विचारायचा होता.
रस्त्यात दिसणाऱ्यापैकी त्यातल्या त्यात कमी खेडवळ माणूस गाठला. त्यांना विचारले,
“अहो इथे सरकारी दवाखाना कुठे आहे?” त्याने बरेच हातवारे करून पत्ता सांगितला आणि विचारले,
“काय नवीन डाक्टर वाटतं”
“ हो, इंटर्नशिपसाठी आलोय, प्रशिक्षण असतं आमचं”
“म्हंजे शिकावू डॉक्टर म्हना की !”
... च्यायला, अगदी चिमणीच पाडली साल्यानं.
अखेर मुक्कामी पोचलो. “प्राथमिक आरोग्य केंद्र” हे शब्द व त्याखाली आई-बाबा, दोन मुले आणि लाल त्रिकोण अशी चित्रांकित पाटी असलेल्या इमारतीत शिरलो. ओपीडी मध्ये बसलेल्या मेडिकल ऑफिसरची भेट झाली. मी आल्याचे पाहून ते एकंदरीत खूष झाले. कारण मागच्या बॅचचे इंटरन्स जाऊन चार दिवस लोटल्याने त्यांच्यावर ओपीडीतील सर्व पेशंटस बघायची वेळ आली होती. मग हॅलो, वेलकम, नाव, गाव, बाप काय करतो व पुढे काय करणार, इत्यादी गप्पा झाल्यावर सहा महिन्यातील कार्यक्रम समजला.
सकाळ-संध्याकाळ ओपीडी काढणे हा त्यातला मुख्य भाग. याशिवाय नसबंदी शस्त्रक्रियेत मदत करणे, शाळांमधून जाऊन बालके तपासणे, क्षयरोग-कुष्ठरोग इत्यादी संबंधी जनजागृती करणे आणि जी काही शिबिरे होतील त्यात इकडून तिकडे करणे या गोष्टींचा समावेश होता. आमचे राहायचे क्वार्टर्स तसं बरं होतं. चौघांची राहायची सोय होती आणि मुख्य म्हणजे हे ठिकाण नर्सेस क्वार्टर्सच्या अगदी समोर होते. एक-दोन दिवसात बाकीचे तिघे आले आणि रूटीन व्यवस्थित चालू झाले.
ओपीडीला भरपूर गर्दी असायची. नव्वद टक्के लोकांची लक्षणे ठराविक असायची. एकंदरीत डोके व कंबर हे दुखण्यासाठी आणि हात व पाय मुंग्या येण्यासाठीच निसर्गाने दिलेले आहेत की काय असे वाटू लागे. व्हिटामिन B12 चे इंजेक्शन हे तिथले एक अत्यावश्यक ड्रग असायचे. या इंजेक्शनने खरोखरीच अंगात ताकद येते की काय असे मला सुद्धा शेवटीशेवटी वाटू लागलं होतं !
काही आजारांवर लोकांकडून गावठी इलाज हे प्राथमिकता म्हणून केले जात. त्यातून बरे वाटले नाही तरच पेशंट इथे येई. अशा इलाजांपैकी काही समजुती तर आपल्या बुद्धीपलीकडील आहेत. कावीळ झालेला माणूस जेव्हा आपल्याकडे यायचा तेव्हा त्याच्या गळ्यात ती विशिष्ट माळ घातलेली असायचीच. एखादी जखम झाली असताना भात खाल्ला तर जखमेत पू कसा काय होतो, याचे स्पष्टीकरण मला तरी माहीत नाही ! सर्पदंशाच्या बाबतीत, चावलेला साप विषारी होता का, हे ठरवण्यासाठी कोंबडीचा प्रयोग गावातील एका वैदूकडून सर्रास करण्यात येई. साप चावलेल्या जागेवर कोंबडीचे गुद्द्वार टेकवण्यात येई; जर कोंबडी मेली तर साप विषारी.
कुटुंबकल्याण कार्यक्रम हे आरोग्य केंद्राच्या कामकाजाचे महत्त्वाचे अंग असते. बाकी एखाद्या जोडप्याला मुलगा झाल्याशिवाय कुटुंबाचे ‘कल्याण’ होऊ शकत नाही, हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव नाही काय ? एक प्रासंगिक विनोद अजून आठवतो. केंद्रांमधील एक मल्टीपर्पज वर्कर होता. सहज घरची चौकशी केली,
“काय मग. मुलेबाळे किती?”
“ पाच मुली आणि एक मुलगा ! आपल्या सर्व सवलती सरकारने बंद केल्यास बघा !”
(त्याचाही अभिमान)
“अहो, निदान तुम्हाला तरी संततिनियमनाचे महत्त्व कळायला नको का ?”
“डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!”
एकदा मुलगा झाल्यावर मात्र नसबंदी करून घेण्याकडे वाढता कल जाणवे; त्यातही अर्थात पुरुषापेक्षा स्त्रीचीच. बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेबाबत मात्र अजून गैरसमज असायचे. एकदा बिनटाक्याचे शिबीर होणार होते. तेव्हा जास्तीत जास्त संख्या जमवण्यासाठी लोकांना पटवायचे काम चालू होते. एका बाईचा नवरा फारच हट्टी निघाला. मी म्हणालो,
“अहो, पंधरा मिनिटात ऑपरेशन, लगेच घरी घेऊन जायचे. पुन्हा (सरकारतर्फे) पैसे पण जास्त आणि लगेच मिळतात” त्यावर तो वैतागून म्हणाला,
“डॉक्टर, आम्ही काय पैशासाठी आपरेशन करतो का? ते जादूवाली भानगड काय नगं. पद्धतशीर टाक्याचे आपरेशन होऊ द्या. पायजे तर आम्ही पैसे देतो !”
तांबी (कॉपर टी) बसवण्यासाठी जरा औदासिन्यच असे. यासाठी स्वतःहून येणाऱ्या स्त्रिया फारच कमी. त्यामुळे ओपीडीत लहान मुलाला दाखवण्यासाठी घेऊन आलेल्या बायकांना पकडावे लागे. तांबी बसवायचे काम दोन मिनिटाचेच असले तरी बाईला समजावून द्यायला मात्र दोन दोन तास जायचे आणि बसवल्यानंतर तीन वर्षे बाईने काही कुरकुर केली नाही, तरच डॉक्टरला खरा आराम !
अशा कितीतरी कार्यक्रमांमुळे रिकामा वेळ तसा मिळतच नसे. पण चुकून मिळालाच तर मात्र काय करायचे असा प्रश्न पडायचा. कारण “शिरूर संस्थान” सारखी करमणुकीची साधने येथे नव्हती. तसं टेबल टेनिस, कॅरम इत्यादी गोष्टी गौण आहेत; बरोबर मैत्रिणी नाहीत हे खरे दुःख ! पण रोजच्या संसारात मात्र येथे जातीने लक्ष घालावे लागे. साखरेचा भाव काय, रॉकेल कधी मिळणार आहे, हे बघावे लागे. एखाद्या दिवशी स्वयंपाकाच्या बाई येणार नसतील तर आम्हा चौघांपैकी एकाला ओपीडीतून पळ काढून स्वयंपाकाची आघाडी बघावी लागे. एक प्रकारे भावी आयुष्याचीच ही इंटर्नशिप नाही का?
एक स्वस्त आणि मस्त करमणूक आयुष्यात प्रथमच येथे अनुभवली. ती म्हणजे तंबूतील थिएटर. इथे अनेक जुने हिंदी मराठी चित्रपट लागत. दर तीन दिवसाला नवीन चित्रपट येई. विद्यार्थिदशेत असताना मोजकेच चित्रपट पाहिले होते. ‘पूरब और पश्चिम’ पासूनचे अनेक जुने राहून गेलेले चित्रपट या मैदानावरील चित्रगृहात मोठ्या चवीने तृप्त होईपर्यंत पाहिले.
महिन्यातील दोन शुक्रवार मात्र घातवार असायचे. कारण या दिवशी पुण्याहून इंटर्नशिप नियंत्रण खात्याचे लोक भेट द्यायला यायचे. त्यांच्या करमणुकीसाठी जर्नल नावाचा एक रुक्ष प्रकार लिहून ठेवावा लागे. ते लोक त्याला प्रेमाने डायरी असे म्हणायचे. मग आदल्या गुरुवारी हे काम उरकण्यात येई. त्यांच्या भेटी दरम्यान त्या प्रकाराची अगदी बारकाईने तपासणी होई आणि मग 100 ग्रॅम डाळ म्हणजे किती चमचे घ्यायची, असल्या गोष्टींवरून सुद्धा चंपी होई. प्रशिक्षणार्थी डॉक्टर कामावर दांड्या मारत नाहीत ना हे बघण्यासाठी या खात्यातर्फे अधूनमधून अचानक भेट दिली जाई. एके दिवशी आमच्यावर अशी अचानक धाड पडली आणि आम्ही चौघेही हजर पाहून ते लोकच आश्चर्यचकीत झाले !
अधूनमधून आजूबाजूच्या लहान खेड्यांतील आरोग्य उपकेंद्रांना जावे लागे. या भेटींमधून मात्र खऱ्या भारत देशाचे दर्शन घडे. तिथे जीपमधून जाताना शरीर अक्षरशः ढवळून निघे. पावसाळ्यात तर काही गावच्या ओढ्यानाल्यांना इतके पाणी येई, की एकीकडून दुसरीकडे जाणे अशक्य व्हायचे. एकीकडे आपला ‘Insat 1 B’ अवकाशात भराऱ्या मारतोय अन दुसरीकडे हे ओढेनाले लोकांना गावाबाहेर पडू देत नाहीत. असे कितीतरी अडथळे आणि विसंगती.
अशा या लहान खेड्यातील (आपल्या भाषेत इंटिरियरमोस्ट) समाजजीवनाचे दर्शन कित्येकदा मन हेलावून टाकणारे असे. दोन वेळेस पुरेसे अन्न, कपड्यांचे दोन जोड आणि एक कौलारू घर एवढे ज्याला प्राप्त झाले आहे तो खरोखरच इथला श्रीमंत म्हटला पाहिजे. तीन रुपये रोजगारावर पोट भरणारी एखादी स्त्री, जर आपल्या दोन वर्षाच्या मुलाला अजूनही फक्त अंगावरच दूध कसेबसे पाजत असेल, तर तिला weaning वर लेक्चर देणारे आपण कोण? दारू पिऊन बायकोला मारझोड करणारा नवरा हा आर्थिक व सामाजिक विषमतेतूनच निर्माण होत नाही का? ‘पेठ-डेक्कन-कॅम्प’ संस्कृतीत वाढलेल्या माझ्यासारख्याला तर ही विषमता फारच जाणवली. दारिद्र्य-रोगराई-दारिद्र्य हे एक दुष्टचक्र झालेले आहे. “सन २००० पर्यंत सर्वांसाठी आरोग्य” हे स्वप्न साकार होण्याआधी ‘गरिबी हटाव’ पूर्णतः साध्य होणे आवश्यक आहे.
अशा असंख्य विचारांनी अंतर्मुख झालेल्या अवस्थेत हे सहा महिने संपले. या ग्रामीण इंटर्नशिपचे फलित काय होते ? तर, माझ्या दृष्टीने जे ‘मेडिसिन’ होते - म्हणजे मधुमेह आणि हृदयविकार- त्या दृष्टीने ज्ञानात विशेष भर पडली नव्हती. परंतु, गेल्या साडेचार वर्षात फारशी जाणीव न झालेल्या सोशल मेडिसीनचे महत्त्व मात्र पुरेपूर पटले होते.
……………………………………………………………………………………...............................................
................................................................................................................................................
टीप :
जे वाचक 1990 नंतर जन्मलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी :
१. “गरीबी हटाव” ही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आवडती राजकीय घोषणा होती.
२. “हेल्थ फॉर ऑल बाय 2000” हे जागतिक आरोग्य संघटनेचे1980-1990 च्या दशकांतील ध्येय होते.
३. “दोन मिनिटाचे काम आणि तीन वर्ष आराम” ही जाहिरात तांबी हे गर्भनिरोधक साधन बसवण्याबाबत महाराष्ट्र शासनाने तयार केलेली होती.
In reply to चटपटीत आणि छान लेख हो. by कंजूस
In reply to नेहेमीसारखाच छान लेख. चाळीस by शेखरमोघे
Weaning : मराठी प्रतिशब्द : स्तनपानसमाप्तीनाही. कारण ही प्रक्रिया 'समाप्ती' नसते. ती काही महिन्यांची संक्रमण अवस्था असते. त्यामुळे इंग्लिशमधला ing प्रत्यय चपखल आहे. रच्याकने... स्तनपान हा अयोग्य शब्द आहे. तो "स्तन्यपान असा हवा. स्तन्य = अंगावरचे दूध.
In reply to नेहेमीसारखाच छान लेख. चाळीस by शेखरमोघे
In reply to दूधवियोग by हेमंतकुमार
In reply to दूधवियोग पेक्षा... by mayu4u
In reply to लेख आवडला.. by ज्ञानोबाचे पैजार
In reply to लेख आवडला. तेव्हाही तुमचे by प्रचेतस
Weaning वर भारतरत्न पां. वा. काणे यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राच्या इतिहासात मजेदार माहिती आहे. मात्र येथे अवांतर होईलप्रचूवल्ली सर, एक वेगळा धागा जरूर यावा.
In reply to लेख आवडला. तेव्हाही तुमचे by प्रचेतस
Weaning वर भारतरत्न पां. वा. काणे यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राच्या इतिहासात मजेदार माहिती आहे. मात्र येथे अवांतर होईलप्रचूवल्ली सर, एक वेगळा धागा जरूर यावा.
उष्टावण>>> हा देखील या प्रक्रियेसाठी पूर्ण पटत नाही कारण उष्टावण म्हणजे फक्त “पहिला घन आहार” देणे. ‘विनिंग’मध्ये अंगावरचे दूध कमी करत करत संपूर्ण घन आहाराकडे वाटचाल करणे असे अभिप्रेत आहे. त्यामुळे हा सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी असतो. " ing " चा भाव शब्दात यावा. … 2.
Weaning वर भारतरत्न पां. वा. काणे>>> रोचक. सवडीने अन्यत्र वाचू.
In reply to माझ्या आयुष्यातील पहिलावहिला by कर्नलतपस्वी
मेळघाटातील मोहोर,>>>> उपयुक्त माहिती. पाहतो. .. २.
पहीली शाळा,पहीला काॅलेजचा दिवस,पहीला नोकरीचा दिवस,पहीला कांदेपोह्याचा कार्यक्रम, पहिली रात्र आणी बरेच काही. हे सर्व अनुभव वेरूळ लेण्यातील शिल्पा सारखे मनावर कोरले जातात आणी कधीच पुसत नाहीत.>>> अ- ग - दी -च ! तुमचे अनुभव आवडले.
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
In reply to तुम्ही पॅथॉलॉजिस्ट, by कर्नलतपस्वी
पाश्चात्य वैद्यकीय शब्दसंग्रहाला समांतर असा गावकऱ्यांचा शब्दसंग्रह असे व तो ओळखणे, समजणे व औषधोपचार करणे नवीन सुरवात करणाऱ्या डाॅक्टर करता एक अव्हानच असे.>>> अगदी बरोबर ! असे काही खास ग्रामीण शब्द ऐकण्यात आलेले आहेत जरा सावकाशीने लिहून काढतो
एकीकडे आपला ‘Insat 1 B’ अवकाशात भराऱ्या मारतोय अन दुसरीकडे हे ओढेनाले लोकांना गावाबाहेर पडू देत नाहीत. असे कितीतरी अडथळे आणि विसंगती.यात सुधारणा झाली असली, तरी अजूनही पावसाळ्यात ओढे-नाले ओलांडता न आल्यामुळे शिक्षण, आरोग्य या सुविधांपासून वंचित राहावं लागणं हे खूपच सर्वसामान्य आहे. एक जवळचं उदाहरण. मांजरी खुर्द नदीच्या पलिकडे आहे. पावसाळ्यात (वेगवेगळे) ८-१० दिवस नदीवरचा पूल पाण्याखाली जातो आणि हडपसर किंवा पुण्यात येणार्या विद्यार्थ्यांचा खोळंबा होतो. नोकरदार आणि तातडीच्या रुग्णांना वाघोली-खराडी मार्गे हडपसर किंवा पुण्यात न्यावे लागते. मांजरी गाव पुणे मनपामध्ये समाविष्ठ होऊन ३-४ वर्षे झालीत. वेल्हा, मुळशी, आंबेगाव, जुन्नर या सह्याद्रीच्या कुशीतील खेड्या-वस्त्या-वाड्यांची स्थिती कशी असेल?
“सन २००० पर्यंत सर्वांसाठी आरोग्य” हे स्वप्न साकार होण्याआधी ‘गरिबी हटाव’ पूर्णतः साध्य होणे आवश्यक आहे.हे हे हे! आता २०२२ सुरू आहे. आणि हा लेख अजून ४१ वर्षांनी तुम्ही "एका लेखाचे सहस्रचंद्रदर्शन" नावाने पुनर्प्रकाशित केला तरी तो Contemporary वाटेल.
“काय मग. मुलेबाळे किती?” “ पाच मुली आणि एक मुलगा ! आपल्या सर्व सवलती सरकारने बंद केल्यास बघा !” (त्याचाही अभिमान) “अहो, निदान तुम्हाला तरी संततिनियमनाचे महत्त्व कळायला नको का ?” “डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!” एकदा मुलगा झाल्यावर मात्र नसबंदी करून घेण्याकडे वाढता कल जाणवे; त्यातही अर्थात पुरुषापेक्षा स्त्रीचीच.मला अशी किमान चार कुटुंबे माहिती आहेत. तीन मुली झाल्यावर नवर्याचा चौथ्या प्रयत्नासाठी आग्रह असतो आणि बायकोला आणखी एक बाळंतपण नको असतं. "आता पुरे" असा आग्रह बायकोने सुरू ठेवल्यास तिची परिस्थिती त्या चौथ्या बाळंतपणापेक्षा वाईट होते!
In reply to रोचक आठवणी by तुषार काळभोर
यात सुधारणा झाली असली, तरी अजूनही पावसाळ्यात ओढे-नाले ओलांडता न आल्यामुळे शिक्षण, आरोग्य या सुविधांपासून वंचित राहावं लागणं हे खूपच सर्वसामान्य आहे.>>> +११११ अगदी बरोबर. अत्यंत वास्तव मांडलेत. यासंदर्भात एकदा डॉ. अभय बंग यांनी एक प्रयोग केला होता. त्यात त्यांनी अगदी लहान खेड्यातील एका हगवण झालेल्या बालकाच्या केसचा अभ्यास केला. त्या बालकाचा आजार तीव्र झाला आणि त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी पोचेपर्यंत सुमारे २४ प्रकारचे अडथळे आले आणि ते योग्य रुग्णालयात पोहोचू शकले नाही. ते बालक दगावले. यावर त्यांनी एक अहवाल शासनाला सादर केला होता. त्या अडथळ्यांमध्ये आर्थिक परिस्थितीपासून अनेक नैसर्गिक, सामाजिक अडथळे वगैरे असे तपशील होते. अशा प्रकारच्या अनुभवातून त्यांनी ‘आरोग्य सेवा’ संदर्भात एक छान विचार असा मांडलेला आहे : “ One accurate measurement is infinitely superior to a thousand intelligent opinions”.
In reply to रोचक आठवणी by तुषार काळभोर
हे हे हे! आता २०२२ सुरू आहे. आणि हा लेख अजून ४१ वर्षांनी तुम्ही "एका लेखाचे सहस्रचंद्रदर्शन" नावाने पुनर्प्रकाशित केला तरी तो Contemporary वाटेल.>>> असे बिलकुल होऊ नये ! “आपण आशावादी असावे, ज्या काही सुधारणा होणे अपेक्षित असतात त्यात आपलाही वाटा असावा” वगैरे विचार डोक्यात कायम गर्दी करतात. परंतु इच्छा, अपेक्षा आणि वास्तव या फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असो. बघूया काय होतेय...... निदान अजून वीस वर्षांनी !
In reply to आणि मुख्य म्हणजे हे ठिकाण by चौकस२१२
असो गम्मत केली हो ...गंमत आवडली तर ! त्याचं काय आहे ना.... निव्वळ एखादी क्वार्टर्स समोर असणे आणि दिवसाचे आठ तास प्रत्यक्ष एखादी सहकारिणी बरोबर काम करत असणे यात फार फरक आहे हो 😀 🙏
In reply to वा डॉक्टर by राजेंद्र मेहेंदळे
अजुनही नवशिक्या डॉ. ना खेड्यात ईटर्नशिप करावी लागते का?>> अलीकडे खेड्यातील (बहुतेक) २/३ महिनेच असावी. (१०/९ महिने शहरातील रुग्णालयात). सरकारी कॉलेजमध्ये इंटरनशिपचे बर्यापैकी विद्यावेतन मिळते. खाजगी कॉलेजमध्ये विनावेतन करावी लागते. माफ कोणालाच नसते.
In reply to स्मरणरंजन by वामन देशमुख
लहानणी मेलडी चॉकलेट खायचे आणि मोठेपणी माला-डी गोळ्या खायच्याप>>> मस्त, आवडले ! इतर घोषणाही सर्व आठवल्या. त्या काळी अजून एक सुंदर व्यंगचित्र आरोग्य विभागाने काढले होते. त्यात नवव्या महिन्यात इतके पोट वाढलेला पुरुष दाखवला होता आणि खाली लिहिले होते : “पुरुषांवर अशी वेळ आली असती तर त्यांनी नक्कीच प्राधान्याने कुटुंब नियोजनाचा विचार केला असता !”
In reply to स्मरणरंजन by वामन देशमुख
One accurate measurement is infinitely superior to a thousand intelligent opinions
In reply to सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार ! by हेमंतकुमार
In reply to हे विचारही वाचायला आवडतील. by शाम भागवत
एकीकडे आपला ‘Insat 1 B’ अवकाशात भराऱ्या मारतोय अन दुसरीकडे हे ओढेनाले लोकांना गावाबाहेर पडू देत नाहीत.>>> देशातील सर्वांच्या मूलभूत गरजा भागल्याशिवाय आपण वैज्ञानिक प्रगतीवर किती लक्ष द्यावे आणि खर्च करावा हा खूप विचार करण्याचा मुद्दा आहे. आजही माझ्याकडे याचे समाधानकारक उत्तर नाही ! परंतु, वैज्ञानिक, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजधुरिणांची काही अभ्यासपूर्ण मते वाचनात आलेली आहेत. त्यावर मी विचार करत राहतो. तरीसुद्धा विधानाच्या कोणत्या भागाकडे अधिक आणि प्राधान्याने लक्ष द्यावे हा पेच मला कोड्यात टाकतो.
In reply to हे विचारही वाचायला आवडतील. by शाम भागवत
दारू पिऊन बायकोला मारझोड करणारा नवरा हा आर्थिक व सामाजिक विषमतेतूनच निर्माण होत नाही का?>>> प्रथम ही जी निंद्य व्यक्ती आणि प्रवृत्ती आहे त्या दोन्हीचा निषेध. पण असा पुरुष समाजात निर्माण व्हायला तो एकटा जबाबदार आहे का ? आजूबाजूचा समाज देखील कारणीभूत असतो ना? या दोष- जबाबदारीची जर व्यक्ती आणि समाज अशी विभागणी करायची झाली, तर ती आपण कशी करावी: 99 :1 80 :20 का 50: 50 ? पुन्हा एकदा विचारांच्या गर्तेत पडायला होते.
In reply to मस्त लिहिला होतात कि हा लेख चाळीस वर्षांपूर्वी by टर्मीनेटर
In reply to आणखी एक by चष्मेबद्दूर
In reply to आणखी एक by चष्मेबद्दूर
In reply to आणखी एक by चष्मेबद्दूर
In reply to डॉक्टर शहा असे का विचारायचे ? by चौकस२१२
In reply to डॉक्टर शहा असे का विचारायचे ? by चौकस२१२
भात खाल्ल्याने जखमेत पू होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.याबद्धल दुमत नाहीच, पण भात, वांगी वगैरे पदार्थ खाल्ल्याने पू होतो असे आमच्या लहानपणी सगळेच मोठे लोक (गावातील डॉक्टर्स देखील) सांगायचे. मीदेखील आत्तापेक्षा लहान असताना खूप धडपड्या होतो आणि बऱ्याचदा कुठेतरी काहीतरी लागलेले असायचे. मग भात खायला मिळायचा नाही. --- अवांतर १: पू, शेंबूड इत्यादी बाबी २०-३०-४० वर्षांपूर्वीच्या तुलनेत आजकाल कमी झाल्यात का? अवांतर २: आमच्या शाळेच्या पुस्तकांत पटकी, विषमज्वर, गोवर, स्पायरोगायरा वगैरे रोग असायचे; आजकाल कमी झालेत का?
In reply to भात खाल्ल्याने जखमेत पू होतो by वामन देशमुख
In reply to वा. दे., by हेमंतकुमार
In reply to त्यामुळे अलीकडे तज्ञांचे असे by चौकस२१२
In reply to आपण असे म्हणूया... by हेमंतकुमार
In reply to भात खाल्ल्याने जखमेत पू होतो by वामन देशमुख
आमच्या शाळेच्या पुस्तकांत पटकी, विषमज्वर, गोवर, स्पायरोगायरा वगैरे रोग असायचे; आजकाल कमी झालेत का?स्पायरोगायरा नावात रोग असला तरी ती वनस्पती/शैवाल असायची ना? आकृती काढताना त्याची ती डीएनए सारखी संरचना लक्शात आहे अजून.
In reply to स्स्पायरोगायरा ? by सुरिया
In reply to भात खाल्ल्याने जखमेत पू होतो by वामन देशमुख
In reply to भात खाल्ल्याने जखमेत पू होतो by वामन देशमुख
In reply to लागले ख आणि प्रतिसाद दोन्ही by प्राची अश्विनी
लाखों मे एक"ही मालिका कोणत्या ओटीटीवर आहे ?
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
ही मालिका कोणत्या ओटीटीवर आहे ?अॅमेजॉन प्राईमवर..
In reply to ही मालिका कोणत्या ओटीटीवर आहे by तर्कवादी
In reply to अरे वा, by हेमंतकुमार
मग सवडीने नक्की बघेन.जमल्यास अभिप्रायसुद्धा द्या.. अशा वेबमालिका फारसं कुणी बघत नाही. बहुतेकांना वेगवान थ्रिलरच फक्त बघायच्या असतात.
In reply to अरे वा, by हेमंतकुमार
मग सवडीने नक्की बघेन.दुसरे पर्व बरं का .. म्हणजे पहिलेही तुम्ही बघू शकता पण मी ते पाहिलेले नाही त्यामुळे मी इथे फक्त दुसरे पर्व सुचवत आहे.
In reply to मग सवडीने नक्की बघेन. by तर्कवादी
In reply to तर्कवादी, by हेमंतकुमार
In reply to हा दुवा बघा by तर्कवादी
In reply to ही मालिका कोणत्या ओटीटीवर आहे by तर्कवादी
In reply to खूपच छान अनुभवकथन! by नचिकेत जवखेडकर
हे सरकारमान्य आहे का ?खरं म्हणजे नाही, परंतु आपल्याकडे नियमांची कडक अंमलबजावणी होत नाही. मध्यंतरी आयुर्वेदिक डॉक्टरांना काही ठराविक प्रकारच्या शल्यक्रिया करण्यासाठी परवानगी दिल्याचे वाचले होते. त्यावर खूप वाद झाला पुढे त्या प्रकरणाचे काय झाले ते माहित नाही. कदाचित न्यायप्रविष्ट असावे.
“ हो, इंटर्नशिपसाठी आलोय, प्रशिक्षण असतं आमचं” “म्हंजे शिकावू डॉक्टर म्हना की !” ... च्यायला, अगदी चिमणीच पाडली साल्यानं.
“अहो, निदान तुम्हाला तरी संततिनियमनाचे महत्त्व कळायला नको का ?” “डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!”
“डॉक्टर, आम्ही काय पैशासाठी आपरेशन करतो का? ते जादूवाली भानगड काय नगं. पद्धतशीर टाक्याचे आपरेशन होऊ द्या. पायजे तर आम्ही पैसे देतो !”अश्या खुसखुशीत किस्स्यांमुळे लेख अ ति शय वाचनीय झाला आहे ! ३०-३५ वर्षांपुर्वी माझा एक डॉक्टर नातेवाईक उमेदवारीच्या काळात पानशेतजवळच्या दुर्गम भागात प्रॅक्टीस करत असे ... त्याच्या बरोबर ५-७ दिवस राहण्याचा योग आला ... असेच काहीबाही किस्से घडायचे त्याची आठवण झाली ! खुप छान कुमार१ साहेब ... आणखी किस्से वाचायला आवडतील !
In reply to सुंदर लेख ! by चौथा कोनाडा
In reply to सुंदर लेख ! by चौथा कोनाडा
In reply to 'युनिव्हर्सिटी ऑफ पूना', 'दोन by अनिंद्य
In reply to कुमारेक लेखन शैलीचा रोचक लेख by चामुंडराय
कोणते खाद्यपदार्थ कोणत्या आजारासाठी तारक किंवा मारक आहेतशंका योग्य आहे. आधुनिक वैद्यकातही ठराविक गोष्टी खाव्यात किंवा खाऊ नयेत असे काहींच्या बाबतीत सप्रमाण सिद्ध केले गेलेले आहे. ते स्पष्टीकरण आपल्याला समजते आणि पटते. पारंपरिक माहितीच्या बाबतीत असे संशोधन संदर्भासहित स्पष्ट केलेले वाचायला मिळाले तर आनंदच होईल.
In reply to कुमारेक लेखन शैलीचा रोचक लेख by चामुंडराय
चटपटीत आणि छान लेख हो.