.img1 {
float: left;
width:50%;
margin-right:15px;
margin-top:32px;
}
.img2 {
float: right;
margin-left:15px;
width:50%;
margin-top:32px;
}
लैंगिक आकर्षण आणि शरीरसंबंध हा एक मूलभूत मानवी गुणधर्म आहे. वयात येण्याच्या दरम्यान जे काही शारीरिक बदल घडतात त्यातून हे आकर्षण निर्माण होते. हा लेख स्वानुभवकथन असल्यामुळे फक्त भिन्नलिंगी आकर्षण या दृष्टिकोनातून लिहिला आहे.
साधारणतः कॉलेज शिक्षणादरम्यानच्या वयात तरुणांमध्ये स्त्रीदेहाबद्दलची ओढ तीव्र होत असते. त्यावेळेस प्रत्यक्ष स्त्री-सहवास आणि शरीरसंबंध या गोष्टी तशा दूर असतात. किंबहुना त्या बहुसंख्यांच्या वाट्याला येत नाहीत. (ज्या थोड्या फार लोकांना त्यात यश येते त्यालाही चोरटेपणाची किनार असते). मात्र त्या संदर्भातील कल्पनाविलास हा सर्व तरुणांच्या मनात सतत चालू असतो. मग ती मानसिक भूक शमविण्यासाठी विविध प्रकारच्या लैंगिक साहित्याचा अनुभव घेतला जातो. अशा साहित्यप्रकारांत ऐकीव ज्ञान, लिखित माहिती आणि दृश्य माध्यमांचा समावेश होतो.
आज आंतरजालाच्या व्यापक उपलब्धतेमुळे लैंगिकतेसंदर्भातल्या अगणित दृश्यफिती आपल्याला सहज पाहता येतात. ते सर्व अनिर्बंध स्वरूपात उपलब्ध आहे. परंतु सुमारे ४० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. तेव्हा मुख्यत्वे मौखिक व लिखित प्रकारे या विषयाच्या माहितीची मर्यादित देवाणघेवाण होई. कालांतराने या परिस्थितीत बदल होत आपण आजच्या मुक्तस्त्रोत स्थितीत पोचलो आहोत. या साहित्याची गेल्या चार दशकांतील स्थित्यंतरे आणि माझे तारुण्यातील अनुभव या लेखाद्वारे सादर करीत आहे. स्वानुभव लिहीत असल्यामुळे या पुढचा पूर्ण लेख फक्त पुरुषी दृष्टिकोनातून लिहिलेला आहे.
सुरुवात करतो प्राथमिक शाळेपासून. साधारण इयत्ता चौथी होईपर्यंत लैंगिक अवयवांना दिलेली बोलीभाषेतील नावे माहीत झाली. त्यावरून एकमेकांना चिडवणे इतपतच मजल पोचली होती. “मी मुलगा आहे”, ही जाणीव पक्की होण्यापलीकडे त्या वयात फारसे काही घडले नाही.
माध्यमिक शाळेतील दीर्घकाळ हा खऱ्या अर्थाने या बाबतीत जडणघडणीचा ठरतो. या शाळेत ‘असल्या’ साहित्याची प्रथम ओळख झाली ती स्वच्छतागृहांतील भिंतींवर ! इथल्या साहित्यात लेखी मजकूराबरोबर कसेबसे घाईत काढलेल्या रेखाचित्रांचाही समावेश होता. स्त्री व पुरुषांच्या जननेंद्रियांची चित्रे काढून ती एकत्र गुंफलेली दाखवणे हा इथल्या ‘लेखकांचा’ आवडता उद्योग होता. हे साहित्य प्रसवण्याची दोन ठिकाणे असतात - मूत्रालय आणि शौचालय. या दोन्ही ठिकाणच्या भिंतीवरील साहित्यामध्ये गुणात्मक फरक असतो.
त्या काळी शाळांमध्ये बेशिस्तीच्या कारणांवरून विद्यार्थ्यांना वेताच्या छड्या व अन्य मार्गांनी मार देण्याची पद्धत होती. शाळेत उशिरा येण्यापासून या छडीचा प्रसाद खावा लागे. या कामासाठी जे शिक्षक नेमलेले असत ते मारकुटे म्हणून प्रसिद्ध होत. मग काय, अशा शिक्षकांना स्वच्छतागृहातील भिंतींवर विद्यार्थी अगदी ‘मानाचे स्थान’ देत. त्यांचा उद्धार करून त्यांच्या नावे विविध लैंगिक मजकूर मोकळेपणाने लिहिलेला असे. इथल्या भिंतलेखकांमध्ये काही प्रकार होते. पेन्सिल किंवा पेनने लिहिणारे विद्यार्थी म्हणजे सामान्य किंवा नवोदित लेखक. दर्दी असणारे विद्यार्थी त्यांचा मजकूर कर्कटकने भिंतीवर कायमस्वरूपी कोरून ठेवत. तो मजकूर आपली इयत्ता पाचवीपासून ते दहावीपर्यंत सोबत करी. शाळा सोडल्यानंतर काही वर्षांनी शाळेत जाणे झाले तेव्हा कुतूहलाने स्वच्छतागृहाला भेट दिली. नवी रंगरंगोटी झाल्याने जुने साहित्य नष्ट झालेले असले तरी या भिंती आता नव्या लेखकांच्या साहित्याने नटलेल्या होत्या ! एकंदरीत लैंगिक लेखन-वाचनाची पायाभरणी इथल्या भिंतींवर होते हे नाकारण्यात अर्थ नाही. या भिंतींच्या जोडीला वर्गातील बाक हे देखील असले साहित्य प्रसवण्याच्या दुय्यम जागा असतात. मुळात भिंतींवर वा बाकांवर काहीतरी लिहिणे हा जरी बेशिस्तीचा भाग असला, तरी त्या वयातील विद्यार्थ्यांच्या उर्मीचे ते एक प्रकटन असते असे म्हणता येईल.
त्याकाळी सरकारी पातळीवरून कुटुंबनियोजनाचा जोरदार प्रचार असे. यामध्ये दोन किंवा तीन पुरेत, लाल त्रिकोण व निरोध यांचा उल्लेख असलेल्या जाहिराती ठळकपणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी असत. त्या वाचून मित्रपरिवारात निरोधचा उपयोग यावर कुतूहलयुक्त चर्चा झाल्याच्या आठवतात.
शाळा संपवून आता कॉलेजमध्ये प्रवेश केला. तेव्हा अकरावी शाळेत झाली होती व बारावीचे एकच वर्ष विज्ञान महाविद्यालयात होतो. एकंदरीत ते वर्ष घासून अभ्यासाचे वगैरे असल्याने लैंगिक साहित्याचा नवा शोध वगैरे काही लागला नाही. मित्रांच्या गप्पांतूनच जी काय माहितीची देवाण-घेवाण झाली तेवढेच.
पुढे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. माझे काही मित्र अन्य अभ्यासशाखांमध्ये गेले. असे वेगवेगळ्या ठिकाणी शिकणारे मित्र एकमेकांच्या वसतिगृहांना अधूनमधून भेटी देत. त्यातूनच लैंगिक कथांच्या छोट्या पुस्तकांची देवाणघेवाण सुरू झाली. तेव्हा ही पुस्तके शहरातील काही मोजक्या पदपथांवर मिळत. तेव्हा तरी त्यांना ‘पिवळी पुस्तके’ असे नाव काही पडलेले नव्हते. ती अगदी अन्य पुस्तकांप्रमाणेच पांढरी दिसत. या पुस्तकांकडे जाण्याण्यापूर्वी वैद्यकीय विद्यार्थ्यांबाबत एक विशेष माहिती लिहितो.
या अभ्यासात कॉलेजच्या पहिल्याच वर्षी शरीरक्रियाशास्त्र हा विषय असतो. एखादा मुलगा जेव्हा त्याचे पाठ्यपुस्तक विकत घेई तेव्हा त्यातील ‘ते’ प्रकरण प्रथम वाचायची त्याला जबरदस्त घाई असे. ते पुस्तक उघडल्यानंतर एक लक्षात येते ते म्हणजे, हृदय, फुप्फुसे, पचनसंस्था या क्रमाने पुढे जात ‘जननेंद्रियांची कार्ये’ हा धडा पुस्तकाच्या शेवटच्या भागात असतो. पुस्तकाची पहिली तीनचतुर्थांश पाने एका दमात उलटून टाकून विद्यार्थी या कुतूहलाच्या विषयात शिरतो. त्यातही वयात येतानाचे बाह्य शारीरिक बदल, बीजांडे, मासिक पाळी इत्यादी माहिती मागे सारून थेट संभोग या विषयावर झडप घातली जाते. एकदा का ते वर्णन वाचले, की आत्मा कसा शांत होतो. जणू काही स्वतःलाच ते सुख क्षणभर मिळाल्याचा भास होतो ! आपले अन्यत्र शिकणारे मित्र ही माहिती कुठल्यातरी चटोर पुस्तकातून वाचत असतात. तीच माहिती आपण आज अधिकृत पाठ्यपुस्तकात वाचल्याने मनात काहीशी श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते.
वैद्यकीय अभ्यासात दुसऱ्या वर्षी न्यायवैद्यकशास्त्र हा विषय असतो. त्यात बलात्काराचा बराच शास्त्रीय उहापोह असतो. त्याची पूर्वपीठिका म्हणून कुमारी स्त्रीच्या योनीवर एक स्वतंत्र प्रकरण असते. त्यामध्ये योनीचे विविध आकार, त्यांची सचित्र माहिती, योनीपटलाचे (hymen) प्रकार आणि कौमार्य हे प्रचंड उत्सुकतेचे विषय हाताळलेले असतात. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असतानाच या दुसऱ्या वर्षाच्या विषयाची कुणकुण लागते. मग मुलांना कुठला दम धरवणार ? फावल्या वेळात ग्रंथालयात जाऊन त्या विषयाचे पुस्तक अधाशीपणे घेतले जाते. मग त्यातली वरील प्रकरणे वाचून हातावेगळी केल्यावर एक वेगळेच समाधान मिळते. जेव्हा विद्यार्थी प्रत्यक्षात दुसऱ्या वर्षात प्रवेश करतात तोपर्यंत ही मूलभूत माहिती त्यांच्या दृष्टीने शिळी झालेली असते.
कॉलेजच्या स्वच्छतागृहांमध्ये शाळेच्या तुलनेत भिंतसाहित्याचे प्रमाण खूप कमी झालेले दिसले. परंतु ते शून्य होत नाही. या वयातही काही जणांमध्ये तिथे लिहिण्याची उर्मी टिकून असते. आता त्या साहित्यातील अर्वाच्चपणा कमी होऊन त्याला काहीशी सौंदर्यदृष्टी येते. वर्गातील बाकांवरील लेखनात तर ती अधिक जाणवते. तिथे वाचलेले काही लैंगिक विनोद आणि मार्मिक टिपण्या कायमस्वरूपी स्मरणात आहेत. त्या वयामध्ये विद्यार्थी या विषयातील कोंडलेली वाफ अशा लिखाणातून मुक्त करीत असतात. या वर्तनावर फार शिस्तीचा बडगा दाखवून उपयोग होत नाही हे लक्षात येते.
आता परत वळतो तथाकथित पिवळ्या पुस्तकांकडे. वसतिगृहात राहिल्याने या पुस्तकांचे वाचन अगदी मनमोकळेपणाने करता आले. अशी तीन चार पुस्तके एकमेकांच्या खोल्यांमधून फिरत असत. त्यांचा नक्की खरेदीदार कोण हे कधी कळायचे नाही. ती वाचण्यात मात्र सर्वांचाच वाटा असायचा. ती सर्व इंग्लिशमध्ये होती. त्यातल्या कथा बर्यापैकी रंजक असत. स्त्रीदेहाची इत्थंभूत वर्णने कलात्मक असायची. एकंदरीत त्या अवयवांचा मोठ्ठा आकार हा त्या वर्णनातील ठळक भाग असायचा. त्या वाचनातून अशा ‘मोठे’पणाच्या वर्णनाची अनेक विशेषणे, तुलनात्मक शब्द व त्यांचे लाक्षणिक अर्थ ही ज्ञानप्राप्ती झाली. Voluptuous हा शब्द मी आयुष्यात प्रथम या पुस्तकांत वाचला आणि तो मेंदूत कायमचा कोरला गेला. त्याकाळी थेटरातले चित्रपट वगळता एकूणच रंजक दृश्यमाध्यमांचा तुटवडा होता. त्यातही काही प्रौढांसाठीचे इंग्लिश चित्रपट सोडले तर बाकी चित्रपट लैंगिकदृष्ट्या सामान्य प्रकारचे असायचे. त्यामुळे लैंगिक वाचन हे महत्त्वाचे मनोरंजनसाधन होते. त्यातून जर का अशा पुस्तकाचे वाचन एकांतात केले, तर त्यातून होणारे विलक्षण कल्पनारंजन हे वर्णनातीत असायचे. आजही असे रंजन मला प्रत्यक्ष दृश्य पाहण्यापेक्षा अधिक आनंद देते. लिखित माध्यमाचे हे सामर्थ्य कालातीत आहे.
आमचा एक अभियांत्रिकीचा मित्र खास ही पुस्तके वाचण्यासाठी आमच्या खोलीत आला होता. त्याने गादीवर बसून भिंतीला पाठ टेकून आणि पाय पोटाशी घेऊन असे एक पुस्तक प्रथम वाचले. वाचून उत्तेजित झाल्यावर तो आम्हाला म्हणाला, “यार, फारच भारी आहे हे. आता १० मिनिटे तरी मी उठून उभा राहू शकणार नाही !” या उद्गारातून त्या लेखनसामर्थ्याचा मुद्दा लक्षात यावा. त्या वयातील या प्रकारच्या वाचन, मनन व सामूहिक चर्चेने एका रंजक स्वप्नसृष्टीला जन्म दिला हे निःसंशय. पदवीचे शिक्षण संपल्यावर मित्रांत त्या छोट्या पुस्तकांची विभागणी झाली. प्रत्येकाने असे एकेक पुस्तक आठवण म्हणून पुढे दीर्घकाळ जपले होते.
वरील छोट्या पुस्तकांबरोबरच अन्य एका मासिकाचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे Debonair. आमच्या कोणाच्याच बाबतीत हे मासिक घरात येण्याची शक्यता बिलकुल नव्हती आणि घरी न सांगता त्याची रीतसर मासिक वर्गणी भरण्याइतपत आम्हा मित्रात कोणी सधन नव्हते. त्यामुळे जुन्या बाजारातून त्याचे काही अंक कोणीतरी घेई आणि मग ते खोल्यांमधून फिरत. त्या मासिकातल्या ‘मधल्या’ पानावरील (centerspread) मुक्त अंगप्रदर्शन केलेल्या स्त्रीचा फोटो हे तरुणांचे मुख्य आकर्षण असे. ते मधले पान बर्याच मोठ्या आकाराचे असे व ते घडी घातलेल्या स्वरूपात मासिकात समाविष्ट असे. ते काढून कोणाच्यातरी खोलीतील भिंतीवर यथावकाश स्थानापन्न होई. असे एखादे नवे चित्र एखाद्या खोलीत लागले की त्या खोलीचा भाव एकदम वधारत असे. तरुणांमध्ये या मासिकाचे आकर्षण त्या फोटोपुरतेच असले तरी हीच त्याची मर्यादा नव्हती. त्यात काही माहितीपूर्ण लेख, राजकीय टिप्पणी आणि खुशवंतसिंग (आणि तत्सम मंडळी) यांचे लैंगिक विनोद असेही साहित्य असे. एकूण ते मासिक तसा आब राखून होते. लैंगिक शिक्षणाच्या रोखाने असलेला त्यातला एक लेख आजही आठवतो. त्यात लेखकाने पुरुषाच्या हस्तमैथुनाची अटळता व उपयुक्तता छान मांडली होती. या क्रियेने अविवाहित अवस्थेत पुरुषाच्या लैंगिक सुखाचा प्रारंभ होतो. पण तितकेच त्याचे महत्त्व नसून ती क्रिया प्रत्येक पुरूषाची आयुष्यभराची सोबत असते, हा मुद्दा मनावर अगदी ठसला. विवाहित पुरुषाच्या आयुष्यातसुद्धा अनेक कारणांनी कधी ना कधी एकटेपणाचे प्रसंग येतातच. तेव्हा या क्रियेचे महत्त्व समजून येते.
.
प्रत्यक्ष संभोग आणि कल्पनारंजनातून केलेले हस्तमैथुन ही दोन वेगळ्या पातळ्यांवरील सुखे आहेत हे अनुभवांती लक्षात येते. कालांतराने डेबोनेरला स्पर्धक म्हणून ‘फॅन्टसी’ नावाचे तसेच एक मासिक निघाले होते. त्यांचे फोटो अधिक गुळगुळीत कागदावर छापलेले असायचे. त्याकाळी पाश्चात्त्य जगातले ‘प्लेबॉय’ फक्त ऐकून माहिती होते. आमच्यातील एका बढाईखोराने, ‘कधीतरी मी सर्वांसाठी एक अंक मिळून दाखवेनच’ असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात काही ते घडले नाही. थोडक्यात, डेबोनेर म्हणजे गरिबांचे प्लेबॉय असे समजून आम्ही दुधाची तहान ताकावर भागवून घेतली होती !
याखेरीज निरोधची रिकामी पाकिटे जमवणे हा त्या काळातील सामायिक छंद असायचा. त्या पाकिटांवरील विविध प्रकारचे स्त्रियांचे फोटो पाहणे हीसुद्धा तारुण्यातील रंजनाची एक महत्त्वाची गरज ठरते. शाळेत असताना काडेपेट्यांवरील चित्रे साठवणारे आपण आता ही पाकिटे साठवायला लागल्याचे स्थित्यंतर स्वतःलाच रंजक वाटले !
हस्तमैथुनासंबंधी गैरसमज पसरवणाऱ्या जाहिराती हाही या साहित्याचा एक भागच म्हटला पाहिजे. या जाहिराती विविध सार्वजनिक भिंती, पत्रके आणि नियतकालिकातून फिरत असायच्या; आजही असतात. असे गैरसमज पसरविणारी मंडळी त्यातून तरुणांमध्ये भयगंड निर्माण करतात आणि त्या बळावर आपली दुकाने थाटतात. आम्ही जरी वैद्यकीय शिक्षण घेत होतो तरीसुद्धा अशा सार्वजनिक अपप्रचाराचा मनावर कळत-नकळत परिणाम व्हायचा. एकदा असेच आम्ही चौघे बसलो असता हा विषय चर्चेस आला आणि त्यावर तब्बल दोन दिवस साधक-बाधक चर्चा घडली. त्यातून गैरसमज दूर व्हायला चांगली मदत झाली. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षी गुप्तरोगशास्त्राच्या प्राध्यापकांनी त्यांच्या पहिल्याच व्याख्यानात वर्गात खणखणीत आवाजात सांगितले, की हस्तमैथुन ही पूर्णपणे नैसर्गिक व अपायविरहित क्रिया आहे. ते ऐकल्यावर खऱ्या अर्थाने आम्ही मैथुनसाक्षर आणि निर्भीड झालो.
पदवीचे शिक्षण संपताना अजून एका साहित्याचा शोध लागला. “प्रत्येक नवविवाहिताने वाचावेच” असे पुस्तक आपल्या मायमराठीतच उपलब्ध होते- अगदी दर्जेदार प्रकाशनाने काढलेले. कोणीतरी ते मिळवले आणि मग त्याचे सामूहिक वाचन झाले. त्यामध्ये प्रणयाराधन ते संभोग या सगळ्याचे तपशीलवार शिस्तीत वर्णन आणि संबंधित सल्ले होते. “आमचे हे पुस्तक वाचा आणि मग आयुष्यभर या सुखाचा मनमुराद आनंद लुटा”, अशी त्याची पुस्तकाच्या मलपृष्ठावर रास्त जाहिरात केलेली होती. पुढील आयुष्यात माझे काही नातेवाईक त्यांच्या लग्नापूर्वी माझ्याशी मोकळी चर्चा करायला आले होते तेव्हा मी त्यांना ते पुस्तक वाचण्याची जोरदार शिफारस केली. त्यातील एकाला तर मी ते त्याच्या लग्नात भेट म्हणून दिले.
अशा तऱ्हेने पदवीची परीक्षा पूर्ण होईपर्यंत वरील प्रकारच्या लैंगिक साहित्याचा परिचय झाला. त्यातील महत्त्वाचा वाटा लिखित साहित्याचाच होता हे लक्षात येईल. लैंगिक दृश्य माध्यमांशी संपर्क इथून पुढच्या आयुष्यात आला.
एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यावर एक वर्ष इंटर्नशिपचा कार्यक्रम असतो. त्यातील पहिले सहा महिने ग्रामीण भागात काम करायचे होते. त्याकाळी घरोघरी टीव्ही संच स्थिरावले होते. परंतु टीव्हीला व्हीसीआर जोडून पाहण्याचे तंत्र थोड्याच लोकांकडे असायचे. बरेच लोक एखादा वेगळा चित्रपट पाहण्यासाठी व्हीसीआर यंत्रणा (कॅसेटसह) भाड्याने आणत. अशा कॅसेट लायब्ररीजची तेव्हा चलती होती. अनेक नव्या जुन्या चित्रपटांच्या कॅसेटस हळूहळू उपलब्ध झाल्या. उघड संभोगक्रिया दाखवणारे चित्रपट सर्रास दाखवण्यास भारतात तरी तेव्हा परवानगी नव्हती. त्यातून मग या प्रांतातील चोरटेपणा सुरू झाला. लैंगिक दृश्यपटांना तेव्हा ब्लू फिल्म असे म्हणत. मूळ परदेशी शब्द ब्लू पिक्चर (BP) असा होता. या दृश्यपटांचे विविध स्तर होते आणि त्यांना X गुणांकन दिलेले असायचे ( X, 2X, 3X इत्यादी). त्यातले X म्हणजे काहीतरी गुळमुळीत असायचे- स्त्री-पुरुष मैत्री इतपतच. 2X म्हणजे थेटरातल्या एखाद्या प्रौढांच्या इंग्लिश चित्रपटाइतके. 3X म्हणजे उघड शरीरसंबंधाची दृश्ये. अशा प्रकारच्या कॅसेट्स काही लायब्ररीजमध्ये दडवून ठेवलेल्या असत. त्या दुकानांचे चालक त्या फक्त ओळखीच्या लोकांना देत. अशा गिऱ्हाईकांची दुकानात ‘ते’ मागण्याची एक सांकेतिक पद्धत असायची.
आमच्या इंटर्नशिप दरम्यान आम्ही चार मित्र एकत्र रहात होतो. पूर्ण वेगळ्या गावात राहात असल्याने आता भरपूर मोकळीक होती. विद्यार्थीदशेतील बंधनांमुळे पूर्वी ज्या गोष्टी करता आल्या नव्हत्या त्या आता पूर्ण करायच्या होत्या. त्यातली एक म्हणजे 3X चित्रपट पाहणे. मग ते कुठे दाखवले जातात त्या अड्डयाचा पत्ता काढला. एका शनिवारी रात्री तिथे दाखल झालो. माणशी तिकिटाचे काही पैसे मोजले. एका घराच्या खोलीत दाटीवाटीने वीस माणसे मांडी घालून बसलो. त्यांत अनेक वयोगटांतील पुरुष होते. रात्री १० नंतर आजूबाजूला सामसूम झाल्यावर त्यांनी पूर्ण अंधारात अशा कॅसेटवरील दृश्यपट चालू केला. त्याच्या सुरुवातीस जवळपास दहा मिनिटे विविध धार्मिक चित्रे आणि त्यानुरूप काही मजकूर होता ! त्यावर, “हे काय?” असे आम्ही आश्चर्याने विचारले. तिथला माणूस म्हणाला, “अहो, आपण हे दाखवत असताना कधी पण पोलिसांची धाड पडू शकते. म्हणून या फिल्मच्या सुरुवातीस व शेवटी अशी चित्रे मुद्दाम घातलेली असतात. जर पोलिस आले तर आम्ही कॅसेट पटकन रिवाइंड करून त्यांना हे दाखवतो” (जसे काही पोलीस अगदी दुधखुळे होते !).
अशा त्या चोरट्या वातावरणात, पोलिसांची धाड वगैरे न पडता आम्ही आयुष्यातील पहिलीवहिली बीपी पाहिली. त्यानंतर मित्रपरिवारात ‘बीपी’ म्हणजे ‘भक्त प्रल्हाद’ असा सांकेतिक शब्दप्रयोग रूढ झाला होता ! या दृश्यपटांचा दर्जा तसा सुमारच असायचा. पुढे अजून एक दोनदा ते प्रकार पाहिल्यावर त्यातले आकर्षण संपून गेले. तसेच त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या अतिरंजित गोष्टी आणि वास्तव यात बराच फरक असतो याचेही भान आले.
कालांतराने आंतरजाल सुविधेत प्रगती होत गेली आणि असल्या कॅसेट्स मागे पडल्या. सध्या त्या इतिहासजमा झालेल्या दिसतात. लैंगिकपट विषयातली आजची प्रगती आणि परिस्थिती सर्वांसमोर आहेच.
...
असा हा माझा लैंगिक साहित्य अनुभवण्याचा प्रवास. आज याबाबतीत तृप्त स्थितीत असताना असल्या कशाचीच गरज भासत नाही. पण ज्या त्या वयात ती मानसिक भूक भागवण्याचे काम या साहित्याने केले आहे यात शंका नाही. आयुष्यातील विविध टप्प्यांवर आणि विशिष्ट परिस्थितीत अशा साहित्याची गरज निश्चित असते. अर्थात अशा दृश्यपटांमधून दाखवल्या जाणाऱ्या विकृत गोष्टींवर कायदेशीर विचारानुसार नियमन असावे. त्यातील अतिरंजित आणि अतिशयोक्त गोष्टीही त्याज्यच. पण संतुलित प्रौढ स्त्री-पुरुष संबंधांवर आधारित लिखित अथवा दृश्य साहित्याकडे पाहताना मनात छुपेपणाची भावना नसावी. त्याकडे समाजाने खुल्या मनाने पाहायला हरकत नाही.
………………………………………………………………………………………………..
प्रतिक्रिया
26 Oct 2021 - 11:08 am | प्रचेतस
व्वा...! भारी लेख.
आम्ही कॅसेटच्या जमान्यातले त्यामुळे ते अनुभव वेगळे. :)
26 Oct 2021 - 11:11 am | गवि
सहमत. तसली क्यासेट व्हिसीआरमधे अडकून बसली तर विविध प्रकारची गुंतागुंत.
26 Oct 2021 - 11:19 am | टर्मीनेटर
तोबा तोबा.... अशा प्रसंगी भलतीच त्रेधातिरपीट उडायची... विशेषतः घरचे परतण्याची वेळ झाली असेल तेव्हा असा प्रसंग उद्भवल्यास ज्याच्या कोणाच्या घरी असू त्याची अवस्था तर फारच दयनीय होऊन जायची 😀
26 Oct 2021 - 11:23 am | गवि
व्हिसीआर खोलण्याचे तंत्रशिक्षण ओपॉप आत्मसात केल्या गेले होते तेव्हा.
26 Oct 2021 - 11:23 am | प्रचेतस
अगदी अगदी.
शिवाय स्वतःच्या घरी कधीही व्हीसीआर आणून बघू नये असा अलिखित दंडक असे. तरीही एखाददुसरा बकरा मिळेच. शिवाय कॅसेटी कित्येकदा वापरलेल्या असल्याने अगदी अभावानेच चांगल्या असत. मुंग्याच खूप असणे, आवाजच न येणे हे प्रकार होत. अगदी पोस्टमनने बेल वाजवली देखील तरी पटकन उठून बंद करण्यासाठी त्रेधातिरपीट उडे.
26 Oct 2021 - 11:27 am | गवि
क्यासेटीचा काही भाग (दृष्ये) ही मागे पुढे करुन परत परत बघून लोकांनी पार जीर्ण केलेली असे. त्यात ते tracking की काय ते बिघडून जाऊन स्क्रीनभर आडव्या चकमकत्या रेघा येऊ लागत.
26 Oct 2021 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय....! ते लाव रे, ते भारी होतं. वगैरे.
-दिलीप बिरुटे
26 Oct 2021 - 11:56 am | ज्ञानोबाचे पैजार
कॅसेट चा उद्योग तर प्रत्येकाने केलेलाच असतो,
एकदा एका मित्रा कडे हा कॅसेट पहायचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि स्वस्तात का सोडायचे म्हणून एका वेळी ५ कॅसेट भाड्याने आणल्या, प्रत्येक केसेट वेगळी होती म्हणजे एकात परदेशी कलाकार, एकात भारतिय कलाकार तर एकात चक्क प्राणी होते, अख्खी रात्र जागुन त्या सगळ्या कॅसेट पाहिल्या होत्या आणि सकाळी उठून सगळे तसेच कॉलेज मधे गेलो होतो. आमचे चेहरे जरा वेगळे दिसत होते जो भेटेल तो विचारत होता "काय झाले?" म्हणून.
एकदा सहलीला गेलो होतो तेव्हा एका मित्राने बरोबर कॉन्डोम चे पाकिट आणले होते, पाहुन झाल्यावर त्याचे करायचे काय? मग त्याचे फुगे फुगवले आणि त्यानेच बराच वेळ खेळत बसलो होतो, त्या वेळेला ते केवढे थ्रिल वाटले होते.
लग्नाच्या आधी एका मित्राने विठ्ठ्ल प्रभुंचे "निरामय कामजीवन" हे पुस्तक वाचायला दिले होते, त्यातुन बरेचसे गैरसमज दुर होण्यास मदत झाली, बाकी मित्र होतेच मदतीला, पुस्तक वाचल्यावर त्याची एक प्रत सरळ विकतच घेउन टाकली, आणि त्यानंतर मात्र माझे कामजिवन खरोखरच निरामय झाले.
पैजारबुवा,
26 Oct 2021 - 12:08 pm | कुमार१
>>>>
अगदी ! ही आवश्यक गोष्ट आहे.
काही वर्षांपूर्वी जेव्हा लैंगिक शिक्षण या विषयावरून आपल्याकडे गदारोळ माजला होता तेव्हा एका वाचकाने मटा मध्ये लिहिलेले पत्र मला अजून आठवते.
त्यांनी लिहिले होते, की लैंगिक शिक्षण किंवा समुपदेशन प्रत्येकासाठी विवाहपूर्व असावेच.
26 Oct 2021 - 11:13 am | टर्मीनेटर
+१ 🙂
26 Oct 2021 - 11:31 am | कुमार१
तुमच्यापैकी अनेक जण कॅसेटमित्र होते ते ऐकून धन्य झालो ! 😀
कॅसेट खोलणे वगैरे मजा फारच भारी वाटल्या. 😎
27 Oct 2021 - 8:04 am | तुषार काळभोर
+१
सहमत!
दृश्य माध्यमात कॉलेजमध्ये सीडी ते पुढे pornhub व्हाया "चाळीस जीबी स्टडी नावाचा फोल्डर" असा आमच्या काळातील प्रवास होता.
जवळ राहणाऱ्या मित्रांत दोन मित्र लोकप्रिय होते, कारण त्यांचे पालक दोघे नोकरी करणारे होते. आणि दोघे मित्र एकुलते एक होते. त्यामुळे त्यांची घरे सार्वजनिक "अभ्यासिका" होत्या. वेळेची खात्री असल्याने गडबड वगैरे कधी झाली नाही. अगदी निवांतपणा असायचा.
26 Oct 2021 - 11:10 am | गवि
उत्कृष्ट लेख. नेहमीप्रमाणे कुमारेक स्टाईल दिलखुलास.
अनेकांना याच्याशी रिलेट करता येईल असं वाटतं. बरेच तपशील अगदी असेच असतात प्रत्येकाच्या आयुष्यात.
असे लेख आणखी यावेत.
26 Oct 2021 - 11:10 am | टर्मीनेटर
भारी आहे लेख! अनुभवकथन आवडले.
'डेबोनेर' आणि 'प्लेबॉय' शी आमची ओळख आठवीत असतानाच झाली होती. आमच्या एका मित्राच्या (तो मित्र आता मिपाकर झालाय 🙂) वडिलांना ही दोन आणि अशी अन्य मासिके संग्रहित करण्याचा छंद होता. माळ्यावर त्यांच्या अंकांनी सुटकेस भरलेली असायची. त्याचे आई वडील दोघेही नोकरी करणारे असल्याने घरी दिवसभर फक्त त्याची आजी सोडून इतर कोणीच नसायचे. आजी दुपारी चारच्या आसपास देवळात गेली कि माळ्यावरची ती सुटकेस काढून त्यातले अंक वाचत बसायला वेळ नसल्याने फक्त चित्रे पाहण्याचा आमचा चारपाच मित्रांचा कार्यक्रम चालायचा 😀
असो, आता सातवी-आठवीतल्या मुलींच्या सॅक/बॅग्स मध्ये पालकांना कॉन्डोम ची पाकिटे सापडतात ह्याचा अर्थ आताची पिढी फारच ऍडव्हान्स झाली आहे असे म्हणायला हरकत नाही! (मुलांबद्दल तर नं बोललेलच बरं 😀)
26 Oct 2021 - 11:22 am | कॉमी
छान लेख.
शाळेतल्या बाथरूम्सचे वर्णन चपखल आहे.
त्याखेरीज आमच्या घरात सुद्धा एकदोन लैंगिक शिक्षणावरची पुस्तकं होती. ती म्हणजे पालकांनी वाचून मुलांच्या प्रश्नांना कसे उत्तर द्यायचे अश्या रचनेतील होती. पण ती थेट आम्ही भावंडांनीच वाचली. त्यात अधेमध्ये कार्टून्स सुद्धा होती. त्यामुळे शाळेत पोरं शिव्या द्यायला लागायच्या आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे मित्रमंडळींचे गैरसमज दूर करण्यात पुढे पुढे करून आपली कॉलर टाईट करता येत असे, अर्थात मित्रांनी पटवून घेतले तर. काही वेळेस 'काही पण फेकतो' अशी संभावना होत असे.
आम्ही कॅसेट आणि मासिक दोन्ही मधले नाही. आमच्या टिनेज वयात इंटरनेट सर्वदूर पसरलेलं नसलं, तरी कोणत्या तरी 'काम'सू कार्यकर्त्याकडून इंटरनेटवरच्या खजिन्याचे वितरण होत असे. कॉलेज मध्ये एका मुलाकडे हार्डडिस्क भरून पॉर्न होते. मग इतर मुलं त्याच्याकडे पेनड्राइव्ह घेऊन जात.
26 Oct 2021 - 11:38 am | कुमार१
•
>>>> तुमच्या या प्रतिसादाने खऱ्या अर्थाने मुक्त झालो ! किंचित बिचकतच हा लेख प्रकाशित केला होता. अनेकांनी असे लेख लिहावेत
•
>>>>>
अरे वा ! म्हणजे तुम्ही आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक समजायला हरकत नाही; वयाने लहान असलात तरी !
•
>>>>
खरंय , असे कामसू कार्यकर्ते खरे मोलाचे…..
26 Oct 2021 - 11:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखन नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण दिसते, लेखन वरवर चाळले. लेखनधाग्यात काही पुरक चित्र असायला पाहिजे होती असे वाटले. मित्रांच्या गप्पा,चावट पुस्तके, मित्रांची लफडी, आणि मित्रांच्या घरी कोणी नसले की व्हीडीयो बघायचो. लैंगिक ज्ञान असे गोळा व्हायचे. संस्कृती आणि तत्सम गोष्टीच्या रेट्यामुळे वगैरे आणि शाळेत काही शिक्षण नसल्यामुळे आणि जागृती नसल्यामुळे आता मागे वळून पाहिल्यावर लक्षात येते लैंगिक ज्ञानाच्या बाबतीत माझ्या पीढ़ीची जरा कुचंबनाच झाली. :/
-दिलीप बिरुटे
26 Oct 2021 - 12:26 pm | टर्मीनेटर
प्रा.डॉ. आपल्या सूचनेला मान देऊन २ चित्रे अॅडवली आहेत 😀
26 Oct 2021 - 12:30 pm | कुमार१
त्याबद्दल मी देखील मनापासून आभारी आहे !
लेखाची शोभा वाढविल्याबद्दल धन्यवाद.
प्लेबॉय चे सांकेतिक चित्र त्यानिमित्ताने समजले 😀
26 Oct 2021 - 1:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला एकच चित्र दिसत आहे, एक दिसत नाही. चित्र कशी गच्च अनुरूप ते आपलं त्याला काय शब्द आहे, तो मला नेमका आठवेना पण हेही ठीक आहे. आभार...!
-दिलीप बिरुटे
( सौंदर्यवादी) :)
26 Oct 2021 - 2:55 pm | ज्ञानोबाचे पैजार
आपली जुही चावली पण डेबोनियर च्या मुखपृष्ठावर झळकली आहे हे माहित नव्हते.
आम्हाला आपले उगाच वाटायचे की तो मान फक्त विदेशी मदलासांचा आहे.
पैजारबुवा,
26 Oct 2021 - 3:50 pm | कुमार१
२००० नंतर डेबोनेरची मधली चित्रे सौम्य झाली असे एक निरीक्षण.
......
पूर्वी वाचलेला त्यातला एक हृदयस्पर्शी लेख आठवतो. खूप गरिबीतून आलेल्या एका तरुणीने तो लिहिला होता. तिने जेव्हा या मासिकाच्या मधल्या फोटोसाठी स्वतःचा फोटो काढू दिला, त्यातून मिळालेल्या मानधनातून तिने आयुष्यात प्रथम बँकेत खाते उघडले होते.
26 Oct 2021 - 11:29 am | कपिलमुनी
हैदोस चा उल्लेख नसल्याने तेंडुलकर विना भारतीय क्रिकेटच्या प्रवासाचे वर्णन केल्यासारखे वाटले.
लेख उत्तम !
28 Oct 2021 - 12:27 am | शेर भाई
तुम्ही करमचंदला विसरलात का? ते मोठ्यांचे इंद्रजाल होते. हैदोस मध्ये वर्णन केलेले अवयव त्यात प्रत्यक्ष पाहायलाच मिळायचे.
28 Oct 2021 - 1:46 pm | असा मी असामी
आम्हि हैदोस चा पन्खा असलेल्या मित्राला हाय दोस्त असे बोलवत असु
28 Oct 2021 - 5:16 pm | चौथा कोनाडा
बरोबर.
हैदोसची व्युत्पत्ती : "हैदोस" या शब्दाविषयी : मुहम्मदाचे नातू हसन आणि हुसैन यांना अनुक्रमे "दोस्त" आणि "दुल्हा" अशी टोपण नावे होती. लढाईतल्या त्यांच्या मृत्यूचा शोक मुहर्रम मध्ये "हाय दोस्त दुल्हा " असे ओरडत नाचत केला जातो. त्यावरून "गल्लीत हैदोस-धुल्ला चालू होता" अशी संज्ञा आली , आणि त्याचे संक्षिप्त रूप "हैदोस". हा शब्द भारतीय संसदेबाबत विशेषत्वाने वापरला जातो!
26 Oct 2021 - 11:44 am | कुमार१
>>>>
एकदम कबूल !
मी पडलो आपला साधा लेखक.
चित्रकार मित्रांनी पुढे यावे असे आमंत्रण देतो…
......
>>>
क्षमा असावी ! हे माझ्या पाहण्यात कधी नव्हते आले.
कोणी तरी लिहा त्याच्याबद्दल.
28 Sep 2022 - 12:52 pm | शाम भागवत
हेच म्हणतो.
26 Oct 2021 - 11:52 am | ॲबसेंट माइंडेड ...
लेख आणि प्रतिसाद भारीच.
26 Oct 2021 - 11:59 am | चौकस२१२
बाबा कदमांची एक कादंबरी अंधुकशी आठवत आहे ... त्यातील नायक हा रेस जॉकी असतो त्याचे "भारी " आयुष्य स्त्रीसंबंध याबद्दल २ पाने होती .. सान्नि लिओनीनच्या कोणत्याही हिदेयो पेक्षा ती दोन पाने "लै भारी " होती असे वाटते
अर्ध नग्नता जशी पूर्ण नग्नतेपेक्षा जास्त मादक वाटते .. तसेच काहीसे
26 Oct 2021 - 12:02 pm | तर्कवादी
मी शाळेत व कॉलेजात असताना पुस्तक किंवा कॅसेटच्या वाटेला गेलो नाही. माझ्या जवळपासच्या मित्रात बहूधा कुणीच त्तसले व्हिडिओज फारसे बघितले नसावेत. टिपीकल मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे वाटणारी भिती असेल कदाचित. शिवाय हॉस्टेललापण मी कधी राहिलो नाही.
पण चावट विनोदांची मात्र कायमच प्रचंड रेलचेल होती. अगदी पहिल्या जॉबमध्येही चावट विनोद ऐकवणारे आणि उत्साहाने ऐकणारे अनेक मित्र आसपास होते.
26 Oct 2021 - 12:13 pm | चौकस२१२
पोलिसांची धाड वगैरे न पडता आम्ही आयुष्यातील पहिलीवहिली बीपी पाहिली.
आठवण.... पन्हाळ गड ते विशाळगड आणि पुढे उतरून रत्नागिरी पर्यंत गेलो होतो तेवहा प्रचंड दमलो होतो .. संध्यकाळी भरपेट माश्याचा खाऊन बीर पिऊन मग "इंग्रजी शिनेमा" पाहावा म्हणून थिएटर शोधात होतो तेव्हा कळलं कि "खास इंग्रजी शिनेमा " बाहेर मराठीत पाटी " जॉन ची रंगिली रात्र" वैगरे दाखवतात
पहिले पाच मिनिटे मज्जा वाटली .. त्यानंतर वरील अवसंस्थेत मित्रांनी एक मेकांकडे पहिला आणि या मेजवानी पेक्षा लोज वर जाऊन कधी एकदा झोपतोय असा झाला आणि चक्क अर्धवट शिनेमा सोडून जाऊन निवांत झोपलो .... खऱ्या अर्थाने पोपट झाला
26 Oct 2021 - 12:21 pm | चौकस२१२
तसेच अजून एकदा पैसे देऊन सुद्ध कार्यक्रम अर्धवट सोडून आलेलो म्हणजे "योनीची गोष्ट " नावाचे नाटक...
" हिट आणि होट " नाटकांपैकी नवहते..आणि तसे असेल म्हणून गेलो हि नव्हतो ... वाटले कि काहीतरी गंभीर नाटक असेल.. शीर्षक जरी "तसे" असले तरी स्त्रीची फरफट असा विषय किंवा "पुरुष" सारखे दमदार लिखाण असेल.. कसलं काय इतकं कंटाळवाणे नाटक आयुष्यात बघितले नाही
26 Oct 2021 - 12:14 pm | वामन देशमुख
कुमार१, लेखातील अनुभवांशी माझ्यासहित बहुतेक सर्वच चाळिशीतील पुरुष वाचक रिलेट करू शकतील. खूप छान लिहिलंय.
माझ्या काही स्फूट नोंदी -
तांबी
"दोन किंवा तीन मुले पुरेत" अश्या जाहिराती सुरुवातीला असायच्या.
त्यानंतर "छोटे कुटुंब सुखी कुटुंब" आणि शेवटी "मुलगी असो की मुलगा, एकाच पुरे" अशी प्रगती झाली. यादरम्यान, तांबी म्हणून ओळखला जाणार लाल त्रिकोण मात्र, त्याचा उपयोग न कळताही मनात पक्का बसला!
सुरक्षित अंतर
विशेषतः १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला आमच्या शाळेची प्रभातफेरी निघायची दोन-दोन विद्यार्थी हातात हात धरून घोषणा देत चालायचे. गावातील भिंतींवर "सुरक्षित अंतर ठेवा - दोन वाहनांत, दोन मुलांत" असे लिहिलेल्या जाहिराती दिसायच्या. ते वाचून, रस्त्यांवर दोन वाहनांत टक्कर होऊन अपघात होऊ नये म्हणून सुरक्षित अंतर ठेवायचे हे समजायचे पण, आपला हात हातात धरलेल्या मित्रात सुरक्षित अंतर किती ठेवायचे, का ठेवायचे आणि त्यातून अपघात कसा टळतो हे मात्र समजायचे नाही!
पाळणा लांबवा
तान्हे मूल पाळण्यात निजवलेले आहे आणि त्याची आई पलंगावर बसून त्याला झोके देत आहे. पाळण्याची दोरी ओढल्यावर पाळणा जवळ येतो आणि ती दोरी ढिली सोडल्यावर आपोआपच लांब जातो (भौतिकशास्त्र - लंबक, आंदोलन वगैरे!). मग पाळणा आपोआपच लांब जात असेल तर तो मुद्दामहून का लांबवायचा आणि कसा लांबवायचा?
माला-डी
बोल सखी बोल तेरा राज क्या है
क्या है तेरी ख़ुशी का राज
मुझको तू बता दे आज...
माला-डी
माला-डी
माला-डी
है मेरा राज.
- निरागस बालक
26 Oct 2021 - 12:14 pm | कुमार१
>>> +11111. महत्वाचा मुद्दा.
ती अधिक चेतवते.
....
>>>
अ ग दी ! यासाठीच मी माझ्या शहरातले कॉलेज असूनही वसतिगृह घेऊन ठेवलेले होते.
त्या काळात मोकळीक मिळणे महत्त्वाचे व गरजेचे असते.
26 Oct 2021 - 12:23 pm | कुमार१
>>>
भारीच. तेव्हा मित्रांत ‘BP’ ला गमतीने भक्त प्रल्हाद म्हणत !
किंबहुना त्या कॅसेटच्या बाह्य भागावर असंच काहीतरी सांकेतिक लिहिलेले असायचे.
....
>>>
धमाल. हा हा हा !
26 Oct 2021 - 12:18 pm | अनिंद्य
धमाल !
लेख रिलेट झाला - विशेषतः होत गेलेले बदल छान टिपले आहेत. स्वच्छतागृहांच्या भिंती खरेतर जाहिरातीसाठी प्रीमियमवर दिल्या पाहिजेत, न आटणारा ग्राहक सोर्स आहे त्यासाठी :-)
... कॉलेजात त्या साहित्यातील अर्वाच्चपणा कमी होऊन त्याला काहीशी सौंदर्यदृष्टी येते......
- बरोबर. प्रतिथयश शिक्षणसंस्थांमध्ये 'ह्या' साहित्याची क्वालिटी उच्च असते. अचूक निरीक्षण !
साहित्यात 'इरॉटिका' मात्र भारतीय भाषांनी दुर्लक्षिलेला विषय आहे असे मत नोंदवतो, अपवाद मोजकेच. त्याबाबतीत इंग्रजी फार समृद्ध आहे. इतर 'इरॉटिक आर्ट' मध्ये आपण जेमतेम आहोत.
26 Oct 2021 - 12:48 pm | Rajesh188
बॉस च्या केबिन मध्ये tv आणि टीव्ही लाच जॉईन vcr असला tv होता.कोणी नव्हतं म्हणून बॉस च्या केबिन केबिन च कब्जा घेवून Bp चे कॅसेट लावून ते बघण्याचा कार्यक्रम आम्ही दोघा तिघांनी योजला.
पूर्ण सिनेमा बघून झाला.आता ऑफिस बंद करून घरी जायची वेळ होती.
कॅसेट बाहेर काढण्याचे बटन दाबले पण कॅसेट काही बाहेर येईना .सर्व बटन दाबून बघितली काही फरक नाही.
कॅसेट ओढून बाहेर येते आहे का? हा खुळा प्रयत्न पण करून झाला.
मग मात्र सर्वांस भीती नी घाम फुटला.
Vcr खोलन्याची कला अवगत होती.
पण इथे vcr tv मध्ये aattach होता.
त्या विषयी काहीच ज्ञान नव्हते.
शेवटी टीव्ही च पूर्ण खोलयाचा आणि कॅसेट बाहेर ओढून काढायचे असे ठरले.
टीव्ही ची वाट लागली तरी चालेल पण कॅसेट बाहेर काढायचं.
शेवटी तेच केले.
आणि काम यशस्वी केलेच पण त्या मध्ये दोनेक तास तरी गेली.
दुसऱ्या दिवशी साळसूद पने ऑफिस मध्ये हजर पण झाली.
26 Oct 2021 - 1:08 pm | चौथा कोनाडा
आम्ही(ही) कॅसेट-डेबोनेर-हैदोस अश्या महाआघाडी पंथाचे असल्याने लेख भावला !
आनंदध्व्जाच्या कथांची हट्कून आठवण झाली !
ले. आनंद साधले यांना भावपुर्ण स्मरणांजली _/\_
26 Oct 2021 - 1:36 pm | कुमार१
साहित्यात 'इरॉटिका' मात्र भारतीय भाषांनी दुर्लक्षिलेला विषय आहे असे मत नोंदवतो
>>>> सहमत.*
शेवटी टीव्ही च पूर्ण खोलयाचा आणि कॅसेट बाहेर ओढून काढायचे असे ठरले.
>>> भारीच !
>>>> वा वा ! छानच.* आम्ही(ही) कॅसेट-डेबोनेर-हैदोस अश्या महाआघाडी पंथाचे
26 Oct 2021 - 2:01 pm | Rajesh188
कामसूत्र ह्याचा अभ्यासक कोणी येथे आहे का?
जसे बाकी ग्रंथाचे पारायण केले जाते.
तसे कामसूत्र ह्या ग्रंथाचे भक्ती भावाने कोणी वाचन केले आहे का?
26 Oct 2021 - 2:19 pm | राजेंद्र मेहेंदळे
कामजीवनाची शाळकरी तोंड ओळख म्हणजे रस्त्यावरील कुत्रा कुत्रीचे मैथुन किवा पाउस यायच्या आधी कावळे/चिमण्या यांचे मैथुन पहाण्यात आले असेल तेव्हढेच. पण कॉलेज्मध्ये गेल्यावर क्रमाने हैदोस (मराठि) किवा मस्तराम (हिंदी) अशी पुस्तके, कधी हाती पडलीच तर डेबोनियर्,प्ले बॉय छाप मासिके आणि बारावीनंतर वर लिहिलेले सगळे व्हि डी ओ चे किस्से. मग ती एक्साईटमेंट, कोणाच्या घरचे गावाला जाणार आहेत वगैरे माहिती काढुन अड्डा जमवणे, व्हि सी आर वगैरे भाड्याने आणणारे खंदे कार्यकर्ते, तो बिघडला तर डोके चालविणारे मेकॅनिक मित्र, कोणी कुठे बसायचे, बेल वाजल्यास दार कोणी उघडायचे ह्याचे प्लॅनिंग वगैरे तंतोतंत..आणि पुढे सी डी आणि संगणकाचा जमाना आल्यावर ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी सामसुम झाल्यावर असेच प्लॅनिंग करुन बघणे सुद्धा तसेच...एकुणात भावना पोचल्या कुमार सर _/\_
26 Oct 2021 - 2:42 pm | कुमार१
>>>
असल्यास स्वागत आहे.
हा ग्रंथपरिचय कोणीतरी करून दिल्यास वाचायला आवडेल.
…
>>> +11 नियोजन महत्वाचे !
26 Oct 2021 - 2:48 pm | अनन्त्_यात्री
6900 वाचने होतील असा अंदाज व्यक्त करून खाली बसतो.
26 Oct 2021 - 3:46 pm | रंगीला रतन
61 कोटी 62 लाख 69 हजार असा माझा अंदाज :=)
26 Oct 2021 - 3:42 pm | रंगीला रतन
बाब्बो.. शॉलीट लेख एकदम :=)
26 Oct 2021 - 3:55 pm | कुमार१
6900 वाचने
>>>
69 चांगले परिचित आहे ! या अंकाबद्दल दाद देण्यात येत आहे.
पण...
61, 62 यासंबंधी ज्ञानात मौलिक भर घालावी !
:)
26 Oct 2021 - 6:08 pm | सुरिया
61, 62 यासंबंधी ज्ञानात मौलिक भर घालावी !........
.
आधी स्व. दादा कोंडके ह्याना मानद डॉक्टर पदवी द्या. किंवा त्यांचे साहित्य मेडिकल सिल्याबस मध्ये घ्या.
.
आणि हे सगळे हलकेच घ्या
26 Oct 2021 - 6:19 pm | कुमार१
आधी स्व. दादा कोंडके ह्याना मानद डॉक्टर पदवी द्या.
>>> दिली. :))
यावरून दादांच्या संदर्भातच एक किस्सा आठवला. आमच्या कॉलेजच्या स्नेहसंमेलन समारोपाला ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तेव्हा विद्यार्थ्यांकडून विविध चिठ्ठ्या पाठवून त्यांना प्रश्न विचारले गेले होते.
एक प्रश्न वगळता दादांनी सर्वच प्रश्नांना हजरजबाबी सुंदर उत्तरे दिली. जो प्रश्न अनुत्तरित ठेवला तो असा होता :
निरोध, विरोध आणि अवरोध यात काय फरक आहे ?
दादांनी क्षणभर डोळे मिटले आणि नंतर ते उघडून समोर बघून एवढेच म्हणाले ,
“जरा विचार करून सांगतो !”
बाकी वल्ली माणूस.... सलाम !
1 Nov 2021 - 1:25 pm | अनिंद्य
दादा कोंडके आपल्या चित्रपटातील गाणी स्वतः लिहीत असत (गीतकार म्हणून कधी नाव दुसऱ्याचे असले तरी) किंवा त्यात 'चावट' बदल सुचवीत असत असे मी जाणकारांकडून ऐकले आहे. पण असे 'साहित्य / काव्य' प्रसविण्यासाठी उच्च दर्जाची प्रतिभा लागते. एक उदा :
कंबरपट्ट्याचं घुंगरू का हसलं
त्यानं पाहिलं जे मला नाही कधी दिसलं
:-)
1 Nov 2021 - 2:22 pm | कुमार१
सहमत.
दादांचे अजून एक विधान हे मार्मिक होते.
ते म्हणायचे,
" एखाद्या निर्मात्याने त्याचा चित्रपट, परीक्षण मंडळापुढे ठेवला आणि जर मंडळाने त्याला एकही कात्री न लावता संमत केला तर असे समजावे की या चित्रपटात काहीही दम नाही.!
26 Oct 2021 - 5:47 pm | टुकुल
<<पदवीचे शिक्षण संपताना अजून एका साहित्याचा शोध लागला. “प्रत्येक नवविवाहिताने वाचावेच” असे पुस्तक आपल्या मायमराठीतच उपलब्ध होते- अगदी दर्जेदार प्रकाशनाने काढलेले. कोणीतरी ते मिळवले आणि मग त्याचे सामूहिक वाचन झाले. त्यामध्ये प्रणयाराधन ते संभोग या सगळ्याचे तपशीलवार शिस्तीत वर्णन आणि संबंधित सल्ले होते. “आमचे हे पुस्तक वाचा आणि मग आयुष्यभर या सुखाचा मनमुराद आनंद लुटा”, अशी त्याची पुस्तकाच्या मलपृष्ठावर रास्त जाहिरात केलेली होती. >>
कुठ्ल्या पुस्तकाबद्दल आहे हे? निरामय कामजीवन ??
26 Oct 2021 - 5:47 pm | टुकुल
<<पदवीचे शिक्षण संपताना अजून एका साहित्याचा शोध लागला. “प्रत्येक नवविवाहिताने वाचावेच” असे पुस्तक आपल्या मायमराठीतच उपलब्ध होते- अगदी दर्जेदार प्रकाशनाने काढलेले. कोणीतरी ते मिळवले आणि मग त्याचे सामूहिक वाचन झाले. त्यामध्ये प्रणयाराधन ते संभोग या सगळ्याचे तपशीलवार शिस्तीत वर्णन आणि संबंधित सल्ले होते. “आमचे हे पुस्तक वाचा आणि मग आयुष्यभर या सुखाचा मनमुराद आनंद लुटा”, अशी त्याची पुस्तकाच्या मलपृष्ठावर रास्त जाहिरात केलेली होती. >>
कुठ्ल्या पुस्तकाबद्दल आहे हे? निरामय कामजीवन ??
26 Oct 2021 - 5:49 pm | टुकुल
"पदवीचे शिक्षण संपताना अजून एका साहित्याचा शोध लागला. “प्रत्येक नवविवाहिताने वाचावेच” असे पुस्तक आपल्या मायमराठीतच उपलब्ध होते- अगदी दर्जेदार प्रकाशनाने काढलेले. कोणीतरी ते मिळवले आणि मग त्याचे सामूहिक वाचन झाले. त्यामध्ये प्रणयाराधन ते संभोग या सगळ्याचे तपशीलवार शिस्तीत वर्णन आणि संबंधित सल्ले होते. “आमचे हे पुस्तक वाचा आणि मग आयुष्यभर या सुखाचा मनमुराद आनंद लुटा”, अशी त्याची पुस्तकाच्या मलपृष्ठावर रास्त जाहिरात केलेली होती. "
कुठ्ल्या पुस्तकाबद्दल आहे हे? निरामय कामजीवन ??
26 Oct 2021 - 5:55 pm | कुमार१
>>>
नाही.
आता त्या पुस्तकाचे नाव विसरलो. पण बहुदा रम्यकथा प्रकाशनचे असावे असे अंधुकसे आठवत आहे.
लेखक आठवत नाही. बहुतेक ते लेखक नामांकित नव्हते
26 Oct 2021 - 8:22 pm | Nitin Palkar
सर्वात प्रथम 'प्रस्थापित साहित्याच्या काहीसा गावकुसाबाहेरचा' हा विषय निवडून त्यावर काहीसे बिनधास्त लेखन केल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
'कोकशास्त्र' या महान (?) ग्रंथाचा आतापर्यंतच्या प्रतिसादांमध्ये उल्लेख नाही याचे थोडेसे नवल वाटले. लैंगिक ज्ञान या महत्वाच्या विषयाची अस्मादिकांची सुरुवात या पुस्तकाने झाली (इयत्ता आठवी). अर्थातच कुणा ज्ञानी आणि हुशार मित्राची ती मेहरबानी होती. त्यात वर्णन केलेले स्त्रियांचे चार प्रकार अद्याप लक्षात आहेत. या साहित्याचा परिणाम किती खोलवर होऊ शकतो याचे हे पुरेसे बोलके उदाहरण आहे. कुठच्या तरी एक स्वामींच्या (?) पुस्तकातील 'ब्रम्हचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू' हे वाक्य देखील आठवते.
कॉलेज जीवनात खास सनसनाटीखेज असे विशेष काही नाही, फक्त हैदोस अलीकडच्या काळातील, त्या काळी 'कामायनी' नावाचे मासिक बेळगावहून प्रसिद्ध होत असे (किंवा त्यावर बेळगावचा पत्ता असे). शिवाय इतर काही पुस्तकेही काही ठराविक मित्र (हे बहुधा सिनीयर्स/रिपिटर्स असत) पुरवत. 'अप्सरा' हे शृंगारिक गणले जाणारे मासिक वाचल्याचेही स्मरते.
कॉलेज शिक्षण संपल्यावर नोकरी निमित्त मुंबईत आल्यावर या साहित्याची सहज उपलब्धता बघून नवल वटले होते.
त्या दरम्यान 'भक्त प्रल्हाद'चा जमाना सुरू झाला होता. ८ mm च्या प्रोजेक्टर वर मित्राच्या रिकाम्या घरी बघितलेली पहिली बीपी आठवते. अर्थात हा प्रकार व्हीसीआर येण्यापूर्वीचा आहे.
तरीही बीपी पेक्षा कामुक साहित्य (कथा, कादंबऱ्या) अधिक भावत असे हे मात्र खरे...
आज याबाबतीत तृप्त स्थितीत असताना असल्या कशाचीच गरज भासत नाही. पण ज्या त्या वयात ती मानसिक भूक भागवण्याचे काम या साहित्याने केले आहे यात शंका नाही.
हे मात्र खरे.
26 Oct 2021 - 8:28 pm | भागो
एक लहान मुलगी{इयत्ता १ली} आणि तिचा भाऊ (इयत्ता ३ री ) आई कडे गेले आणि त्यांनी आईला विचारले "आई, आपल्याला मुले कशी होतात?" आईने उत्तर दिले "अरे. जेव्हा मुले पाहिजे असतात तेव्हा लोक देवळात जातात आणि देवाला प्रार्थना करतात. "देवा .आम्हाला एक मुलगा/मुलगी दे " आम्ही तुम्हाला असेच मागून आणले."
मुले बाबांकडे जातात. बाबा पण त्यांना असेच काहीतरी उत्तर देतात, मग ती दोघ आजोबांकडे जातात. आजोबा काय सांगणार?
मग मुलगा बहिणीला म्हणाला, "आपल्या आधीच्या दोन पिढ्या वाया गेल्या. इतक वय झाल पण अजून त्यांना मुल कशी होतात हे माहित नाही."
26 Oct 2021 - 10:02 pm | कॉमी
.
26 Oct 2021 - 8:44 pm | मित्रहो
मस्त लेख
आम्ही कॅसेटच्या जमान्यातले पण पुस्तके सुद्धा वाचनारे. आठवी संपल्यावर आमच्या शाळेत पुण्याचे डॉक्टर दांपत्य आले होते. त्यांनी लैंगिकते बद्दल जी माहिती दिली त्याचा खूप फायदा झाला. काय चुकीचे काय बरोबर हे समजले.
इंजिनियरींग कॉलेजच्या होस्टेलला राहिल्यामुळे ते कॅसेट प्रकरण आलेच. म्हणजे आधी एक अमिताभचा पिक्चर तो झाला की मग रात्रभर हे चालायचे. एका तासात बरीच मंडळी उठून जायची. मीही त्यातला मला पुस्तक वाचायला जास्त आवडायचे. हैदोस नावाचे एक पुस्तक होते. या पुस्तकांचे एक वैशिष्ट असते या पुस्तकात फारच क्वचित नवरा आणि बायको याच्यातल्या संबंधाविषयी असते. त्यात नेहमी क्रॉसकनेक्शन असतात. कदाचित त्यामुळेही वाचण्यात मजा येते असावी . ती भाषा मजेशीर असते. बिपी बघायला कधी थेटरात गेलो नाही. कॉलेज संपल्यावर बघितले नाही. काही तशी सिनेमे आणि त्यांची ठरलेली थेटर होती. आता आठवत नाही सिरक्को असा काहीतरी चित्रपट होता, नंतर अर्थातच बेसिक इंस्टिक्ट आला. हा क्लास थोडा वेगळा होता.
शाळा कॉलेजच्या भितीसाहित्याबद्दल पूर्णपणे सहमत.
कॉलेजच्या आय़डी कार्डात तेंव्हा एक नवीन कंडोम आले होते ते ठेवले होते. मी विसरुन गेलो. काही दिवसांनी रुमपार्टनरचे मामा विद्यापीठात पेपर तपासायला आले होते ते मित्राला भेटायला आले. तेंव्हा सबमिशनचा काळा होता. नाइट मारली होती. दुपारी एक वाजता सुद्धा जेंव्हा मित्राचे मामा आले तेंव्हा मी गाढ झोपोलो होतो. मित्रांने सांगितले रात्री खूप उशीरा आला. त्यांना माझ्या सायकलची किल्ली होती ती शोधताना त्यांना कार्ड दिसले. त्यांनी मित्राला नंतर विचारले पार्टनर खरच सबमिशनला गेला होता की आणखीन कुठे.
अशा चित्रपटातली बरीच दृष्ये अनैसर्गिक असतात. अशा चित्रपटांनी किंवा साहित्यांनी तरुणांच्या मनावर उलट परिणाम होतो का याचा काही अभ्यास आहे का. मी तरी वाचले नाही.
28 Oct 2021 - 12:37 am | शेर भाई
या पुस्तकातील कथांमध्ये नेहमी अतिरंजित अतिशयोक्ती असते. येथे कोणी "सविताभाभी" हि Online पुस्तिक पाहिली आहे का? यात एका भारतीय स्त्रीचे विकृत लैंगिक चित्रीकरण आहे. त्यातील कथा पाहून जर कोणी प्रत्येक स्त्री हि कामातुर असते असे मत बनवले तर काय करावे??
28 Oct 2021 - 7:53 am | कुमार१
>>>
बरोबर. त्यासंदर्भात लैंगिक शिक्षण /समुपदेशनाचे महत्त्व आहेच.
समाजात काही तज्ञ लोक गेल्या अनेक वर्षांपासून 'लैंगिक शिक्षण' असे बिरुद न लावता यासंदर्भात चांगले काम करत आहेत.
त्यामध्ये पुस्तक लिहिणे, व्याख्याने देणे, चर्चासत्र अशांचा समावेश आहे.
त्यातून तरुणांमधले गैरसमज दूर केले जातात
28 Oct 2021 - 10:27 am | मित्रहो
या दोन्हीत अतिरंजित अतिशयोक्ती असते. म्हणूनच शिक्षणाची गरज आहे. काय नैसर्गिक आहे आणि काय नाही हे कळायचे हवे.
28 Oct 2021 - 12:48 pm | चौथा कोनाडा
असे चित्र रंगवणे पुरुषी मानसिक कामुकतेचा भाग आहे.
नीळपटांत देखिल असे खोटे चित्र चित्रित केलेले दिसते
26 Oct 2021 - 9:04 pm | प्रकाश घाटपांडे
आमच्या कॉलेज होस्टेलला माझा एक मित्र होता. तो म्हणायचा sex is more psychological than physical. मी त्याला म्हणायचो," सग्या, तु यडपट आहेस काय रे. काही पण बडबडतो. ही काय सायकॉलॉजिकल गोष्ट आहे का? पिव्वर फिजिकल आहे." यावर तो फक्त हसायचा. त्याच्या विचारांची खोली समजायला मला बराच काळ जावा लागला.
लैंगिकतेच्या तारुण्यसुलभ सहज आविष्कारातून कधी अहंगंड कधी न्य़ुनगंड तर कधी अपराधगंड तयार होतात. नैतिकतेचेही प्रश्न निर्माण होतात. तुज आहे तुजपाशी या पुलंच्या नाटकात त्याची झलक पहायला मिळते.मानवी लैंगिक नाती व निती हा विषय समाजात नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. र.धों कर्व्यांनी समाजस्वास्थ्य या मासिकाद्वारे त्या काळात बरेच लैंगिक लोकशिक्षणाचे काम केले आहे. त्या काळात त्यांना बरीच अवहेलना स्वीकारावी लागली.
26 Oct 2021 - 9:21 pm | कुमार१
>>> अतिशय चांगला आणि मननीय मुद्दा .
आवडलाच !
26 Oct 2021 - 10:09 pm | टर्मीनेटर
+१०००
माझेही असेच विचार होते आणि आहेत 👍
26 Oct 2021 - 9:05 pm | कुमार१
१.
. >>> +११११ . कल्पनारंजन भारीच.
२.
" >>> छानच !
३.
>>> विचार करण्याजोगा चांगला मुद्दा
धन्यवाद !
26 Oct 2021 - 10:30 pm | गुल्लू दादा
मैथुनसाक्षर ;)
हा लेख वाचून माझ्यासारखे बरेच मैथुनपदवीधर झालेत यात शंका नाही.
26 Oct 2021 - 11:22 pm | सौन्दर्य
लेख फारच छान व प्रत्येक पिढीशी संबंधित असणारा आहे. आवडला.
ह्या लेखावरून शालेय जीवनातील एक गोष्ट आठवली. मी आठवीत किंवा नववीत असेन. वर्गात एकदा एका मुलाने विविध संभोगाच्या क्रिया दर्शवणारे इंग्रजी मासिक आणले होते. ते मासिक शेवटच्या बेंचच्या ड्रॉवरमध्ये ठेवले होते. ज्याला ते बघायची इच्छा होई तो त्या शेवटच्या बेंचवर जाऊन ते मासिक बघत असे. वर्गातील मुलींना पण त्याची कुणकुण लागली होती व त्या देखील ते मासिक बघण्यासाठी उत्सुक होत्या. एके दिवशी एक नव्यानेच लागलेले गुरुजी आम्हाला शिकवत होते व त्यांचे शिकवणे बघण्यासाठी अचानक आमचे मुख्याध्यापक वर्गात आले. शेवटचा बेंच रिकामा असल्यामुळे ते नेमक्या त्याच बेंचवर बसले आणि आम्ही सर्व मुले धास्तावलो कारण त्यांची शिस्त फारच कडक होती. जर त्यांनी ते मासिक पाहिले तर ते संपूर्ण वर्गाला धारेवर धरतील ह्यात शंकाच नव्हती. आमच्या शाळेतील शिस्तीनुसार मुलींचे स्कर्ट्स गुढघ्याखाली आठ बोटे व मुलांची पॅन्ट गुढघ्याखाली चार बोटे असणे अनिवार्य होते असल्या शाळेत 'असले' मासिक सापडणे म्हणजे काय झाले असते ते न सांगता देखील कळले असते. पण गंमत म्हणजे मुख्याध्यापकांनी त्या मासिकाचा उल्लेख देखील केला नाही, आता त्यांनी ते पाहिलेच नाही की पाहून न पाहिल्यासारखे केले हे एक त्यांना किंवा देवाला ठाऊक.
मोठे झाल्यावर एक वाक्य वाचले होते, 'जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या खिशात सिगारेटचे पाकीट सापडले व हे मुलाला माहीत असले तरी त्यावर त्याला काही बोलू नका, कारण तुम्हाला घाबरून किंवा तुमचा आदर राखावा म्हणून गुपचूप सिगारेट पिणारा मुलगा, तुम्ही बोललात तर तुमच्या समोरच सिगारेट ओढील.'
आमच्या मुख्याध्यापकांनी हे वाक्य आधीच वाचले, ऐकले असावे कदाचित.
26 Oct 2021 - 11:57 pm | चामुंडराय
निसर्गाने वंश सातत्यासाठी प्राणी जगताला लैंगिक प्रेरणा दिली असावी. आणि लैंगिक क्रियेबरोबर आनंदाची अनुभूती जोडून दिली आहे म्हणजे केवळ आनंद प्राप्तीसाठी तरी लैंगिक क्रिया व्हावी आणि त्यातून पुढे वंश चालू रहावा. मोठा लब्बाड आहे निसर्ग.
प्राणी जगतात अपत्य जन्म अनुकूल काळात व्हावा म्हणून प्राण्यांची लैंगिकता विशिष्ट काळात / हंगामात जागृत होत असावी का? मानवात मात्र तिन्ही त्रिकाळ लैंगिकता जागृत असते. मानव हा कोणत्याही काळात अपत्य संगोपनासाठी सक्षम असतो म्हणून असे असेल काय? पूर्वी म्हणजे उत्क्रांतीपूर्व काळात मानवात देखील हंगामी लैंगिकता असेल काय? पुढे उत्क्रांतीमध्ये त्याची गरज राहिली नसावी बहुधा. ह्या संदर्भात कोणास काही ठाऊक असेल तर वाचायला आवडेल.
एकंदरीत समाज-निषिद्ध टॅबू विषयावर चांगले लेखन डॉ. कुमारेक सर मात्र ह्या लेखनात समाज जीवनाचा केवळ अर्धा आरसा दिसतो आहे. उरलेला अर्धा आरसा दाखवण्याचे काम कोणी अनाहिता करेल काय?
27 Oct 2021 - 12:34 am | Rajesh188
लैंगिक इच्छा आणि त्या मधून मिळणारा आनंद ह्याच्या पाठी निसर्गाचा एकच हेतू आहे तो म्हणजे पुनरुत्पादन करणे.
बाकी कोणताच हेतू नाही.
माणूस हा लय स्वार्थी प्राणी आहे लैंगिक संबंधात सुख मिळत नसते पण पुनरुत्पादन करण्यासाठी त्याची आवश्यकता Asti तर माणसाने उद्या करू असा बहाणा करून आयुष्य भर काही लैंगिक संबंध ठेवले नसते.
मला वाटतं माणसाने स्वतभोवती नैतिकतेची बंधन घालून घेतल्या मुळे सेक्स करणे सहज शक्य होत नाही आणि कोणाशी पण कधी पण सेक्स करता येत नाही.
त्या मुळे माणसाची लैंगिक इच्छा सदा सर्वकाळ असावी.
तशी नैतिक बंधन नसती तर माणसाची लैंगिक इच्छा सदा सर्वकाळ राहिली नसती.
जशी बाकी प्राणी मात्र नेहमीच सेक्स चे खूळ घेवून बसत नाहीत.
संभोगातून समाधी कडे हे रजनीश ह्यांचे पुस्तक थोडे वाचनात आले होते .
त्या मध्ये त्यांनी छान समजवले आहे.
माणूस आयुष्यभर अतृप्त का असतो .त्याची लैंगिक भूक कधीच का मिटत नाही ते.
27 Oct 2021 - 7:54 am | कुमार१
१.
>>> शुभेच्छा ! असेच मैथुन पदव्युत्तर व्हा.
२.
>>>> +111 अगदी मार्मिक !
३.
>>> +111.
अगदी माझ्या मनातले बोललात. या विषयावर मोकळेपणाने चर्चा आतापर्यंत मी जगातील एकमेव स्त्रीबरोबर केली आहे – ती म्हणजे माझी पत्नी ! भारतात ही चर्चा बहुतेकदा एकलिंगी गटातच का होते ?
27 Oct 2021 - 12:54 pm | वामन देशमुख
बरोबर आहे.
हाच तर्क अन्नग्रहणालाही लागू आहे. जडत्व नैसर्गिक आहे. प्रजोत्पादन आणि उदरभरण यांत आनंदानुभूती / सुखानुभूती नसती तर कदाचित प्राणिमात्र टिकू-जगू-वाढू शकले नसते.
28 Oct 2021 - 8:11 pm | कुमार१
>>>>
याचे उत्तर एखादा मानववंश शास्त्रज्ञ देऊ शकेल.
सहज म्हणून दोन प्राण्यांमधली एक रोचक तुलना पाहू. मी ती व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘चरित्ररंग’ मध्ये वाचली होती. कोंबडी आणि गरुडी यांची तुलना कशी आहे पहा :
कोंबडी रोज एक अंडे घालते आणि गरुडी वर्षातून एकदाच (१-३ ) अंडी घालते (क्वचित दुसऱ्यांदा). हा फरक का असावा ते व्यंमांच्या भाषेत :
“निसर्गाला कोंबड्या पुष्कळ लागतात कारण त्या अनेकांचे खाद्य आहेत. गरुड संहारक आहे. म्हणून निसर्गानुसार त्यांची संख्या मर्यादित ठेवली आहे”
या धर्तीवर निव्वळ एक विचार :
माणसांची संख्या खूप वाढावी असे काही निसर्गानुसार अपेक्षित होते ??? पण माणूस तर अतिसंहारक आहे ! :))
27 Oct 2021 - 12:23 am | डाम्बिस बोका
खूप छान लिहिले आहे, वाचून बालक पालक चित्रपट आठवला. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
आता जमाना खूप बदलला आहे. इंटरनेट मुले VCR, मासिके ह्यांना फारसे स्थान उरले नाही.
27 Oct 2021 - 7:57 am | कुमार१
> अ ग दी सहमत.
.....................................
पूर्वी डॉ. शशांक सामक कामजीवनावर चांगली सचित्र व्याख्याने घेत. ‘चाळीशीनंतरचे कामजीवन’ या त्यांच्या कार्यक्रमात एक छान मुद्दा त्यांनी सांगितला होता.
स्त्रीच्या २ स्तनांच्यामधील घळीच्या दर्शनाने (विशेषतः ती इंचभरच दिसत असताना) पुरुष उत्तेजित होतो हे सर्वज्ञात आहे.
या विशिष्ट उत्तेजनाची चेतासंरचना पुरुषाच्या मेंदूमध्ये त्याच्या स्वतःच्या गर्भावस्थेच्या अगदी सुरवातीच्या टप्प्यातच नोंदविली जाते.
इतकी ही आदिम प्रेरणा आहे.
त्यांनी सांगितलेली ही माहिती रोचक वाटली.
27 Oct 2021 - 8:22 am | Bhakti
अभ्यासू किडा आणि मुळातच ढापण असल्याने ही अशी वाड्म़य स्थित्यंतरे काही घडली नाही.पण तरी शाळेत असतांना एक लव्ह लेटर आलं होतं,तेच काय वाड्म़य ;) मुलांच्या मनात असं असू शकतं हे कळून लांबच राहिले.
शाळेत वयात येतानाचा कार्यक्रम झाला होता,ज्याचा फायदा झाला.
नंतर विज्ञानाची विद्यार्थ्यांनी असल्याने स्त्री पुरुष फरक,बीज फलनासाठी दोघांची गरज हा निसर्ग आहे,हे वेगळं काही नाही समजलं.
नंतर थेट महाविद्यालयात मैत्रीणींनी ययातीच वर्णन "काय सतत तिला बेडवर ढकलतो"असं केलं होतं.तेवढच शृंगारिक वर्णनासाठी वाचली.
महाविद्यालयातच राणी बंग यांचे भारी शिबिर झाले होते.
त्या नेमक्या कंडोम काय कसा उपयोग शिकवतांना प्रिन्सी आले.आम्हांला लाजल्यासारख झालं,पण राणीताई एकदम शांत होत्या तेव्हा समजलं ,समजतो एव्हढे या गोष्टींचा बाऊ करायची गरज नाही.
लग्नाच्या आधी विवाहित मैत्रीणी आणि बहिणींनी कोड language मध्ये बौद्धिक घेतलेल आठवतंय.
मुलगा मुलगी वयात येताना खरच त्यांचे शंका निरसन आवश्यक आहे.इतर ठिकाणी चुकीच्या माहितीऐवजी पालकांनी योग्य माहिती विश्वसनीय पद्धतीने सांगावी.
27 Oct 2021 - 9:46 am | कुमार१
मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार !
तुमच्या प्रतिसादाने एक तरी अनाहिता पुढे आलेली पाहून आनंद झाला. 😀
अन्यथा धाग्यात चांगली चर्चा होऊनही मी स्वतःला अनुत्तीर्ण समजलो असतो !!
27 Oct 2021 - 10:07 am | Bhakti
होय ,
धाग्यावर चांगली चर्चा होतेय.
27 Oct 2021 - 11:42 am | ॲबसेंट माइंडेड ...
प्रतिसाद आवडला.
27 Oct 2021 - 10:00 am | सर टोबी
प्रणय उत्सुकतेेला साहित्य विश्वात एकूणच जरा कमी प्रतिष्ठा लाभते काही सन्माननीय अपवाद वगळता. मागच्या पिढीत रमेश मंत्री म्हणून एक छान रसिले साहित्यिक होते. एका वर्षात सर्वात जास्त पुस्तके प्रकाशित करण्याचा त्यांचा विक्रम रहस्य कथा लेखकांना पण मोडता आलेला नाही. तर त्यांनी पॅरीस येथील नाईट क्लब मधील त्यांचा अनुभव लिहिला होता. कॅबेरे करणारी नर्तिका सर्वांची उत्सुकता चाळवत शेवटी शेवटचे वस्त्र पण त्यागते आणि मंचावर क्षणात अंधार पसरतो. त्या अंधारात ती नर्तिका गायब होते. नंतर निवेदक खट्याळपने विचारतो तिचे डोळे खूप सुंदर आहेत हे तुमच्या पैकी किती जणांच्या लक्षात आले?
27 Oct 2021 - 10:05 am | कुमार१
प्रणय उत्सुकतेेला साहित्य विश्वात एकूणच जरा कमी प्रतिष्ठा लाभते >>> +११.
...................................................................
>>
हा जो निषिद्धतेचा मुद्दा आला आहे त्यावरून एक किस्सा सांगतो.
समाजाचे राहू दे, पण खुद्द वैद्यकीय महाविद्यालयातली निषिद्धता सांगतो. लेखात म्हटल्याप्रमाणे वैद्यकीयच्या पहिल्या वर्षाला शरीरक्रियाशास्त्र हा विषय असतो. त्यातील जननेंद्रिय विभाग शिकवायला आम्हाला एक प्राध्यापिका होत्या. नेहमीप्रमाणे जननेंद्रियांची माहिती, मासिक पाळी इत्यादी गोष्टी व्यवस्थित शिकवून झाल्या. मग त्यांनी वर्गात रुक्ष चेहऱ्याने सांगितले,
“यानंतरचे संभोगाचे प्रकरण मी काही वर्गात शिकवणार नाही, तुम्ही ते पुस्तकात वाचा.”
त्यानंतर पुढच्या व्याख्यानात त्यांनी थेट गरोदरपणाचा पहिला महिना इथपासून पुढे शिकवायला. सुरुवात केली.
गमतीचा भाग पुढे आहे.
या बाईंचे यजमान आमच्याच कॉलेजात दुसरा विषय शिकवायचे. ते दरवर्षी त्या बाईंना टोकायचे, “तुम्ही संभोगाचे प्रकरण वर्गात शिकवायला एवढे का लाजता ? निव्वळ पुरुष व स्त्री बीजांड यांचे मिलन गर्भाशयात होते या एका वाक्यात तुम्ही या महत्त्वाच्या विषयाची बोळवण करून टाकता ! तुम्हाला जर बोलून शिकवायला ते अवघड वाटत असेल तर रेखाचित्रे किंवा चित्रफितीच्या माध्यमातून तुम्ही ते वर्गात विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे”.
मला त्यांचा दृष्टिकोन आवडला.
सध्या त्या शिक्षणात काय परिस्थिती आहे मला कल्पना नाही.
27 Oct 2021 - 11:44 am | मित्रहो
अशा साहित्यातला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे चावट विनोद. तिकडे नेहमीचे संता बंता तर होतेच पण एक आर्जंंटिना कि अशा देशातले कॅरेक्टर होते पेड्रो. Mouth to Mouth Publicity चे ते एक उत्तम उदाहरण होते. एक जोक ऐकला दोन दिवसात दुसरा कुणी मित्र तोच जोक सांगणार. ही जोक सांगणे आणि लक्षात ठेवणे ही एक कला आहे. मला तर एकदा ऐकलेला जोक परत दुसरा कुणी सांगेपर्यंत लक्षात राहत नाही. दुसरा सांगायला लागला का अख्खा जोक आठवतो मग त्यातली मजा निघून जाते. भिंती साहित्यापासून ते पुस्तका पर्यंत सर्वत्र जोक लिहिलेले असतात.
मुलांना लैगिक शिक्षण आवश्यक आहे म्हणजेच जेव्हा ते अशा प्रकारचे साहित्य वाचतात तेंव्हा स्वप्नरंजन आणि सत्यातला फरक करु शकतील. ते गरजेचे सुद्धा आहे.
27 Oct 2021 - 11:55 am | कुमार१
सध्या चावट मराठी विनोद असणारी अनेक संस्थळे आहेत. त्यातले हे एक
एरवीच्या रटाळ बातम्यांचे दळण बघत बसण्यापेक्षा मला इथे चक्कर मारायला आवडते.
काही विनोद सुंदर असतात आणि त्यावर आम्हा नवरा-बायको असे दोघांनाही एकत्रित खळखळून हसता येते. 😀
27 Oct 2021 - 11:50 am | अकिलिज
आमचा प्रवास कुमार सरांसारखाच झाला. १क्ष, २क्ष ,३क्ष मार्गाने. आणि तो कॅसेट अडकण्याचा प्रकार तर घाम फोडणाराच असायचा. झक मारली आणि प्लान बनवला असं त्या क्षणाला व्हायचं. आणि परत अश्या प्रकाराच्या नादाला लागणे नाही असं मनाने ठरवून चार महीन्याच्या आतच पुन्हा प्रोग्राम व्हायचा.
साहित्यामध्ये 'गॄहशोभिका' नावाचे मासिक होते. त्यात पत्रोत्तराचा प्रकार होता. माझे अमक्या तमक्या वयाच्या काकूबरोबर संबंध आहेत तर काय करू टाईप प्रश्न असायचे. तेही खोटे आहेत हे माहीती असूनही चवीने वाचायला मजा यायची.
27 Oct 2021 - 11:59 am | प्रकाश घाटपांडे
सेक्सायन हे निरंजन घाटे यांचे मानवी लैंगिकतेचा वैज्ञानिक व सांस्कृतीक इतिहास सांगणारे उत्तम पुस्तक आहे. स्टोरीटेल वर देखील ते उपलब्ध आहे.
27 Oct 2021 - 12:49 pm | प्रकाश घाटपांडे
लावण्यांमधे स्त्रीपुरुष आकर्षणाचा मुद्दा हा शृंगार, वर्तन, अशा मुद्द्यांभोवती बोली भाषेतील प्रतिकांमधून सुरेख गुंफलेला असतो.
चिंचा आल्यात पाडाला
हात नको लावूस झाडाला-
माझ्या झाडाला !
माझ्या कवांच आलंय् ध्यानी
तुझ्या तोंडाला सुटलंय् पाणी
काय बघतोस राहुन आडाला ?
मी झाडाची राखणवाली
फिरविते नजर वरखाली
फळ आंबुस येइल गोडाला
माझ्या नजरेत गोफणखडा
पुढंपुढं येसी मुर्दाडा
काय म्हणू तुझ्या येडाला ?
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – जशास तसे
28 Oct 2021 - 7:26 am | चौकस२१२
मराठी भाव गीतात चित्रपट गीतात शृंगार / कामेच्छा अगदी भरलेली
हेच बघा ना
मी मज हरपुन बसले, ग
आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले, ग
साखरझोपेमध्येच अलगद प्राजक्तासम टिपले, ग
त्या श्वासांनी दीपकळीगत पळभर मी थरथरले, ग
त्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजत उमलत झुलले, ग
त्या नभश्यामल मिठीत नकळत बिजलीसम लखलखले, ग
दिसला मग तो देवकिनंदन अन् मी डोळे मिटले, ग
27 Oct 2021 - 1:13 pm | जेम्स वांड
आनंदध्व्जाच्या कथांची हट्कून आठवण झाली !
ले. आनंद साधले यांना भावपुर्ण स्मरणांजली _/\_
तुवाते तया आनंदमार्गी आनंदध्वज गारुचिये स्मरण करोन दिधलेस मित्रा, आता द्वादशी पारायण करो पडे.
मय मदिराक्षी भोवताली असोनिया सुद्धा स्थितप्रज्ञ अशिया गारुने लोकांचे पार पाडियेलेले अवघड प्रेम ते संभोग प्रसंग वाचन करावयाचे सुखच ते विरळ,
अहाहा अहाहा बडा मझा आला बहुत मझा आला गारु
---///----
आनंद साधलेंची आनंदध्वज द्वादशी आधारित चोपडी ही रिबाल्ड लिटरेचरचा कदाचित एकमेवाद्वितीय नमुना असावा मराठी साहित्यातील. स्त्री पुरुष जननांग वर्णनाला पक्व फळे, चंद्र सूर्य, काठी दांडा, विहीर, कातळ इत्यादी रूपके वापरून रचलेल्या ह्या कथा, ओंगळ नाहीत पण विदिन गुड टेस्ट अश्लील तरीही सुसंस्कृत वाटाव्यात असले ते चमत्कारिक कॉम्बो होय !.
27 Oct 2021 - 1:16 pm | जेम्स वांड
कुमार सर लेख आवडलाच.
९०च्या दशकातील (आता पस्तिशीत असलेले) आमच्यासारखे कैक लोक ह्या साहित्य/चित्रपटांच्या डिलिव्हरी सिस्टममध्ये आलेल्या फरकांचे जिवंत साक्षीदार आहोत, कॅसेट आणणे, अडकलेल्या कॅसेट व्हीसीआर खोलून (चमच्याने !) काढणे, ते पुढे सीडी, डीव्हीडी, ब्लु रे डिस्क, पेन ड्राइव्ह, स्ट्रीमिंग ते आता व्हीआर सगळं तिच्यायला ह्याची देहा ह्याची अवयवा (;)) बदलताना बघितलं आहे.