मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शृंगार

नखरा नाही इतका बरा

पाषाणभेद ·
नखरा नाही इतका बरा
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून नखरा नाही इतका बरा ठेव हातचं थोडं राखून ||धृ|| अगदी सकाळी इतकी सजली नाही कसर तू ठेवली कसली मोगर्‍याची फुले वेणीत माळली सुगंधी मन माझे कसे ठेवू मी झाकून ||१|| कुणी रंभा म्हणू की अप्सरा स्वर्गाची तूला बघताच होई तगमग जीवाची दागदागीने घालून रस्त्याने चालली मागे नको ग पाहू अशी मान वळवून ||२|| तुझ्या नजरेला माझी नजर भिडली पिवळ्या केवडी रंगानं जादू केली प्रित दोन जीवांची जुळू लागली नको झुरवू आता दुर उभी राहून

वसंत काव्य मालेत पुष्प गुंफायला निमंत्रण....

शशिकांत ओक ·
मित्रहो, वसंत बहरला पानोपानी । लाली धरली गुलमोहरांनी ।। कंठ आला कोकिळेला । रुंजलेकवि शब्द गंधाला ।। कविराजांनो अणि राणींनो, आपले वसंत काव्यमालेच्या निमित्ताने काव्यकुसुम कट्टयाकरिता स्वागतम्.... आपणास वसंत काव्य मालेत पुष्प गुंफायला निमंत्रण - Beer आपण फक्त इतकेच करायचे आहे - जसे जमेल तसे, काव्य निर्मित करा - जेणे करून आपला परिचय त्यात

संदर्भ

मिसळलेला काव्यप्रेमी ·
प्रेमओले तप्त ओठ आज पुन:श्च थरारले तू समोर ठाकताच फिरुनी शुष्क जाहले तव लोचनी तरळताच रंग माझिया प्रितीचे गालावरील गुलाब तुझिया बघ उमलू लागले सात्विक चेहर्‍याशी ती लाली पाहून नयन सुखावले क्षणी मनात माझिया तुळशी वृंदावन उमटून गेले नजर भिडताच कस्तुरीगंधित काया किंचित थरारली रुपसंपन्न मृगनयनी नवतारुण्य अवचित अवगुंठले प्रयास तो अनुराग लपविण्याचा किती निष्फळ नजर अन् मनातील द्वंद्व पहा लख्ख दिसू लागले

गवसला एक पाहुणा : लावणी

गंगाधर मुटे ·
गवसला एक पाहुणा : लावणी पहाटलेली विभोर लाली उधाण वारा पिऊन आली मस्तीतकाया, धुंदीत न्हाया कशी उतावीळ झाली गं बाई उतावीळ झाली मन ऐकेचना, तन ऐकेचना जाई पुढे, पळते पुढे सांगू कुणा?

वासंतिका‏

स्पंदना ·
स्वागता पुन:र्मिलनाच्या उत्तरा अन रविच्या घेऊन बहार साचा आला वसंत आला || विरह तो सहा मासांचा तिज शुष्क थंड शिशिराचा गर्भात फुलवीत आशा पुन:रुपी वसंत आला || रंगेल सोहळा आता विरहीत दोन जीवांचा उभारीत गुढ्या पर्णांच्या विलासी वसंत आला || लेऊन गर्द हिरवाई कोरून पुष्प काशिदाही रसरशीत फळे ही पदरी मिलनास अधिर अवनी ही || आला वसंत आला .......... __/\__ अपर्णा

पावसात भिजतांना

मिसळलेला काव्यप्रेमी ·
बरसणार्‍या मेघधारांना वार्‍यावर पेटतांना पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना सरीवर सर कोसळून हे कृष्ण मेघ गडगडतांना पहायचेय तप्त धरेसह माझ्या मनास निवतांना रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना ग्रीष्माचा दिवस सारून श्रावणसांज अवतरतांना पहायचेय जाईवेलास फिरुनी तरुण होतांना ओलेत्याने तिला माझी कविता गुणगुणतांना पहायचेय मोहरून तो कोकीळकंठ पालवतांना पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना पहायचेय तिने मला एकदा, मी तिला चिंबून पाहतांना |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२०/०४/२०११)

कार्ट्यांस...

नगरीनिरंजन ·
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

पुन्हा नव्याने...

मिसळलेला काव्यप्रेमी ·
प्रेरणा : हा प्रतिसाद पुन्हा नवा खेळ मांडूया पुन्हा अनोळखी होऊया पुन्हा नव्याने भेटूया चल पुन्हा नव्याने जगूया ओंगळ दु:खांना स्वछ पुसून गोजीर्‍या सुखांना गिरवूया जन्मांतरीचे आपले रेशमी नाते नवरंगाच्या धाग्यांनी सजवूया चल सखे................. सुंदर प्रेमाचे साजिरे रूप नव्याने एकवार लेवूया हुकलेल्या सार्‍या स्वप्नांना मनाच्या गाभार्‍यात रुजवूया चल सखे................... सोड आता हा समंजसपणा काही क्षण फिरून धुंद होवुया विसरुनी हा विरस शहाणपणा पुन्हा नव्याने कोवळे वेड पांघरुया |- मिसळलेला काव्यप्रेम

चांदण्यांस मिठी मारतांना

निनाव ·
चांदण्यांस मिठी मारतांना चंद्रास गोड का वाटत असेल? त्यास आलिंगनात भरतांना रात्रीस मोह का आवरत असेल? दिवस उजाडुच नये कधी वाटत तिला ही असेल मोहक चंद्रा च्या पाशातुन सुटतांना जीव तारकांचा का आवळत असेल? चंद्रा च्या कुशी खालून अलगद पदर खेचून पहाटे आंथरुणातून उतरत रात्र जेंव्हा असेल सुटलेल्या केसांमधुनी लाज आवरत पदरा खालील मन तिचे का बांवरत नसेल? मधु-चंद्र काय असावे चंद्रास का ते कळत असेल? रोजच असते रात्र त्याचीच मोह मिलना चे का उमगत असेल? चांदण्यांस मिठी मारतांना चंद्रास गोड का वाटत असेल? चंद्रास आलिंगनात भरतांना रात्रीस मोह का आवरत असेल?

अक्षय पात्र

ajay wankhede ·
तु मला अजुनहि जानलं नाहिस कारण तुझा स्वभाव च तसा आहे त्याला मि तरि काय करु. मि तर भरभरुन देतो... तुला घेता च येत नाहि , त्याला मि तरि काय करु. मि देता देता थकत नाहि, पण तु घेता घेता च थकतेस, त्याला मि तरि काय करु. मि तुला देतो ते हि तुला आवडत नाहि, मि तिला देतो ते हि तुला आवडत नाहि. कारण तुझा स्वभाव च तसा आहे.. त्याला मि तरि काय करु. मि तुला तिला सर्वानाच देतो ... तरि माझं पात्र रिकामं होत नाहि. मि सदैव त्रुप्त तु सदैव अत्रुप्त . आज मि तुला माझं अक्षयपात्र च देतो.. ते तरि तु निस्वन्शयि मनाने घे. नि मि जसा देतो तसं तु भरभरुन दे.