Skip to main content

शृंगार

स्वप्न

लेखक नाहिद नालबंद यांनी रविवार, 23/01/2011 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
निळे, जांभळे, केशरी, तांबडे मेघ मेघात मिसळले होते हाती हात एकमेकांचे बोटात बोट गुंफले होते नयनांशी नयन दोघांचे काहीतरी बोलले होते घेता जवळी साजणाने लाजूनी शहारले होते चुंबिताना अधर माझे स्वप्नी पाहिले होते - नाहिद नालबंद
काव्यरस

तारुण्य ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 20/01/2011 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
तारुण्य किती मस्त असते एक छान कविता असते तारुण्य म्हणजे सळसळनारा कल्लोळ असतो बेदम असा उत्साह असतो मस्तीचा एक डंख असतो डंख मारण्याची डंख घेण्याची हीमत म्हणजे तारुण्याचा कैफ असतो तारुण्याला नसतो भविष्यकाळ नसतो भूतकाळ त्याला असतो फक्त वर्तमानकाळ भूतकाळाने तो नाही मन रिझवत तो जगत असतो आजची स्वप्ने आणि ठाऊक असतात उद्याची बहाणे तारुण्य पाखराच्या मस्तिसारखे असते फुलपाखरासारखे झुलत असते काय करू नि काय नको त्यांचे मस्त एक गाणे असते तारुण्यात असते आभाळावर मुठ उगारण्याची हिम्मत कोठल्यातरी ध्यासाने त्यांचे मन जाते झिंगत काविता सुद्धा जमून जातात अस्सल मस्त टिकून राहतात जन
काव्यरस

नार देखणी..(लावणी)

लेखक प्राजु यांनी बुधवार, 19/01/2011 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी नजर कट्यारी, टंच उभारी, मुसमुसलेली ज्वानी अहो राजसा, जवळी बसा, ऐकून घ्या मागणी माझी... ऐकून घ्या मागणी.. मान वळविते, जरा झटकते, डौल हंसापरी असा शिणगार, नव रत्नहार, गोर्‍या कांतीवरी विशाल भाळी, आणा बिंदली, लखलख चंद्रावाणी माझी... ऐकून घ्या मागणी.. गर्भ रेशमी, रंग कांचनी, शालू हा भरजरी मखमल चोळी, निळी जांभळी, नक्षी काठावरी कमर साजिरी, बंद चंदेरी, घाला मज आणुनी माझी... ऐकून घ्या मागणी.. धुंद गारवा, मनी काजवा, लुकलुक करतो भारी विडा केशरी, रंगतो परी, मैफ़िल सजते न्यारी बसा पळभरी, देह कस्तुरी, लुटेल दुजा कुणी माझी... ऐकून घ्या मागणी.. - प्राजु
काव्यरस

काव्यक्षण (कविता संग्रह)

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 16/01/2011 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत मिसळपाव वर प्रकाशीत झालेल्या सर्व कविता एकत्रीत स्वरूपात येथे देत आहे. - निमिष न.

नव्या वर्षाची हीच जिंगळ.....

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 07/01/2011 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
अंगळ मंगळ टंगळ चंगळ शनीवारात येता चम्बळ फुफाट्यातला फाटका फटाका मोजून सटका. चालुनी चालुनी ;चप्पल दमली घालु जाता अंगठा तुटका येता ध्वनी फीमेल कानी. क्यूमेल होऊनी काया फुलते. हलते डूलते निर्लज्ज लाजते अंगळ मंगळ टंगळ चंगळ चेहेरा मात्र अम्मळ अमंगळ नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ दादोजींचा दुर्दम्य दंगा , औरंगनगरी थेट पंगा अशोकाची निष्पर्ण छाया बारामतीत जाई वाया विलासातले सुशील सारे नारायणाच्या शीडात वारे. दंगा घाला पिंगा घाला हातात हात ..हळू चाला नव्या वर्षाची हीच जिंगळ घेऊनी सज्ज मद्यमंडळ खळ्ळ खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्याक खळ्ळ खॅट्य

प्रच्छन्न प्रोमेथियसचे प्रमाथी प्राक्तन

लेखक शरदिनी यांनी गुरुवार, 06/01/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोपित झेयुस शापित राजा यकृत तुकडे गिधाड खाजा पुराणवांगी ग्रीक नवाजा अडम तडम तडतड बाजा पितळ्यांच्या गायीला फ़्रेंच कल्हई जैताच्या गावात ऊर्जेची उईउई रशियन पतंगाला 'हिरवा' मांज्जा अडम तडम तडतड बाजा ठाकरच्या वाडिला गालीब मिर्झा एक नॉर सूप महा नॉर ऊर्जा एआरडॅनी जयहो राजा अडम तडम तडतड बाजा गोरस पायथा मितीय शक्कल घडवा अद्दल फ़िरवा मुद्दल डब्बा एस्प्रेस शिवला बोज्जा अडम तडम तडतड बाजा भ्रमणधनीवर आजा आजा "देव कोण" ते कंपित फ़ज्जा आस्तिक नास्तिक झगडा लज्जा अडमतडम तडतड बाजा प्रच्छन्न प्रमेय नंदनसिद्धी जोहर यळकोट वृद्धी वृद्धी शब्द बापुडे करती मज्जा अडम तडम तडतड बाजा शरद

सांजवेळी सोबतीला..

लेखक मयुरेश साने यांनी मंगळवार, 04/01/2011 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
सांजवेळी सोबतीला - एकदा येऊन जा ओठ जे गातात गाणे - ओठी तू घेऊन जा ज्या - मुळे फुलती कळ्या - अन् पाकळ्या होती खुळ्या वसंत तो "मी" प्रितीचा - तू भेटुनी बहरून जा न भेटण्याची कारणे आता मला देऊ नको भेटण्याच्या कारणांची - कारणे ऐकून जा याच - साठी टाळतो मी - पौर्णीमेचा चंद्र ही कोजागिरी असते कशी ?- तू एकदा दाऊन जा शब्द ही सोडून जाती - लागता चाहुल तुझी मी जे मुक्याने बोलतो - तू एकदा समजून जा श्वास ही बघ एक होती - "मी "- न् - "मी"!
काव्यरस

लेवू दे निळाई..

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 19/12/2010 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
झेपावत्या धरेला गगना कवेत घेई अंगांग तृप्त कर तू मज लेवू दे निळाई आधार मीच होते दुबळ्या जगास सार्य़ा माझ्या मनातूनी का पण शोधते निवारा जेव्हा तुला पहाते हरपून भान जाई देतोस रंग ओले माझ्या सुन्या मनाला क्षितिजास रेखिसी अन सौभाग्यरूप माला घे जिंकूनी मला तू अपुल्या गृहास नेई - स्वानंद
काव्यरस

जे प्रेम करून लग्न करतात ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 15/12/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा तो प्रेम करतो तेव्हा त्याच्या खिशात चंद्र असतो जेव्हा ती प्रेम करते तेव्हा तिच्या मनात एक स्वप्न असते दहा पेंशाचे फुटाणे खाता खाता दोघांचे एक गाणे असते चला इथपर्यंत पाऊलवाट सापडली स्वर्ग आता हाकेवर आहे आमचे प्रेमतर सात जन्माची ठेव आहे !! तो तिच्या डोळ्यात बघतो एक छान गाणे गातो ती डोळे मिटते त्याच्या गाण्यात हरवून जाते इथपर्यंत गाडी येता येता ती अवघड वाट संपून जाते प्रेमाचा शेवट लग्नात होतो हु.sss...शः....!! आई बाबांचा अवघड प्रश्न आपण चुटकीसरशी सोडवला ह्याच आनदात दोघे असतात संसाराचे गाणे ठेका धरून गात असतात ....!!
काव्यरस