वासंतिका
लेखनविषय:
काव्यरस
स्वागता पुन:र्मिलनाच्या
उत्तरा अन रविच्या
घेऊन बहार साचा
आला वसंत आला ||
विरह तो सहा मासांचा
तिज शुष्क थंड शिशिराचा
गर्भात फुलवीत आशा
पुन:रुपी वसंत आला ||
रंगेल सोहळा आता
विरहीत दोन जीवांचा
उभारीत गुढ्या पर्णांच्या
विलासी वसंत आला ||
लेऊन गर्द हिरवाई
कोरून पुष्प काशिदाही
रसरशीत फळे ही पदरी
मिलनास अधिर अवनी ही ||
आला वसंत आला ..........
__/\__
अपर्णा
वाचने
2950
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
कविता छानच .. आवडली ..
तुमची 'आलेख' हि कविता जास्त आवडली होती... ही सुद्धा कविता तशीच, नाविन्य.. पुन्हा फिरुन येणारी पालवी मस्तच...
विशेष करुन
गर्भात फुलवीत आशा
आणि पर्णांच्या गुढ्या उभारुन ह्या ओळी खरेच खुप मस्त वाटल्या ..
पर्णांच्या गुढ्या काय मस्त कलप्ना आहे नाहि ...?
असेच लिहित रहा .. वाचत आहे
सुरेख!
सुंदरच. मस्त ... लय आणिक शब्द कोश.. मस्त जमली आहे. छान वाटले वाचतांना. - पुलेशु. :).
सुरेख!
मस्तच.. आवडेश..
अवांतरः च.गो. यांची चारोळी आठवली.
पाने गळताना सांगतात
वसंत आता येणार आहे
वसंत ओरडतच येतो की
मी लगेच जाणार आहे.
:)
In reply to मस्तच.. आवडेश.. अवांतरः by मराठमोळा
अप्रतिम ममो!
सुंदर!
वा !!
मस्त आहे कविता.
मस्त..!
धन्यवाद तात्या, जागु, सुहास, नगरी, प्राजु ,गणेशा, निनाव आणि मिका. आभार .
वसंताचे रंग घेवून तुमची कविता आली.
कविता छानच .. आवडली ..