मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नखरा नाही इतका बरा

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
नखरा नाही इतका बरा
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून नखरा नाही इतका बरा ठेव हातचं थोडं राखून ||धृ|| अगदी सकाळी इतकी सजली नाही कसर तू ठेवली कसली मोगर्‍याची फुले वेणीत माळली सुगंधी मन माझे कसे ठेवू मी झाकून ||१|| कुणी रंभा म्हणू की अप्सरा स्वर्गाची तूला बघताच होई तगमग जीवाची दागदागीने घालून रस्त्याने चालली मागे नको ग पाहू अशी मान वळवून ||२|| तुझ्या नजरेला माझी नजर भिडली पिवळ्या केवडी रंगानं जादू केली प्रित दोन जीवांची जुळू लागली नको झुरवू आता दुर उभी राहून ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २०/०५/२०११

वाचने 5764 वाचनखूण प्रतिक्रिया 9

अत्रुप्त आत्मा 20/05/2011 - 02:22
एकदम कडक...मोगय्राचा सीझन ऊन्हाळ्यात का येतो?...हे आज कळलं...

चित्रगुप्त 06/09/2011 - 17:11
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून... दागदागीने घालून रस्त्याने चालली मागे नको ग पाहू अशी मान वळवून ... नको झुरवू आता दुर उभी राहून ....

चित्रगुप्त 06/09/2011 - 17:11
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून... दागदागीने घालून रस्त्याने चालली मागे नको ग पाहू अशी मान वळवून ... नको झुरवू आता दुर उभी राहून ....