Skip to main content

जिलबी

वाट!

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 26/06/2016 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या पावसात एक फांदी तुटली आपटलीच मग झाडंच कोसळलं धप्पदिशी अजस्त्र सांगाडा जमीनीवर पसरला. कधीकाळी त्यावर किलबिल पक्षी बसायचे आजकाल फक्त कावळेच शतकानुशतके झाड उभं होतं गुण्यागोविंदाने जगत होतं संसार करावा तर झाडासारखा पण एकाएकी खंगूनच गेलं उन्मळून पडावं असं काही राहीलंच नव्हतं तरीही पडलं दु:ख त्याचं नाहीच पण खाली एक कुत्रं बसलं होतं गेलं बिचारं :(
काव्यरस

बंद पडलं..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 22/06/2016 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या! गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!" सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत. "काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. " येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून. लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून. कस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू? कैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू??? (दुत्त दुत्त!

आळस

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 10/06/2016 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी मन भरून येतं काठोकाठ जावंसं वाटतं दूर दऱ्या डोंगरात डुंबावं वाटतं भल्याथोरल्या समुद्रात पण अशावेळी मला आळसंच येतो मग झोप झोपतो मी गपगार पांघरुनात कधी वाटतं चमकाव्या विजा कडाडून आकाशात बरसाव्या धारा मुसळधार अंगणात पण रखरखीत उनंच पडतं दिवसभर मग बसावं लागतं सावलीत आडवं व्हावं लागतं काटकोनातलं जग दिसतं राहतं स्वप्नात आळसंच दाटलेला असतो म्हणा जगण्यात आळसाचे असतात प्रमुख तीन प्रकार ऑय य्यॉय याय ... उद्या सागेनॉय य्यॉय जरा आळसंच आलॉय य्यॉय यियॉय्य . . हम्म..

<मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका>

लेखक नाखु यांनी शनिवार, 21/05/2016 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका एकोणवीस शोधण्यात खूप वेळ जातो काथ्याकुटात एक धागा हुकला आहे त्याच्या जरासं खाली एक किडा वळवळतोय दुर्लक्षण्यात खूप वेळ जातो टंकाळा आल्यावर मी एखादा प्रतिसाद लिहायला घेतो अर्थ? समजण्यात खूप वेळ जातो तोल सुटलाय मिपावरचाही रोज उठून कोण साव्ररणार त्याला? सल्ला, मागण्यातही तूचभेळ खातो मिपा ! ही तर एक रिक्षाच आहे वाट पाहण्यात (चांगल्या धाग्याची) खरंच खूप वेळ जातो -नजरबंद

गेले मोदी कुणीकडे

लेखक anilchembur यांनी मंगळवार, 17/05/2016 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचा पाऊस पडे सारखा महागाईलाही पूर चढे विमान उडवीत चहूकडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे शिक्षण खोटे पदवी खोटी मंत्रीणबाई तुळशी झाली केजरीवालची पडता बिजली दचकून तीचा ऊर उडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे पैसा काळा आणू म्हणुनी ठोकूनी भाषण दाही दिशांनी चाय - गाय पे चर्चा करूनी मनकी बाता देश बुडे , गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे चीनमध्ये झोपाळ्यावरुनी दाढीवाले बिंब बघूनी हसता संघ भगव्या रानी धर्म अफूचे ऊन पडे गं बाई ....

< < < < मजबूरी हय > > > >

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 16/05/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

< < < मजबूरी है > > >

लेखक रातराणी यांनी सोमवार, 16/05/2016 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
पैजारबुवा के पाऊल पे पाऊल डालते हुए मयभी इधर अपनी एक मजबूर रचना प्रस्तुत करती हूँ. मिकादादा, पैजारबुवा, एसभाय, और अपने मोहल्ले के आन बान शान अभ्या दो डॉट सबकी माफी पयलेसे ले लेती हूँ. दुनियाकी हर एक औरत अपने नवरे का सबसे ज्यादा म्हणजे लयच गुस्सा कब करती मालूम? जब वो घोरता है तब.

< < मजबुरी है > >

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 14/05/2016 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
हमारे दोस्तने हिंदीमे एक कविता क्या लिखी सब लोग उसका लैच कौतुक करने लगे. मेरी तो बहोत म्हणजे बहोत जलने लगी. एकदम चुलके वल्ले लकडीकी माफिक मै धुमसने लगा. बहोत धुवा निकालनेके बाद मैने सोच्या अगर वो लिख सकता है तो मै क्यो नही? फिर क्या..... निकाली अपनी पाचवी की पुस्तक और लिख डालीच ये कविता. क्या करु मजबुरी है ना…..

तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 30/04/2016 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून , अर्धातास, निमुट उभा रहात, आमच्या गप्पा ऐकणार्या तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते “आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले दमुन झोपले आहेत बिचारे.

एकटा !

लेखक ब़जरबट्टू यांनी शुक्रवार, 15/04/2016 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
घरी मी एकटाच, खिडकीत कुंद पाऊस गुरफटलेला, मित्र आला, तो धुरात धुसमटलेला, आता दोघे, निवांत , हातात चहा वाफाळलेला, सरप्राइज ! म्हणत 'ती' आली अचानक, ड्रेस भिजलेला, आता तिघे, क्षण बावचळलेला.. इशारा घुमला, YZ मंदावलेला, येते रे नंतर ! तिचा आवाज, विझलेला.. आता परत आम्ही दोघे, मी परत एकटाच, घुसमटलेला, वाफाळलेला हां YZ पण एकटाच, गाल सुजलेला... (सर्व मंद YZ मित्रांना समर्पित ) :)
काव्यरस