लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला. सिग्नलला थेट मामाशेजारी उभं राहुन त्यांना फोन केला तर ते वल्लींची वाट पाहत रस्त्यावर उभे होते आणि वल्लींनी "अग्दी पाच मिंटात येतो बर्का असं अर्ध्या तासापुर्वी बोलल्याचं शुभवृत्तांत कळला". ;).. तो फोन संपवुन थोडा पुढे जातोय तोपर्यंत Gogglya उर्फ नितीनचा फोन आला. तो अगदी वेळेआधी १५ मिनीटं गणेशतलावापाशी जाउन उभा होता. शिका रे कैतरी नव्या आयडींकडुन. असो. पुढच्या १० मिनिटात मीसुद्धा गणेश तलावापाशी पोचलो. मंडळी कुठेही दिसेनात म्हणुन मी जरा तलावाच्या बाजुच्या रस्त्याला गाडी दिसली तर मुवि त्यांच्या चिरंजीवांच्या गाडीवर बसताना दिसले. त्यांना हात केला. तिथेचं झकासरावही भेटले. त्यांच्याशी बोलत असतानाचं मिपाचे औरंगजेब उर्फ गिर-जा काका उर्फ माझा मित्र प्रगो ह्याचा फोन आला. त्याला पत्त्याला लाउन आम्ही बागेकडे जायला निघालो.
(ह्या लोकांनी आणि पहिला राजा ह्या आयडीने बागेबाहेर बराचं उद्योग केल्याचं लक्षात आलं. बागेजवळ बसलेल्या चार टाळक्यांना त्यांनी "मिसळपाव?" असा प्रश्ण टाकला आणि त्या टाळक्यांनी पण "नाssSssSsही, वडापाव" असं उत्तर देउन गार केलं. दोनदा झालं हो असं. शेवटी ती पोरं येईल त्याला वडापाव असा आवाज द्यायला लागली असं ऐकुन आहे. ;) ;) )
मग आम्ही सगळ्यांनी बागेकडे कुच केलं. लांबुनचं बागेच्या पोडियम वर थांबलेले वल्लीबुवा दिसले (वल्लीबुवा-वल्ली आणि बुवा नव्हे). गाड्या लाउन मुविंबरोबर पोडियमवर पोचलो. तिकडे मितान तै, त्रि-----------------वे--------------णी तै (एखादा स्पेस कमी पडला असेल तर माफ करा हो), सौ. मुवि आणि अजुन एक तै होत्या (सॉरी, मला नावं नीट ऐकु आलं नाही. धाग्यामधे अपडेट कराल का? :( ). सौ. मुविंनी चविष्ट चिरोटे देउन सगळ्यांचं स्वागत केलं. इकडे अन-अनाहितामधले वल्ली, नितीन पाटील उर्फ gogglya, नाखु'न'काका, एक्काकाका, चौ.रा.काका, पहिला राजा इ.इ. मंडळींनी स्वागत केलं. नितीननी सगळ्यांना कॅटबर्या दिल्या आणि चौराकाकांनी पेढे वाटले. मग ओळखपरेडीचा कार्यक्रम चालु झाला. सगळ्यांची नावं कळली. (त्या एका तैंच नाव नीट ऐकु आलं नाही आणि काहितरी वैचारिक उपद्व्याप करायच्या नादामधे मी विचारायचं राहुन गेलं). तेवढ्यात गणेशा कंपनीला टँजेंट हाणुन कट्ट्याला आले. आणि गप्पा-टप्पांना सुरुवात झाली. हे होतयं न होतय तोपर्यंत आत्मुस बुवांचा (फेमस कथानायकाचे साहित्तीक निर्माते, दिगदर्शक, उत्तम लेखक, फुलराणीप्रेमी, जिलबीसंप्रदायाचे स्थापनकर्ते ई.ई.) फोन आला आणि येतोय असं कळवलं. ते येताहेत हे कळल्यावर मंडळींचे चेहेरे आनंदाने उजळले. =)). कपिलचाही फोन आला.
तेवढ्यात अनाहिताधर्माला जागुन समस्तं तै वर्गानी बागेमधे एंट्री घेउन वेगळा कट्टा चालु केला. =))
थोडा वेळ बाहेर उखाळ्या-पाखाळ्या काढुन, नं आलेल्या आयडींना उचक्या लावण्यामधे मंडळी गुंतली. (अन्या दातार, कालच्या तुला लागलेल्या उचक्यांना संपुर्णपणे नाखुनकाका जबाबदार आहेत रे). दंबुकवाले डॉक का आले नसावेत ह्यावरुन बराचं खल झाला आणि एक्काकाकांनी ते प्रॅक्टीसमधे गुंतलेले असल्याने आले नसावेत असा अंदाज व्यक्त केला. (पेशंट प्रॅक्टिस का टारगेट शुटिंग प्रॅक्टीस ही अंमळ शंका आहे) ;). तेवढ्यात दाढीधारी औरंगजेबाचं सपत्नीक आगमन झालं. त्याच्या पाठोपाठ कपिलही आला. मग सगळ्यांनी बागेमधे कुच केलं. अंधार व्हायला लागलेला होता. मंडळींनी इथे माझी खेचायचा माफक अतिअयशस्वी प्रयत्न करुन पाहिला =)). नाखुनकाकांना चौथा कोनाडा ह्या सखोल आयडीचा फोन आला आणि परत त्यांना आणायसाठी म्हणून आम्ही बागेबाहेर आलो. चौथा कोनाडाही सपत्नीक आलेले होते. एवढी हसत खिदळत चाललेली मंडळी बघुन बागेच्या गार्डांची पाचावर धारण बसली असावी असा अंदाज आहे. सगळेजण सावरकर उद्यानामधल्या धबधबा चौथर्यावर जमले. चिरोट्यांचा राउंड टु झाला. तिकडे परत गप्पांचा राउंड टु सुरु झाला. तिकडे जेमतेम १० मिनिट होतायत तोपर्यंत बुवांचा फोन आला. त्यांनाही बागेपाशी बोलावलं. त्यांना घ्यायला म्हणुन मी परत बागेच्या दाराशी गेलो. (अश्या फेर्या रोज मारल्या असत्या तर काठीसारखा बारिक झालो असतो. असो).
बुवा आपले बागेच्या दाराशी सिक्युरिटीपाशी काही चौकशी करताना दिसले. बागेचा.....इंशुरन्स...शांती वगैरे काही शब्द अस्पष्टपणे कानावर पडले. त्यांना घेउन परत धबधब्यापाशी गेलो. जाता जाता गेल्या चार दिवसात त्यांच्यावर झालेल्या खरडहल्ल्याविषयी माफक चर्चा केली. बुवांनी दुर्लक्ष करणे (उर्फ फाट्यावर मारणे) ह्या हत्याराचे उपयोग समजाउन सांगितले. धबधब्यापाशी आल्यावर सर्व मंडळींनी कथानायकाला जुळं झाल्याबद्दल गुरुजींचं हार्दिक हाबिणंदण केलं. बरीचं "विचारपुस" केली. बुवा अजुनही फुलराणी कोण हे सांगायला तयार नाहित असं एक निरि़क्षण नोंदवतो. आता उशिर झाल्याने जेवायला जायचा बुट काढला गेला. कुठे जायचं ह्यावरुन चार-सहा हॉटेलांची नावं चावली गेली. शेवटी रसोई से फायनल करुन मंडळी बागेबाहेर यायला निघाली. सिक्युरिटी गार्डाच्या बाहेर पडाच्या शिट्ट्यांना चक्क फाट्यावर मारुन मंडळी रमतगमत बाहेर आली. बाहेर पार्किंग मधे पण परत थोडा वेळ कट्टा रंगला. आणि मंडळी जेवायला रवाना झाली. मी, कपिल आणि नितीन जेवायला जाणार नसल्याने बागेबाहेर आलो. कपिलही गेला. मग नितीनशी थोडा वेळ गप्पा हाणुन आम्ही आपापल्या घराकडे रवाना झालो.
कोणाचा गफलतीनी नामोल्लेख राहिला असेल तर सांगा रे.
(जेवण वृत्तांत लिहा रे कोणीतरी.)
डावीकडुन नितीन पाटील (gogglya), इस्पिकचा एक्का, झकासराव, उत्सवमुर्ती मुवि, चौरा, पहिला राजा, वल्ली, नाखु आणि मुवि ज्युनिअर.
वाचने
56375
प्रतिक्रिया
127
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुपच धमाल कट्टा !
छान फोटो आणि लिहिलं पण छान.
In reply to खुपच धमाल कट्टा ! by चौथा कोनाडा
नक्कीच !
In reply to छान फोटो आणि लिहिलं पण छान. by कॅप्टन जॅक स्पॅरो
या लेखणीत
In reply to नक्कीच ! by चौथा कोनाडा
धन्यु नाखु !
In reply to या लेखणीत by नाखु
५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना
In reply to धन्यु नाखु ! by चौथा कोनाडा
आमची कायनायठीक ल्युनातर बाबा
In reply to ५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना by टवाळ कार्टा
यवरां महेत नै?
In reply to ५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना by टवाळ कार्टा
८० सीसीची लुना?
In reply to ५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना by टवाळ कार्टा
स्कूटी
In reply to ५० सीसीची स्कूटी अस्ते...लूना by टवाळ कार्टा
५०
In reply to स्कूटी by श्रीरंग_जोशी
शाळेत असताना चढावर असणार्या
In reply to ५० by पैसा
वरच्या प्रतिसादामधे सनी नामक
In reply to शाळेत असताना चढावर असणार्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
टिव्हिएसची
In reply to ५० by पैसा
अॅक्टिव्हा अँड कायनेटिक
In reply to टिव्हिएसची by श्रीरंग_जोशी
नक्कीच
In reply to अॅक्टिव्हा अँड कायनेटिक by कॅप्टन जॅक स्पॅरो
गाडी कितीही सी.सी.ची असुद्या
In reply to धन्यु नाखु ! by चौथा कोनाडा
हा हा हा
In reply to गाडी कितीही सी.सी.ची असुद्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
म्हणायची एक पद्धत हो.
In reply to हा हा हा by श्रीरंग_जोशी
बरं बरं
In reply to म्हणायची एक पद्धत हो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अजिबात नाही. शिस्तीत नियम नं
In reply to बरं बरं by श्रीरंग_जोशी
हा हा हा
In reply to अजिबात नाही. शिस्तीत नियम नं by कॅप्टन जॅक स्पॅरो
फोटो आणि वर्णन दोन्ही चांगले जमले आहे!
In reply to खुपच धमाल कट्टा ! by चौथा कोनाडा
कॅ.जॅ.स्पॅ.;अ.आ;ई.ए.;'चौ.क,
मिपाकर आणि अनाहिता?
In reply to कॅ.जॅ.स्पॅ.;अ.आ;ई.ए.;'चौ.क, by नूतन सावंत
अॅडीशनल उपव्रुत्तांत खूप
शुक्रवारी हिंजवडीत बरेच
दु..दु..दुर्लक्ष >> =))
In reply to शुक्रवारी हिंजवडीत बरेच by प्रचेतस
@थोड्याच वेळात आत्मूबुवा
In reply to शुक्रवारी हिंजवडीत बरेच by प्रचेतस
गवि-गणेश अन नॅनो-कट्टा
In reply to शुक्रवारी हिंजवडीत बरेच by प्रचेतस
गवि नाय. मुवि...मुवि.
In reply to गवि-गणेश अन नॅनो-कट्टा by चौथा कोनाडा
अर्र र्र र्र र्र र्र र्र र्र र्र . . . . .
In reply to गवि नाय. मुवि...मुवि. by प्रचेतस
मुवि
च म्हणायचं होतं मला ! (हे दोघे ही विहारी असल्यामुळे अक्षरांनी विहरत चुकीची जागा पकडली असावी काय ? आमी आपले मिपाचे जुने वाचक (वाचनमात्र) असल्यामुळे असे टायपो झाला असावा. सॉरी गवि, महासॉरी मुवि) (स्वगत: चौको, जरा जपुन बाबा, पहिल्याच कट्टयाच्या उपवृतांतात असल्या "ध" चा "मा" वाली चुक म्हंजे पुढच्या कटट्याला मुविदादा अन गवि दोघांकडुनही फटके खायची शक्यता आहे. वल्लीनं म्हंजे आपल्या चौदाकरानं वेळीच सावध केलंय)मस्त
कट्टा वृत्त्तांत आणि सगळेच
मस्तच!
वृत्तांत आणि उपवृत्तांत भारीच
तेवढ्यात अनाहिताधर्माला जागुन
In reply to वृत्तांत आणि उपवृत्तांत भारीच by मितान
माझ्या कन्येने तुझी एक ट्यूशन
In reply to तेवढ्यात अनाहिताधर्माला जागुन by टवाळ कार्टा
माझ्या कन्येने तुझी एक ट्यूशन
In reply to माझ्या कन्येने तुझी एक ट्यूशन by मितान
टक्या ,
In reply to माझ्या कन्येने तुझी एक ट्यूशन by टवाळ कार्टा
खिक्क...एमेन टू बैठक कट्टा..
In reply to टक्या , by प्रसाद गोडबोले
हा माझा मिपावरचा (मायक्रो
उपवृत्तांतही
अनाहीतांचे फोटो खूप कमी हायेत
कट्ट्याला मजा आली.
१०० झाल्याबद्दल चिमण्याचे एक
हेल्मेट वर
In reply to १०० झाल्याबद्दल चिमण्याचे एक by टवाळ कार्टा
अरेरे...माझ्या घ्रराजवळ कट्टा झाला ..
मस्त कट्टा
अगदी
In reply to मस्त कट्टा by कपिलमुनी
कट्टा वृत्तांत आणि उपवृतांत दोन्हीही अल्टिमेट!!!!!
झक्कास कट्टा
खुमासदार वृत्तांत -
चान चान!! आता शन्वारचा किंवा
झकास वृत्तांत .....
अशी झाली काय गम्मत …
छान वृत्तांत ।