पॉल पॉट : कंबोडियाचा क्रूरकर्मा

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in जनातलं, मनातलं
23 Jul 2016 - 2:13 am

जन्माच्या वेळचे नाव सलोथ सार. ह्या क्रूरकर्म्याचा जन्म 19 मे 1925 रोजी 'Prek Sbauv ' ह्या कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह पासून 100 मैल दूर असलेल्या खेड्यात झाला. 'पेन सलोथ' आणी 'सोक नेम' हे त्याचे आईवडील त्या वेळच्या मानाने बऱ्यापैकी सुखवस्तू दाम्पत्य होते. 1934 साली पॉल पॉट कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह इथे शिक्षणासाठी गेला आणी तिथे एक वर्ष त्याने बुद्धिस्ट मॉनेस्ट्री मध्ये घालवले. त्यानंतर त्याने एका फ्रेंच कॅथॉलिक शाळेत प्रवेश घेतला आणी 1949 साली आपले शिक्षण पूर्ण केले. तिथून 1949 ला पॅरिस गाठले आणी 1953 सालापर्यंत रेडिओ टेक्नॉलॉजीजचे शिक्षण घेतले. पण सलग 3 वर्षे परीक्षेत नापास झाल्याने त्याला 1953 च्या जानेवारी मध्ये पुन्हा कंबोडियामध्ये परतावे लागले. पण त्यापूर्वीच 1951 मध्ये तो मार्क्सवादी चळवळीत दाखल झाला होता.

1963 साली पॉल पॉट कंबोडियन कम्युनिस्ट पक्षाचा प्रमुख बनला. त्याने अशिक्षित मुले व तरुणांची फौज बनवली ज्याला Khmer Rouge असे नाव पडले. कंबोडियाचा तत्कालिक शासक नोरोडोम सिहनौक ह्याने पॉल पॉटच्या ह्या Khmer Rouge चा निर्दयपणे पाडाव करायला सुरवात केली पण 17 एप्रिल 1975 साली Khmer Rouge ने नोरोडोम सिहनौक ची सत्ता उलटवून लावत देश आपल्या ताब्यात घेतला. 5 जानेवारी 1976 रोजी कंबोडियाने नवे संविधान स्वीकारले व देशाचे नाव बदलून "Democratic Kampuchea" केले. 13 एप्रिलला तो देशाचा पंतप्रधान झाला. मग त्याने देशाच्या नागरिकांचे 3 भाग केले.
1) सर्व अधिकार असणारा.
2) कॅन्डिडेट्स
3) डिपॉसिटीस - हे काहीही अधिकार नसलेले लोक होते. ह्या लोकांना ठार करायचे असे त्याचे ध्येय होते.

देशाची पूर्ण अर्थव्यवस्था फक्त शेतीवर आधारित असली पाहिजे व भरपूर प्रमाणात शेती उत्पन्न मिळवून देश स्वयंपूर्ण करायचा हे त्याचे ध्येय होते. त्याने पैसा चलनातून बाद केला. सर्व शाळा, धार्मिक स्थळे, दुकाने ह्यांचे रूपांतर तुरुंगात केले. सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद केली. काळे कपडे हा पोशाख सक्तीचा केला.
शेती करून देश स्वयंपूर्ण करण्यासाठी फक्त 10-20 लाख लोक पुरेसे आहेत. बाकीच्या लोकांचा जगून देखील काही उपयोग नाही असे त्याने रेडिओ वर जाहीर केले.

सत्तेवर येताच Khmer Rouge ह्या त्याच्या लष्कराने 25 लाख लोकसंख्येचे नाम पेन्ह शहर पूर्ण रिकामे केले. इतर लहान मोठी जिंकलेली शहरे देखील पूर्णपणे रिकामी करण्यात आली. अमेरिकेचा हवाई हल्ला होण्याची शक्यता आहे असे खोटे सांगून त्याने सर्वाना देशाच्या ग्रामीण भागात नेले. तिथे सर्वाना बंदी बनवले गेले. सर्व बंदीवानांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असे शेतीकाम करावे लागे. आणी त्या बद्दल अन्न मिळत असे ते म्हणजे 2 वाट्या भात. त्यामुळे बरीच लोक उपासमारीने आणी अति श्रमाने मारून जात असत. जो कुणी कामाबद्दल तक्रार करेल किंवा कोणताही नियम मोडेल त्याला देण्यात येणारे अन्नधान्य (2 वाट्या भात) बंद करण्यात येऊन त्याला छळ छावणीत नेण्यात येत असे आणी अगोदरच उपासमारीने अर्धमेल्या झालेल्या त्या व्यक्तीला हाल हाल करून ठार मारण्यात येत असे.

बऱ्याच डिपॉसिटीसना साखळ्यानी बांधून खड्डे खणण्यासाठी नेले गेले आणि मग त्यांना त्याच खड्ड्यात जिवंत पुरून टाकले. अशी हजारो किलिन्ग फिल्ड्स आजही कंबोडिया मध्ये सापडतात.

शिक्षित लोक म्हणजे देशाला धोका असे त्याचे मत असल्याने देशातले सर्व डॉक्टर, शिक्षक, शिक्षित स्त्री पुरुष आणी मुले, चष्मां घालणारी लोक, एका पेक्षा जास्त भाषा बोलू शकणारी माणसे, तसेच ज्यांचे हात मऊ आहेत अशा सर्वाना हाल हाल करून ठार मारले. ह्याचे सैनिक कोणाच्याही घराची अचानक झडती घेत आणी घरात पुस्तक किंवा पेपर जर आढळला तरी त्या घरातल्या सर्वाना ठार करण्यात येई. जर कुणाला चष्मां असेल तर ह्याचा अर्थ त्याला वाचता येते असे समजून त्या व्यक्तीस ठार केले जात असे. त्यामुळे लोकांनी चष्मे फेकून दिले तर ह्याचे सैनिक लोकांच्या नाकाचे निरीक्षण करत. चष्मां घातल्याने नाकावर एक काळसर डाग किंवा खड्डा पडतो. तो जर असेल तर त्या व्यक्तीस शिक्षित समजून ठार केले जाई. त्याच्या काळात 3 किंवा जास्त लोकांना एकत्र यायला बंदी होती. जर असे आढळले तर त्या सर्वाना शत्रू ठरवून ठार मारण्यात येई.

बंदुकीची गोळी ही किमती वस्तू असल्याने लोकांना मारण्यासाठी तो हातोडी, दांडे, फावडी, कुदळ अशी हत्यारे वापरत असे किंवा जिवंत पुरून टाकत असे. तर काही लोकांना बेडला साखळ्यांनी बांधून ठेवले जाई (त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत).

शेती आधारित अर्थव्यवस्थेत इतर जगाशी काहीही संबंध ठेवायची गरज नाही असे मत असल्याने त्याने चीन सोडून इतर सर्व देशांशी संबंध तोडून टाकले. देशातील विमान तळ बंद केले, सीमा सील केल्या जेणेकरून कोणीही देश सोडून पळून जाऊ शकणार नाही.

1975 ते 1979 ह्या त्याच्या 4 वर्षाच्या जुलमी कारकिर्दीत कंबोडियाच्या 70 लाख नागरिकांपैकी जवळपास 25 ते 30 लाख लोकांना ठार मारण्यात आले. एक छळ छावणी S - 21 इतकी भयानक होती की तिथे कैद केलेल्या 20000 लोकांपैकी फक्त 7 जण जिवंत राहू शकले. ह्या सर्व मृतांना भाताच्या शेतात पुरले जाई.
आज पर्यंत कंबोडिया मध्ये तब्बल 300 ठिकाणी अशी 'किलिन्ग फिल्ड्स ' सापडली आहेत आणी अजूनही सापडत आहेत.

मे 1975 साली त्याच्या सैन्याने Phú Quốc हे व्हिएतनामचे बेट जिंकल्याने त्याचे व्हिएतनामशी संबंध बिघडले. तह करण्याचे सर्व पर्याय संपल्यावर व्हिएतनामने कंबोडियाशी युद्ध पुकारले. चीनच्या मदतीनं पॉल पॉट ने व्हिएतनामशी लढायचा खूप प्रयत्न केले पण तरीही त्याचा पराभव झाला. ज्यानंतर तो थायलंडला पळून गेला. थायलंडने पॉल पॉटचा आणी त्याच्या सैन्याचा बफर म्हणून उपयोग केला आणी त्याला चीन कडून हत्यारे मिळवून देण्यास मदत केली.

1985 साली त्याने एका इंटरव्ह्यू मध्ये 'मी पूर्णपणे निर्दोष असून माझ्या हाताखालच्या लोकांनी मला न सांगता ह्या हत्या केल्या असे आरोप केला.' त्याच साली व्हिएतनाम ने Khmer Rouge चा पूर्णपणे पाडाव केला. 1989 साली व्हिएतनामचे सैन्य कंबोडिया मधून निघून गेल्यावर पॉल पॉट थायलंड मधून परत देशात आला आणी त्याने नवीन सरकारशी लढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 19 मे 1997 ला त्याला लष्कराने ताब्यात घेतले. पण आपल्याला अमेरिकेच्या हवाली करतील म्हणून त्याने 15 एप्रिल 1998 रोजी औषधांचा डोस जास्त प्रमाणात घेऊन आत्महत्या केली.

आजच्या कंबोडियातल्या जवळपास प्रत्येक घरातले कुणीतरी पॉल पॉट च्या अत्याचारांचे शिकार झालेले आहे. आणी त्यामुळे आजही खूप मोठ्या प्रमाणात ह्या देशातली जनता मानसिक रोगग्रस्त आहे.

समाप्त.

इतिहाससमीक्षा

प्रतिक्रिया

पॉल पॉटला त्याच्या कृष्णकृत्यांबद्दल पुरेशी शिक्षा न मिळताच तो स्वस्तात सटकला. असल्या मूर्खशिरोमणी राज्यकर्त्यांना त्यांच्या देशाची जनताच काय, कुणीच माफ करणार नाही. व्हिएटनामचे याबद्दल कौतुक वाटते की या कणखर देशाने आधी अमेरिकेला आणि नंतर चीनलाही हरवले.

Trump's picture

4 Oct 2021 - 2:53 pm | Trump

व्हिएटनामच्या लोकांबरोबर काम केले आहे. अतीशय चिवट माणसे.

शिक्षित लोक म्हणजे देशाला धोका असे त्याचे मत असल्याने देशातले सर्व डॉक्टर, शिक्षक, शिक्षित स्त्री पुरुष आणी मुले, चष्मां घालणारी लोक, एका पेक्षा जास्त भाषा बोलू शकणारी माणसे, तसेच ज्यांचे हात मऊ नाहीत अशा सर्वाना हाल हाल करून ठार मारले. ह्याचे सैनिक कोणाच्याही घराची अचानक झडती घेत आणी घरात पुस्तक किंवा पेपर जर आढळला तरी त्या घरातल्या सर्वाना ठार करण्यात येई. जर कुणाला चष्मां असेल तर ह्याचा अर्थ त्याला वाचता येते असे समजून त्या व्यक्तीस ठार केले जात असे. त्यामुळे लोकांनी चष्मे फेकून दिले तर ह्याचे सैनिक लोकांच्या नाकाचे निरीक्षण करत. चष्मां घातल्याने नाकावर एक काळसर डाग किंवा खड्डा पडतो. तो जर असेल तर त्या व्यक्तीस शिक्षित समजून ठार केले जाई. त्याच्या काळात 3 किंवा जास्त लोकांना एकत्र यायला बंदी होती. जर असे आढळले तर त्या सर्वाना शत्रू ठरवून ठार मारण्यात येई.

शिक्षीत वर्गाप्रति हा तिरस्कार भयावह आहे आपल्याकडेही हा "बीज" स्वरुपात आढळतोच.

पगला गजोधर's picture

23 Jul 2016 - 1:08 pm | पगला गजोधर

शिक्षीत वर्गाप्रति हा तिरस्कार भयावह आहे आपल्याकडेही हा "बीज" स्वरुपात आढळतोच.

त्यातल्या त्यात, भक्तीभावाचे वातावरणात ... दुसरं मत फक्त व्यक्त केलं तर, शिक्षीत वर्गाकडूनही हा भयावह तिरस्कार अनुभवास येईल.

असो, एका अग्रगण्य राज्यातील काही निम्नशिक्षित लोकांकडून, मातंग समाजाने कोणत्या जनावराचे कातडे कमावून जगावे... यावर सुद्धा निर्बंध आहेत की काय ? असे वाटावे, अशी घटना समजली वर्तमान पत्राद्वारे... कोणी काय खावे/खाऊ नये याबरोबरच आता कोणी काय व्यवसाय करावा /करू नये, याबद्दल लवकरच निर्बंध येतात की काय ? अशी या बातमीसारखी 'बीजे' दिसत आहेत खरं.

नाखु's picture

23 Jul 2016 - 9:12 am | नाखु

प्रांजळपणे सांगतो ही माहीती प्रथमच वाचतो आहे इतके दिवस फक्त हिटलर /आणि चिनचा कोण क्रूर्कर्मा बद्दल वाचले होते.

एका लेखात टंकण्यासारखा विषय दिसत नाही. असे बणण्यामागे (जसे हिटलरच्या उदयापुर्वी जर्मनीचे केलेले जागतीक खच्चीकरण) असेल .

आणि सद्य स्थितीत देश कसा आहे (राजवट हुकुमशाही का अध्यक्षीय पद्धत)

पुलेशु

नितवाचक नाखु

स्पार्टाकस's picture

24 Jul 2016 - 8:48 am | स्पार्टाकस

दुसर्‍या महायुद्धात हिटलरइतकेच, किंबहूना जास्तंच अत्याचार जपानी लोकांनी चीन आणि फिलीपाईन्सच्या नागरीकांवर केले. दुर्दैवाने जपानी लोकांना आजही त्याबद्द्ल खंत वाटत नाही. एकाही जपानी पंतप्रधानाने आजवर त्याबद्द्ल दिलगीरी व्यक्तं केलेली नाही.

जपानी अत्याचाराचं अत्यंत भीषण उदाहरण म्हणजे नानकिंग मॅसेकर!
https://en.wikipedia.org/wiki/Nanking_Massacre

लोनली प्लॅनेट's picture

24 Jul 2016 - 9:49 am | लोनली प्लॅनेट

जनरल शिरो इशी नि जपान मध्ये केलेल्या अमानुष प्रयोगांना तोड नाही

सामान्य वाचक's picture

24 Jul 2016 - 7:24 pm | सामान्य वाचक

उतरती भाजणी लावली तर रशिया आणि जपान याना विभागून पहिला नंबर मिळेल

बाकी प्रत्येकामधेच क्रूरपणाची बीजे असतात। कुणाला अनुकूल परिस्थिती मिळते आणि मग उन्माद वाढत जातो

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jul 2016 - 11:08 am | कैलासवासी सोन्याबापु

खमेर रुज एक निरातिशय भयंकर प्रकार होता, त्यात सतत सत्तेसाठी अगोदर झालेली युद्धे, कंबोडियन माईन्स एक्शन सेंटर (सी एम ए सी) नुसार आजही कंबोडिया मध्ये किमान ४० ते ६० लाख भूसुरुंग (लँड माईन्स) ऍक्टिव्ह आहेत अन कोणाचाही पाय पडता ते फुटू शकतात, हे कोणीही म्हणजे चारा गवत कापायला गेलेल्या स्त्री पासून ते खेळणारी बागडणारी बालके कोणीही असू शकते, अतिशय भयंकर अवस्था आजही आहे

शंतनु _०३१'s picture

23 Jul 2016 - 11:52 am | शंतनु _०३१

पॉल पॉट विषयी सकाळ मध्ये ही एक लेख आला होता...

एकंदरीत अतिशय भयंकर प्रकरण आहे हे

पिशी अबोली's picture

23 Jul 2016 - 12:54 pm | पिशी अबोली

25-30 लाख माणसे 4 वर्षांत???

कनवाळू कम्युनिस्ट्स!!!

शाम भागवत's picture

23 Jul 2016 - 4:54 pm | शाम भागवत

१९६० ते २०१३ या कालावधीचा लोकसंख्यावाढीचा ग्राफ
पाहिला तर असे वाटतेय की, १९७५ साली लोकसंख्या ७५ लाख होती व ती १९८० साली ६७ लाख झाली. म्हणजे अंदाजे ८ लाख लोक मेले असावेत. १५-२० लाख विकलांग झाले असावेत. असे सगळे मिळून २५-३० लाख आकडा आला असावा.

अधिक खुलासा तज्ञ लोक करतीलच.

अभिजीत अवलिया's picture

23 Jul 2016 - 5:17 pm | अभिजीत अवलिया

@शाम भागवत साहेब,
पॉल पॉट ने बऱ्याच हत्या लपवून ठेवल्या असाव्यात. तसेच 5 वर्षाच्या काळात काही नवे जन्म देखील झाले असतील. हा आकडा 20 लाखाच्या खाली निश्चित नाही असेही एका दुव्यावर लिहिलेले सापडले होते.
पण मुळात आकड्यांपेक्षा त्याने देशात कसले वातावरण आणले होते हे महत्वाचे. हत्या 25-30 लाख लोकांची असो वा एका नागरिकाची.

लोनली प्लॅनेट's picture

24 Jul 2016 - 9:50 am | लोनली प्लॅनेट

हा तर हिटलर व हुसैनी चा सुद्धा बाप होता

शाम भागवत's picture

24 Jul 2016 - 5:46 pm | शाम भागवत

मी पॉल पॉटच्या बाजूने काही बोलत नाहिये. पण दर दोन माणसांमागे एक माणूस मारायचा म्हणजे तो हिटलर, माओ, जपानी सैनिक अधिकार्‍यांपेक्षाही मोठा व्हायला लागला म्हणून शंका आली इतकेच. त्यासाठीच ग्राफची लिंक दिली होती. असो. तुम्ही म्हणता तसेही असेल. माझा त्यावर जास्त अभ्यास वगैरे नाहीय्ये.

पगला गजोधर's picture

23 Jul 2016 - 12:55 pm | पगला गजोधर

बाकी, हा लेख अभ्यासाअंती लिहिलेला खरा इतिहासच आहे.
पुलेशु

इशा१२३'s picture

23 Jul 2016 - 2:51 pm | इशा१२३

खुप पुर्वी वाचलय याविषयी.भयंकरच आहे!

अभिजीत अवलिया's picture

23 Jul 2016 - 3:30 pm | अभिजीत अवलिया

एक सुधारणा
'ज्यांचे हात मऊ नाहीत' ऐवजी 'ज्यांचे हात मऊ आहेत' असे वाचावे. संपादक कृपया सुधारणा कराल का?

@नाखु काका,
मान्य. हा विषय एका लेखात टंकण्यासारखा नाही. मी गेले 2 आठवडे माहिती शोधून शोधून ह्या व्यक्तीवर लेख बनवत होतो. जास्त मोठा लिहिला तर कंटाळवाणा होईल म्हणून फक्त जितके महत्वाचे वाटेल तितके लिहिले.

पण मला एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते.
इतके सगळे होत असताना स्वत:ला जगाचे मसीहा समजणारे अमेरिका आणी त्या वेळची दुसरी महासत्ता रशिया आणी संयुक्त राष्ट्रसंघ झोपा काढत बसले होते का? कुणीच कसा हस्तक्षेप केला नाही. का हे गरीब राष्ट्र असल्यामुळे तिथल्या लोकांची काहीच किंमत न्हवती संयुक्त राष्ट्रसंघाला.

व्हिएटनामने देखील हस्तक्षेप केला ते त्यांचे बेट पॉल पोट ने काबीज केले म्हणून. नाहीतर ह्या मूर्खांने अजून 25-30 लाख लोकांना सहज यमसदनी धाडले असते.

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 4:18 pm | संदीप डांगे

America 'helps' only when she has 'something' to gain.

मुक्त विहारि's picture

23 Jul 2016 - 5:23 pm | मुक्त विहारि

+ १

बाबा योगिराज's picture

24 Jul 2016 - 11:03 pm | बाबा योगिराज

100 टक्के मान्य.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jul 2016 - 9:07 am | कैलासवासी सोन्याबापु

थोडक्यात काय , Give us ur oil or we will bring democracy to ur country =))

मार्मिक गोडसे's picture

25 Jul 2016 - 4:34 pm | मार्मिक गोडसे

थोडक्यात काय , Give us ur oil or we will bring democracy to ur country =))

मस्तच

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2016 - 5:10 pm | अत्रुप्त आत्मा

कमिन्युस्ट हे इतके टोकाचे असतात. हे अलीकडेच डॉ.अभिराम दिक्षीत यांच्या भाषणात ऐकलेले होते. त्यात ह्या पॉल पॉट बद्दल " ह्यानी कुदळी आणी फावड्यानी माणसे मारली.. " असा उल्लेख आला होता. त्याचा उलगडा आज झाला.
भयंकरच टनाटनी होता की हो हा! बाप रे!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jul 2016 - 7:47 am | डॉ सुहास म्हात्रे

पोल पॉट्चा काल कंबोडियाचा काळा कालखंड आहे. माणूस किती माथेफिरू व क्रूरकर्मा होऊ शकतो, आणि तात्कालिन राजकारणासाठी त्याला उजळ माथ्याने कसा व किती पाठिंबा दिला जाऊ शकतो याचा वस्तूपाठच !

पोल पॉटला समर्थन, साथ आणि रसद पुरवणार्‍या चीनमध्ये, माओच्या सांस्कृतिक क्रांतीने (Cultural Revolution) १९६६ ते १९७८ या दहा वर्षांच्या कालखंडात ३ कोटी लोकांचे बळी घेतले आहेत. हा आकडा चीन सरकारमान्य अधिकृत आकडा आहे, इतरांच्या मते खरा आकडा यापेक्षा खूप मोठा आहे.

ह्या असल्या लोकांचा इगोच लै हॉर्रीबल असतो राव... ही कल्चरल रिव्होल्यूशन त्याचाच तर परिपाक होती...

संदीप डांगे's picture

24 Jul 2016 - 8:41 am | संदीप डांगे

It may not be about ego, it has something to do with fear deeply rooted in mind of the dictator. 'The way' he comes to power he knows the power of 'that way' and always fear that his opponents will become more powerful than him. So he choose to eliminate them in budding stage.

हे खरंच प्रचंड हॉरिबले

सुधीर कांदळकर's picture

24 Jul 2016 - 8:17 am | सुधीर कांदळकर

वृत्तपत्रात बातम्या येत असत पण काहीच तपशील ठाऊक नसे. खोटा राजकीय प्रचार असेल अस वाटत असे. एका मुलाने आपल्या बापाला पॉल पॉट नाव ठेवले होते. 'हिटलर' तर अनेक मुले आपल्या पिताश्रींना बोलत असत. हिटलरच्या समर्थकांना तिथे पाठवायला हवे होते. तो देखील राष्ट्रभक्त होता असेलच.

क्रूरकर्म्याच्या तत्त्वज्ञानाबद्दल लेखात थोडक्यात आणि छान ओळख करून दिली आहे. लेखाबद्दल धन्यवाद.

जव्हेरगंज's picture

24 Jul 2016 - 7:13 pm | जव्हेरगंज

भयंकर

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Jul 2016 - 11:01 pm | माम्लेदारचा पन्खा

एक नवीन क्रूरकर्मा सापडला.....हिटलरसुध्दा मवाळ वाटतोय ह्याच्यापुढे !

खटपट्या's picture

24 Jul 2016 - 11:10 pm | खटपट्या

बापरे...माथेफीरु....

शि बि आय's picture

25 Jul 2016 - 10:56 am | शि बि आय

भयंकर आहे... हिटलर बरा ह्याच्यापुढे

प्रचेतस's picture

25 Jul 2016 - 11:09 am | प्रचेतस

छान लिहिलंय.
युगांडाचा इदी अमीन असाच एक क्रूरकर्मा.

हिरोशीमा , नागासाकी विएत्नाम इथे झालेल्या नरसंहाराला कोण जबाब्दार होते,
रशीयाच्या काय्टीन ला कोण जबाब्दार??? इदि अमीन , पोल पोट, हिट्लर , हे तर क्रुरकर्मे आहेतच, सोबत अमेरीकेने पण तेवढेच लोक मारलेय्त.

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Jul 2016 - 1:40 pm | अनिरुद्ध.वैद्य

आम्च्या बिच्चार्‍या अम्रिकेला उगा गोवु न्का. ते दोन्ही साईडला हत्यारे पुरवणारे गुनी बेपारि लोक्स.
छोटा अन लठठ मुलगे त्या जपान्यांनी पर्लहर्बर्वर विमाने पाडली हुती म्हुन धाडले होते.

छोटा मानुस आणी लट्ठ मुलगा टाकायच्या आधीच इंम्पीरीयल आर्मी ने शरणागती पत्करली होती, शास्त्र्ज्ञांचा हव्यास होता तो फक्त अण्वस्त्रांच्या चाचणीचा, नशीब जपान्यांचं की नागासाकी चा नेम चुकला.

खरचं गुणी बेपारी...
वीएतनाम मध्ये फ्रेंचाना बाजुला सारुन कधी युधात उतरले ते त्यांना स्वताला पण कळलं नाही,आत्ता फ्रांस वर लागोपाठ २ ३ हल्ले / घात्पाती कारवाया झाल्या पण इथे मात्र फार काही अ‍ॅक्शन दीसली नाही.

गॅरी ट्रुमन's picture

25 Jul 2016 - 3:41 pm | गॅरी ट्रुमन

छोटा मानुस आणी लट्ठ मुलगा टाकायच्या आधीच इंम्पीरीयल आर्मी ने शरणागती पत्करली होती

याचा संदर्भ मिळू शकेल का?

रघुनाथ.केरकर's picture

25 Jul 2016 - 3:52 pm | रघुनाथ.केरकर

तरी सुधा लींक सापडल्यास जरुर देइन. ट्रुमन साहेबाना ह्याची कल्पना होती.

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Jul 2016 - 5:58 pm | अनिरुद्ध.वैद्य

आण्विक शस्त्रास्त्रे बनवण्याचे प्रॉग्रॅम्स होते. त्यांचे एकुणात क्रौर्त्य बघता त्यांनी २ सोडा १० बॉम्ब नक्किच उडवले असते.
आधी मलाही जपान्यांविषयी सहानुभुती वाटायची. पण जसजसे त्यांचे नानकिंग अन चायनामधले प्रकार समजले, तसतशि सहानुभुती पुर्ण गेली.

तुम्ही म्हणता तश्या लिंक्स माझ्याही वाचनात होत्या. त्यांचा रोख मुख्यत्वे रशिया जपानला मागे रेटत होता तर अमेरिकेने क्न्व्हेन्श्नल वेपन्स वापरुन जपानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले असते तर बरे झाले असते असा होता.

गॅरी ट्रुमन's picture

25 Jul 2016 - 6:24 pm | गॅरी ट्रुमन

जालावरच्या रँन्डम वाचनात आलं होतं

तेच. अशा रॅन्डम लिंकांची विश्वासार्हता काय?जपानवर दोन अणुबॉम्ब पडूनही आणि त्याचवेळी रशियानेही युद्धात उडी घेऊनही जपानने शेवटी ६ दिवसांनी म्हणजे १५ ऑगस्टला सम्राट हिरोहिटोच्या Jewel Voice Broadcast नंतर जपानने शरणागती पत्करायची घोषणा केली. असे काही होणार ही कुणकुण लागताच १४-१५ ऑगस्टच्या रात्री केनजी हटानाका या जपानी सेनाधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली बंड होऊन हिरोहिटोंनाही नजरकैदेत ठेवायचा प्रयत्न झाला होता.म्हणजे जपान्यांची लढायची खुमखुमी इतके सगळे होऊनही गेलेली नव्हती.

तेव्हा अणुबॉम्ब पडायच्या आधीच जपानने शरणागती पत्करली होती या म्हणण्याला नक्की कितपत महत्व द्यावे?

रघुनाथ.केरकर's picture

25 Jul 2016 - 6:43 pm | रघुनाथ.केरकर

प्रत्येक घटनेचा शास्त्रोक्त अभ्यास करायला आपण कुणी इतीहास संशोधक नाहि.... तरी पण चार ठीकाणच्या बातम्या वाचुन सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मी तर असही वाचलं होतं की अमेरीकेच्या बाँबनी नव्हे तर स्टॅलीन च्या मुत्सद्दीगीरीने जपान पडला. पण नंतर अमेरीकेनेच जपान ला हरवलं असा प्रचार करण्यात आला.

गॅरी ट्रुमन's picture

25 Jul 2016 - 6:54 pm | गॅरी ट्रुमन

मी तर असही वाचलं होतं की अमेरीकेच्या बाँबनी नव्हे तर स्टॅलीन च्या मुत्सद्दीगीरीने जपान पडला.

स्टॅलिनच्या मुत्सद्देगिरीने की बोकेपणामुळे? १९४५ च्या सुरवातीला जर्मनी बॅकफूटला असतानाही स्टॅलिनने जपानविरूध्द युध्द सुरू केले नव्हते. ते सुरू केले ते अगदी शेवटी म्हणजे ९ ऑगस्टला-- नागासाकीवर बॉम्ब पडला त्याच्या काही तास आधी. आणि इतके करून जपानकडून कुरील बेटे लाटलीच. आजही कुरील बेटे हा रशिया आणि जपानमध्ये वादाचा मुद्दा आहे.अमेरिकेने ओकिनावा ताब्यात ठेवले होते ते पण १९७२ मध्ये जपानला परत केले. पण रशिया कुरील बेटे जपानला अजूनही परत द्यायला तयार नाही. म्हणजे आयत्या वेळेस डल्ला मारून लोण्याचा गोळा स्टॅलिननामक बोक्याने लाटलाच.

देवांग's picture

25 Jul 2016 - 3:53 pm | देवांग

अधिक माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा

http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5285922805981958652

http://goo.gl/ZroG6E

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Jul 2016 - 6:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

जपानी काही संतत्वाचे पुतळे नाहीत, पण उत्तरेकडले खंजीर खुपसे शेजारी ह्यांना शह द्यायचा असल्यास ते आटा काळाची गरज आहेत आपली, तेव्हा जपान आपला ब्येष्ट फ्रेंड बरंका

कारण

इट्स जस्ट गुड बिझनेस

अनिरुद्ध.वैद्य's picture

25 Jul 2016 - 8:38 pm | अनिरुद्ध.वैद्य

जॅप्स,व्हिएट्स, फिलिपिनोज, मंगोल्स सगळे लागणार आहेतच आपल्याला. कझाक,अफगाणही.

शाम भागवत's picture

25 Jul 2016 - 10:13 pm | शाम भागवत

इराण पण मोजायला लागणार आहे आता. इराण मुळे इराण मधील बलुची लोक व तेथून अफगाणीस्तान व तेथून अफगाण व पाकीस्तान बॉर्डर वरचे लोक.

काश्मीर प्रश्न सुटणे अवघड. पण तो आणखी चिघळू नये म्हणून एकच उपाय. पाकीस्तानला दबावाखाली ठेवणे. भारत युध्द जिंकतो व तहात हरतो असे म्हटले जाते. पण सध्या जे चाललय त्यावरून असे वाटतय की पाकीस्तानला एकाकी पाडणे व युद्ध न करता एकदम तहच जिंकणे अस काही धेय्य आहे की काय.

गॅरी ट्रुमन's picture

25 Jul 2016 - 7:06 pm | गॅरी ट्रुमन

हा लेख मिपावर लिहिल्याबद्दल प्रचंड आभार. खरे तर या लाल रंगांच्या विविध छटा असलेल्या कम्युनिस्टांनी (स्टॅलिन, माओ, पॉल पॉट इत्यादी) केलेल्या कत्तली इतक्या भयानक आहेत की त्यापुढे हिटलरही बराच सज्जन वाटायला लागेल.

पण कसे असते की डाव्यांना पाठिंबा दिला की आपली पुरोगामी क्रेडेन्शिअल्स मिरवायला बरे पडते त्यामुळे अशा गोष्टींकडे असे लोक जाणीवपूर्वक कानाडोळा करतात.

अमितदादा's picture

26 Jul 2016 - 3:25 am | अमितदादा

पूर्ण सहमत. कधी कधी मला कंम्युनिस्ट आणि एका xyz धर्माच्या विचारसरणी मध्ये कमालीचं साधर्म्य वाटत । दोघेही कट्टर, काळानुसार न बदलणारे, विस्तारासाठी हिंसे चा वापर करणारे, वरून शांती आणि आतून क्रूरतेचा वापर करणारे। पण असो भारतामध्ये काही कंम्युनिस्ट लोकांनी आपला ठसा नक्कीच उमठवालाय मधू दंडवते , जॉर्ज फर्नांडीझ , ज्योती बासू,माणिक सरकार, व्ही अत्त्युचनादान, सोमनाथ चार्टजी, आणि बरेच..

रघुनाथ.केरकर's picture

26 Jul 2016 - 8:48 am | रघुनाथ.केरकर

Ajun ek naav aahe, HO CHI MINH. North vietnam che president

गॅरी ट्रुमन's picture

28 Jul 2016 - 3:08 pm | गॅरी ट्रुमन

भारतामध्ये काही कंम्युनिस्ट लोकांनी आपला ठसा नक्कीच उमठवालाय मधू दंडवते , जॉर्ज फर्नांडीझ , ज्योती बासू,माणिक सरकार, व्ही अत्त्युचनादान, सोमनाथ चार्टजी, आणि बरेच..

मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस हे कम्युनिस्ट नव्हते तर ते समाजवादी होते.

आजही केरळ आणि बंगालमध्ये राजकीय हिंसाचार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे याचे कारण वेगळे सांगायलाच नको.मागे केरळमधल्या कुणा कम्युनिस्ट नेत्याने "हो आम्ही राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे खून केले आहेत" अशा प्रकारची कबुलीही दिली होती. भारतात राज्यघटना आणि कायदा याचा काही प्रमाणात तरी वचक आहे म्हणून कम्युनिस्टांच्या कारवाया माओ किंवा पॉल पॉटसारख्या भयंकर स्तराला जाऊ शकलेल्या नाहीत आणि बंगाल आणि केरळमध्ये जे काही त्यांना करता येत आहे तितपतच त्यांच्या कारवाया मर्यादित आहेत.जर तो वचक नसता तर भारतातही तशी नृशंस हत्याकांडे या लोकांनी केली असतीच. कम्युनिस्टांचा ठसा कसाही आणि कितीही असो त्यांचे खरे रूप रक्तरंजितच असते.

मी कम्युनिस्टांना जितका विरोध करतो तितका विरोध करणारा अन्य कोणी सदस्य मिपावर तरी नाही आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे.या कम्युनिस्टांना जिथे शक्य होईल तिथे, ज्या पध्दतीने करता येईल त्या पध्दतीने विरोध केलाच पाहिजे.

अमितदादा's picture

28 Jul 2016 - 5:37 pm | अमितदादा

हा हा, प्रतिसादाशी सहमत,मी हि कंम्युनिस्ट विरोधी आहे पश्चिम बंगाल मध्ये राहिल्यामुळे. बाकी चुकी बद्दल क्षमस्व...

Nitin Palkar's picture

18 Oct 2021 - 8:00 pm | Nitin Palkar

मधू दंडवते कुठच्या अंगाने कम्युनिस्ट होते?

स्पार्टाकस's picture

26 Jul 2016 - 12:12 am | स्पार्टाकस

बंगालमधील कम्युनिस्टांनी तर अशी अनेक शिरकाणं केलीत राजकीय विरोधकांची!

ही दोन उदाहरणं -

सैनबारी हत्याकांडं - http://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/Victims-recall-Sainbari-...

आनंदमार्गी हत्याकांडं - https://en.wikipedia.org/wiki/Bijon_Setu_massacre

रघुनाथ.केरकर's picture

26 Jul 2016 - 11:13 am | रघुनाथ.केरकर

राजकीय वीरोधकांच्या हत्या फकस्त कम्युनीस्टांनिच केल्या का?

जौ द्या तो वीषय वेगळा आहे....

पण पॉल पॉट हा सगळ्या क्रुरकर्म्यांचा बापच निघाला. चष्मा घालणार्‍या लोकांना ते शीक्षीत आहेत म्हणुन ठार मारले, हे म्हणजे अती भयंकर.

सतिश गावडे's picture

26 Jul 2016 - 11:18 am | सतिश गावडे

असलं काही वाचलं की नि:शब्द होतो.

मानसशास्त्रात psychopathy (anti social personality disorder) म्हणून व्यक्तिमत्व विकृतीचे निदान आहे. ते ही अशा कृरकर्मी व्यक्तीपुढे फीके पड़ते.

प्रमोद देर्देकर's picture

27 Jul 2016 - 11:15 am | प्रमोद देर्देकर

वरती देवांग यांनी सकाळचा जो लेख दिलाय त्याचा हा पुढचा लेख. तो दुष्ट माणुस ८५ वर्षे जगाला आणि फक्त हृदयविकाराने झोपेतच त्याचा मृत्यू झाला.
म्हणजे "जैसी करनी वैसी भरनी हे खोटं असतं तर.

कंबोडिया.. एक भयानक सत्य (भाग 2) (पैलतीर) | सकाळ

आणि अजुनही काही देशात हे चालुच आहे की. काय करत्येय अमेरिका , रशिया आणि युनेस्को?
आत्त्ताच्या घडीला उत्तर कोरियाचे लोक हेच आजही भोगत आहेत. कोणाला माहित आहे की नाही त्याबद्दल.

नरेश माने's picture

27 Jul 2016 - 12:06 pm | नरेश माने

एव्हढी क्रुरता माणसात येते कुठुन कंबोडियन जनतेने काय सोसले असेल ते वाचून अंगावर काटा आला.

पद्मावति's picture

27 Jul 2016 - 10:05 pm | पद्मावति

उत्तम लेख!

अभ्या..'s picture

27 Jul 2016 - 10:17 pm | अभ्या..

मला एक मात्र कळेना, फक्त शारीरिक कष्ट करणाऱ्याच्या अन सैनिकांच्या जीवावर कुठलेही शिक्षित नसताना सध्यकाळात एखादा देश चालवता येईल? लहानसे गाव वगैरे ठीक आहे पण देश चालवणे अवघड वाटते. जगाशी काही संपर्कच नाही? व्यवहार नाही? निदान अंतर्गत तरी व्यवहार?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jul 2016 - 3:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चीनचं उदाहरण तुझ्या अपेक्षेसारखं नाही अभ्या, पण गूगल, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सॅप वगैरे जगभर चालणाऱ्या गोष्टी चीनमध्ये चालत नाहीत. तिथे ह्या सगळ्या सोयींसाठी इतर, समांतर सोयी आहेत.

लेख अपूर्ण वाटतो; वाचन करत राहा आणि लिहीत राहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jul 2016 - 6:34 am | डॉ सुहास म्हात्रे

उत्तर कोरियाचा थोडासा अभ्यास या सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळण्यासाठी खूप होईल ! :)

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Oct 2021 - 2:47 am | अमरेंद्र बाहुबली

छान लेख.

चौथा कोनाडा's picture

4 Oct 2021 - 5:42 pm | चौथा कोनाडा

या क्रुरकर्म्याबद्दल प्रथमच वाचण्यात आले.
ओघवते लिहिले आहे.
सध्याचे अफगाणीस्थान आणि तालीबान आठवले.
पॉल पॉट ने चीनची मदत घेतली तशीच तालीबान सध्या चीनची मदत घेऊन तरायचा प्रयत्न करत आहे.
तालीबानी युद्ध आणि अस्थिरतेला कंटाळले असावेत असे अफगाणीस्थान मधिल सध्याच्या परिस्थितीवरून वाटत आहे.

तालीबानी युद्ध आणि अस्थिरतेला कंटाळले असावेत असे अफगाणीस्थान मधिल सध्याच्या परिस्थितीवरून वाटत आहे.

परफेक्ट निरीक्षण...

आपली मानसिकता अन् कुवत यामधील तफावत उघडी पडली असल्याने तालिबान तूर्त सबुरी चां मुखवटा धारण करून आहे... अर्थात त्याचा आदर्श पाकिस्तान आहे पणं तालिबान पाकिस्तान बनण्यासाठी त्यांना शेजारी देशा सोबत छुपे युद्ध सुरू करावे लागेल मागच्या वेळीं रशियामुळे हे शक्य झाले होते, त्याच्या पुढच्या वेळी त्यांनी अमेरिका विरोध करून हात पोळून घेतले त्यामूळे या वेळीं काय याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे...

कुवत आणि मानसिकता याच्या विचित्र कात्रीत तालिबान अडकलेले दिसते..

जाता जाता :- अमेरिकेने जाण्यापूर्वी $८५ अब्जची शस्त्रास्त्रे वगैरे निकामी करून भंगार म्हणून तशीच अफगाणिस्तानमधे सोडून दिली... अन् भारताचे २०२१ चे संरक्षण बजेट बहुदा $७० अब्ज आहे

चौथा कोनाडा's picture

7 Oct 2021 - 1:15 pm | चौथा कोनाडा


कुवत आणि मानसिकता याच्या विचित्र कात्रीत तालिबान अडकलेले दिसते..


अगदी पर्फेक्ट ! ते प्रशासनावर कशी पकड मिळवणार हा ही एक प्रश्न आहेच ! सौम्य भुमिका घेऊन ते विविध देशांकडे मदत मागताहेत हे आशादायक आहे !

तालीबानी युद्ध आणि अस्थिरतेला कंटाळले असावेत असे अफगाणीस्थान मधिल सध्याच्या परिस्थितीवरून वाटत आहे.

हे गंमत म्हणून लिहिले आहे की गांभीर्याने?

गांभीर्याने लिहिले असले तर साष्टांग दंडवत. महंमद बिन कासीमपासून जी सगळी टोळधाड होती त्या टोळधाडीतले टोळ आणि सध्याचे तालिबानी यांच्या मानसिकतेत नक्की काय फरक आहे? ती मानसिकता शतकानुशतकांच्या हिंसाचाराला आणि अस्थिरतेला कंटाळली नसेल तर ती काही दिवसात कंटाळून गप्प बसेल असे खरोखरच वाटते?

चौथा कोनाडा's picture

7 Oct 2021 - 1:07 pm | चौथा कोनाडा

हे मी अर्थातच गांभीर्याने लिहिलंय.
सततची युद्धअस्थिरता कुणालाच परवडणारी नसते.
जगातील इतर देश (तुलनने) स्थिर आहेत, होताहेत त्या पार्श्वभुमीवर तालीबानींचा व्यापक प्रमाणावरचा दशहतवाद कालबाह्य होत आहे.
जसजशे तालीबानींनधील मवाळ लोकांचा जोर वाढत जाईल तसतश्या दशहतवादी कारवायांच्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात होईल.
तालीबानींनधील मवाळ नेत्यांशी अमेरिका (व इतर देशांच्या) नेत्यांनी चर्चा करुनच अमेरिका तालीबानीच्या हाती सोपवली, कदाचित त्यांची खात्री असेल की तालीबानी अस्थिरता होऊ देणार नाहीत. स्वतःच्या आर्थिक साम्राज्य टिकवण्यासाठी अफगाणीस्थानात अस्थिरता पेटवत राहणे परवडणारे नाही हे गेल्या २० वर्षांत समजून चुकले आहे.
... अर्थात हे एवढे सोपे नाही ... पण हळूहळू होईलच असे वाटते. असो.
अफगाणीस्थानात शांतता नांदो, पुन्हा सुंदर वैभवशाली अफगाणीस्थान पहायला मिळो हिच मनोमन इच्छा.

सुबोध खरे's picture

8 Oct 2021 - 12:35 pm | सुबोध खरे

जसजशे तालीबानींनधील मवाळ लोकांचा जोर वाढत जाईल तसे त्यांना अल्लाघरी पाठवण्यात येईल

मुल्ला बरादर आणि हैबतउल्ला अखुंडजादा यांबद्दल सध्या ऐकिवात येत नाही याचे कारण काय असेल?

टर्मीनेटर's picture

6 Oct 2021 - 9:04 pm | टर्मीनेटर

या क्रुरकर्म्याबद्दल प्रथमच वाचण्यात आले.

+१००... माझ्यापण!
बाकि सगळ्या क्रुरकर्म्यांबद्दल ढिगाने वाचनात आले आहे, हाच महाभाग त्यातुन कसा सुटला ह्याचेच आश्चर्य वाटतय 😀

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

4 Oct 2021 - 6:16 pm | ॲबसेंट माइंडेड ...

भयानक आहे सगळ.
लेख आवडला.

राघव's picture

4 Oct 2021 - 6:18 pm | राघव

भ यं क र.

तर्कवादी's picture

5 Oct 2021 - 10:21 pm | तर्कवादी

फारच भयंकर आहे हे ..
एक व्यक्ती इतकी क्रूर वा नालायक असू शकते, एखादा छोटा समूह पण असू शकतो हे स्मजण्यासारखे आहे पण हजारो लाखो सैनिकांनी तरी अशा राज्यकर्त्यांकरिता काम कसे काय केले ? आपण आपल्याच निरपराध देशबांधवांना मारत आहोत ही कल्पनाच किती भयंकर आहे.. पॉल पॉट इतकाच त्याचा प्रत्येक सैनिकही मला दोषी वाटतो.

तर्कवादी's picture

5 Oct 2021 - 10:25 pm | तर्कवादी

झालंच तर हे सगळं १९७५ नंतर म्हणजे अगदी आधुनिक युगात घडले हे एक आणखी मोठे आश्चर्य. अमेरिका , युनो वा इतर जागतिक संघटना यावेळी काय करत होत्या ?
धन्य ते व्हिएतनाम ज्यांनी अशा जुलमी राजवटीपासून कंबोडियाला मुक्त केले.

की डोकं ठिकाणावर येई पर्यंत तुम्ही त्यासाठी कसलाही किंमत मोजायला मागेपुढे पहात नाही ही मानवी वस्तुस्थिती आहे..

Rajesh188's picture

6 Oct 2021 - 1:02 am | Rajesh188

वाचून अंगावर काटा आला.माणूस आहे की हैवान हा माणूस.जग फक्त बघत बसले ह्याचा पण संताप आला.उन्माद हा वाईट च .

नगरीनिरंजन's picture

6 Oct 2021 - 2:16 pm | नगरीनिरंजन

वरती अनेकांनी “एक व्यक्ती इतकी क्रूरकर्मी असू शकते?“ अशा प्रकारचे आश्चर्य व्यक्त केले आहे. आश्चर्य करण्यासारखीच गोष्ट आहे; परंतु हे सर्व शिरकाण एका व्यक्तीने केले असे म्हणता येईल का? नाही.
हा झाला किंवा हिटलर झाला किंवा कोणीही हुकूमशहा असो, त्याच्या मागे स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करु शकणार्‍या सुप्रिमसिस्ट सुमारांची फौज असते. तोंडाने हे नेहमीच देशभक्तीच्या बाता करत असले तरी स्वतःच्या हितसंबंधांचे व श्रेष्ठत्वाचे रक्षण हाच त्यांचा मूळ अजेंडा असतो.
देश व देशातल्या इतर माणसांबद्दल त्यांना यत्किंचितही प्रेम नसते; उलट लोकशाही व मानवाधिकार वगैरेंसारख्या आधुनिक मूल्यांचा प्रचार करणार्‍या विद्वानांचा ते आत्यंतिक द्वेष करतात.
बर्‍याचदा हे हुकूमशहा आधीच्या राजवटीविरोधात जहरी प्रचार करून सत्ता हस्तगत करतात आणि त्या प्रयत्नांत असतानाच आपल्या सुप्रिमसिस्ट सुमारांच्या फौजेला त्यांच्या हितरक्षणासंबंधी “व्हर्च्यु सिग्नलिंग” करतात.
आधीच कंपूबाजी करुन समाजात मोक्याच्या जागी असलेले ही सुमारांची फौज नव्या राजवटीच्या प्रत्येक क्रूरकर्माचे समर्थन करु लागते व त्यात हिरीरीने सहभागीसुद्धा होते.
एक माणूस इतका क्रूरकर्मा असू शकतोच; पण तो एकटा काही करू शकत नाही. इतरांच्यात लपलेले जनावर बाहेर काढायला मात्र तो पुरेसा असतो.
असा क्रूरकर्मा देशाचे व समाजाचे अतोनात नुकसान करून नाहीसा होतो व बाकीची जनावरे परत लपून बसतात, पुढच्या संधीची वाट पाहात.

Rajesh188's picture

6 Oct 2021 - 8:45 pm | Rajesh188

हेच मला पण वाटत.कंबोडिया चा हा क्रूरकर्मा सत्ताधारी कसा झाला लोकांच्या पाठिंब्याने च झाला असणार.
हिटलर ला डोक्यावर जर्मनी मधील लोकांनीच बसवले त्याला देव समजायचे ते.
एकदा देवत्व,प्राप्त झाले की उणिवा,तोटे ,धोके दिसेनासे होतात.
मग अशा अंध भक्तांच्या कृपे मुळे क्रूर कर्मा जन्म घेतात.
हाच जगाचा इतिहास आहे.
सामान्य लोक विचारवंत नसतात.खूप लांबचा विचार तर करू शकत नाहीत.
त्यांना राष्ट्रवाद,धर्मवाद अशा विषयाने मोहित करता येते.
आणि हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.
भारतात पण गुंड,डाकू निवडणुका जिंकत आले आहेत हे त्याच प्रकारचे लहान उदाहरण आहे.

नगरीनिरंजन's picture

11 Oct 2021 - 11:28 pm | नगरीनिरंजन

सामान्य लोक विचारवंत नसतात

सामान्य कसले अहो, स्वतःच्या काल्पनिक श्रेष्ठत्वासाठी सायकोपॅथ व अडाणी राज्यकर्त्याला आंधळेपणाने पाठिंबा देणारे हे सुमार लोक उच्चशिक्षित व लब्धप्रतिष्ठितही असतात. अगदी डॉक्टर इंजिनीअर वगैरेसुद्धा असतात असे लोक. आपल्या आजूबाजूलाही सहज दिसतील असे हलकट महाभाग.

जर्मनी,जपान,कोंबोडिया ,कोरिया इथे क्रूर हुकूमशहा तयार झाले का.तिथेच का?
भारताशी तुलना.
१)भारतात विविध राज्य सरकार आहेत आणि त्यांना स्वतंत्र हक्क आहेत.
२) प्रतेक राज्यांची पोलिस, एसआरपी ही सशस्त्र दल राज्य सरकार च्या नियंत्रणात आहेत.
३) लष्कर,हवाई दल,वायू दल ह्यांचे प्रमुख एकच व्यक्ती नसून वेगवेगळे व्यक्ती आहेत.
(आता च्या अती हुशार सरकार ने आता बदल करून तिन्ही दलाचा एक प्रमुख नेंमला आहे)
४) निम लष्करी दल ही गृह मंत्रालय च्या अधिकारात आहेत.
भारतात एक व्यक्ती च्या हातात सत्ता नाही तर ती विभागली गेली आहे.
जर्मनी,जपान,कंबोडिया,कोरिया ह्या देशात एकच व्यक्ती च्या हातात सत्ता आहे .
हे कारण पण क्रूर हुकूमशाही निर्माण होण्यास कारण असेल.
भारतात.
विविध जाती,धर्म,प्रांत,भाषा ,संस्कृती,निष्ठा,विचार सरणी ची लोक आहेत.
Germany, जपान,कंबोडिया ,कोरिया मध्ये एकच विचाराची,एकच भाषेची,एकच संस्कृती ची बहुसंख्य लोक असल्या मुळे उन्माद ला प्रोत्साहन देणे सोपे गेले आणि त्याचा परिणाम म्हणून ही हत्याकांड झाली.
हा तर्क फक्त माझा आहे.
तुम्ही वेगळा विचार करायला मोकळे आहात.
भारतात ,अमेरिकेत त्या मुळे असले प्रकार घडले नाहीत.
कारण दोन्ही देशात ह्या बाबतीत समानता आहे.

सुबोध खरे's picture

6 Oct 2021 - 7:36 pm | सुबोध खरे

(आता च्या अती हुशार सरकार ने आता बदल करून तिन्ही दलाचा एक प्रमुख नेंमला आहे)

Chief of Defence Staff (India)

General K. V. Krishna Rao advanced creation of the post of Chief of Defence Staff in June 1982.[20] However, officially, it was only following the Kargil Review Committee's recommendation in 1999 that the Group of Ministers (GoM) officially proposed the creation of the post of CDS in 2001.

जिथे तिथे आपली अक्कल पाजळु नका.

मी आपल्याशी यापेक्षा जास्त चर्चा करू इच्छित नाही

इतर जिज्ञासू लोकांसाठी

https://indianexpress.com/article/explained/prime-minister-narendra-modi...

एक भाषा एक देश.
एक शिक्षण पद्धती एक देश.
एकच संस्कृती आणि एक देश.
एकच विचार सरणी आणि एक देश.
एकच सरकार आणि एक देश.
हे विचार हुकूमशाही कडे देशाला घेवून जातील अशी सुप्त भीती वाटते.

गॉडजिला's picture

6 Oct 2021 - 3:36 pm | गॉडजिला

...

निदान - अनेक धर्म पण एक नियम आणि आधी देश ( शेकूलर ) मग धर्म याला तरी साहेब आपली मान्यता आहे का ?

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Oct 2021 - 3:07 pm | अमरेंद्र बाहुबली

लेख वर आननार्या ला कुनीही धन्यवाद दिले नाहित. ;(

टर्मीनेटर's picture

6 Oct 2021 - 9:08 pm | टर्मीनेटर

मी देतो 😀
वाचनातुन निसटलेला एक चांगला लेख लेख वर आणल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद!

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Oct 2021 - 2:07 am | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद. टर्मिनेटर जी. ईतर लोकानी मला साधं धन्यवाद ही म्हटल नाही. कृतघ्न कुणीकडचे. ह्या पुढे असे चांगले लेख वाचून तुम्हाला लिंक व्यनी करत जाईन, लेख वर आणणारच नाही. :)