✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पॉल पॉट : कंबोडियाचा क्रूरकर्मा

अ
अभिजीत अवलिया यांनी
Sat, 07/23/2016 - 02:13  ·  लेख
लेख
जन्माच्या वेळचे नाव सलोथ सार. ह्या क्रूरकर्म्याचा जन्म 19 मे 1925 रोजी 'Prek Sbauv ' ह्या कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह पासून 100 मैल दूर असलेल्या खेड्यात झाला. 'पेन सलोथ' आणी 'सोक नेम' हे त्याचे आईवडील त्या वेळच्या मानाने बऱ्यापैकी सुखवस्तू दाम्पत्य होते. 1934 साली पॉल पॉट कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह इथे शिक्षणासाठी गेला आणी तिथे एक वर्ष त्याने बुद्धिस्ट मॉनेस्ट्री मध्ये घालवले. त्यानंतर त्याने एका फ्रेंच कॅथॉलिक शाळेत प्रवेश घेतला आणी 1949 साली आपले शिक्षण पूर्ण केले. तिथून 1949 ला पॅरिस गाठले आणी 1953 सालापर्यंत रेडिओ टेक्नॉलॉजीजचे शिक्षण घेतले. पण सलग 3 वर्षे परीक्षेत नापास झाल्याने त्याला 1953 च्या जानेवारी मध्ये पुन्हा कंबोडियामध्ये परतावे लागले. पण त्यापूर्वीच 1951 मध्ये तो मार्क्सवादी चळवळीत दाखल झाला होता. 1963 साली पॉल पॉट कंबोडियन कम्युनिस्ट पक्षाचा प्रमुख बनला. त्याने अशिक्षित मुले व तरुणांची फौज बनवली ज्याला Khmer Rouge असे नाव पडले. कंबोडियाचा तत्कालिक शासक नोरोडोम सिहनौक ह्याने पॉल पॉटच्या ह्या Khmer Rouge चा निर्दयपणे पाडाव करायला सुरवात केली पण 17 एप्रिल 1975 साली Khmer Rouge ने नोरोडोम सिहनौक ची सत्ता उलटवून लावत देश आपल्या ताब्यात घेतला. 5 जानेवारी 1976 रोजी कंबोडियाने नवे संविधान स्वीकारले व देशाचे नाव बदलून "Democratic Kampuchea" केले. 13 एप्रिलला तो देशाचा पंतप्रधान झाला. मग त्याने देशाच्या नागरिकांचे 3 भाग केले. 1) सर्व अधिकार असणारा. 2) कॅन्डिडेट्स 3) डिपॉसिटीस - हे काहीही अधिकार नसलेले लोक होते. ह्या लोकांना ठार करायचे असे त्याचे ध्येय होते. देशाची पूर्ण अर्थव्यवस्था फक्त शेतीवर आधारित असली पाहिजे व भरपूर प्रमाणात शेती उत्पन्न मिळवून देश स्वयंपूर्ण करायचा हे त्याचे ध्येय होते. त्याने पैसा चलनातून बाद केला. सर्व शाळा, धार्मिक स्थळे, दुकाने ह्यांचे रूपांतर तुरुंगात केले. सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद केली. काळे कपडे हा पोशाख सक्तीचा केला. शेती करून देश स्वयंपूर्ण करण्यासाठी फक्त 10-20 लाख लोक पुरेसे आहेत. बाकीच्या लोकांचा जगून देखील काही उपयोग नाही असे त्याने रेडिओ वर जाहीर केले. सत्तेवर येताच Khmer Rouge ह्या त्याच्या लष्कराने 25 लाख लोकसंख्येचे नाम पेन्ह शहर पूर्ण रिकामे केले. इतर लहान मोठी जिंकलेली शहरे देखील पूर्णपणे रिकामी करण्यात आली. अमेरिकेचा हवाई हल्ला होण्याची शक्यता आहे असे खोटे सांगून त्याने सर्वाना देशाच्या ग्रामीण भागात नेले. तिथे सर्वाना बंदी बनवले गेले. सर्व बंदीवानांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असे शेतीकाम करावे लागे. आणी त्या बद्दल अन्न मिळत असे ते म्हणजे 2 वाट्या भात. त्यामुळे बरीच लोक उपासमारीने आणी अति श्रमाने मारून जात असत. जो कुणी कामाबद्दल तक्रार करेल किंवा कोणताही नियम मोडेल त्याला देण्यात येणारे अन्नधान्य (2 वाट्या भात) बंद करण्यात येऊन त्याला छळ छावणीत नेण्यात येत असे आणी अगोदरच उपासमारीने अर्धमेल्या झालेल्या त्या व्यक्तीला हाल हाल करून ठार मारण्यात येत असे. बऱ्याच डिपॉसिटीसना साखळ्यानी बांधून खड्डे खणण्यासाठी नेले गेले आणि मग त्यांना त्याच खड्ड्यात जिवंत पुरून टाकले. अशी हजारो किलिन्ग फिल्ड्स आजही कंबोडिया मध्ये सापडतात. शिक्षित लोक म्हणजे देशाला धोका असे त्याचे मत असल्याने देशातले सर्व डॉक्टर, शिक्षक, शिक्षित स्त्री पुरुष आणी मुले, चष्मां घालणारी लोक, एका पेक्षा जास्त भाषा बोलू शकणारी माणसे, तसेच ज्यांचे हात मऊ आहेत अशा सर्वाना हाल हाल करून ठार मारले. ह्याचे सैनिक कोणाच्याही घराची अचानक झडती घेत आणी घरात पुस्तक किंवा पेपर जर आढळला तरी त्या घरातल्या सर्वाना ठार करण्यात येई. जर कुणाला चष्मां असेल तर ह्याचा अर्थ त्याला वाचता येते असे समजून त्या व्यक्तीस ठार केले जात असे. त्यामुळे लोकांनी चष्मे फेकून दिले तर ह्याचे सैनिक लोकांच्या नाकाचे निरीक्षण करत. चष्मां घातल्याने नाकावर एक काळसर डाग किंवा खड्डा पडतो. तो जर असेल तर त्या व्यक्तीस शिक्षित समजून ठार केले जाई. त्याच्या काळात 3 किंवा जास्त लोकांना एकत्र यायला बंदी होती. जर असे आढळले तर त्या सर्वाना शत्रू ठरवून ठार मारण्यात येई. बंदुकीची गोळी ही किमती वस्तू असल्याने लोकांना मारण्यासाठी तो हातोडी, दांडे, फावडी, कुदळ अशी हत्यारे वापरत असे किंवा जिवंत पुरून टाकत असे. तर काही लोकांना बेडला साखळ्यांनी बांधून ठेवले जाई (त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत). शेती आधारित अर्थव्यवस्थेत इतर जगाशी काहीही संबंध ठेवायची गरज नाही असे मत असल्याने त्याने चीन सोडून इतर सर्व देशांशी संबंध तोडून टाकले. देशातील विमान तळ बंद केले, सीमा सील केल्या जेणेकरून कोणीही देश सोडून पळून जाऊ शकणार नाही. 1975 ते 1979 ह्या त्याच्या 4 वर्षाच्या जुलमी कारकिर्दीत कंबोडियाच्या 70 लाख नागरिकांपैकी जवळपास 25 ते 30 लाख लोकांना ठार मारण्यात आले. एक छळ छावणी S - 21 इतकी भयानक होती की तिथे कैद केलेल्या 20000 लोकांपैकी फक्त 7 जण जिवंत राहू शकले. ह्या सर्व मृतांना भाताच्या शेतात पुरले जाई. आज पर्यंत कंबोडिया मध्ये तब्बल 300 ठिकाणी अशी 'किलिन्ग फिल्ड्स ' सापडली आहेत आणी अजूनही सापडत आहेत. मे 1975 साली त्याच्या सैन्याने Phú Quốc हे व्हिएतनामचे बेट जिंकल्याने त्याचे व्हिएतनामशी संबंध बिघडले. तह करण्याचे सर्व पर्याय संपल्यावर व्हिएतनामने कंबोडियाशी युद्ध पुकारले. चीनच्या मदतीनं पॉल पॉट ने व्हिएतनामशी लढायचा खूप प्रयत्न केले पण तरीही त्याचा पराभव झाला. ज्यानंतर तो थायलंडला पळून गेला. थायलंडने पॉल पॉटचा आणी त्याच्या सैन्याचा बफर म्हणून उपयोग केला आणी त्याला चीन कडून हत्यारे मिळवून देण्यास मदत केली. 1985 साली त्याने एका इंटरव्ह्यू मध्ये 'मी पूर्णपणे निर्दोष असून माझ्या हाताखालच्या लोकांनी मला न सांगता ह्या हत्या केल्या असे आरोप केला.' त्याच साली व्हिएतनाम ने Khmer Rouge चा पूर्णपणे पाडाव केला. 1989 साली व्हिएतनामचे सैन्य कंबोडिया मधून निघून गेल्यावर पॉल पॉट थायलंड मधून परत देशात आला आणी त्याने नवीन सरकारशी लढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 19 मे 1997 ला त्याला लष्कराने ताब्यात घेतले. पण आपल्याला अमेरिकेच्या हवाली करतील म्हणून त्याने 15 एप्रिल 1998 रोजी औषधांचा डोस जास्त प्रमाणात घेऊन आत्महत्या केली. आजच्या कंबोडियातल्या जवळपास प्रत्येक घरातले कुणीतरी पॉल पॉट च्या अत्याचारांचे शिकार झालेले आहे. आणी त्यामुळे आजही खूप मोठ्या प्रमाणात ह्या देशातली जनता मानसिक रोगग्रस्त आहे. समाप्त.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
43730 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

आभार

गॅरी ट्रुमन
Mon, 07/25/2016 - 19:06 नवीन
हा लेख मिपावर लिहिल्याबद्दल प्रचंड आभार. खरे तर या लाल रंगांच्या विविध छटा असलेल्या कम्युनिस्टांनी (स्टॅलिन, माओ, पॉल पॉट इत्यादी) केलेल्या कत्तली इतक्या भयानक आहेत की त्यापुढे हिटलरही बराच सज्जन वाटायला लागेल. पण कसे असते की डाव्यांना पाठिंबा दिला की आपली पुरोगामी क्रेडेन्शिअल्स मिरवायला बरे पडते त्यामुळे अशा गोष्टींकडे असे लोक जाणीवपूर्वक कानाडोळा करतात.
  • Log in or register to post comments

पूर्ण सहमत. कधी कधी मला

अमितदादा
Tue, 07/26/2016 - 03:25 नवीन
पूर्ण सहमत. कधी कधी मला कंम्युनिस्ट आणि एका xyz धर्माच्या विचारसरणी मध्ये कमालीचं साधर्म्य वाटत । दोघेही कट्टर, काळानुसार न बदलणारे, विस्तारासाठी हिंसे चा वापर करणारे, वरून शांती आणि आतून क्रूरतेचा वापर करणारे। पण असो भारतामध्ये काही कंम्युनिस्ट लोकांनी आपला ठसा नक्कीच उमठवालाय मधू दंडवते , जॉर्ज फर्नांडीझ , ज्योती बासू,माणिक सरकार, व्ही अत्त्युचनादान, सोमनाथ चार्टजी, आणि बरेच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

Ho vhi minh

रघुनाथ.केरकर
Tue, 07/26/2016 - 08:48 नवीन
Ajun ek naav aahe, HO CHI MINH. North vietnam che president
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

ठसा

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 07/28/2016 - 15:08 नवीन
भारतामध्ये काही कंम्युनिस्ट लोकांनी आपला ठसा नक्कीच उमठवालाय मधू दंडवते , जॉर्ज फर्नांडीझ , ज्योती बासू,माणिक सरकार, व्ही अत्त्युचनादान, सोमनाथ चार्टजी, आणि बरेच..
मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस हे कम्युनिस्ट नव्हते तर ते समाजवादी होते. आजही केरळ आणि बंगालमध्ये राजकीय हिंसाचार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे याचे कारण वेगळे सांगायलाच नको.मागे केरळमधल्या कुणा कम्युनिस्ट नेत्याने "हो आम्ही राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे खून केले आहेत" अशा प्रकारची कबुलीही दिली होती. भारतात राज्यघटना आणि कायदा याचा काही प्रमाणात तरी वचक आहे म्हणून कम्युनिस्टांच्या कारवाया माओ किंवा पॉल पॉटसारख्या भयंकर स्तराला जाऊ शकलेल्या नाहीत आणि बंगाल आणि केरळमध्ये जे काही त्यांना करता येत आहे तितपतच त्यांच्या कारवाया मर्यादित आहेत.जर तो वचक नसता तर भारतातही तशी नृशंस हत्याकांडे या लोकांनी केली असतीच. कम्युनिस्टांचा ठसा कसाही आणि कितीही असो त्यांचे खरे रूप रक्तरंजितच असते. मी कम्युनिस्टांना जितका विरोध करतो तितका विरोध करणारा अन्य कोणी सदस्य मिपावर तरी नाही आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे.या कम्युनिस्टांना जिथे शक्य होईल तिथे, ज्या पध्दतीने करता येईल त्या पध्दतीने विरोध केलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

हा हा, प्रतिसादाशी सहमत,मी हि

अमितदादा
गुरुवार, 07/28/2016 - 17:37 नवीन
हा हा, प्रतिसादाशी सहमत,मी हि कंम्युनिस्ट विरोधी आहे पश्चिम बंगाल मध्ये राहिल्यामुळे. बाकी चुकी बद्दल क्षमस्व...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मधू दंडवते?

Nitin Palkar
Mon, 10/18/2021 - 20:00 नवीन
मधू दंडवते कुठच्या अंगाने कम्युनिस्ट होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा

बंगाली कम्युनिस्ट

स्पार्टाकस
Tue, 07/26/2016 - 00:12 नवीन
बंगालमधील कम्युनिस्टांनी तर अशी अनेक शिरकाणं केलीत राजकीय विरोधकांची! ही दोन उदाहरणं - सैनबारी हत्याकांडं - http://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/Victims-recall-Sainbari-horror/articleshow/7723622.cms आनंदमार्गी हत्याकांडं - https://en.wikipedia.org/wiki/Bijon_Setu_massacre
  • Log in or register to post comments

इतर ठीकाणी पण फक्त ..

रघुनाथ.केरकर
Tue, 07/26/2016 - 11:13 नवीन
राजकीय वीरोधकांच्या हत्या फकस्त कम्युनीस्टांनिच केल्या का? जौ द्या तो वीषय वेगळा आहे.... पण पॉल पॉट हा सगळ्या क्रुरकर्म्यांचा बापच निघाला. चष्मा घालणार्‍या लोकांना ते शीक्षीत आहेत म्हणुन ठार मारले, हे म्हणजे अती भयंकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

असलं काही वाचलं की नि:शब्द

सतिश गावडे
Tue, 07/26/2016 - 11:18 नवीन
असलं काही वाचलं की नि:शब्द होतो. मानसशास्त्रात psychopathy (anti social personality disorder) म्हणून व्यक्तिमत्व विकृतीचे निदान आहे. ते ही अशा कृरकर्मी व्यक्तीपुढे फीके पड़ते.
  • Log in or register to post comments

वरती देवांग यांनी सकाळचा जो

प्रमोद देर्देकर
Wed, 07/27/2016 - 11:15 नवीन
वरती देवांग यांनी सकाळचा जो लेख दिलाय त्याचा हा पुढचा लेख. तो दुष्ट माणुस ८५ वर्षे जगाला आणि फक्त हृदयविकाराने झोपेतच त्याचा मृत्यू झाला. म्हणजे "जैसी करनी वैसी भरनी हे खोटं असतं तर. कंबोडिया.. एक भयानक सत्य (भाग 2) (पैलतीर) | सकाळ आणि अजुनही काही देशात हे चालुच आहे की. काय करत्येय अमेरिका , रशिया आणि युनेस्को? आत्त्ताच्या घडीला उत्तर कोरियाचे लोक हेच आजही भोगत आहेत. कोणाला माहित आहे की नाही त्याबद्दल.
  • Log in or register to post comments

भयंकर आहे हे सर्व

नरेश माने
Wed, 07/27/2016 - 12:06 नवीन
एव्हढी क्रुरता माणसात येते कुठुन कंबोडियन जनतेने काय सोसले असेल ते वाचून अंगावर काटा आला.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख!

पद्मावति
Wed, 07/27/2016 - 22:05 नवीन
उत्तम लेख!
  • Log in or register to post comments

मला एक मात्र कळेना, फक्त

अभ्या..
Wed, 07/27/2016 - 22:17 नवीन
मला एक मात्र कळेना, फक्त शारीरिक कष्ट करणाऱ्याच्या अन सैनिकांच्या जीवावर कुठलेही शिक्षित नसताना सध्यकाळात एखादा देश चालवता येईल? लहानसे गाव वगैरे ठीक आहे पण देश चालवणे अवघड वाटते. जगाशी काही संपर्कच नाही? व्यवहार नाही? निदान अंतर्गत तरी व्यवहार?
  • Log in or register to post comments

चीन?

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/28/2016 - 03:54 नवीन
चीनचं उदाहरण तुझ्या अपेक्षेसारखं नाही अभ्या, पण गूगल, यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सॅप वगैरे जगभर चालणाऱ्या गोष्टी चीनमध्ये चालत नाहीत. तिथे ह्या सगळ्या सोयींसाठी इतर, समांतर सोयी आहेत. लेख अपूर्ण वाटतो; वाचन करत राहा आणि लिहीत राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दक्षिण कोरियाचा थोडासा अभ्यास

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/29/2016 - 06:34 नवीन
उत्तर कोरियाचा थोडासा अभ्यास या सगळ्या प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळण्यासाठी खूप होईल ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

छान लेख.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/04/2021 - 02:47 नवीन
छान लेख.
  • Log in or register to post comments

या क्रुरकर्म्याबद्दल प्रथमच

चौथा कोनाडा
Mon, 10/04/2021 - 17:42 नवीन
या क्रुरकर्म्याबद्दल प्रथमच वाचण्यात आले. ओघवते लिहिले आहे. सध्याचे अफगाणीस्थान आणि तालीबान आठवले. पॉल पॉट ने चीनची मदत घेतली तशीच तालीबान सध्या चीनची मदत घेऊन तरायचा प्रयत्न करत आहे. तालीबानी युद्ध आणि अस्थिरतेला कंटाळले असावेत असे अफगाणीस्थान मधिल सध्याच्या परिस्थितीवरून वाटत आहे.
  • Log in or register to post comments

तालीबानी युद्ध आणि अस्थिरतेला

गॉडजिला
Tue, 10/05/2021 - 22:34 नवीन
तालीबानी युद्ध आणि अस्थिरतेला कंटाळले असावेत असे अफगाणीस्थान मधिल सध्याच्या परिस्थितीवरून वाटत आहे.
परफेक्ट निरीक्षण... आपली मानसिकता अन् कुवत यामधील तफावत उघडी पडली असल्याने तालिबान तूर्त सबुरी चां मुखवटा धारण करून आहे... अर्थात त्याचा आदर्श पाकिस्तान आहे पणं तालिबान पाकिस्तान बनण्यासाठी त्यांना शेजारी देशा सोबत छुपे युद्ध सुरू करावे लागेल मागच्या वेळीं रशियामुळे हे शक्य झाले होते, त्याच्या पुढच्या वेळी त्यांनी अमेरिका विरोध करून हात पोळून घेतले त्यामूळे या वेळीं काय याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे... कुवत आणि मानसिकता याच्या विचित्र कात्रीत तालिबान अडकलेले दिसते.. जाता जाता :- अमेरिकेने जाण्यापूर्वी $८५ अब्जची शस्त्रास्त्रे वगैरे निकामी करून भंगार म्हणून तशीच अफगाणिस्तानमधे सोडून दिली... अन् भारताचे २०२१ चे संरक्षण बजेट बहुदा $७० अब्ज आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

कुवत आणि मानसिकता याच्या

चौथा कोनाडा
गुरुवार, 10/07/2021 - 13:15 नवीन
कुवत आणि मानसिकता याच्या विचित्र कात्रीत तालिबान अडकलेले दिसते..
अगदी पर्फेक्ट ! ते प्रशासनावर कशी पकड मिळवणार हा ही एक प्रश्न आहेच ! सौम्य भुमिका घेऊन ते विविध देशांकडे मदत मागताहेत हे आशादायक आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

हे गंमत म्हणून लिहिले आहे की गांभीर्याने?

चंद्रसूर्यकुमार
Wed, 10/06/2021 - 20:28 नवीन
तालीबानी युद्ध आणि अस्थिरतेला कंटाळले असावेत असे अफगाणीस्थान मधिल सध्याच्या परिस्थितीवरून वाटत आहे.
हे गंमत म्हणून लिहिले आहे की गांभीर्याने? गांभीर्याने लिहिले असले तर साष्टांग दंडवत. महंमद बिन कासीमपासून जी सगळी टोळधाड होती त्या टोळधाडीतले टोळ आणि सध्याचे तालिबानी यांच्या मानसिकतेत नक्की काय फरक आहे? ती मानसिकता शतकानुशतकांच्या हिंसाचाराला आणि अस्थिरतेला कंटाळली नसेल तर ती काही दिवसात कंटाळून गप्प बसेल असे खरोखरच वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

हे मी अर्थातच गांभीर्याने

चौथा कोनाडा
गुरुवार, 10/07/2021 - 13:07 नवीन
हे मी अर्थातच गांभीर्याने लिहिलंय. सततची युद्धअस्थिरता कुणालाच परवडणारी नसते. जगातील इतर देश (तुलनने) स्थिर आहेत, होताहेत त्या पार्श्वभुमीवर तालीबानींचा व्यापक प्रमाणावरचा दशहतवाद कालबाह्य होत आहे. जसजशे तालीबानींनधील मवाळ लोकांचा जोर वाढत जाईल तसतश्या दशहतवादी कारवायांच्या प्रमाणात घट होण्यास सुरुवात होईल. तालीबानींनधील मवाळ नेत्यांशी अमेरिका (व इतर देशांच्या) नेत्यांनी चर्चा करुनच अमेरिका तालीबानीच्या हाती सोपवली, कदाचित त्यांची खात्री असेल की तालीबानी अस्थिरता होऊ देणार नाहीत. स्वतःच्या आर्थिक साम्राज्य टिकवण्यासाठी अफगाणीस्थानात अस्थिरता पेटवत राहणे परवडणारे नाही हे गेल्या २० वर्षांत समजून चुकले आहे. ... अर्थात हे एवढे सोपे नाही ... पण हळूहळू होईलच असे वाटते. असो. अफगाणीस्थानात शांतता नांदो, पुन्हा सुंदर वैभवशाली अफगाणीस्थान पहायला मिळो हिच मनोमन इच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

जसजशे तालीबानींनधील मवाळ

सुबोध खरे
Fri, 10/08/2021 - 12:35 नवीन
जसजशे तालीबानींनधील मवाळ लोकांचा जोर वाढत जाईल तसे त्यांना अल्लाघरी पाठवण्यात येईल मुल्ला बरादर आणि हैबतउल्ला अखुंडजादा यांबद्दल सध्या ऐकिवात येत नाही याचे कारण काय असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

+१००... माझ्यापण!

टर्मीनेटर
Wed, 10/06/2021 - 21:04 नवीन
या क्रुरकर्म्याबद्दल प्रथमच वाचण्यात आले.
+१००... माझ्यापण! बाकि सगळ्या क्रुरकर्म्यांबद्दल ढिगाने वाचनात आले आहे, हाच महाभाग त्यातुन कसा सुटला ह्याचेच आश्चर्य वाटतय 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

भयानक आहे सगळ.

ॲबसेंट माइंडेड…
Mon, 10/04/2021 - 18:16 नवीन
भयानक आहे सगळ. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

भ यं क र.

राघव
Mon, 10/04/2021 - 18:18 नवीन
भ यं क र.
  • Log in or register to post comments

भयंकर

तर्कवादी
Tue, 10/05/2021 - 22:21 नवीन
फारच भयंकर आहे हे .. एक व्यक्ती इतकी क्रूर वा नालायक असू शकते, एखादा छोटा समूह पण असू शकतो हे स्मजण्यासारखे आहे पण हजारो लाखो सैनिकांनी तरी अशा राज्यकर्त्यांकरिता काम कसे काय केले ? आपण आपल्याच निरपराध देशबांधवांना मारत आहोत ही कल्पनाच किती भयंकर आहे.. पॉल पॉट इतकाच त्याचा प्रत्येक सैनिकही मला दोषी वाटतो.
  • Log in or register to post comments

झालंच तर हे सगळं १९७५ नंतर

तर्कवादी
Tue, 10/05/2021 - 22:25 नवीन
झालंच तर हे सगळं १९७५ नंतर म्हणजे अगदी आधुनिक युगात घडले हे एक आणखी मोठे आश्चर्य. अमेरिका , युनो वा इतर जागतिक संघटना यावेळी काय करत होत्या ? धन्य ते व्हिएतनाम ज्यांनी अशा जुलमी राजवटीपासून कंबोडियाला मुक्त केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

एकदा तुम्ही कसल्याही इजम ने भारावलात

गॉडजिला
Tue, 10/05/2021 - 22:36 नवीन
की डोकं ठिकाणावर येई पर्यंत तुम्ही त्यासाठी कसलाही किंमत मोजायला मागेपुढे पहात नाही ही मानवी वस्तुस्थिती आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी

फारच भयंकर

Rajesh188
Wed, 10/06/2021 - 01:02 नवीन
वाचून अंगावर काटा आला.माणूस आहे की हैवान हा माणूस.जग फक्त बघत बसले ह्याचा पण संताप आला.उन्माद हा वाईट च .
  • Log in or register to post comments

एक व्यक्ती?

नगरीनिरंजन
Wed, 10/06/2021 - 14:16 नवीन
वरती अनेकांनी “एक व्यक्ती इतकी क्रूरकर्मी असू शकते?“ अशा प्रकारचे आश्चर्य व्यक्त केले आहे. आश्चर्य करण्यासारखीच गोष्ट आहे; परंतु हे सर्व शिरकाण एका व्यक्तीने केले असे म्हणता येईल का? नाही. हा झाला किंवा हिटलर झाला किंवा कोणीही हुकूमशहा असो, त्याच्या मागे स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करु शकणार्‍या सुप्रिमसिस्ट सुमारांची फौज असते. तोंडाने हे नेहमीच देशभक्तीच्या बाता करत असले तरी स्वतःच्या हितसंबंधांचे व श्रेष्ठत्वाचे रक्षण हाच त्यांचा मूळ अजेंडा असतो. देश व देशातल्या इतर माणसांबद्दल त्यांना यत्किंचितही प्रेम नसते; उलट लोकशाही व मानवाधिकार वगैरेंसारख्या आधुनिक मूल्यांचा प्रचार करणार्‍या विद्वानांचा ते आत्यंतिक द्वेष करतात. बर्‍याचदा हे हुकूमशहा आधीच्या राजवटीविरोधात जहरी प्रचार करून सत्ता हस्तगत करतात आणि त्या प्रयत्नांत असतानाच आपल्या सुप्रिमसिस्ट सुमारांच्या फौजेला त्यांच्या हितरक्षणासंबंधी “व्हर्च्यु सिग्नलिंग” करतात. आधीच कंपूबाजी करुन समाजात मोक्याच्या जागी असलेले ही सुमारांची फौज नव्या राजवटीच्या प्रत्येक क्रूरकर्माचे समर्थन करु लागते व त्यात हिरीरीने सहभागीसुद्धा होते. एक माणूस इतका क्रूरकर्मा असू शकतोच; पण तो एकटा काही करू शकत नाही. इतरांच्यात लपलेले जनावर बाहेर काढायला मात्र तो पुरेसा असतो. असा क्रूरकर्मा देशाचे व समाजाचे अतोनात नुकसान करून नाहीसा होतो व बाकीची जनावरे परत लपून बसतात, पुढच्या संधीची वाट पाहात.
  • Log in or register to post comments

अगदीं अगदी

Rajesh188
Wed, 10/06/2021 - 20:45 नवीन
हेच मला पण वाटत.कंबोडिया चा हा क्रूरकर्मा सत्ताधारी कसा झाला लोकांच्या पाठिंब्याने च झाला असणार. हिटलर ला डोक्यावर जर्मनी मधील लोकांनीच बसवले त्याला देव समजायचे ते. एकदा देवत्व,प्राप्त झाले की उणिवा,तोटे ,धोके दिसेनासे होतात. मग अशा अंध भक्तांच्या कृपे मुळे क्रूर कर्मा जन्म घेतात. हाच जगाचा इतिहास आहे. सामान्य लोक विचारवंत नसतात.खूप लांबचा विचार तर करू शकत नाहीत. त्यांना राष्ट्रवाद,धर्मवाद अशा विषयाने मोहित करता येते. आणि हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. भारतात पण गुंड,डाकू निवडणुका जिंकत आले आहेत हे त्याच प्रकारचे लहान उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

सामान्य लोक विचारवंत नसतात

नगरीनिरंजन
Mon, 10/11/2021 - 23:28 नवीन
सामान्य लोक विचारवंत नसतात
सामान्य कसले अहो, स्वतःच्या काल्पनिक श्रेष्ठत्वासाठी सायकोपॅथ व अडाणी राज्यकर्त्याला आंधळेपणाने पाठिंबा देणारे हे सुमार लोक उच्चशिक्षित व लब्धप्रतिष्ठितही असतात. अगदी डॉक्टर इंजिनीअर वगैरेसुद्धा असतात असे लोक. आपल्या आजूबाजूलाही सहज दिसतील असे हलकट महाभाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

एक विचार सारखा सतावत आहे

Rajesh188
Wed, 10/06/2021 - 14:32 नवीन
जर्मनी,जपान,कोंबोडिया ,कोरिया इथे क्रूर हुकूमशहा तयार झाले का.तिथेच का? भारताशी तुलना. १)भारतात विविध राज्य सरकार आहेत आणि त्यांना स्वतंत्र हक्क आहेत. २) प्रतेक राज्यांची पोलिस, एसआरपी ही सशस्त्र दल राज्य सरकार च्या नियंत्रणात आहेत. ३) लष्कर,हवाई दल,वायू दल ह्यांचे प्रमुख एकच व्यक्ती नसून वेगवेगळे व्यक्ती आहेत. (आता च्या अती हुशार सरकार ने आता बदल करून तिन्ही दलाचा एक प्रमुख नेंमला आहे) ४) निम लष्करी दल ही गृह मंत्रालय च्या अधिकारात आहेत. भारतात एक व्यक्ती च्या हातात सत्ता नाही तर ती विभागली गेली आहे. जर्मनी,जपान,कंबोडिया,कोरिया ह्या देशात एकच व्यक्ती च्या हातात सत्ता आहे . हे कारण पण क्रूर हुकूमशाही निर्माण होण्यास कारण असेल. भारतात. विविध जाती,धर्म,प्रांत,भाषा ,संस्कृती,निष्ठा,विचार सरणी ची लोक आहेत. Germany, जपान,कंबोडिया ,कोरिया मध्ये एकच विचाराची,एकच भाषेची,एकच संस्कृती ची बहुसंख्य लोक असल्या मुळे उन्माद ला प्रोत्साहन देणे सोपे गेले आणि त्याचा परिणाम म्हणून ही हत्याकांड झाली. हा तर्क फक्त माझा आहे. तुम्ही वेगळा विचार करायला मोकळे आहात. भारतात ,अमेरिकेत त्या मुळे असले प्रकार घडले नाहीत. कारण दोन्ही देशात ह्या बाबतीत समानता आहे.
  • Log in or register to post comments

(आता च्या अती हुशार सरकार ने

सुबोध खरे
Wed, 10/06/2021 - 19:36 नवीन
(आता च्या अती हुशार सरकार ने आता बदल करून तिन्ही दलाचा एक प्रमुख नेंमला आहे) Chief of Defence Staff (India) General K. V. Krishna Rao advanced creation of the post of Chief of Defence Staff in June 1982.[20] However, officially, it was only following the Kargil Review Committee's recommendation in 1999 that the Group of Ministers (GoM) officially proposed the creation of the post of CDS in 2001. जिथे तिथे आपली अक्कल पाजळु नका. मी आपल्याशी यापेक्षा जास्त चर्चा करू इच्छित नाही इतर जिज्ञासू लोकांसाठी https://indianexpress.com/article/explained/prime-minister-narendra-modi-chief-of-defence-staff-position-5908744/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

म्हणून मला हे अयोग्य वाटत

Rajesh188
Wed, 10/06/2021 - 14:56 नवीन
एक भाषा एक देश. एक शिक्षण पद्धती एक देश. एकच संस्कृती आणि एक देश. एकच विचार सरणी आणि एक देश. एकच सरकार आणि एक देश. हे विचार हुकूमशाही कडे देशाला घेवून जातील अशी सुप्त भीती वाटते.
  • Log in or register to post comments

सार्थ भीती आहे

गॉडजिला
Wed, 10/06/2021 - 15:36 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

निदान - अनेक धर्म पण एक नियम

चौकस२१२
Tue, 10/12/2021 - 15:05 नवीन
निदान - अनेक धर्म पण एक नियम आणि आधी देश ( शेकूलर ) मग धर्म याला तरी साहेब आपली मान्यता आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

लेख वर आननार्या ला कुनीही

अमरेंद्र बाहुबली
Wed, 10/06/2021 - 15:07 नवीन
लेख वर आननार्या ला कुनीही धन्यवाद दिले नाहित. ;(
  • Log in or register to post comments

मी देतो!

टर्मीनेटर
Wed, 10/06/2021 - 21:08 नवीन
मी देतो 😀 वाचनातुन निसटलेला एक चांगला लेख लेख वर आणल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद. टर्मिनेटर जी. ईतर

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 10/07/2021 - 02:07 नवीन
धन्यवाद. टर्मिनेटर जी. ईतर लोकानी मला साधं धन्यवाद ही म्हटल नाही. कृतघ्न कुणीकडचे. ह्या पुढे असे चांगले लेख वाचून तुम्हाला लिंक व्यनी करत जाईन, लेख वर आणणारच नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

निरपराध्यांचं शिरकाण कोणी केलं ?

गामा पैलवान
गुरुवार, 10/07/2021 - 01:27 नवीन
लोकहो, कंबोडियाच्या निरपराध नागरिकांचं शिरकाण पॉल पॉटने नाही, तर अमेरिकन सैन्याने केलं. अमेरिकेने व्हियेतनामसोबत कंबोडिया व लाओस मध्येही आक्रमण केलं होतं. जागतिक प्रसारमाध्यमांनी हे तथ्य सोयीस्करपणे दडपलं आहे. १९६५ सालापासनं अमेरिकेने व्हियेतनाममध्ये घुसखोरी सुरु केली. तिला फारसं यश मिळेना. म्हणून १९६९ मध्ये कंबोडिया या तटस्थ ( होय, तटस्थ) देशामध्ये बॉम्बफेक सुरु केली. ती १९७३ पर्यंत चार वर्षं चालली. हे बॉम्ब नापाम प्रकारचे होते. म्हणजे आगी लावणारे. सोबत अमेरिकी पायदळाने एजंट ऑरेंजची फवारणी सुरु केली. हजारो टन एजंट ऑरेंज फवारला. यामुळे विकृत बालकं जन्मास येतात. व्हियेतनामी लोकांची साक्ष आहे. याच एजंट ऑरेंज मुळे झाडांची सर्व पानं एका दिवसात गळून पडतात. ही संततधार बॉम्बफेक ( = कार्पेट बॉम्बिंग ) आणि फवारलेला एजंट ऑरेंज यांमुळे कंबोडियाचा अक्षरश: सर्वनाश झाला. सोबत दयाळू अमेरिकेने असंख्य भूसुरुंग ( = land mines ) पेरले व विमानांतून टाकले. लोकांना कळू नये म्हणून अमेरिकी डीप स्टेट ने कंबोडियाची मोहीम गुप्त ठेवली. इतकी गुप्त की आजही अमेरिका एजंट ऑरेंज फवारल्याचं नाकारते. संदर्भ : https://www.nytimes.com/2021/03/16/magazine/laos-agent-orange-vietnam-war.html या चित्रात बघा एजंट ऑरेंज चे परिणाम ( सोबतचा लेखही वाचला तरी चालेल ) : https://agentorangerecord.com/cambodia/ व्हियेतनाममध्ये ५०००० टन ( अक्षरी पन्नास हजार टन ) एजंट ऑरेंज फवारला. कंबोडियात आकडा आजून जास्त असणार. लोकं ९००००+ टन ( अक्षरी नव्वद हजाराधिक टन ) म्हणतात. एजंट ऑरेंज + संतत ध्वंफेक + भूसुरुंग = सत्यानाश. तरीपण कंबोडियाने कुणाकडे कसलीही भीक मागितली नाही. जी काही उरली सुरली जमीन होती तिच्यावर यशस्वीपणे भाताची लागवड केली. परिणामी कंबोडिया सदैव अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्ण राहिला आहे. याला कारण एकंच माणूस. तो अमेरिकी हलकटपणाविरुद्ध ठामपणे उभा राहिला. त्याचं नाव सलोथ सार. लोकं त्याला पोलिटिकल पोतान्ते या फ्रेंच बिरुदाने ओळखायचे. त्याची आद्याक्षरं पॉल पॉट होतात. आज कंबोडियाचा भात उच्च दर्जाचा समजला जातो : https://www.khmertimeskh.com/540271/malys-angkor-crowned-worlds-best-rice/ आता कळलं असेल पॉल पॉट प्रस्थापित प्रसारमाध्यमांचा का नावडता होता ते. अमेरिकेने हा#यचं आणि इतरांनी साफ करायचं. रीतंच आहे ती जगाची. उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर लेख परत वाचावा म्हणून सुचवेन. बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

ऑ

रंगीला रतन
गुरुवार, 10/07/2021 - 01:45 नवीन
ऑ ह्या काय आता नवीन? अमेरिका बाराची आहे यात नवीन काय नाही. खरं असेल तर माहिति विन्टरेस्टिंग हाय. आता यावर इथले अमेरिकेचे भाट आणी दोन अव्वल नंबरी नशेडी काय बोलतात ते वाचायला मज्जा येणार पॉप कॉर्न घेउनशान बसलोय :=)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

गामाजी पुर्णपणे विरोधी माहीती

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 10/07/2021 - 02:04 नवीन
गामाजी पुर्णपणे विरोधी माहीती. वर रंगील्यांच्या रतन ने सांगीतल्या प्रमाणे आता चर्चेत मजा येणार. हे अमरीकी काय करतील भरवसा नाही. मी हा धागा वर आणला नसता तर ही माहीती मिळाली असता का रे मिसळ्यानो?? आभार माना माझे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

ते एक राहिलंच

गामा पैलवान
गुरुवार, 10/07/2021 - 13:08 नवीन
हो, अमरेंद्र! लेख वर काढल्याबद्दल तुमचे आभार मानायचे राहून गेले. त्यानिमित्ताने आता मानतो. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद गामाजी माफ करा.

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 10/07/2021 - 14:49 नवीन
धन्यवाद गामाजी माफ करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

तुम्ही मोलाची भर वाचकांच्या माहितीत घातली

गॉडजिला
गुरुवार, 10/07/2021 - 17:01 नवीन
तुमचे खरे मनापासून आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हेनरी किसिंजर

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 10/07/2021 - 07:45 नवीन
यामागे हेनरी किसिंजरचा हात होता. या दोघांनी बांगलादेशमध्ये काय केले हे पण जगजाहीर आहे. म्हणूनच म्हणतो की हेनरी किसिंजर आणि रिचर्ड निक्सन या दोघांसाठी नरकात कायमस्वरूपी जागा आरक्षित करून ठेवली असेल. आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे त्याच हेनरी किसिंजरला शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. अर्थातच त्यामुळे पॉल पॉटने केलेल्या अत्याचारांचे गांभीर्य कमी होत नाही किंवा त्याचे समर्थनही कोणी करू नये. डावे असेच हलकट असतात. पण त्याला सत्तेवर येण्यासाठी योग्य परिस्थिती किसिंजर-निक्सन जोडगोळीने निर्माण केली हे पण तितकेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

ह्या हेन्री किसिंजरचा

नगरीनिरंजन
गुरुवार, 10/07/2021 - 14:29 नवीन
ह्या हेन्री किसिंजरचा भारतद्वेषही प्रसिद्ध होता. विशेषतः इंदिरा गांधींच्या काळात निक्सन व त्याचे भारताबद्दलचे अनुदार उद्गार गाजले होते. जगत्गुरु श्री मोदींनी मात्र त्यांचे मन जिंकले व दिल्लीत त्यांची भेट घेतली होती. त्याचा वृत्तांत व विश्लेषण येथे वाचता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

गामा येतात तेच मुळे संदर्भ

सुरसंगम
गुरुवार, 10/07/2021 - 07:29 नवीन
गामा येतात तेच मुळे संदर्भ सहित माहिती घेऊन. त्यांच्याबद्दल आदर दुणावला आहे. पण गामा साहेब मग यां माणसाने आपलीच माणसे मारली याला काय कारण असावे. आणि हो आता इथे नको तर त्यावर नवीन लेख येवू द्या.
  • Log in or register to post comments

शोधता शोधता ही माहिती सापडली

Rajesh188
गुरुवार, 10/07/2021 - 20:41 नवीन
पोल भांडे - mr.wikipaltz.com https://mr.wikipaltz.com/113162-pol-pot-OWPSZA भाषांतर असल्या मुळे मराठी ची पुर्ण वाट लागली आहे समजून घेत वाचा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा