✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पॉल पॉट : कंबोडियाचा क्रूरकर्मा

अ
अभिजीत अवलिया यांनी
Sat, 07/23/2016 - 02:13  ·  लेख
लेख
जन्माच्या वेळचे नाव सलोथ सार. ह्या क्रूरकर्म्याचा जन्म 19 मे 1925 रोजी 'Prek Sbauv ' ह्या कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह पासून 100 मैल दूर असलेल्या खेड्यात झाला. 'पेन सलोथ' आणी 'सोक नेम' हे त्याचे आईवडील त्या वेळच्या मानाने बऱ्यापैकी सुखवस्तू दाम्पत्य होते. 1934 साली पॉल पॉट कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह इथे शिक्षणासाठी गेला आणी तिथे एक वर्ष त्याने बुद्धिस्ट मॉनेस्ट्री मध्ये घालवले. त्यानंतर त्याने एका फ्रेंच कॅथॉलिक शाळेत प्रवेश घेतला आणी 1949 साली आपले शिक्षण पूर्ण केले. तिथून 1949 ला पॅरिस गाठले आणी 1953 सालापर्यंत रेडिओ टेक्नॉलॉजीजचे शिक्षण घेतले. पण सलग 3 वर्षे परीक्षेत नापास झाल्याने त्याला 1953 च्या जानेवारी मध्ये पुन्हा कंबोडियामध्ये परतावे लागले. पण त्यापूर्वीच 1951 मध्ये तो मार्क्सवादी चळवळीत दाखल झाला होता. 1963 साली पॉल पॉट कंबोडियन कम्युनिस्ट पक्षाचा प्रमुख बनला. त्याने अशिक्षित मुले व तरुणांची फौज बनवली ज्याला Khmer Rouge असे नाव पडले. कंबोडियाचा तत्कालिक शासक नोरोडोम सिहनौक ह्याने पॉल पॉटच्या ह्या Khmer Rouge चा निर्दयपणे पाडाव करायला सुरवात केली पण 17 एप्रिल 1975 साली Khmer Rouge ने नोरोडोम सिहनौक ची सत्ता उलटवून लावत देश आपल्या ताब्यात घेतला. 5 जानेवारी 1976 रोजी कंबोडियाने नवे संविधान स्वीकारले व देशाचे नाव बदलून "Democratic Kampuchea" केले. 13 एप्रिलला तो देशाचा पंतप्रधान झाला. मग त्याने देशाच्या नागरिकांचे 3 भाग केले. 1) सर्व अधिकार असणारा. 2) कॅन्डिडेट्स 3) डिपॉसिटीस - हे काहीही अधिकार नसलेले लोक होते. ह्या लोकांना ठार करायचे असे त्याचे ध्येय होते. देशाची पूर्ण अर्थव्यवस्था फक्त शेतीवर आधारित असली पाहिजे व भरपूर प्रमाणात शेती उत्पन्न मिळवून देश स्वयंपूर्ण करायचा हे त्याचे ध्येय होते. त्याने पैसा चलनातून बाद केला. सर्व शाळा, धार्मिक स्थळे, दुकाने ह्यांचे रूपांतर तुरुंगात केले. सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद केली. काळे कपडे हा पोशाख सक्तीचा केला. शेती करून देश स्वयंपूर्ण करण्यासाठी फक्त 10-20 लाख लोक पुरेसे आहेत. बाकीच्या लोकांचा जगून देखील काही उपयोग नाही असे त्याने रेडिओ वर जाहीर केले. सत्तेवर येताच Khmer Rouge ह्या त्याच्या लष्कराने 25 लाख लोकसंख्येचे नाम पेन्ह शहर पूर्ण रिकामे केले. इतर लहान मोठी जिंकलेली शहरे देखील पूर्णपणे रिकामी करण्यात आली. अमेरिकेचा हवाई हल्ला होण्याची शक्यता आहे असे खोटे सांगून त्याने सर्वाना देशाच्या ग्रामीण भागात नेले. तिथे सर्वाना बंदी बनवले गेले. सर्व बंदीवानांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असे शेतीकाम करावे लागे. आणी त्या बद्दल अन्न मिळत असे ते म्हणजे 2 वाट्या भात. त्यामुळे बरीच लोक उपासमारीने आणी अति श्रमाने मारून जात असत. जो कुणी कामाबद्दल तक्रार करेल किंवा कोणताही नियम मोडेल त्याला देण्यात येणारे अन्नधान्य (2 वाट्या भात) बंद करण्यात येऊन त्याला छळ छावणीत नेण्यात येत असे आणी अगोदरच उपासमारीने अर्धमेल्या झालेल्या त्या व्यक्तीला हाल हाल करून ठार मारण्यात येत असे. बऱ्याच डिपॉसिटीसना साखळ्यानी बांधून खड्डे खणण्यासाठी नेले गेले आणि मग त्यांना त्याच खड्ड्यात जिवंत पुरून टाकले. अशी हजारो किलिन्ग फिल्ड्स आजही कंबोडिया मध्ये सापडतात. शिक्षित लोक म्हणजे देशाला धोका असे त्याचे मत असल्याने देशातले सर्व डॉक्टर, शिक्षक, शिक्षित स्त्री पुरुष आणी मुले, चष्मां घालणारी लोक, एका पेक्षा जास्त भाषा बोलू शकणारी माणसे, तसेच ज्यांचे हात मऊ आहेत अशा सर्वाना हाल हाल करून ठार मारले. ह्याचे सैनिक कोणाच्याही घराची अचानक झडती घेत आणी घरात पुस्तक किंवा पेपर जर आढळला तरी त्या घरातल्या सर्वाना ठार करण्यात येई. जर कुणाला चष्मां असेल तर ह्याचा अर्थ त्याला वाचता येते असे समजून त्या व्यक्तीस ठार केले जात असे. त्यामुळे लोकांनी चष्मे फेकून दिले तर ह्याचे सैनिक लोकांच्या नाकाचे निरीक्षण करत. चष्मां घातल्याने नाकावर एक काळसर डाग किंवा खड्डा पडतो. तो जर असेल तर त्या व्यक्तीस शिक्षित समजून ठार केले जाई. त्याच्या काळात 3 किंवा जास्त लोकांना एकत्र यायला बंदी होती. जर असे आढळले तर त्या सर्वाना शत्रू ठरवून ठार मारण्यात येई. बंदुकीची गोळी ही किमती वस्तू असल्याने लोकांना मारण्यासाठी तो हातोडी, दांडे, फावडी, कुदळ अशी हत्यारे वापरत असे किंवा जिवंत पुरून टाकत असे. तर काही लोकांना बेडला साखळ्यांनी बांधून ठेवले जाई (त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत). शेती आधारित अर्थव्यवस्थेत इतर जगाशी काहीही संबंध ठेवायची गरज नाही असे मत असल्याने त्याने चीन सोडून इतर सर्व देशांशी संबंध तोडून टाकले. देशातील विमान तळ बंद केले, सीमा सील केल्या जेणेकरून कोणीही देश सोडून पळून जाऊ शकणार नाही. 1975 ते 1979 ह्या त्याच्या 4 वर्षाच्या जुलमी कारकिर्दीत कंबोडियाच्या 70 लाख नागरिकांपैकी जवळपास 25 ते 30 लाख लोकांना ठार मारण्यात आले. एक छळ छावणी S - 21 इतकी भयानक होती की तिथे कैद केलेल्या 20000 लोकांपैकी फक्त 7 जण जिवंत राहू शकले. ह्या सर्व मृतांना भाताच्या शेतात पुरले जाई. आज पर्यंत कंबोडिया मध्ये तब्बल 300 ठिकाणी अशी 'किलिन्ग फिल्ड्स ' सापडली आहेत आणी अजूनही सापडत आहेत. मे 1975 साली त्याच्या सैन्याने Phú Quốc हे व्हिएतनामचे बेट जिंकल्याने त्याचे व्हिएतनामशी संबंध बिघडले. तह करण्याचे सर्व पर्याय संपल्यावर व्हिएतनामने कंबोडियाशी युद्ध पुकारले. चीनच्या मदतीनं पॉल पॉट ने व्हिएतनामशी लढायचा खूप प्रयत्न केले पण तरीही त्याचा पराभव झाला. ज्यानंतर तो थायलंडला पळून गेला. थायलंडने पॉल पॉटचा आणी त्याच्या सैन्याचा बफर म्हणून उपयोग केला आणी त्याला चीन कडून हत्यारे मिळवून देण्यास मदत केली. 1985 साली त्याने एका इंटरव्ह्यू मध्ये 'मी पूर्णपणे निर्दोष असून माझ्या हाताखालच्या लोकांनी मला न सांगता ह्या हत्या केल्या असे आरोप केला.' त्याच साली व्हिएतनाम ने Khmer Rouge चा पूर्णपणे पाडाव केला. 1989 साली व्हिएतनामचे सैन्य कंबोडिया मधून निघून गेल्यावर पॉल पॉट थायलंड मधून परत देशात आला आणी त्याने नवीन सरकारशी लढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 19 मे 1997 ला त्याला लष्कराने ताब्यात घेतले. पण आपल्याला अमेरिकेच्या हवाली करतील म्हणून त्याने 15 एप्रिल 1998 रोजी औषधांचा डोस जास्त प्रमाणात घेऊन आत्महत्या केली. आजच्या कंबोडियातल्या जवळपास प्रत्येक घरातले कुणीतरी पॉल पॉट च्या अत्याचारांचे शिकार झालेले आहे. आणी त्यामुळे आजही खूप मोठ्या प्रमाणात ह्या देशातली जनता मानसिक रोगग्रस्त आहे. समाप्त.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
43729 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

पॉल पॉटला त्याच्या

एस
Sat, 07/23/2016 - 04:41 नवीन
पॉल पॉटला त्याच्या कृष्णकृत्यांबद्दल पुरेशी शिक्षा न मिळताच तो स्वस्तात सटकला. असल्या मूर्खशिरोमणी राज्यकर्त्यांना त्यांच्या देशाची जनताच काय, कुणीच माफ करणार नाही. व्हिएटनामचे याबद्दल कौतुक वाटते की या कणखर देशाने आधी अमेरिकेला आणि नंतर चीनलाही हरवले.
  • Log in or register to post comments

व्हिएटनामच्या

Trump
Mon, 10/04/2021 - 14:53 नवीन
व्हिएटनामच्या लोकांबरोबर काम केले आहे. अतीशय चिवट माणसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

शिक्षित लोक म्हणजे देशाला

मारवा
Sat, 07/23/2016 - 07:14 नवीन
शिक्षित लोक म्हणजे देशाला धोका असे त्याचे मत असल्याने देशातले सर्व डॉक्टर, शिक्षक, शिक्षित स्त्री पुरुष आणी मुले, चष्मां घालणारी लोक, एका पेक्षा जास्त भाषा बोलू शकणारी माणसे, तसेच ज्यांचे हात मऊ नाहीत अशा सर्वाना हाल हाल करून ठार मारले. ह्याचे सैनिक कोणाच्याही घराची अचानक झडती घेत आणी घरात पुस्तक किंवा पेपर जर आढळला तरी त्या घरातल्या सर्वाना ठार करण्यात येई. जर कुणाला चष्मां असेल तर ह्याचा अर्थ त्याला वाचता येते असे समजून त्या व्यक्तीस ठार केले जात असे. त्यामुळे लोकांनी चष्मे फेकून दिले तर ह्याचे सैनिक लोकांच्या नाकाचे निरीक्षण करत. चष्मां घातल्याने नाकावर एक काळसर डाग किंवा खड्डा पडतो. तो जर असेल तर त्या व्यक्तीस शिक्षित समजून ठार केले जाई. त्याच्या काळात 3 किंवा जास्त लोकांना एकत्र यायला बंदी होती. जर असे आढळले तर त्या सर्वाना शत्रू ठरवून ठार मारण्यात येई. शिक्षीत वर्गाप्रति हा तिरस्कार भयावह आहे आपल्याकडेही हा "बीज" स्वरुपात आढळतोच.
  • Log in or register to post comments

सहमत

पगला गजोधर
Sat, 07/23/2016 - 13:08 नवीन
शिक्षीत वर्गाप्रति हा तिरस्कार भयावह आहे आपल्याकडेही हा "बीज" स्वरुपात आढळतोच.
त्यातल्या त्यात, भक्तीभावाचे वातावरणात ... दुसरं मत फक्त व्यक्त केलं तर, शिक्षीत वर्गाकडूनही हा भयावह तिरस्कार अनुभवास येईल. असो, एका अग्रगण्य राज्यातील काही निम्नशिक्षित लोकांकडून, मातंग समाजाने कोणत्या जनावराचे कातडे कमावून जगावे... यावर सुद्धा निर्बंध आहेत की काय ? असे वाटावे, अशी घटना समजली वर्तमान पत्राद्वारे... कोणी काय खावे/खाऊ नये याबरोबरच आता कोणी काय व्यवसाय करावा /करू नये, याबद्दल लवकरच निर्बंध येतात की काय ? अशी या बातमीसारखी 'बीजे' दिसत आहेत खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अद्भुत

नाखु
Sat, 07/23/2016 - 09:12 नवीन
प्रांजळपणे सांगतो ही माहीती प्रथमच वाचतो आहे इतके दिवस फक्त हिटलर /आणि चिनचा कोण क्रूर्कर्मा बद्दल वाचले होते. एका लेखात टंकण्यासारखा विषय दिसत नाही. असे बणण्यामागे (जसे हिटलरच्या उदयापुर्वी जर्मनीचे केलेले जागतीक खच्चीकरण) असेल . आणि सद्य स्थितीत देश कसा आहे (राजवट हुकुमशाही का अध्यक्षीय पद्धत) पुलेशु नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments

प्रांजळपणे सांगतो ही माहीती प्रथमच वाचतो आहे.

मुक्त विहारि
Sat, 07/23/2016 - 12:19 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

दुसर्‍या महायुद्धात

स्पार्टाकस
Sun, 07/24/2016 - 08:48 नवीन
दुसर्‍या महायुद्धात हिटलरइतकेच, किंबहूना जास्तंच अत्याचार जपानी लोकांनी चीन आणि फिलीपाईन्सच्या नागरीकांवर केले. दुर्दैवाने जपानी लोकांना आजही त्याबद्द्ल खंत वाटत नाही. एकाही जपानी पंतप्रधानाने आजवर त्याबद्द्ल दिलगीरी व्यक्तं केलेली नाही. जपानी अत्याचाराचं अत्यंत भीषण उदाहरण म्हणजे नानकिंग मॅसेकर! https://en.wikipedia.org/wiki/Nanking_Massacre
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

जनरल शिरो इशी नि जपान मध्ये

लोनली प्लॅनेट
Sun, 07/24/2016 - 09:49 नवीन
जनरल शिरो इशी नि जपान मध्ये केलेल्या अमानुष प्रयोगांना तोड नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

सगळ्या क्रूरकरम्यानची

सामान्य वाचक
Sun, 07/24/2016 - 19:24 नवीन
उतरती भाजणी लावली तर रशिया आणि जपान याना विभागून पहिला नंबर मिळेल बाकी प्रत्येकामधेच क्रूरपणाची बीजे असतात। कुणाला अनुकूल परिस्थिती मिळते आणि मग उन्माद वाढत जातो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लोनली प्लॅनेट

हा जपान्यांनी फिलिपिन्स मध्ये

टवाळ कार्टा
Mon, 07/25/2016 - 16:19 नवीन
हा जपान्यांनी फिलिपिन्स मध्ये करवलेला डेथ मार्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

खमेर रुज एक निरातिशय भयंकर

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/23/2016 - 11:08 नवीन
खमेर रुज एक निरातिशय भयंकर प्रकार होता, त्यात सतत सत्तेसाठी अगोदर झालेली युद्धे, कंबोडियन माईन्स एक्शन सेंटर (सी एम ए सी) नुसार आजही कंबोडिया मध्ये किमान ४० ते ६० लाख भूसुरुंग (लँड माईन्स) ऍक्टिव्ह आहेत अन कोणाचाही पाय पडता ते फुटू शकतात, हे कोणीही म्हणजे चारा गवत कापायला गेलेल्या स्त्री पासून ते खेळणारी बागडणारी बालके कोणीही असू शकते, अतिशय भयंकर अवस्था आजही आहे
  • Log in or register to post comments

पॉल पॉट

शंतनु _०३१
Sat, 07/23/2016 - 11:52 नवीन
पॉल पॉट विषयी सकाळ मध्ये ही एक लेख आला होता... एकंदरीत अतिशय भयंकर प्रकरण आहे हे
  • Log in or register to post comments

25-30 लाख माणसे 4 वर्षांत???

पिशी अबोली
Sat, 07/23/2016 - 12:54 नवीन
25-30 लाख माणसे 4 वर्षांत??? कनवाळू कम्युनिस्ट्स!!!
  • Log in or register to post comments

१९६० ते २०१३ या कालावधीचा

शाम भागवत
Sat, 07/23/2016 - 16:54 नवीन
१९६० ते २०१३ या कालावधीचा लोकसंख्यावाढीचा ग्राफ पाहिला तर असे वाटतेय की, १९७५ साली लोकसंख्या ७५ लाख होती व ती १९८० साली ६७ लाख झाली. म्हणजे अंदाजे ८ लाख लोक मेले असावेत. १५-२० लाख विकलांग झाले असावेत. असे सगळे मिळून २५-३० लाख आकडा आला असावा. अधिक खुलासा तज्ञ लोक करतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

@शाम भागवत साहेब,

अभिजीत अवलिया
Sat, 07/23/2016 - 17:17 नवीन
@शाम भागवत साहेब, पॉल पॉट ने बऱ्याच हत्या लपवून ठेवल्या असाव्यात. तसेच 5 वर्षाच्या काळात काही नवे जन्म देखील झाले असतील. हा आकडा 20 लाखाच्या खाली निश्चित नाही असेही एका दुव्यावर लिहिलेले सापडले होते. पण मुळात आकड्यांपेक्षा त्याने देशात कसले वातावरण आणले होते हे महत्वाचे. हत्या 25-30 लाख लोकांची असो वा एका नागरिकाची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

हा तर हिटलर व हुसैनी चा

लोनली प्लॅनेट
Sun, 07/24/2016 - 09:50 नवीन
हा तर हिटलर व हुसैनी चा सुद्धा बाप होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

मी पॉल पॉटच्या बाजूने काही

शाम भागवत
Sun, 07/24/2016 - 17:46 नवीन
मी पॉल पॉटच्या बाजूने काही बोलत नाहिये. पण दर दोन माणसांमागे एक माणूस मारायचा म्हणजे तो हिटलर, माओ, जपानी सैनिक अधिकार्‍यांपेक्षाही मोठा व्हायला लागला म्हणून शंका आली इतकेच. त्यासाठीच ग्राफची लिंक दिली होती. असो. तुम्ही म्हणता तसेही असेल. माझा त्यावर जास्त अभ्यास वगैरे नाहीय्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

अहलुवालिया कसे आहात तुम्ही ... ? ;)

पगला गजोधर
Sat, 07/23/2016 - 12:55 नवीन
बाकी, हा लेख अभ्यासाअंती लिहिलेला खरा इतिहासच आहे. पुलेशु
  • Log in or register to post comments

खुप पुर्वी वाचलय याविषयी

इशा१२३
Sat, 07/23/2016 - 14:51 नवीन
खुप पुर्वी वाचलय याविषयी.भयंकरच आहे!
  • Log in or register to post comments

बुधवार, 8 एप्रिल 2015 सकाळ पैलतीमध्ये देखिल आलं होतं

रघुनाथ.केरकर
Mon, 07/25/2016 - 12:43 नवीन
कंबोडिया.. एक भयानक सत्य! (पैलतीर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३

एक सुधारणा

अभिजीत अवलिया
Sat, 07/23/2016 - 15:30 नवीन
एक सुधारणा 'ज्यांचे हात मऊ नाहीत' ऐवजी 'ज्यांचे हात मऊ आहेत' असे वाचावे. संपादक कृपया सुधारणा कराल का? @नाखु काका, मान्य. हा विषय एका लेखात टंकण्यासारखा नाही. मी गेले 2 आठवडे माहिती शोधून शोधून ह्या व्यक्तीवर लेख बनवत होतो. जास्त मोठा लिहिला तर कंटाळवाणा होईल म्हणून फक्त जितके महत्वाचे वाटेल तितके लिहिले. पण मला एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते. इतके सगळे होत असताना स्वत:ला जगाचे मसीहा समजणारे अमेरिका आणी त्या वेळची दुसरी महासत्ता रशिया आणी संयुक्त राष्ट्रसंघ झोपा काढत बसले होते का? कुणीच कसा हस्तक्षेप केला नाही. का हे गरीब राष्ट्र असल्यामुळे तिथल्या लोकांची काहीच किंमत न्हवती संयुक्त राष्ट्रसंघाला. व्हिएटनामने देखील हस्तक्षेप केला ते त्यांचे बेट पॉल पोट ने काबीज केले म्हणून. नाहीतर ह्या मूर्खांने अजून 25-30 लाख लोकांना सहज यमसदनी धाडले असते.
  • Log in or register to post comments

America 'helps' only when she

संदीप डांगे
Sat, 07/23/2016 - 16:18 नवीन
America 'helps' only when she has 'something' to gain.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

+ १

मुक्त विहारि
Sat, 07/23/2016 - 17:23 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संदीप भौ

बाबा योगिराज
Sun, 07/24/2016 - 23:03 नवीन
100 टक्के मान्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

थोडक्यात काय , Give us ur oil

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/25/2016 - 09:07 नवीन
थोडक्यात काय , Give us ur oil or we will bring democracy to ur country =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

थोडक्यात काय , Give us ur oil

मार्मिक गोडसे
Mon, 07/25/2016 - 16:34 नवीन
थोडक्यात काय , Give us ur oil or we will bring democracy to ur country =))
मस्तच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

कमिन्युस्ट हे इतके टोकाचे

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/23/2016 - 17:10 नवीन
कमिन्युस्ट हे इतके टोकाचे असतात. हे अलीकडेच डॉ.अभिराम दिक्षीत यांच्या भाषणात ऐकलेले होते. त्यात ह्या पॉल पॉट बद्दल " ह्यानी कुदळी आणी फावड्यानी माणसे मारली.. " असा उल्लेख आला होता. त्याचा उलगडा आज झाला. भयंकरच टनाटनी होता की हो हा! बाप रे!!!
  • Log in or register to post comments

पोल पॉट्चा काल कंबोडियाचा

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 07/24/2016 - 07:47 नवीन
पोल पॉट्चा काल कंबोडियाचा काळा कालखंड आहे. माणूस किती माथेफिरू व क्रूरकर्मा होऊ शकतो, आणि तात्कालिन राजकारणासाठी त्याला उजळ माथ्याने कसा व किती पाठिंबा दिला जाऊ शकतो याचा वस्तूपाठच ! पोल पॉटला समर्थन, साथ आणि रसद पुरवणार्‍या चीनमध्ये, माओच्या सांस्कृतिक क्रांतीने (Cultural Revolution) १९६६ ते १९७८ या दहा वर्षांच्या कालखंडात ३ कोटी लोकांचे बळी घेतले आहेत. हा आकडा चीन सरकारमान्य अधिकृत आकडा आहे, इतरांच्या मते खरा आकडा यापेक्षा खूप मोठा आहे.
  • Log in or register to post comments

ह्या असल्या लोकांचा इगोच लै

वटवट
Sun, 07/24/2016 - 08:28 नवीन
ह्या असल्या लोकांचा इगोच लै हॉर्रीबल असतो राव... ही कल्चरल रिव्होल्यूशन त्याचाच तर परिपाक होती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

It may not be about ego, it

संदीप डांगे
Sun, 07/24/2016 - 08:41 नवीन
It may not be about ego, it has something to do with fear deeply rooted in mind of the dictator. 'The way' he comes to power he knows the power of 'that way' and always fear that his opponents will become more powerful than him. So he choose to eliminate them in budding stage.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट

हे खरंच प्रचंड हॉरिबले

वटवट
Sun, 07/24/2016 - 07:52 नवीन
हे खरंच प्रचंड हॉरिबले
  • Log in or register to post comments

पॉल पॉटबद्दल ......

सुधीर कांदळकर
Sun, 07/24/2016 - 08:17 नवीन
वृत्तपत्रात बातम्या येत असत पण काहीच तपशील ठाऊक नसे. खोटा राजकीय प्रचार असेल अस वाटत असे. एका मुलाने आपल्या बापाला पॉल पॉट नाव ठेवले होते. 'हिटलर' तर अनेक मुले आपल्या पिताश्रींना बोलत असत. हिटलरच्या समर्थकांना तिथे पाठवायला हवे होते. तो देखील राष्ट्रभक्त होता असेलच. क्रूरकर्म्याच्या तत्त्वज्ञानाबद्दल लेखात थोडक्यात आणि छान ओळख करून दिली आहे. लेखाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

भयंकर

जव्हेरगंज
Sun, 07/24/2016 - 19:13 नवीन
भयंकर
  • Log in or register to post comments

हा धागा काढल्याबद्दल आभार !

माम्लेदारचा पन्खा
Sun, 07/24/2016 - 23:01 नवीन
एक नवीन क्रूरकर्मा सापडला.....हिटलरसुध्दा मवाळ वाटतोय ह्याच्यापुढे !
  • Log in or register to post comments

बापरे...माथेफीरु....

खटपट्या
Sun, 07/24/2016 - 23:10 नवीन
बापरे...माथेफीरु....
  • Log in or register to post comments

भयंकर आहे... हिटलर बरा

शि बि आय
Mon, 07/25/2016 - 10:56 नवीन
भयंकर आहे... हिटलर बरा ह्याच्यापुढे
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय.

प्रचेतस
Mon, 07/25/2016 - 11:09 नवीन
छान लिहिलंय. युगांडाचा इदी अमीन असाच एक क्रूरकर्मा.
  • Log in or register to post comments

हिरोशीमा , नागासाकी विएत्नाम, इथे झालेल्या नरसंहारात..

रघुनाथ.केरकर
Mon, 07/25/2016 - 12:52 नवीन
हिरोशीमा , नागासाकी विएत्नाम इथे झालेल्या नरसंहाराला कोण जबाब्दार होते, रशीयाच्या काय्टीन ला कोण जबाब्दार??? इदि अमीन , पोल पोट, हिट्लर , हे तर क्रुरकर्मे आहेतच, सोबत अमेरीकेने पण तेवढेच लोक मारलेय्त.
  • Log in or register to post comments

अम्रिकेचे पर्ल हार्बर

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 07/25/2016 - 13:40 नवीन
आम्च्या बिच्चार्‍या अम्रिकेला उगा गोवु न्का. ते दोन्ही साईडला हत्यारे पुरवणारे गुनी बेपारि लोक्स. छोटा अन लठठ मुलगे त्या जपान्यांनी पर्लहर्बर्वर विमाने पाडली हुती म्हुन धाडले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

छोटा मानुस आणी लट्ठ मुलगा टाकायच्या

रघुनाथ.केरकर
Mon, 07/25/2016 - 13:59 नवीन
छोटा मानुस आणी लट्ठ मुलगा टाकायच्या आधीच इंम्पीरीयल आर्मी ने शरणागती पत्करली होती, शास्त्र्ज्ञांचा हव्यास होता तो फक्त अण्वस्त्रांच्या चाचणीचा, नशीब जपान्यांचं की नागासाकी चा नेम चुकला. खरचं गुणी बेपारी... वीएतनाम मध्ये फ्रेंचाना बाजुला सारुन कधी युधात उतरले ते त्यांना स्वताला पण कळलं नाही,आत्ता फ्रांस वर लागोपाठ २ ३ हल्ले / घात्पाती कारवाया झाल्या पण इथे मात्र फार काही अ‍ॅक्शन दीसली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

संदर्भ?

गॅरी ट्रुमन
Mon, 07/25/2016 - 15:41 नवीन
छोटा मानुस आणी लट्ठ मुलगा टाकायच्या आधीच इंम्पीरीयल आर्मी ने शरणागती पत्करली होती
याचा संदर्भ मिळू शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

जालावरच्या रँन्डम वाचनात आलं होतं

रघुनाथ.केरकर
Mon, 07/25/2016 - 15:52 नवीन
तरी सुधा लींक सापडल्यास जरुर देइन. ट्रुमन साहेबाना ह्याची कल्पना होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

जपान्यांचे सुद्धा

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 07/25/2016 - 17:58 नवीन
आण्विक शस्त्रास्त्रे बनवण्याचे प्रॉग्रॅम्स होते. त्यांचे एकुणात क्रौर्त्य बघता त्यांनी २ सोडा १० बॉम्ब नक्किच उडवले असते. आधी मलाही जपान्यांविषयी सहानुभुती वाटायची. पण जसजसे त्यांचे नानकिंग अन चायनामधले प्रकार समजले, तसतशि सहानुभुती पुर्ण गेली. तुम्ही म्हणता तश्या लिंक्स माझ्याही वाचनात होत्या. त्यांचा रोख मुख्यत्वे रशिया जपानला मागे रेटत होता तर अमेरिकेने क्न्व्हेन्श्नल वेपन्स वापरुन जपानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले असते तर बरे झाले असते असा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

रॅन्डम लिंका

गॅरी ट्रुमन
Mon, 07/25/2016 - 18:24 नवीन
जालावरच्या रँन्डम वाचनात आलं होतं
तेच. अशा रॅन्डम लिंकांची विश्वासार्हता काय?जपानवर दोन अणुबॉम्ब पडूनही आणि त्याचवेळी रशियानेही युद्धात उडी घेऊनही जपानने शेवटी ६ दिवसांनी म्हणजे १५ ऑगस्टला सम्राट हिरोहिटोच्या Jewel Voice Broadcast नंतर जपानने शरणागती पत्करायची घोषणा केली. असे काही होणार ही कुणकुण लागताच १४-१५ ऑगस्टच्या रात्री केनजी हटानाका या जपानी सेनाधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली बंड होऊन हिरोहिटोंनाही नजरकैदेत ठेवायचा प्रयत्न झाला होता.म्हणजे जपान्यांची लढायची खुमखुमी इतके सगळे होऊनही गेलेली नव्हती. तेव्हा अणुबॉम्ब पडायच्या आधीच जपानने शरणागती पत्करली होती या म्हणण्याला नक्की कितपत महत्व द्यावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

रॅन्डम लिंकांची विश्वासार्हता

रघुनाथ.केरकर
Mon, 07/25/2016 - 18:43 नवीन
प्रत्येक घटनेचा शास्त्रोक्त अभ्यास करायला आपण कुणी इतीहास संशोधक नाहि.... तरी पण चार ठीकाणच्या बातम्या वाचुन सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. मी तर असही वाचलं होतं की अमेरीकेच्या बाँबनी नव्हे तर स्टॅलीन च्या मुत्सद्दीगीरीने जपान पडला. पण नंतर अमेरीकेनेच जपान ला हरवलं असा प्रचार करण्यात आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

मुत्सद्देपणा की बोकेपणा?

गॅरी ट्रुमन
Mon, 07/25/2016 - 18:54 नवीन
मी तर असही वाचलं होतं की अमेरीकेच्या बाँबनी नव्हे तर स्टॅलीन च्या मुत्सद्दीगीरीने जपान पडला.
स्टॅलिनच्या मुत्सद्देगिरीने की बोकेपणामुळे? १९४५ च्या सुरवातीला जर्मनी बॅकफूटला असतानाही स्टॅलिनने जपानविरूध्द युध्द सुरू केले नव्हते. ते सुरू केले ते अगदी शेवटी म्हणजे ९ ऑगस्टला-- नागासाकीवर बॉम्ब पडला त्याच्या काही तास आधी. आणि इतके करून जपानकडून कुरील बेटे लाटलीच. आजही कुरील बेटे हा रशिया आणि जपानमध्ये वादाचा मुद्दा आहे.अमेरिकेने ओकिनावा ताब्यात ठेवले होते ते पण १९७२ मध्ये जपानला परत केले. पण रशिया कुरील बेटे जपानला अजूनही परत द्यायला तयार नाही. म्हणजे आयत्या वेळेस डल्ला मारून लोण्याचा गोळा स्टॅलिननामक बोक्याने लाटलाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

जास्तीची माहिती

देवांग
Mon, 07/25/2016 - 15:53 नवीन
अधिक माहिती साठी खालील लिंकवर क्लिक करा http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5285922805981958652 http://goo.gl/ZroG6E
  • Log in or register to post comments

जपानी काही संतत्वाचे पुतळे

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/25/2016 - 18:50 नवीन
जपानी काही संतत्वाचे पुतळे नाहीत, पण उत्तरेकडले खंजीर खुपसे शेजारी ह्यांना शह द्यायचा असल्यास ते आटा काळाची गरज आहेत आपली, तेव्हा जपान आपला ब्येष्ट फ्रेंड बरंका कारण इट्स जस्ट गुड बिझनेस
  • Log in or register to post comments

+१

अनिरुद्ध.वैद्य
Mon, 07/25/2016 - 20:38 नवीन
जॅप्स,व्हिएट्स, फिलिपिनोज, मंगोल्स सगळे लागणार आहेतच आपल्याला. कझाक,अफगाणही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

खर आहे.

शाम भागवत
Mon, 07/25/2016 - 22:13 नवीन
इराण पण मोजायला लागणार आहे आता. इराण मुळे इराण मधील बलुची लोक व तेथून अफगाणीस्तान व तेथून अफगाण व पाकीस्तान बॉर्डर वरचे लोक. काश्मीर प्रश्न सुटणे अवघड. पण तो आणखी चिघळू नये म्हणून एकच उपाय. पाकीस्तानला दबावाखाली ठेवणे. भारत युध्द जिंकतो व तहात हरतो असे म्हटले जाते. पण सध्या जे चाललय त्यावरून असे वाटतय की पाकीस्तानला एकाकी पाडणे व युद्ध न करता एकदम तहच जिंकणे अस काही धेय्य आहे की काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा