भूछत्री
आणखी अपहरणे
'ती'ही त्याचा फुटबॉल करते
कधी कधी किंवा बर्ञाचदाही,
पण अपहरणांना, 'ती'च्या तर्हा अधिक
कधी जन्माला येण्यापुर्वीच अपहरण झालेले असते
आलीच तर 'ती' हा शब्दच अपहरण करतो पहिले
'ती' चे अपहरण करण्याची सवय
आधीच्या 'ती'लाही सोडवत नाही
अपहरण
सूत्रांनी गुणांच्या कट काय केले
नी बंदीगृहांच्या प्रवासास सुरवात काय झाली
स्वतःचेच अपहरण करण्याची दिवा स्वप्ने पहात
सतत अपहरणातूनच तर पुढे सरकतोय .
अपहरणकर्ते फक्त बदलत जातात
अनेकदा अनुमती शिवाय ,
अनेकदा हातातन निसटणार्या अनुमतीने
अपहरणांच्या घटनांचे
हे आत्मचरीत्र
अद्याप बाकी आहे,
वाढवेन म्हणतोय
उसंत मिळेल तसे तसे
नव नव्या अपहरणकर्त्यांची
तेवढीच सोय
जुन्या अपहरणकर्त्यांना
जरासा दिलासा
(तिखले)
बंद जाहला वाजून वाजून, गजराचे चुकले
कठीण दिलीसे नेमून कसरत, ट्रेनरचे चुकले
मध्ये उपटला कुठून जन्मदिन, पेस्ट्रीचे चुकले
वामकुक्षीला विसावला त्या, खाटेचे चुकले
बुडून गेला दुलईमध्ये, झोपेचे चुकले
शर्ट दाटला पोटाला अन टेलरचे चुकले
तडफडला पण गेला नाही, ट्रेकिंगचे चुकले
रांजणापरी उदरी ढकले, माशाचे तिखले...
(गजब)
(धुतले...)
उंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले
भंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले
दुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले
पारावरती विसावलो अन तिथेच चुकले
खबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले
तडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले
सुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले
पाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...
काळाची उबळ
खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,
तरुणाई तर म्हणते ती सगळ सर करत चालली
पण त्यांचे सर तर मला खाली दिसतात आणि पाय हवेत !
खोकल्याची उबळ यावी
तशी आज मला काळाची उबळ आलीए,
जेव्हा माणूस विचार करावयास शिकला
तेव्हा पासून मला कलीयुगच दिसत
तो माकड होता तेव्हा सुखी होता कदाचित
ते सुख मला वापस हवय स्वछंद माझ्या स्वप्नातल्या सारखं
पण त्यांच्या स्वप्नातल्यासारख नसलेल.
भासं~फुलं!
ह्याच्यातून त्याच्यात
त्याच्यातून ह्याच्यात
शब्दातून क्रीडेत
क्रीडेतून शब्दात
व्यासातून आसात
आसातून व्यासात
शब्दांच्या मनोय्रात
मनोय्रांच्या शब्दात
अर्थ नाही आशयात
आशय नाही अर्थात
रिकाम्या कुंथनात
कुंथनातून रिकाम्यात..
शब्दकृतींच्या प्र-हारात
भासं~कृतींच्या पूर्ण-विरामात! ;)
कवी- अपना
(चंम्मतग)
हायवे वरच्या वाटेवरचे वळण द्यायचे हाक
"लोक काय म्हणतील कृत्रीम बंधन सत्वर तोडुनी टाक !"
बायको नामक भूत बाटलीस कायम भिववीत होते
त्या भीतीने तरल काहिसे ग्लासातून निसटत होते
गोळा करूनी धैर्य, ठरविले, नको गाय छाप मळलेली
वाट खोकुनी माझी लावीते, वीडी कोंदटलेली,
जेडी, शिवास, टिचर्स, यांच्यात अवघडून बसलेली
ओल्ड माँक ती ग्लासामध्ये, विमुक्त होता निर्मळ हसली
त्या हसण्याचा खळाळ ध्वनि मज सांगुनी गेला काही,
"कितीही प्या, पण ध्यानी ठेवा..चखण्याविण "गंमत" नाही !"
(दे कुटाणे सोडुनी...)
घेईना कोणी मनावर सोडणे गझलेस 'त्या'
मी म्हणालो आपणच या काव्यास आता बॅलंसुया !
एक विनवतो त्या कवीस की बाबारे, भडकू नको
बक्ष या नवकवीस अन ते फुत्कार तू टाकू नको
*****
पास होण्यासारखे तुज ना मिळाले मार्कही
केटी अन रिव्हॅल झाले भरशी किती तू फॉर्मही
लावले ते क्लास किती अन गाईडेही आणिली
कोपऱ्यावर मारुतीला वाहिले तू तेलही
वागणे बालिश अन ते कोवळे वय वाटे परी
सांगती दाढीमिश्या ज्या वाढल्या गालावरी
(ही पहा पाडली गजल)
आता लक्षात ठेउन वेगळ्या धाग्यावर कविता पाडणे आले
पेरणा सांगायलाच पाहिजे का?
ही पहा पाडली गजल,
ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी
दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी,
उंच डोंगर, श्रावणसरी, यावरी काही लिहू,
शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी,
कोप-यावरती जिन्याच्या, पिंक कोणी टाकली,
रंगते टाईल इथली, पान ठेल्यासारखी,
हो! जरा जेलस होतो, प्रतिसाद संख्या पाहूनी,
मीही मग लिहिली गजाली, सत्यजिता सारखी,