Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी शेवट

अबोली२१५'s picture
अबोली२१५ in जनातलं, मनातलं
12 Dec 2016 - 7:05 pm

Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी १Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ३Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५

मी सर्वसामान्य आहे जी फक्त २. ५० ची धावपळ केलीय पण असे काही जण आहेत ज्यांनी यात आपल्या जमिनी विकल्या, घर गहाण ठेवली आहेत, जे नुकतेच जॉब ला लागलेत ज्याचं सर्व काही होणे बाकी आहे त्यांनी १२ ते १५ लाखाची लोन केलीय त्याची अवस्था माझ्या पेक्षा जास्त वाईट आहे. मी कोणाच्याही ही प्रचारासाठी धागा काढला नाही आहे.

Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी शेवट

हे अकाउंट चालू करून त्यामध्ये पैसे भरायला मला कमीतकमी 1-2 आठवड्याचा अवधी लागणार होता. त्या साठी मी परत Mr परेशशी काही कॉन्टॅक्ट होतो का ते पाहत होती. मी माझ्या मैत्रिणीला whatapp वरून मेसेज पाठवत होती फोन करत होती कि माझ्या नवऱ्याला Mr. परेशशी बोलायचं आहे तर तू त्याचाशी कॉन्टॅक्ट करून दे. पण तिने दोन दिवस कोणताच रिप्लाय दिला नाही. तिने दोन दिवसांनी मेसेज केला कि ते बिझी आहेत त्यामुळे ते फोन वर येणार नाही तुमच्या ज्या काही query त्या कागदावर लिहून आण. मी २ मीटिंगला त्या समजावून सांगेन (मला येथे वाटलं कि तो माझ्या नवऱ्याला घाबरलेला आहे) तो फोनवर यायला तय्यारच नव्हता.

मी तोपर्यन्त मी बँकेत पैसे भरायला सुरवात केली होती. मी पैसे एकदम भरले असते तर मला pan card दाखवावं लागणार होत म्हणून मी ३ हफ्त्यात बँकेत पैसे जमा करायचं असं ठरवलं. मी तीन दिवस जाऊन पैसे भरू लागली होती. या दरम्यान माझी मैत्रीण पण मुंबई बाहेर गेली होती त्यामुळे मला जरा बँकेत पैसे भरायला निवांतपणा मिळाला. माझ्या नवऱ्याने माझ्या आणि माऊच्या FD वर लोन काढलं आणि ते पैसे Nationalised बँकेतील अकाउंटमध्ये NEFT केले.
माझी मैत्रीण परत बाहेरून आल्यावर मला फोन केला कि काय झालं तू बँकेत पैसे जमा केलेस का? त्यावर मी बोलली हो झालेत तू पुढची मीटिंग घे. त्यावर ती बोलली माझे senior बिझनेस पार्टनर (Mr परेश नाही) तुला भेटतील मी त्याची वेळ घेते तू माझी मैत्रीण आहेस त्यामुळे ते तुला भेटत आहेत. ते कोणालाच भेटत नाहीत. ते माझे गुरु आहेत त्याच्यामुळे मी बिझनेस शिकली (पण हे तर तू Mr परेश बद्दल पण बोलत होतीस???) तुझ्यापेक्षा मीच जास्त excited त्यांना भेटला. खूप दिवसांनी भेटत आहेत ते मला. त्यांचे भारतात खूप ठिकाणी त्याचे बिझनेस सेन्टर आहेत त्यांनी खूप लोकांना या बिझनेस आणलाय त्यामुळे खूप लोक त्याच्यामुळे sucessful झाली आहेत.(????????) (मैने क्या क्या पापड बेले है। तुम्हे क्या बताऊ )

मी तिला भानवनिक होऊन सांगितलं कि माझ्या माऊच्या FD वर लोन काढलंय त्यावर अग तू फक्त २. ७० लाखाचं गुंतवतेस मी माझ्या सासऱ्या आणि वडिलांकडून काही पैसे उधार घेतले त्यात मी माझे असे १० लाख यात गुंतवले आहेत ( मला अजूनही या गोष्टीवर विश्वास वाटत नाही आहे.)

मी: तिला विचारलं मग तुझे पैसे रिकव्हर झाले?
ती: हो
मी : मग दुबईला पण तुला त्याने पाठवलं का बिझनेससाठी?
ती : ते कशाला पाठवतील माझी मी गेले होते बिझनेससाठी. बिझनेस माझा आहे
मी : म्हणजे ?
ती : (थोडी गडबडली ) अग कॉन्फरन्स होती म्हणून गेली होती.
बर ते जाऊ दे उद्या मी तुला फोन करते appointment कधी आहे ते सांगते by असं म्हणून तिने फोन ठेऊन दिला.

तिने दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं कि उद्या ११. ०० वाजता आपल्याला Dr. प्रशांत आपल्याला भेटणार आहेत. ते अम्यक्या अमक्या कॉलेज मधून डॉक्टरेट केली ते केम मध्ये consultancy करायचे पण जेव्हा पासून ते या बिझनेस मध्ये आले आहेत तेव्हापासून त्यांनी हे सर्व सोडून दिलाय (strange ????? एक doctor हे सर्व सोडून बिझनेस करतोय ????) उद्या तुम्ही दोघे सुट्टी घ्या आणि दोघेही फॉर्मल मध्ये या. तुझ्या नवऱ्याला सांग कि clean shaven look आणि polish shoes घालून ये (काय विंचु सदृश राशी असणाऱ्या माझ्या नवऱ्याला मी हे सांगु... घास कोरडा पडलाय हि बाई काय सांगतेय असं कुठे असत काहीतरी सॉलिड झोल आहे..... ) मी म्हटलं अरे त्यांचं नाव काय बोललीस

DR प्रशांत चांदोरकर

आणि मी हे नाव गुगल्याला विचारलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकायला लागली. त्याने Qnet मधले Scams आणि compliant चा पाढा वाचायला त्याने सुरवात केली

MLM Company (multi-level marketing (MLM) किंवा Qunet, GoldQuest, QuestNet,Transview Enterprises India Pvt Ltd,Vihaan Direct selling (India) Pvt Ltd, QI Ltd and QI group अशा अनेक नावाने चालवत आहेत. विजय ईश्वरन आणि जोसेफ बिस्मार्क मिळून हि कंपनी चालवतात. या दोघांनी मिळून Rs425 crore चा QNet scam केलाय.

यांचे individual representative (IR) असतात. कॉफेशॉप आणि बरिस्ता हे त्याचे अड्डे आहेत. हे लोकांनकडून पैसे घेतात आणि दुसऱ्या लोकांना फसवाचं ट्रेनिंग देतात जर तुम्ही जर नाही फसवलत तर तर तुमचे पैसे अक्कल खाती जमा. याची टार्गेट जवळच्या व्यक्तीं आहेत (friends, नातेवाईक )आता पर्यंतच्या जास्त कॉम्प्लेइंट्स हे जवळच्या व्यक्तींनी फसवल्याच्या आहेत. हे दुबईचा टूरच package पण देतात यात, हे टूर package इतर ट्रॅव्हल कंपन्या (दुबई टूर package) देतात त्यापेक्षा जास्त महाग असत.(दुबईला गेल्यावर कळत कि त्यांची ऑफिसेस सेंटर्स असं काहीच नाही आहे. काही काही देशात Qunet यावर बंदी आहे. ) तुम्ही जर लोकांना फसवलं सुरवात केली कि त्यावर तुम्हाला कमिशन मिळत जर तुम्ही २. ५० लाख केले तर तुम्हाला २०,००० कमिशन, १० लाख केले तर ३०,००० कमिशन असे याचे कमिशन रेट्स आहेत.

मी धावत जाऊन नवऱ्याला फोन केला तर तो म्हणाला तू यात पैसे नको गुंतवू. मी पण त्याला तेच बोलली कि मी यात पैसे नाही गुंतवणार तो तुला कस कळलं अरे मी गूगल केलं आणि मी तुला कस कळलं अरे माझ्या मित्राच्या मित्राने ११ लाख गुंतवले ४ महिन्या पूर्वी आणि तो engineer आहे पण त्याला एक रुपया पण परत मिळालेला नाही आणि एक मित्र दुबई ला गेलेला पण तिकडे त्यांचं ऑफिसेस, सेंटर वैगरे काहीच नाही आहे. Mr परेश आपल्या गल्लीत पण राहत नाही.. हे बघ आम्ही एकत्रच आहोत. मी त्याला बोलली मी ठेवते १५ मिनीटांनी फोन करते, तो बोलला तू काय करणार आहेस मी सांगते तुला सध्या मला एकीला फोन करायचा आहे.

मी माझ्या मैत्रिणीला फोन केला "मी तुझ्यावर जास्त विश्वास ठेवला हा सगळा fraud आहे. Mr प्रशांत चांदोरकर पण एक नंबरचा fraud आहे. तुमचा ऑनलाईन काहीही बिझनेस नाही आहे. तुमचा हा बिझनेस लोकांना फसवाचा आहे. तू मला फसवलास तर तुला तुझं कमिशन मिळणार. पण तू तुझ्या मुलीचा विचार कर...
मैत्रिणी : अरे तू असं कस बोलू शकतेस.(तोंडाने... परत भेट मला... ) अरे मला तुझं बोलणं ऐकूच येत नाही आहे. थांब मी तुला फोन करते.

या नंतर तिचा फोन मला अजून पर्यंत आलेला नाही.

मी तिला फोन केला (कारण ती माझी मैत्रीण होती मला यातून तिला बाहेर काढायच होत पण .... ) तिने तो उचला हि पण तिचा हसरा आवाज ऐकून मला तिला जे सांगायच होत ते सांगताच आलं नाही कदाचित तिने घेतलेले पैसे तिला परत कारण अपरिहार्य आहे. जो पर्यंत ती अजून १० जणांना फसवणार नाही तो पर्यंत तिची यातून सुटका नाही आहे. फसवणारी लोक आपलीच असतात आणि फसली जाणारी लोक पण आपलीच असतात.

वाईट इतकाच आहे कि
तुटते हुए ख्याब कभी आवाज नाही करते|
पर ख्याब देखाना कभी बुरा भी नाही है ।

माझ्या एवढ्या उपदव्याप बघून माझा नवऱ्याने मला तू तुझ्या क्षेत्रातला बिझनेस करू शकतेस आणि तू कर.
तू निर्णय घेऊ शकतेस असं म्हणून माझ्या बिझनेससाठी जागा शोधायला सुरवात केलेय…..

समाजजीवनमानअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकप्रतिसादबातमीअनुभवमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

पैसा's picture

12 Dec 2016 - 7:13 pm | पैसा

अशीच जिद्द ठेवून काम करा. नशीब की यातून वाचलात. तुम्हा दोघींच्या कॉमन मैत्रिणी असतील त्यांना याबद्दल नक्की सावध करा. माझी मैत्रीण आहे, तिच्याबद्दल वाईट कसे बोलू म्हणून गप्प राहू नका.

या घोटाळ्यात मायकेल फरेरासकट बर्‍याच जणांना अटक झाल्याच्या बातम्या आहेत.

गवि's picture

12 Dec 2016 - 7:22 pm | गवि

हुश्श..

अबोली२१५'s picture

12 Dec 2016 - 7:26 pm | अबोली२१५

हा हा हा हा आता पर्यंतचा सर्वात छान प्रतिसाद

पिलीयन रायडर's picture

12 Dec 2016 - 7:31 pm | पिलीयन रायडर

अगदी असेच वाटले... नुकसान झाले नाही हे वाचुन बरे वाटले..

तुषार काळभोर's picture

13 Dec 2016 - 5:15 pm | तुषार काळभोर

हुश्श!!

जव्हेरगंज's picture

12 Dec 2016 - 7:24 pm | जव्हेरगंज

finally

कानडाऊ योगेशु's picture

12 Dec 2016 - 7:27 pm | कानडाऊ योगेशु

तुमचे पैसे वाचलेत हे वाचुन आनंद झाला.खरेतर हा फायदाच झालेला आहे.
बाकी क्लायमॅक्स सांगायला तुम्ही फार अधीर झाला होतात असे वाटते आहे विशेषतः हा शेवटचा लेख वाचुन.

सुमीत's picture

12 Dec 2016 - 8:22 pm | सुमीत

अगदी हेच सांगायचे आहे

लालगरूड's picture

12 Dec 2016 - 7:44 pm | लालगरूड

whatsapp वर शेयर करू का? मलापण एक जण मित्र घेऊन गेलता एका चुत्या कडे.आमचं एक प्राॅडक्ट घ्या 14000 आणि नंतर अजून कस्टमर आणा आणि 1000 कमिशन घ्या. matrix. फुल हरभर्याच्या झाडावर चढवतात

सुमीत's picture

12 Dec 2016 - 8:27 pm | सुमीत

दोन महाभाग भरीस पाड्णार होते, पन मूळात असल्या थेयरी वर विश्वास नाही ठेवत ,,, वाचलो

अबोली२१५'s picture

13 Dec 2016 - 1:16 pm | अबोली२१५

हो चालेल

मास्टरमाईन्ड's picture

12 Dec 2016 - 7:45 pm | मास्टरमाईन्ड

तुम्ही वाचलात हे वाचून फार आनंद झाला.

संदीप डांगे's picture

12 Dec 2016 - 7:48 pm | संदीप डांगे

अंत भला तो सब भला. :)

भविष्यातल्या खर्‍याखुर्‍या यशासाठी खर्‍याखुर्‍या शुभेच्छा!

जिन्क्स's picture

12 Dec 2016 - 8:00 pm | जिन्क्स

तू निर्णय घेऊ शकतेस असं म्हणून माझ्या बिझनेससाठी जागा शोधायला सुरवात केलेय…..
कंचा बिझनेस?

निरंजन._.'s picture

12 Dec 2016 - 8:29 pm | निरंजन._.

तुम्ही सहीसलामत सुटलात हे बघून बरं वाटलं!

आणि इथे येऊन आमचं प्रबोधन केल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

तुमची लेखनशैली वेगळ्या धाटणीची आहे.

लिहीत रहा.

सप्तरंगी's picture

12 Dec 2016 - 8:55 pm | सप्तरंगी

जी मैत्रीण फसवायचा विचार करू शकते ती अजूनही मैत्रीण आहे असा विचार मी तरी करू शकत नाही, अश्या फसवणाऱ्या/ गंडवणाऱ्या लोकांशी परत इतके चांगले वागावे हेच मला पटत नाही, अश्या लोकांपासून सावध राहा अबोली. तू या scam मध्ये फसली नाहीस हे हि असे थोडके.

बोका-ए-आझम's picture

12 Dec 2016 - 9:19 pm | बोका-ए-आझम

तुमच्या ' तथाकथित ' मैत्रिणीने तुमचा वापर करुन घ्यायचा प्रयत्न केला आणि जेव्हा तुम्हाला सत्य समजलं तेव्हा थंडपणे संबंध तोडून टाकला. यावरून ती काय लायकीची मैत्रीण होती ते समजतंच. अशा व्यक्तीला मित्र म्हणणं हा मैत्रीसारख्या भावनेचा अपमान आहे.असो. तुम्ही यात फसला नाहीत आणि वेळीच सावध झालात हे फार छान झालं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Dec 2016 - 9:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

पैसे बुडण्याअगोदर खरी गोष्ट समजली हे उत्तम झाले.

एमएलएम मार्केटिंग आणि कमी पैसे-श्रम-वेळात बक्कळ फायदा देणार्‍या कोणत्याही योजनेबद्दल, कितीही आकर्षक वाटली किंवा कितीही विश्वासू माणसातर्फे माहिती मिळाली तरी, सत्य बाहेर येईपर्यंत हजार चौकश्या करा.

नवीन व्यवसायातील यशासाठी अनेकानेक शुभेच्छा !

सुबोध खरे's picture

12 Dec 2016 - 9:37 pm | सुबोध खरे

First law of economics—
Money cant be generated,
It cant be lost.
It just changes hands

खेडूत's picture

12 Dec 2016 - 9:52 pm | खेडूत

छान.
मलम योजनेत फसवणूक टळल्याबद्दल अभिनंदन.
आता आपण इतरांना सावध/ परावृत्त करावे.
हेराफेरी चित्रपटात सही करण्यापूर्वी दरवेळी सुनील शेट्टीला एकट्यालाच, ''गोलमाल है भाई सब गोलमाल है''हे गाणं ऐकू येतं तसं आपल्यालाही यायला हवं!

अनिरुद्ध.वैद्य's picture

13 Dec 2016 - 9:36 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त नाव.

तुमच्यासारखेच इतरही लोक वेळीच शहाणे होवोत हीच सदिच्छा !

अर्धवटराव's picture

13 Dec 2016 - 12:02 am | अर्धवटराव

अभिनंदन :)

१) गुगलबाबाला अगदी पहिल्याच दिवसापासुन याबाबत विचारणा करायला हवी होती
२) सरळ पोलिस कम्प्लेण्ट देऊन या नेटवर्कधारी मंडळींना खास 'दुबई'ची सहल घडवायला हवी होती.

अबोली२१५'s picture

13 Dec 2016 - 12:10 pm | अबोली२१५

मला अगोदर गुगल्या विचारलं होत पण result काही नाही आला, पण मी जस Dr प्रशांत चांदोरकरच नाव टाकलं तस गुगल्या उत्तर द्याल लागला

रुस्तम's picture

13 Dec 2016 - 9:15 am | रुस्तम

मागील भागाच्या लिंका (दुवे) या भागात आणि इतर भागात टाका ना.

मंजूताई's picture

13 Dec 2016 - 9:36 am | मंजूताई

झालं... एकदम हायस वाटलं.... हे मेसेज सगळीकडे पोचवले पाहीजे.. पुढच्याला ठेच मागचा शहाणा..
माझ्या उर्मिला (मदतनीस) ला असंच फसावायचा प्रयत्न केला होता.. वेळीच सावध केले होते..
नो लंच एज फ्री... कष्टाला पर्याय नाही...

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Dec 2016 - 9:38 am | ज्ञानोबाचे पैजार

जे होते ते चांगल्यासाठीच होते. नवा बिझनेस चालू करताना हा अनुभव अतिशय मोलाचा ठरेल यात काही शंका नाही.
मनःपूर्वक शुभेच्छा.
पैजारबुवा,

लेखमालेचे नाव बदलायला हवे असे वाटते.. मी क्यूनेट्मध्ये जाते वगैरे असे काहीतरी.. लेखमालेच्या शीर्षकावरून यामध्ये काही इनसायडर गोष्टी असतील असे वाटले होते, तो भ्रमनिरास झाला.
पण लेखमाला खूपच चांगली. विशेषतः तुम्ही फसण्यापासून वाचलात हे वाचून बरे वाटले.

अभिजीत अवलिया's picture

13 Dec 2016 - 10:40 am | अभिजीत अवलिया

तुमचे पैसे वाचले हे वाचून आनंद झाला.
असाच एक मलम धंधा काही वर्षांपूर्वी आला होता. २००२-०३ साली. जापान लाईफ इंडिया. मी तेव्हा इंजिनीरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो.
आमचा एक तत्कालीन परम मित्र त्यासाठी मला पर्वरी गोवा इथे घेऊन गेला होता. नक्की काय धंधा आहे हे विचारल्यावर असेच गुळमुळं उत्तर. चल गोव्याला, तिकडे आमचे सिनियर तुला समजावतील.
मग गेलो गोव्याला त्याच्याबरोबर तर झकपक सूट, टाय घालून शे दीडशे लोक आले होते. प्रत्येकाची एक स्टोरी होती. अगोदर त्यांचे कसे दिवस होते आणि कसे हा धंधा करून ते श्रीमंत झाले वगैरे. मग अशाच २ सिनियरनी धंधा समजावला. अगोदर एक लाख भरायचे. मग तुम्हाला एक मॅग्नेटिक गादी मिळणार. तिच्यावर झोपले की सर्व रोग बरे होणार इतकी भारी गादी होती ती. मग तुम्ही बकरे शोधायचे आणि त्यांना मेम्बर बनवून अशा गाद्या त्यांच्या गळ्यात मारायच्या. म्हणजे काही वर्षांनी पूर्ण जग रोगमुक्त. काही डॉक्टर वगैरेंची गरज नाही. मज्जाच मजा. पण मला त्यांचा बनाव लक्षात आला होता. बाहेर आल्यावर भयानक झापले मित्राला. त्यानंतर गेल्या १३ वर्षात आमचा काहीही संपर्क नाही.

बबन ताम्बे's picture

13 Dec 2016 - 11:52 am | बबन ताम्बे

त्या गादीवर शांत झोप तरी येत असेल की नाही शंका आहे.
आमच्या ऑफीसमधे पण एक असाच बकरा बनला होता आणि त्याने एक लाख घालवल्यानंतर वसूल करायला ओळखीच्यांना भरीस पाडत होता. शहाम्रूगांच्या पिसांची गादी होती म्हणे :-)

खरोखर भयानक!
पत संस्थेचं २३%-२४% किंवा अशाच विचित्र दरानं कर्ज काढून २-२ गाद्या घेतलेले महाभाग पाहिलेत.

आनन्दा's picture

13 Dec 2016 - 10:52 am | आनन्दा

ही बघा - एक प्रश्नावली जी सगळ्या मलम धंद्यांना लागू पडते.
https://www.quora.com/What-is-the-Business-Model-of-Qnet-1

तुम्ही फसला नाहीत हे वाचून आनंद झाला.

३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट,
माझी एक लांबच्या नात्यात असलेली बहीण माझ्या पुण्यातल्या ऑफिस जवळ राहायची. एक दिवस ती अचानक भेटली. तसे आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटत होतो. नंतर एकदा मी तिच्या घरी गेलो. तिचा नवरा नोकरी सोडून काहीतरी ऑनलाईन बिझीनेस करतो असे मला सांगितले.
काही दिवांनी तिचा फोन आला. तिने तिच्या बिझीनेस मध्ये पार्टनर होशील का असे विचारले आणि मला येत्या शनिवारी CCD ला भेटायला बोलावले. पण बिझीनेस विषयी ती काहीही नीट सांगत नव्हती. CCD मध्ये एक Mr परेश सारखा माणूस भेटला. त्याने माझी मुलाखत घेतली. मी खोदून खोदून त्याला कंपनीविषयी विचारत होतो. पण ऑनलाईन पोर्टल हे सोडून तो काहीही बोलत नव्हता. एकंदरीत त्याचा आवेश हा "आपण लय दुनिया बघितली आणि ह्याहून चांगला कोणताच धंदा नाही" असा होता. मी नवीन बिझीनेस पार्टनर्स शोधायचे असा माझा प्रोफिले असल्याचे सांगितले. नंतर मला २ लाखाचा चेक मागितला. मी स्पष्ट शब्दात नाही सांगितले. Mr परेश ने थोडे समजावयाचा प्रयत्न केला. पण मी बधत नाही हे बघून त्याचा अपमान झाल्याचा आवेश आणून निघून गेला. नंतर बहिणीने भरपूर इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. शेवटी पन्नास हजार तरी दे इथपर्यंत गाडी आली. मी निर्धाराने नाही म्हणून तिथून निघालो. नंतर तिचे फोन येत गेले. मी नाही म्हणायचे कारण तिला हवे होते. मी तिला तीन कारणं दिलीत १. माझ्याजवळ पैसे नाहीत २. माझ्याजवळ वेळ नाही ३. आणि मला इंटरेस्ट तर बिलकुलच नाही. यानंतर तिचा फोन आला नाही.

मी पर्चेसला असल्यामुळे मार्केटिंग वाल्यांना इतक्या सहजासहजी बधत नाही. पण अनेक सामान्य लोक या चक्रात अडकतात.

इरसाल कार्टं's picture

13 Dec 2016 - 11:56 am | इरसाल कार्टं

मीही बऱ्याचदा अडकलोय यात,
मित्र अथवा जवळचा कोणीतरी एकदम हात पाय धुवीन मागे लागतो अन आपल्याला गुढगे टेकावे लागतात.
यांच्या सेमिनारमध्ये हायली मोटिवेश्नल ऐकायला मिळते मात्र.
बऱ्याचदा मी तर अश्या सेमिनारला फक्त तेच ऐकायला जायचो आणि नंतर टांग देत जॉईन होणे टाळायचो.
तरीही किमान ४ ठिकाणी फ़सलोय. काय करणार, हे लोक पिच्छा सोडतच नाहीत.

आता मी एक ठेवणीतलं हत्यार बाहेर काढतो,
"एक काम कर, आता माझ्याकडे पैसे नाहीत तर तू माझे पैसे भर आणि जेव्हा मी या बिझनेस मधून पैसे कमवायला लागेन तेव्हा सगळ्यात आधी तुझे पैसे तू घे. हवे तर १०% जास्त घे."
विशेष म्हणजे हे लोकं पैसे भारतात कधीकधी आपले कारण त्यांनाही वाटत नाही कि त्यांचीही फसवणूक झाली आहे.
माझ्या एक मित्राने तर माझ्या वरील वाक्याला भुलून माझेच नाही तर इतर मित्रांचेही पैसे भरले होते, विचार करा त्याला त्याच्या कंपनीवर किती विश्वास होता.
आता बसलाय बोंबलत, आम्ही फक्त सहानुभूतीने बघतो त्याच्याकडे कारण मला वाटले तो मान्य करणार नाही पैसे भरायला पण त्याने भारमल आमचे पैसे, आमच्या मागे लागून आमची कागद-पत्रे घेऊन गेला नोंदणीसाठी.
असेच दोन मित्र वॉटर प्युरिफायर डायरेक्ट सेल करणारी कंपनीचे एजंट झाले होते, नोकऱ्या सोडून हेच काम पूर्णवेळ निवडले. आता कंपनीने पॉलिसी बदलली अन हे 'तेल हि गेलं अन तूपही...' म्हणत कावरे बावरे झालेत.

किसन शिंदे's picture

13 Dec 2016 - 12:52 pm | किसन शिंदे

झालेला प्रसंग रंगवून सांगण्याची हातोटी छानच! पैसे वाचले हे खूप चांगले झाले.

अबोली२१५'s picture

13 Dec 2016 - 1:45 pm | अबोली२१५

संपादकीय मंडळाने ram ram यांचा प्रतिसाद उडवला आहे का ????

सांरा's picture

13 Dec 2016 - 2:19 pm | सांरा

वाटते प्रत्येकाने कधी ना कधी हा अनुभव घेतला आहेच.. मलाही ebiz, mi lifestyle, technobiz यांचे IR भेटले आहेत. इकडे आमच्या हातातून १०० सुटत नाहीत तर लाखाची काय कथा. बाकी आम्ही मित्रांनी mi मध्ये i का? y का नाही? यावरच २ तास मस्त टाइमपास करून घेतला होता. कधीही या IR ना भेटायला मित्रांसोबत जावे, जाम मजा येते.
बाकी अबोली ताई तुमचा फक्त पैसाच नाही, तर वेळ आणि मनस्ताप जो तुम्हाला भोगावा लागला असता तो सुद्धा वाचला आहे.
रच्याकने,
Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी १
Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २
Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ३
Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४
Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५

बापू नारू's picture

13 Dec 2016 - 3:18 pm | बापू नारू

हॉलिडे इन वाले पण असाच भिकार धंदा करतात ,त्यांच्यापासून पण सावध रहा

पाटीलभाऊ's picture

13 Dec 2016 - 5:47 pm | पाटीलभाऊ

नशीब बलवत्तर...कि तुम्ही सहीसलामत बचावलात या फसवणुकीतून...!

सिरुसेरि's picture

13 Dec 2016 - 7:11 pm | सिरुसेरि

"आ बैल मुझे मार " अशी स्थिती झाली नाही हे सुदैवच ..

अमर विश्वास's picture

13 Dec 2016 - 7:14 pm | अमर विश्वास

MLM पासून दूर राहावे हेच खरे...

या MLM मुळे मी पैसे जरी गमावले नसले तरी काही मित्र जरूर गमावले आहेत ...

संदीप डांगे's picture

13 Dec 2016 - 8:05 pm | संदीप डांगे

"प्रत्येक माणसाचे काही ड्रीम असतात" ह्या वाक्याने सुरु होणारे संभाषण सुरु झाले की मी आटोमॅटिकली डिफेन्स मोड मध्ये जातो. मलमकलाकारांचे आवडते वाक्य आहे.

मास्टरमाईन्ड's picture

13 Dec 2016 - 8:36 pm | मास्टरमाईन्ड

बरोब्बर !
मी पण

अनिरुद्ध.वैद्य's picture

13 Dec 2016 - 9:29 pm | अनिरुद्ध.वैद्य

मुळात, काही कष्ट न करता, आपोआप तुम्ही कसे मालामाल व्हाल, असे सांगुन गुंतवणुक करा असं कोणी म्ह्ण्टलं की मी आपलं नाही म्हणुन टाकतो.

नको बाबा. तुच हो स्रीमंत!

श्रीगुरुजी's picture

13 Dec 2016 - 8:34 pm | श्रीगुरुजी

२००१ मध्ये Symbionic Marketing या नावाच्या कंपनीने मला व माझ्या अर्धांगिनीला फसवायचा अगदी असाच प्रयत्न केला होता. माझ्या आयटी कंपनीतील एका मुलीने स्वतःहून मला अ‍ॅप्रोच करून या कंपनीचे नाव न सांगता एक नवीन संधी आहे असे सांगून मला एका सेमिनारला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. आम्हाला न्यायला पोचवायला कार पाठवू असे देखील सांगितले. प्रत्यक्षात त्या सेमिनारमध्ये प्रत्येकाने ५०००० ते १ लाख रूपयाचे काहीतरी फालतू प्राड्क्टस घ्यायचे व ३ नवीन मेंबर आणल्यास तुम्हाला कमिशन मिळायला सुरूवात होईल असे सांगितले गेले. आपण या प्रकारामुळे कसे लक्षाधीश झालो असे सुमारे ३०-४० जणांनी पुढे येऊन सांगितले. कंपनीच्या संयोजकांच्या भाषणाला प्रेक्षकातील काही जण ठराविक वेळी ठरवून टाळ्या वाजवून "वॉव", "ग्रेट", "अमेझिंग" असे प्रोत्साहनपर उद्गार काढत होते. हा सर्व प्रकार हा मॅनेज्ड प्रकार असून स्वतः खड्ड्यात पडलेले लांडगे खड्ड्याच्या बाहेर येण्यासाठी बकरे शोधत आहेत हे लगेच लक्षात आले.

हा सर्व मूर्खपणा संपल्यावर माझ्या सहकारी मुलीने मी किती पैसे गुंतविणार हे विचारल्यावर मी ठाम नकार दिला. मला कन्व्हिन्स करायचा तिने बराच प्रयत्न केला. परंतु मी बधत नाही हे बघून काही वेळाने तिचा बॉस (ज्याने तिला खड्ड्यात ढकलून तिच्या पाठीवर चढून तो खड्ड्याबाहेर आला होता) आमच्याकडे येऊन आम्हाला या स्किमचे महत्त्व सांगायला लागला. एकही रूपया न गुंतविण्याच्या आमच्या निर्धारामुळे काही वेळाने "तुम्ही भ्याड आहात. धाडस करण्याची तुमची तयारी नाही. तुमच्या बायकोला इंटरेस्ट आहे, पण तुम्ही तुमचा निर्णय तिच्यावर लादत आहात." असे काहीबाही सांगून डिवचायचा प्रयत्न केला. परंतु आम्ही त्याच्या युक्त्यांना अजिबात बळी न पडता तिथून निघून आलो व मोठे नुकसान टाळले.

अ‍ॅमवेच्या गळ्यात पडणार्‍या लोचट प्रतिनिधींनाही मी असेच दोन वेळा वाटेला लावले होते. अमेरिकेत असताना एक अ‍ॅमवेचा प्रतिनिधी संध्याकाळी ६ च्या सुमाराला घरी येऊन तब्बल ३ तास चिवटपणे ठाण मांडून बसला होता व माझ्या गळ्यात स्किम मारायचा प्रयत्न करीत होता. परंतु चिवटपणाच्या बाबतीत मी त्याचा बाप निघालो आणि त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरविले.

आनंदयात्री's picture

14 Dec 2016 - 12:04 am | आनंदयात्री

परमेश्वराने लोचट अ‍ॅमवे प्रतिनिधींसाठी नरकात स्पेशल छळछावणी बांधावी अशीच मागणी या निमित्ताने मांडतो.

सुबोध खरे's picture

14 Dec 2016 - 9:50 am | सुबोध खरे

या ऍमवे ने तर माझा फार वेळ खाल्ला आहे.
एक अत्यंत प्रथितयश आणि बड्या कंपनीतील इंजिनियर मित्र आणि एक प्रथितयश रेडिओलॉजिस्ट डॉक्टर ( हे दोघे या लफड्यात का पडले तेच कळले नाही) यांनी प्रत्येकी तीन तीन तास खाल्ले आहेत. माझा मूळ धोशा मला हे करायचेच नाही असा असला तरीही केवळ गेट आउट म्हणून शकलो नाही म्हणून ६ तास फुकट गेले आहेत. ऍमवे चे एकही उत्पादन आजता गायत मी विकत घेतलेले नाही. हा भाग वेगळा.

इतर म.ल.म बद्दल माहित नाहि, पण एम्वे ने अनेकांना मालामाल करुन दिलं आहे. एम्वेची काहि प्रॉडक्ट्स खरच चांगली आहेत.
म.ल.म. हा निव्वळ धोकेबाजीचा धंदा आहे हे साफ चुक आहे. त्या बिझनेस मॉडेलमधे बर्‍याच अंशी तथ्य आहे. पण जसं क्रोसीन देऊन पोराचा ताप उतरवला कि बापाला आपण डॉक्टर झाल्याचा भास होतो, चार दिवस योगाभ्यास करुन अनेकांच्या कुंअलिनी वगैरे जागृत व्हायला लागतात, त्याचप्रमाणे धंदा ज्यांच्या गुणसुत्रातच नाहि अशा लोकांना आपण एकदम टाटा-बिर्ला झाल्याचा भास होतो व पुढे त्याची वाट लागते. ज्यांना धंदा कळतो ते गरज->मागणी-पुरवठा अशी चेन शोधतात व आपला नफा कमावतात. म.ल.म सुद्धा याच तत्वाने चालतो, फक्त त्यात लिंक्स थोड्या वेगळ्या पद्धतीने लागतात. ज्यांना त्या लावता येत नाहि, व तसं करणं आपल्याला जमणार नाहि हे कळतं ते या धंद्यापासुन दूर राहातात, आणि तेच योग्य आहे.

आदूबाळ's picture

14 Dec 2016 - 11:32 am | आदूबाळ

ज्यांना धंदा कळतो ते गरज->मागणी-पुरवठा अशी चेन शोधतात व आपला नफा कमावतात. म.ल.म सुद्धा याच तत्वाने चालतो, फक्त त्यात लिंक्स थोड्या वेगळ्या पद्धतीने लागतात.

याच्याबद्दल जरा विस्ताराने लिहिता का?

मलमचा मुख्य यूएस्पी असा आहे की एकदा तुम्ही एका माणसाला जोडलंत, की तुम्हाला पैसे मिळतील. तसंच, त्या माणसाने जोडलेल्या माणसांमागेही पैसे मिळत राहतील. त्या माणसाच्या माणसांनी जोडलेल्या, ... ∞

"तू मला पैसे मिळवून दिलेस याबद्दल ही घे बक्षिसी / फाईंडर्स फी / कमिशन / एजन्सी फी" हे जगातल्या प्रत्येक बिझिनेस मॉडेलमध्ये घडतं. आणि ते योग्य आहे, कारण एजंटने केलेले श्रम आणि त्याला मिळालेले पैसे यात थेट नातं असतं.

पण मलम वगळता अन्य कोणतंही बिझनेस मॉडेल "डेरिव्हेटेव्ह कमिशन" देत नाही. वरील उदाहरणात त्या एजंटच्या सब-एजंटच्या सब-एजंटच्या कमिशनमधला कोणताही भाग एजंटला मिळत नाही, कारण ते 'थेट नातं' नाही.

जगात कोणतेही पैसे काम केल्याबद्दल (परफॉर्मिंग फंक्शन्स), भांडवल गुंतवल्याबद्दल (डिप्लॉयिंग अ‍ॅसेट्स) आणि/किंवा जोखीम घेतल्याबद्दल (बेअरिंग रिस्कस) मिळतात. मलमच्या डेरिव्हेटिव्ह कमिशन मॉडेलमध्ये हे घडताना दिसत नाही.

या मॉडेलमधल्या टेक्नीकल टर्म्स मला माहित नाहि. पण ढोबळमानाने प्रकरण असं आहे कि यातला प्रत्येक दुकानदार स्वतः त्या प्रॉडक्टचा उपभोक्ता आहे. तो स्वतः वापरलेल्या प्रॉडक्टची जाहिरात करतोय व त्याचे पैसे कमवतोय. आपण एखाद्या गायकाची सीडी विकत घेतली, आपल्याला ति आवडली, आणि आपण तिची मौथ पब्लिसिटी केली. एक थ्रेड सुरु झाला. तुम्ही १० लोकांना सांगितलं, त्यांनी प्रत्येकी दहा लोकांना.. असं करत करत थेरोटीकली रिपल इफेक्ट सारखं आपण त्या सिडीचा खप वाढवतो आहे. म.ल.म. म्हणतय कि तुम्हाला या वाढीव विक्रीचा फायदा व्हायला हवा. तुमच्या पासुन सुरु झालेल्या थ्रेडच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जी विक्री होईल त्याच्या फायद्यात तुम्ही भागीदार असायला हवं... आणि धंद्याच्या दृष्टीने हे लॉजीकल आहे. प्रॉडक्ट जर खरच चांगलं असेल, आणि कॉस्टवर्दी असेल तर या मॉडेलमधे यश नक्की मिळु शकतं. आपण बरेचदा हे करत असतो. आपला मेकॅनीक, सुतार, मिठाईवाला, दिवाळीचे फटाकेवाल... हि मंडळी जर आपण त्यांना डायरेक्ट-इंडायरेक्ट ग्राहक मिळवुन दिले तर आपल्याला काहि फ्री सर्वीस वगैरे देत असतात. तसलाच प्रकार म.ल.म.चा आहे.

मी स्वतः मात्र या फंदात अजीबात पडलो नाहि कधी :)

बायोडिस्क, मॅग्नेटीक गादी - हे काय प्रॉडक्ट आहे? आणि किंमत ? अव्वाच्या सवा. अ‍ॅम्वे ची प्रॉडक्ट- कायच्या काही महाग, हॉलीडे पॅकेज - काहीच्या काही महाग आणि त्यांच्या टर्म्स आणि कंडीशन वर.
सीडी चे उदाहरण योग्य आहे कारण ती जर चांगल्या गायकाची असेल तर निश्चित लोक विकत घेतात.

धंदे रिपल इफेक्टवर नाय चालत हो!

म.ल.म. म्हणतय कि तुम्हाला या वाढीव विक्रीचा फायदा व्हायला हवा. तुमच्या पासुन सुरु झालेल्या थ्रेडच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जी विक्री होईल त्याच्या फायद्यात तुम्ही भागीदार असायला हवं... आणि धंद्याच्या दृष्टीने हे लॉजीकल आहे.

छे! उलट लॉजिकल नाही.

तुम्ही इथे ग्राहकाच्या दृष्टीने एकांगी विचार करताय. ग्राहकाच्या दृष्टीने फायद्याच्या असणार्‍या (आणि म्हणूनच ग्राहकाला लॉजिकल वाटणार्‍या) गोष्टीच्या भडिमाराने मलम कंपनी तुम्हाला मलम लावत आहे.

असं बघा - ग्राहकाला जे काही घडावंसं वाटतंय ती 'इन्फर्मेशन असिमेट्री' आहे. ग्राहकापासून सुरू झालेली थ्रेड किती लांब गेली आहे हे तपासण्याचं कोणताही मेकॅनिझम ग्राहकापाशी उपलब्ध नाही. सदर ग्राहक रजनीकांत आहे असं धरलं तरी पैशाचा ओघ ग्राहकाचेग्राहक --> मलम कंपनी --> ग्राहक असा असणार आहे. त्यातलं मलम कंपनी --> ग्राहक हे ऑब्लिगेशन मलम कंपनी पूर्ण करेल याची कोणतीही शाश्वती नाही. लीगल कॉण्ट्रॅक्ट नाही. (कॉण्ट्रॅक्ट केलं तरी ते वैध - एन्फोर्सेबल - असेल का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. पण तो विषय वेगळा.)

म्हणजे थोडक्यात - प्रस्तुत ग्राहक सर्वस्वी मलम कंपनीच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून या धंद्यात उतरला आहे. धंद्यात कोणाच्याही चांगुलपणावर विश्वास ठेवून आपल्याकडचं भांडवल जोखमीला टाकणे म्हणजे *पणा आहे. "मी चांगला आहे - म्हणून माझ्याशी धंदा कर" असं म्हणणार्‍या माणसापासून मी एकशेवीसने पळून जातो.

आपला मेकॅनीक, सुतार, मिठाईवाला, दिवाळीचे फटाकेवाल... हि मंडळी जर आपण त्यांना डायरेक्ट-इंडायरेक्ट ग्राहक मिळवुन दिले तर आपल्याला काहि फ्री सर्वीस वगैरे देत असतात. तसलाच प्रकार म.ल.म.चा आहे.

यामध्ये आणि मलममध्ये एक महत्त्वाचा फरक आहे.

इथे सगळे 'व्यक्तिगत सेवा'** विकतात. म्हणजे ते जे काही विकतायत त्याचा उगम त्यांच्या स्वतःमध्ये आहे. एका अर्थी त्यांचं स्वतःचं आणि त्यांच्या व्यवसायाचं अद्वैत आहे. मेकॅनिकने गाडी बिघडवली, सुताराचं टेबल मोडलं, मिठाईने फूड पॉयझनिंग झालं, फटाके फुसके निघाले तर या सर्व 'वाल्यां'ची वैयक्तिक इज्जत निघणार आहे, वैयक्तिक पत जाणार आहे. म्हणजे हे वाले "रेप्युटेशनल रिस्क" घेतायत.

मलम कंपनीला ग्राहकाच्या वैयक्तिक रेप्युटेशनशी काहीही देणंघेणं नसतं. त्यामुळेच वरती अनेकांनी "माझ्या जवळच्या मैत्राने मला मलम विकून *हॉर्स स्टिकिंग* करायचा प्रयत्न केला" वगैरे प्रतिसाद दिले आहेत. त्यात लोकांना 'मलम कंपनी हरामखोर आहे' यापेक्षा 'मित्राने असं केलं' याची हळहळ जास्त वाटते आहे. मित्राचं (आयई मलम-ग्राहकाचं) रेप्युटेशन इथे गेलेलं आहे.

__________
**मिठाईवाल्याच्या बाबतीत स्वतः बनवलेलं प्रॉडक्ट

खेडूत's picture

14 Dec 2016 - 2:18 pm | खेडूत

+१
अगदी सहमत.
हा प्रकार सुरू झाला त्यावेळी गादी आणि पीअरलेस नामक फायनान्स कंपनी हे करत असे.. तेंव्हा इंटरनेटचा प्रसार नसल्याने विश्वासराव हेच माध्यम होते. पण नेट आल्यावरही असे प्रकार आणि लोकांचा लोभ - फसणे सुरूच राहिले.

एक जबरी चोर कंपनी होती, ते बँडविडथ विकत.एक वर्षाचे डोमेन नेम रजिस्ट्रेशन आणि थोडी जागा, असे ३६००रु घेत.
अर्थातच मलमाचे दोन लेप झाले की पुढे बंद पडे, मग ही मंडळी सांगत- तुमची नेटवर्कची डावी-उजवी बाजू समसमान चालली पाहिजे ( जे कुणाच्या अज्ज्यालाही जमत नसे!) चारेक वर्षे चालवून सगळे बंद पडले. गेल्या वर्षी 'पर्ल' पण बुडाले- पैसे देणारे बंगालच्या शेतात लावलेली आपली सागवानाची झाडे स्वप्नात पहात निजून राहिली आणि भामटे गेले पळून.
पण म्हणून उद्या नव्या पॅकिंगमधे मलम येणारच अनही असे नाही!

संदीप डांगे's picture

14 Dec 2016 - 2:22 pm | संदीप डांगे

चांगलं समजावलंय, +१००००

एक दृष्टीकोनः
मलम योजना चांगले उत्पादन, योग्य भाव असेल तर सुरुवातीच्या लोकांना फायदा देते. नंतर कितीही ताणली तरी तळाच्या लोकांनाच पुढे पसरायला वाव राहत नाही. इन अ परफेक्ट वर्ल्ड जरी आपण विचार केला की सर्व लोक नीतीमान, प्रामाणिक आहेत तरी ग्राहकाची गरज व मागणी यावरच धंदा चालतो, व्यक्तिगत जोडण्यांवर नव्हे. पुश करण्याची एक लिमिट असते.

दुसरा दृष्टीकोनः
कोलगेट टूथपेस्ट आणि अ‍ॅम्वे टूथपेस्ट दोन्हीचे उत्पादन जरी एक असले तरी ग्राहकांपर्यंत पोचण्याची पद्धत वेगळी आहे. दोन्ही मध्ये ग्राहक कसल्यातरी प्रोपगंडाला भुलून टूथपेस्ट विकत घेतात, अ‍ॅम्वेवाले 'कोलगेटला एकट्याला मिळणारा फायदा चेनमधल्या लोकांना वाटून दिल्या जातो' असे सांगतात. लॉजिक बरोबर वाटते, पण ते चेनमधल्या प्रत्येकाने ते प्रॉडक्ट सतत आहे त्या किमतीला घेत राहिले तरच. अनेक लोक इथेच फसतात. ती चेन पुढे कुठवर जाईन याची जबाबदारी शेवटच्या बकर्‍यावर असते. हा खरंतर स्वतःचाच रिटेल धंदा करण्यासारखे आहे. पण शेवटी हमखास फसणारा.

अ‍ॅम्वेच्या एका मिटींगला उपस्थित राह्यलोय(१९९८). तेव्हा अर्धवट ऐकून जास्त खोलात न शिरता अनेकांनी साडेपाच हजार रुपये भरुन किट घेतलेले आधीच. बिजनेस मॉडेल एक्स्प्लेन करण्याच्या मीटींगला सगळ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. वरच्या माणसाला सर्वांची उत्तरे देता देता नाकीनऊ आलेले. एकाने तर माझ्या वडिलांचे व इतर पाच जणांचे पैसे स्वतः भरलेले, त्याला जाम टेन्शन आले होते. साहजिकच अ‍ॅम्वेच्या त्या मिटींगमधून पुढे कोणीच गेले नाही. सगळ्यांनी किटमधले प्रॉडक्ट वापरुन घेतले, दिल्लीला मिटींगला जाऊन आले त्यावर समाधान मानून रामराम ठोकला.

अगदी वरच्या लेव्हलला जरी सुरुवात करायला मिळाली तरी कोणीही समजूतदार माणसांनी यात पडू नये. लाखो रुपये कमावले तरी खालच्या हजारो अपयशी माणसांची बेक्कार हाय लागते.

बबन ताम्बे's picture

14 Dec 2016 - 3:03 pm | बबन ताम्बे

अगदी वरच्या लेव्हलला जरी सुरुवात करायला मिळाली तरी कोणीही समजूतदार माणसांनी यात पडू नये. लाखो रुपये कमावले तरी खालच्या हजारो अपयशी माणसांची बेक्कार हाय लागते.

९४-९५ साली मनी ग्रोअर स्कीम्ने असाच धूमाकूळ घातला होता. प्रॉडक्ट काहीच नव्ह्ते. दोन हजार भरायचे आणि नंतर चार मेंबर गोळा करायचे. जे लोक अधिकारावर होते (सरकारी अधीकारी, मुख्याध्यापक , प्रिंसिपॉल, खासगी कंपन्यांतील अधिकारी वगैरे... त्यांनी आपल्या हाताखालील आणि ओळखीच्या लोकांना असेच भुलवले आणि स्वतः मालामाल झाले.ज्यांना चार मेंबर गोळा करता आले नाहीत - जे साखळीत शेवटी होते, ते झोपले दोन हजारांना.

अर्धवटराव's picture

14 Dec 2016 - 10:31 pm | अर्धवटराव

मी पहिलेच सांगितलं कि हा व्यवहार विशिष्ट प्रकारे केला तरच फायद्याचा असतो. आपण स्वतः प्रॉडक्टची क्वालिटी, किंमत, विक्री धाग्याची ट्रेसेबिलिटी, व इतर बाबींची प्रामाणीकपणे कन्व्हीन्स असु तरच हा धंदा करता येतो. सर्वसाधारण माणसाला वाटतं कि आपण एक विशिष्ट रक्कम गुंतवली, थोडी पोपटपंची केली (किंवा काहि लोकांना सेमिनार अटेण्ड करायला लावलं) कि आपोआप पैसा मिळतो. असच काहितरी आय.टी. धंद्यात टेस्टींग नामक व्यवसायाबाबत होतं. लोकांना वाटतं कि एक कोर्स केला, काहि जुजबी टुल्स वापरायला शिकलं कि आपोआप डॉलरकी बारीश होती है. हि बेसीक चुक आहे. प्रत्येक धंद्याचं स्वतःचं म्हणुन गणित असतं. ते कळल्याशिवाय, व समीकरणं वापरायची तयारी असल्याशिवाय चक्रव्युव्हात उतरुच नये. मी स्वतः जरी हे धंदे केले नाहि तरी एम्वे मलमने अनेकांना पैसा मिळवुन देताना बघितलं आहे. असो.

सुबोध खरे's picture

14 Dec 2016 - 12:32 pm | सुबोध खरे

हे दोघे या लफड्यात का पडले तेच कळले नाही
अहो ते दोघे आपल्या व्यवसायात व्यवस्थित स्थिर असून भरपूर पैसे मिळवत आहेत आणि त्यांची उत्तरोत्तर भरभरातच होणार आहे हे उघड दिसत आहे. असे असताना उगाच लोकांकडे जाऊन त्यांचे डोके खाऊन शत्रू बनवण्यात काय हशील आहे?

अनिरुद्ध.वैद्य's picture

13 Dec 2016 - 9:27 pm | अनिरुद्ध.वैद्य

आपले पैसे अन मनस्ताप वाचल्याबद्दल!

ऐन वेळी तुम्हाला झालेल्या साक्षात्कारासाठी आणि या फसवणुकीतून सही सलामत सुटका झाल्याबद्दल अभिनंदन!!!

डिस्कोपोन्या's picture

14 Dec 2016 - 12:17 pm | डिस्कोपोन्या

AmWay....हे सुद्धा अशाच फसवणुकीचे सोफिस्टीकेतेड वर्जन ....

वन्दना सपकाल's picture

29 Dec 2016 - 1:26 pm | वन्दना सपकाल

सहीसलामत वाचल्याबद्दल तुमच अभिनंदन।