दोन वेडे !

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
16 Nov 2015 - 11:43 pm

रात्र झाली होती.
विसपुते मेन्शन सुद्धा निद्रादेवीच्या आधीन झाला होता.
मात्र एका रूम मधील लाइट अजूनही चालू होती.
"मार्क झोपा आता" अल्डेर म्हणाला.
"अल्डेर १३ वर्षे झाली आता, नाही झोप येत."
"येत नसेल तरीही झोप, कारण विसपुते मेन्शन जागा राहणं जगाला परवडणार नाही."
"विसपूते मेन्शन जागा राहणं जगाला चालेल पण मार्क विसपूते नाही."
"मार्क विसपुतेने जग जिंकलं पण स्वत:ला नाही, अल्डेर."
मार्कचा आवाज कंप पावत होता.
"मला एका व्यक्तीने सांगितलं होतं, जग जिंकणं सोपं असतं, पण "स्वतःला जिंकणं अवघड असतं."
कोण ? सिकंदर ?"
"नाही, सर आर.एम. विसपुते."
अल्डेर बाहेर गेला.
जगातल्या सर्वात मोठ्या घराचा मालक गेल्या १३ वर्षांपासून झोपला नव्हता !
जगातल्या सर्व सुखसोयीनी युक्त त्याचा रूम, तरीही त्याला या
सुखसोयी झोपू देत नव्हत्या !
विसपूते बाल्कनीत उभा होता.
आणि त्या बाल्कनीसमोर दूरवर एक अजून लाइट चालू होता.
बहुतेक हाच लाईट त्याचा जीवनात प्रकाश आणणार होता !

---------

१३ वर्षांपूर्वी!
"केमिकल लॉझ तयार आहे." टॉम म्हणाला.
"चल टेस्ट करु."
अतिशय लक्षपूर्वक केमिकल लॉझ त्यांनी परीक्षानळी मधे घेतला!
"टॉम जर हा प्रयोग यशस्वीपणे पार पडला तर युद्धच बदलुन जाईल." मार्क अतिशय उत्साहात होता.
समोरच एक डेडबॉडी पडलेली होती!
केमिकल लॉझ चा एकच थेम्ब!
त्या बॉडीचा मागमुसही उरला नाही!

'आताच आलेल्या बातमीनुसार अमेरिका वल्टेट च्या युध्दात जिंकली आहे.'
गेली सहा वर्षे ज्या युध्दात अमेरिकन सैन्याने सतत हार खाल्ली ते युद्धच आज तीन तासात संपले!
कारण एकच केमिकल लॉझ!

मार्क विसपूते आणि टॉम बिजी यांनी केमिकल हिस्टरी च्या इतिहासात कल्लोळ माजवला होता!
वेपन्स मेकर्स थक्क होऊन पहात होते!
पारंपारिक शस्त्रे कुचकामी ठरली होती!
आणि केमिकल युद्ध सुरू झाले होते!

टॉम बिजी यांची हत्या!
जगभरात हीच बातमी वार्यावर पसरली. ज्याच्या शोधांने लाखो जीव घेतले तो टॉम बिजी मेला होता. कुठे लोक आनंदाने वेडे झाले तर कुठे दु :खाने!
मार्क अजूनही शॉक्ड होता.
कारण टॉम बिजिला मारणारा एक १८ वर्षांचा मुलगा होता!
"माझा परिवार याने मारला," तो मार्ककड़े बोट दाखवत होता!
४२ लाख जीव घेणारा हाच!
त्याची ती नजर मार्क सहन करु शकला नाही!

४२ लाख!
४२ लाख!
४२ लाख!

जेव्हा तो झोपण्याचा प्रयत्न करे, तेव्हा ४२ लाख लोकांपैकी कोणीतरी त्याच्या डोळ्यासमोर येत असे !
केमिकल लॉझ ने त्याला जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनवले !
पण त्याची झोप कायमची हिरावून घेतली !

'केमिकल लॉझ - ड्रॉप ऑफ डेड!'
हेच नाव त्यांनी दिले होते त्याला.

(क्रमशः )

नाट्यकथामुक्तकसाहित्यिकमौजमजाप्रकटनविचारआस्वादलेखप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

17 Nov 2015 - 4:07 pm | महासंग्राम

हुस्श्श्श…. एका दमात वाचली, चुकून पोस्टली का ????

DEADPOOL's picture

17 Nov 2015 - 7:06 pm | DEADPOOL

नाही हो, पहिल्यांदा मराठी लिहितोय.
२ रा भाग जरा मोठा टाकलंय.

थोडा मोठा भाग टाकायला हवा असे वाटले. बाकी रोचक सुरुवात आहे. पुभाप्र.

DEADPOOL's picture

17 Nov 2015 - 7:25 pm | DEADPOOL

पुढचा भाग जरा मोठा टाकलाय

जव्हेरगंज's picture

17 Nov 2015 - 8:20 pm | जव्हेरगंज

अनुवाद वगैरे आहे काय?
तसं काय असल्यास लिवा की.
प्रेरणा वगैरे!!

(कथा अजुन फुलवायला चान्स आहे)
बाकी मस्त!!

नाही हो स्वतः लिहिली

DEADPOOL's picture

18 Nov 2015 - 8:27 am | DEADPOOL