माझ्या घरचा बाप्पा!

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
31 Aug 2014 - 10:08 am

नमस्कार मंडळी!

घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार!

गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत. आपापल्या घरच्या सजावटीची छायाचित्रे इथे सादर करा, आणि इतरांची छायाचित्रे पाहून आनंद मिळवा!

गणपती बाप्पा मोरया!

------------

वावरसंस्कृतीकलासमाजजीवनमानराहणीछायाचित्रणशुभेच्छाअभिनंदनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

अनन्न्या's picture

31 Aug 2014 - 12:55 pm | अनन्न्या

bappa

अनन्न्या's picture

31 Aug 2014 - 1:05 pm | अनन्न्या

ही सजावट करण्यासाठी आमच्या दुकानातील जाहिरातीच्या जुन्या बोर्डची मेटल फ्रेम सायल्यानी सजवलीय!
bappa

भिंगरी's picture

31 Aug 2014 - 1:07 pm | भिंगरी

अतिशय सुन्दर मुर्ति!

भिंगरी's picture

31 Aug 2014 - 1:08 pm | भिंगरी

मी पहिली की काय?

अनन्न्या's picture

31 Aug 2014 - 8:39 pm | अनन्न्या

*yahoo*

भिंगरी's picture

31 Aug 2014 - 8:59 pm | भिंगरी

सॉरी.

अनन्न्या's picture

1 Sep 2014 - 5:51 pm | अनन्न्या

सॉरी काय?

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Aug 2014 - 2:06 pm | माम्लेदारचा पन्खा

गणपती बाप्पा मोरया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2014 - 9:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मामलेदार आवडले हो बाप्पा आपले !

-दिलीप बिरुटे

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Aug 2014 - 10:53 pm | माम्लेदारचा पन्खा

आभारी आहे

गणपती आणि आरास दोन्ही छान..

सर्वसाक्षी's picture

31 Aug 2014 - 5:27 pm | सर्वसाक्षी

Bappa

पैसा's picture

31 Aug 2014 - 5:53 pm | पैसा

अगदी प्रसन्न मुद्रा आहे!

सुहास झेले's picture

31 Aug 2014 - 5:47 pm | सुहास झेले

हा आमचा मयुरेश.... सजावटीसाठी फक्त हिरवे गवत वापरले होते आणि त्यावर चौरंगावर मूर्ती :)

.
.

पैसा's picture

31 Aug 2014 - 5:51 pm | पैसा

त्या गवताच्या सजावटीचा फोटो असला तर दे की रे!

सुहास झेले's picture

31 Aug 2014 - 6:02 pm | सुहास झेले

:)

.

पैसा's picture

31 Aug 2014 - 6:41 pm | पैसा

साधे आणि सुंदर!

अजया's picture

31 Aug 2014 - 7:28 pm | अजया

हा आमचा बाप्पा!
.
.

पैसा's picture

31 Aug 2014 - 9:18 pm | पैसा

अनन्या, अजया, माम्लेदारचा पंखा, मस्त वाटले फोटो पाहून.

@ माम्लेदारचा पंखा, मूर्तीचा रंग असा आहे की लाईटिंग केले आहे?

जोशी 'ले''s picture

31 Aug 2014 - 9:40 pm | जोशी 'ले'

हा माझा या वेळचा बाप्पा.. :-)
बाप्पा
बाप्पा1
2

सुहास झेले's picture

31 Aug 2014 - 10:24 pm | सुहास झेले

व्वा मस्त सजावट :)

सानिकास्वप्निल's picture

31 Aug 2014 - 9:59 pm | सानिकास्वप्निल

सगळ्यांचे बाप्पा मस्तं आहेत +++१११११

खूप सुरेख __/\__

खटपट्या's picture

31 Aug 2014 - 10:00 pm | खटपट्या

सर्व बाप्पा अतिशय मनमोहक !!!

आयुर्हित's picture

1 Sep 2014 - 12:38 am | आयुर्हित

||गणपती बाप्पा मोरया||

रेवती's picture

1 Sep 2014 - 1:38 am | रेवती

मस्त फोटू!

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Sep 2014 - 9:40 am | ज्ञानोबाचे पैजार

गणपती बप्पा मोरया
मस्त सजावट केलेले बप्पा पाहुन मन प्रसन्न झाले.
मागा वत्सांनो मागा काय आशिर्वाद देउ तुम्हाला?
पैजारबुवा,

प्रसाद प्रसाद's picture

1 Sep 2014 - 11:35 am | प्रसाद प्रसाद

1

2

अभिरुप's picture

1 Sep 2014 - 4:40 pm | अभिरुप

Bappa

हे गणपतीच्या अंगावर धागेदोरे कसले आहेत? म्हणजे हा काही वेगळा विधी वैगरे आहे का?

बाकी सगळ्याच गणेशमुर्ती व सजावट सुंदरच आहेत.

सुहास झेले's picture

2 Sep 2014 - 2:12 pm | सुहास झेले

मला वाटतं सजावटीसाठी लावलेल्या लाईट्सच्या केबल आहेत त्या...

ओह...अच्छा. आत्ता निरखून पाहील्यावर लक्षात आलं.

धन्यवाद.

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Sep 2014 - 8:19 pm | माम्लेदारचा पन्खा

गणपतीच्या अंगावर सजावट करणे शक्यतो टाळावे बाकी तुमची इच्छा

दिपक.कुवेत's picture

1 Sep 2014 - 5:00 pm | दिपक.कुवेत

सगळ्यांचे सगळे बाप्पा आणि त्यासाठि केलेली सजावट आवडुन गेली.

मूर्ती पाहून प्रसन्न वाटतेय.

पियुशा's picture

3 Sep 2014 - 12:46 pm | पियुशा

सगळॅ बाप्पा अगदी गोड आहेत :)

लव उ's picture

4 Sep 2014 - 12:35 pm | लव उ

माझ्या सासरच्या गौरी गणपती

g1

गणपती

g2

गौरी

g3

आणि माझ्या माहेरच्या गौरी गणपती

g4

गणपती

g5

गौरी

g6

तुमच्या सासरच्या गौरीच्या चेहर्‍यावरचे भाव आश्वासक आणि माहेरच्या गौरीचे करारी आहेत. :)

पैसा's picture

4 Sep 2014 - 9:40 pm | पैसा

त्यांच्या वयातही फरक दिसतो आहे ना! सासरच्या तरूण आहेत तर माहेरच्या जरा प्रौढ.

लव उ's picture

5 Sep 2014 - 11:08 am | लव उ

माहेरच्या गौरी ५० - ६० वर्षांपासुन याच आहेत. सासरच्या त्या मानाने अलिकड्च्या साधारण १५ - २० वर्षांपुर्विच्या आहेत.

गौरी म्हणजे बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय!! त्यामुळे वयाबद्दल जाणीवपूर्वक लिहीलं नाही म्हणा. ;) ह. घ्या. हो.

@ सूड -
इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला.
धन्यवाद!

@ सूड -
इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला.
धन्यवाद!

ह्या आमच्या गावच्या घरच्या महालक्ष्मी / गौरी.. ही सजावटीची पद्धत पुर्वापार (किमान पणजोबांपासून) तशीच आहे. जेष्ठा-कनिष्ठा गौरीसमोर कुमार आणि कुमारीपण मांडल्या जातात. दुसर्‍या फोटोत केळीच्या पानावर मांडलेले पुजेचे-प्रसादाचे ताट आहे. पक्वान्नांसोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसादात सोळा प्रकारच्या भाज्या असतात.

a

b

यंदा महालक्ष्म्यांकरीता गावी जाऊ शकलो नाही, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर दर्शन घेऊन, प्रसादाच्या ताटाच्या आठवणीत उसासे सोडण्याखेरीज काहीही हाती नाही. :(

पैसा's picture

4 Sep 2014 - 5:10 pm | पैसा

लव उ आणि चिगो, गौराया, महालक्ष्म्या मस्त आहेत!

@चिगो, एवढ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या कुठून गोळा करतात?

आनन्दिता's picture

4 Sep 2014 - 7:18 pm | आनन्दिता

हा आमचा बाप्पा...

.

या गौरी
.

. .

.

मुक्त विहारि's picture

4 Sep 2014 - 10:13 pm | मुक्त विहारि

यानबूत बसल्या बसल्या, गौरी-गणपतींचे दर्शन झाले.

एक मिपाकर म्हणून आनंद झाला.

पैसा's picture

5 Sep 2014 - 11:15 am | पैसा

फेटेवाले बाप्पा!

केदार-मिसळपाव's picture

5 Sep 2014 - 7:12 pm | केदार-मिसळपाव

सुरेख गौरी-गणपती.
सर्वांचे अभिनंदन.
सुरेख सजावट केली आहे.
जियो मिपा.

केदार-मिसळपाव's picture

5 Sep 2014 - 7:15 pm | केदार-मिसळपाव

इतकी छान सजावट बघायला मिळाली. अजुन काय हवे?
गणपती बाप्पा मोरया....

सानिकास्वप्निल's picture

7 Sep 2014 - 8:30 pm | सानिकास्वप्निल

पैसाताईच्या सांगण्यावरुन माझ्या घरच्या हरितालिकेच्या पुजेचे व आमच्या शेफिल्डच्या राजाचे फोटो देत आहे. आमच्या घरी इथे गणपती नसतो पण आम्ही सगळे मिळून दरवर्षी इथल्या मंदिरात गणपती आणतो :)

हरितालिका पूजा

.

.

शेफिल्डचा राजा

.

.

पैसा's picture

7 Sep 2014 - 8:34 pm | पैसा

मस्त वाटलं बघून! रांगोळी पण मोठी काढली होतीस!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2014 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

आमच्या सोसायटीचा बाप्पा...

.

सोसायटीचे सभासद हिंदू व मुस्लीम साधारण समसमान संख्येने आणि काही थोडे ख्रिश्चन असे आहे. पण गेल्या दहा-एक वर्षांपासून १० दिवसांचा बाप्पांचा उत्सव सकाळ-संध्याकळची आरती, सगळ्यांनी आणलेला प्रसाद, रोज मुलांचे खेळ आणि एक सामुदायीक जेवण असा बहुसंख्य सभासदांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.