औद्योगीक इसापनीती भाग एक

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
30 Jun 2008 - 12:03 pm

इसवीसनपूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेला इसाप आपणाला माहीत आहेच. प्राणीजगतातली पात्रे घेऊन अगदी सोप्या भाषेत त्याने जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्‍या नीतीकथा लिहील्या. आज जर इसाप असता, तर आजच्या औद्योगीक (कॉर्पोरेट) जगाचे निरीक्षण करून त्याने कुठल्या नीतीकथा लिहील्या असत्या? जालावर अशी एक कथा वाचली. मग त्यात माझ्या कल्पनेतून आणखी काही कथांची भर घालण्याचे ठरवले. आणि काही नवयुगाच्या औद्योगीक इसापकथा जन्माला आल्या. मिपाकरांच्या मनोरंजनासाठी देत आहे.

**************************

तीन बेडके

एकदा एका कोरड्या विहीरीत तीन बेडके पडली. विहीर बरीच खोल होती. त्यामुळे उड्या मारून किंवा चढून वर येणे शक्य वाटत नव्हते. विहीरीत खाण्यासाठी काही खास दिसत नव्हते. थोड्या फार माशा, किडे, काही हिरवे कोंभ वगैरे असावेत. त्यातल्या हुशार बेडकांनी लगेच सर्व परिस्थीती ताडली. जर खाद्यपदार्थांमधे सर्वांचा वाटा पडला, तर लवकरच उपासमारीची पाळी येणार! हुशार बेडके मठ्ठ बेडकाला म्हणाली "तू असे कर....तू सर्वात बारीक आहेस. उंच उंच उड्या मारून विहीरीबाहेर पडण्याचा प्रयत्न कर. जर कसोशीने प्रयत्न केला, तर तुला बाहेर नक्कीच पडता येईल. मग तू बाहेरून आमच्यासाठी मदत पाठवू शकतोस."

मठ्ठ बेडूक उंच उड्या मरून वर जाण्याचा प्रयत्न करू लागले. हुशार बेडके मोठमोठ्याने ओरडून त्याला प्रोत्साहन देऊ लागली. "हा हा! शाबास पठ्ठे, आणखीन जोरात.." इकडे ओरडता ओरडता हुशार बेडकांचे विहीरीत असलेले अन्न खाणे सुरूच होते. ती हुशार बेडके थोड्याच वेळात टम्म फुगली. मठ्ठ बेडूक दमून निपचीत पडले. हुशार बेडकांचे ओरडणे ऐकून एक साप तेथे आला. टम्म फुगलेल्या बेडकांना पहून लगेच त्याने ती बेडके मटकावली. नंतर दमून निपचीत पडलेले मठ्ठ बेडूक देखील गिळंकृत करून तो साप तेथून दुसर्‍या भक्षाच्या शोधात निघून गेला.

बोध-
१) प्रॉडक्टीव कामे करणारे लोक एखाद दुसरेच असतात. बाकीचे फक्त गाजावाजा करणारे असतात.
२) प्रॉडक्टीव भासणारी कामे वास्तवात प्रॉडक्टीवच असतील असे नाही.
३) होणार्‍या आणि न होणार्‍या कामांचा गाजावाजा करून छोटे समूह लठ्ठ झाले की मोठे समूह त्यांना आपल्यात सामावून घेतात. (ऍक्वीजीशन)
*********************************

कलावाङ्मयकथासमाजजीवनमानप्रकटनविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

विदुषक's picture

30 Jun 2008 - 12:37 pm | विदुषक

वा वा क्या बात है !!!!

मजेदार विदुषक

बाबुराव गनपतराव आपते's picture

30 Jun 2008 - 1:23 pm | बाबुराव गनपतराव आपते

फार छान!!!!!!

वरदा's picture

30 Jun 2008 - 6:44 pm | वरदा

प्रॉडक्टीव कामे करणारे लोक एखाद दुसरेच असतात. बाकीचे फक्त गाजावाजा करणारे असतात.

मस्तच!!!

बापु देवकर's picture

30 Jun 2008 - 7:00 pm | बापु देवकर

ही औद्योगीक इसापनीती आवडली...अजुन येऊ दे.

राज....

विसोबा खेचर's picture

1 Jul 2008 - 12:10 am | विसोबा खेचर

होणार्‍या आणि न होणार्‍या कामांचा गाजावाजा करून छोटे समूह लठ्ठ झाले की मोठे समूह त्यांना आपल्यात सामावून घेतात.

हा बोध आवडला! :)

अरुण मनोहर's picture

1 Jul 2008 - 3:33 am | अरुण मनोहर

होणार्‍या आणि न होणार्‍या कामांचा गाजावाजा करून छोटे समूह लठ्ठ झाले की मोठे समूह त्यांना आपल्यात सामावून घेतात.
हा बोध आवडला!

मिपाचे सदस्य १००० च्या वर झालेत .......... जपून! :$ :$

चतुरंग's picture

1 Jul 2008 - 6:29 am | चतुरंग

चतुरंग

यशोधरा's picture

1 Jul 2008 - 7:29 am | यशोधरा

होणार्‍या आणि न होणार्‍या कामांचा गाजावाजा करून छोटे समूह लठ्ठ झाले की मोठे समूह त्यांना आपल्यात सामावून घेतात. (ऍक्वीजीशन)

ह्म्म.... :)