तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-२५

खुशि's picture
खुशि in भटकंती
8 Jul 2012 - 5:35 pm

पाच वाजता उठलो,प्रातर्विधी उरकुन घाटावर स्नानाला गेलो.ग्रहण सुटल्यामुळे चन्द्रमा आता नव्या तेजाने चमकत होता त्यामुळे अन्धार नव्हता २५/३० पायर्‍या उतरुन मैय्याच्या पात्राजवळ गेलो.पाणी जास्त नव्हते सरदार सरोवरातुन पाणी सोडले तरच पाणी वाढते. थन्डीच्या दिवसात वाहत्या पाण्याने स्नान करणे हा अनुभव स्वतःच घेणे छान वाटेल.छान उबदार असते पाणी.उगवत्या सुर्याला अर्घ्य दिले आणि शिवमन्दिरात वाहण्यासाठी पाणी जवळच्या ताम्ब्याच्या लोट्यात पाणी घेउन समाधीमन्दिरात गेलो.शिवपिन्डीवर पाणी वाहुन मानसपुजा केली,नन्तर वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीन्च्या समाधीदर्शनास गेलो.तिथे दत्तबावनी म्हटली. नन्तर चहा घेउन हॉलवर येउन पिशव्या पाठीवर लादुन विनोबा एक्सप्रेस निघाली. नर्मदे हर.
गरुडेश्वरला जानकीमाताजी नावाच्या एक माताजी प्रसिद्ध आहेत.त्या परिक्रमावासीन्ची सेवा करत असतात. परिक्रमावासीना हव्या असलेल्या वस्तू त्या देतात.त्या गावाला गेल्या होत्या त्यामुळे भेट झाली नाही याची चुटपुट लागली.असो. नर्मदे हर.
तासाभराचे चालणे झाल्यावर खडगदा गाव आले.तिथे रामसिन्गभाई मोतीभाई तडवी यान्च्या सत्यम शिवम सुन्दरम या घरी त्यानी आग्रह करुन नेले,चहा दिला.अर्धातास तिथे थाम्बुन पुढे निघालो. गरुडेश्वर पासुन केवडिया कॉलनी फाटा आठ कि.मि. होता.तिथे डाव्या बाजुच्या रस्त्याने जायचे होते,समोरचा रस्ता केवडिया कॉलनीला जाणारा रस्ता होता. झरिया येथिल बान्धकाम चालु असलेल्या मन्दिरात पोहोचलो तेव्हा सकाळचे दहा वाजले होते.
हनुमान मन्दिरात विद्याताई,लिलाताई यानी खिचडी केली,मी हापशावर कपडे धुतले.भोजन झाल्यावर बागेतील मोठ्या झाडाच्या पारावर विश्रान्ती घेउन दीड वाजता पुढे निघालो. उन्हाचा कडाका वाढला होता,दमायला झाले होते,नर्मदे हर नर्मदे हर जप करत कसेतरी पाय ओढत चालत होतो.मुक्कामाचे ठीकाण अम्बाजी किती दुर आहे माहीत नव्हते.इतक्यात एक टेम्पो आला,त्याने अम्बाजीला सोडायचे कबुल केले मग सर्व सामान टेम्पोत टाकुन बसलो. अम्बाजीला जाणारा रस्ता खराब होता त्यातच अम्बाजीचे ठाणे उन्चावर असल्याने घाट चढायचा होता.अगदी वेळेवर टेम्पो मिळाला होता नाहीतर आज अम्बाजीला पोहोचणे अशक्य होते.
अम्बाजी दहा कि.मि. दुर होते.चार वाजता पोहोचलो. माता अम्बाजीचे हे क्षेत्र मोठे रमणीय आहे. चारी बाजुना दाट व्रुक्षराजीने भरलेले डोन्गर,मन्दिरामागे झुळझुळ वाहणारी छोटी नदी,सुबक बान्धणीचे मन्दिर,सन्गमरवरी पाषाणाची स्वरुपसुन्दर अम्बाजीची प्रसन्न हसतमुख मुर्ती.सुन्दर निसर्ग.
नवीनच बान्धलेल्या भक्तनिवासात एका हॉल मध्ये आसन लावले. वान्गी,बटाटे,कणीक सदाव्रतात मिळाले रस्सा-पोळ्या असा स्वयम्पाक केला.पुजा आरती केली नन्तर भोजन केले आज एका परिक्रमावासीलाही भोजन प्रसाद देण्याचा योग आला. आता विश्रान्ती.
नर्मदापरिक्रमा एक आनन्द यात्रा आहे. आजचा दिवस मजेत पार पडला,उद्या कुठे कधी कसे माहीत नाही तरीही सारा आनन्दीआनन्द. नर्मदे हर. क्रमशः

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

9 Jul 2012 - 12:49 pm | स्पंदना

नर्मदे हर !

सुजित पवार's picture

9 Jul 2012 - 1:55 pm | सुजित पवार

छान जमतय सर्व

कवटी's picture

9 Jul 2012 - 2:48 pm | कवटी

प्रवास्/परिक्रमा वर्णन आवडले...

काही शंका:
"आसन लावले" म्हन्जे काय?
भक्तनिवास, आश्रम याठिकाणी रहाण्याचे सोय फुकट होते की (माफक)पैसे भरावे लागतात?
सदाव्रत मिळते त्यासाठीही काही पैसे द्यावे लागतात का? मिळालेले साहित्य शिजवायला लागणार्‍या साधनांचे (गॅस्/रॉकेल्/चूल्/भांडी) काय?
भक्तनिवास , आश्रम, सदाव्रत देणार्यांना संस्था/धनिक यांच्याकडून काही मदत मिळते का?

अवांतर : तुम्ही परिक्रमा करत करत रोज जे घडल ते मिपावर टाकताय की मागे कधी केलेल्या परिक्रमेत लिहिलेल्या डायरीची पाने इकडे चिकटवताय? (दुसरी शक्यता असेल तर येवढे छोटे भाग टाकण्यापेक्षा ५-६ दिवसाचे एक्त्रच मोठा भाग टाका)

नमस्कार.
आसन लावणे- ज्या आश्रमात आपण मुक्कामाला राहतो त्या ठिकाणी आपण जिथे झोपणार,बसणार तिथे आपली पिशवी,अन्थरूण ठेवणे याला आसन लावणे असे म्हणतात.
एखाद्या क्षेत्रस्थळी भक्तनिवासात आपण स्वतन्त्र खोली घेतली तर पैसे द्यावे लागतात,बाकी आश्रमान्मध्ये राहण्यासाठी पैसे लागत नाहीत.
काही आश्रमात अन्नक्षेत्र असते तिथे तयार भोजन प्रसाद मिळतो,तो प्रसाद असल्याने त्याला पैसे पडत नाहीत. सदाव्रतही सेवा म्हणुनच ते देतात त्यामुळे पैसे द्यावे लागत नाही.स्वयम्पाकासाठी चुल पेटवण्यासाठी जळण तेच देतात,पैसे लागत नाहीत.
सन्स्था नेहेमी देणग्यान्वरच चालतात.पण आमचा अनुभव असा आहे परिक्रमेतला ,की कोणी धनिक लाखो रुपये देत नाही तर त्या त्या गावातील लोकच सर्व मिळून हे सेवाकार्य करतात.मध्यप्रदेश,गुजराथ मध्ये नर्मदेला ते आपली आई मानतात आणि परिक्रमावासीन्ची सेवा ही मैयाचीच सेवा असा त्यान्चा भाव असतो,फार मानाची वागणूक मिळते.
आमची परिक्रमा फेब्रुवारीत पुर्ण झाली,तेव्हा केलेल्या नोन्दीन्च्या आधारे मी लिहीत आहे. परिक्रमा करत असताना इन्टरनेटचा वापर करणे जमण्यासारखे नाही. नेहेमी मोबाईलला रेन्ज मिळेलच असे सान्गता येत नाही,मोबाईल वेळेवर चार्ज करता येईल असेही नाही.मध्यप्रदेशात खुप लोडशेडीन्ग असते,गुजराथ मध्ये ती अडचण नाही तिथे सर्वच ऑल इज वेल आहे पण आमचा मोबाईल साधाच आहे त्यामुळे ते शक्य नव्हते.
काम साम्भाळुन तसेच मी हे सर्व नवीनच शिकते आहे त्यामुळे जास्त लिहिणे जमेल की नाही असे वाटते,तरीही आपण म्हणता तसे करण्याचा प्रयत्न करीन.
लेख वाचुन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.आशा आहे आपल्या प्रश्णान्ची उत्तरे आपणास समाधान कारक वाटतील. पुन्हा एकदा धन्यवाद.
ता.क.- आपले नाव असे काय आहे?

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jul 2012 - 3:24 pm | अत्रुप्त आत्मा

अजुन किती दिवस शिल्लक आहेत?

जोपर्यंत फिरणार्‍याला किंवा वाचणार्‍याला चक्कर येत नाही तोपर्यंत परिक्रमा चालू राहते.

(आता मिपा प्रथेप्रमाणे त्यांना डायरी द्यावी म्हटलं तर ती त्यांनी आधीच लिहिलीये त्यामुळे आता फक्त वाट बघणं आपल्या हातात आहे)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2012 - 7:09 am | अत्रुप्त आत्मा

@त्यामुळे आता फक्त वाट बघणं आपल्या हातात आहे >>>
पटलं हो पटलं संजय भाऊ
पुढच्या धाग्यांचा करणार नाही बाऊ...! ;-)

Dhananjay Borgaonkar's picture

10 Jul 2012 - 12:02 pm | Dhananjay Borgaonkar

जोपर्यंत लिहीणार्‍याला किंवा वाचणार्‍याला चक्कर येत नाही तोवर काही अध्यात्मिक(!) लेखमालाही जालावर चालू राहतील असे दिसते. दिसली कविता की पाड विडंबन हा प्रकार काही नवविडंबक त्यांचा आत्मा सद्गतीला जाईपर्यंत करतील ही शक्यता नाकारता येत नाही. वाट पाहणेच आपल्या हाती असते अशा वेळी.

--------------
जे पटेल तेच करतो.

खुशि's picture

11 Jul 2012 - 4:13 pm | खुशि

नमस्कार. धन्यवाद.
मी सुद्धा मला जे पटते तेच करते.

राजो's picture

11 Jul 2012 - 10:43 am | राजो

कारणे दाखवा नोटीस
-----------------------------------------------
भटकंती या सदराचे नामकरण जिलेबी/डायरी का करण्यात येऊ नये ;)

नमस्कार,धन्यवाद.
किती दिवस शिल्लक आहेत माहीत नाही,चालत रहाणे,जगत रहाणे हे आपले कर्म आहे,भोग सम्पले की एका क्षणाचाही जाण्यास विलम्ब करता येणार नाही किम्बहुना तो करणे आपल्या हातातच नाही.
ता.क.- आपल्या नावाचा अर्थ काय? मला समजला नाही हो.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jul 2012 - 12:37 pm | अत्रुप्त आत्मा

दुखावली भावना की पाड प्रतिसाद हा प्रकार काही उपेक्षित परतिसादक त्यांचा खात्मा होईपर्यंत करतील ही शक्यता नाकारता येत नाही.. त्यांची पुरती वाट लावणेच आपल्या हाती असते,अश्या येळी :-p

संजय क्षीरसागर's picture

11 Jul 2012 - 10:23 am | संजय क्षीरसागर

वेळ मिळाला की परिक्रमेविषयी सर्वांना उपयोगी होईल असं लेखन करेन म्हणून प्रतिसाद काढला आहे. लेखन लांबल्यामुळे वरील प्रतिसाद दिला होता, खुशिमॅम आपल्याला दुखावण्याचा उद्देश नाही

खुशि's picture

11 Jul 2012 - 4:16 pm | खुशि

नमस्कार.
इहलौकिक जग अर्धसत्य आहे,म्हणजे काय हो? आणि मग पुर्णसत्य कोणते आणि कसे असते?

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jul 2012 - 6:30 pm | अत्रुप्त आत्मा

आणि मग पुर्णसत्य कोणते आणि कसे असते? >>>
(इहलौकिक जग अर्धसत्य आहे) आणी>>>अंतरजाल हे(च) पूर्ण सत्य आहे... ;-)

राजो's picture

11 Jul 2012 - 1:36 pm | राजो

सगळा आनंदी-आनंद आहे.. :D

विटेकर's picture

20 Jul 2012 - 6:19 pm | विटेकर

तुम्ही उगाचच प्रतिवाद करता.. त्याची अजिबात आवश्यकता नाही...

प्रतिवाद करण्यापेक्षा भाग मोठे करता आले तर ते अधिक फायद्याचे होईल..

काही लोक "प्रोफेशनल पिंक टाकू "आहेत, त्यांना प्रत्येक धाग्यावर मत द्यायचे असते आणि गंम्मत बघत बसायचे असते...
सोडून द्या झालं....त्यांना छिद्रान्वेषीपणा करण्याचा जन्मजात अधिकार आहे !

आणि छान लिहिताय .. मुख्य म्हणजे खूपच प्रामाणिक आहे.. श्रद्गायुक्त अंतः करणाने लिहिताय .. म्हणून प्रांजळ आणि रसाळ झाले आहे ! Keep it up !

नर्मदे हर !