तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-२४

खुशि's picture
खुशि in भटकंती
8 Jul 2012 - 12:56 pm

नेहेमीप्रमाणे स्नान पुजा आरती करुन चहा घेउन उमेशगिरी महाराजान्चा भावपुर्ण निरोप घेउन विनोबा एक्स्प्रेस निघाली.काल चान्दोदला पोहोचलो त्यावेळी रात्र झाली होती त्यामुळे गाव बघायला मिळाला नव्हता,सकाळी चालता चालता बघायला मिळाला.चान्दोदगावाला एक इतिहास आहे.चान्द्रवन्शी राजाची राजधानी होती. इमारती सुन्दर नक्षीकाम केलेल्या आहेत सुन्दर कलाकुसर केलेले दरवाजे तावदाने आहेत.
नर्मदेवर बान्धीव घाट आहे.इथे नर्मदा-ओरी{ओरसन्ग}-गुप्त सरस्वती असा त्रिवेणी सन्गम आहे.पवित्र तीर्थक्षेत्र आहे.एक प्रसिद्ध श्लोक आहे .
सर्वत्र सुलभा रेवा,त्रिषु स्थानेषु दुर्लभा!

ओम्कारेsच भ्रुगुक्षेत्रे तथा रेवोरि सन्गमे !! अर्थः- रेवा{नर्मदा}सर्व ठिकाणी सुलभ आहे पण तीन ठिकाणी दुर्लभ आहे,ओम्कारेश्वरला,भ्रुगुक्षेत्र {भरुच},नर्मदा-ओरि-सरस्वती सन्गमस्थळी{चान्दोद-कर्नाली}.या ठिकाणी रेवा स्नान अतीव पुण्यदायी आहे.
थोड्या अवघड वाटेने मान्डवा गावात आलो. वाटेत एक पिराचे स्थान दिसले,दादापीर. हिन्दु-मुस्लीम दोन्ही मानतात या स्थानाला. मान्डवा गावात प्राचीन राजवाडा आहे.अर्थात तो रिकामा आहे.राजा महाराज इन्दुरला राहतात. नर्मदा जयन्तीच्या उत्सवाच्या वेळी येतात.पुजेचा मान त्यान्चा असतो.एका अवघड घळीतुन उतरून सन्गमावर आलो. गुढग्या एवढ्या पाण्यातुन ओरिनदी पार केली,पाण्याला बरीच ओढ होती थन्डगार पाण्याचा स्पर्श मोठा सुखद होता.एकमेकान्चा आधार असल्याने नदी पार करणे सोपे झाले. नदीपार केली पण किनार्‍यावरील वाळूत पाय घोट्यापर्यन्त रुतत होते,कसेबसे किनारा पार करुन वर चढलो.पण रस्ताच दिसत नव्हता,कसे करणार? सगळीकडे कापसाची शेते होती,मग त्या कापसाच्या झाडान्ची धक्का लावण्या बद्दल मनोमन क्षमा मागुन हाताने त्याना बाजुला करत शक्यतो ती तुडवली जाणार नाहीत असे पहात पुढे निघालो.गोसावी आधी पुढे गेले आणि लाम्बवर दिसत असलेल्या घराजवळ वाट आहे का ते पाहुन घेतले,त्यानी इशारा केल्यावर बाकीसर्वजण गेलो.
कर्नाली गाव आले. हेही प्राचीन इतिहास असलेले गाव आहे.बराच मोठा मन्दीर समुह आहे.गणपती,हनुमान,शिव,देवी अशी मन्दिरे आहेत.एक गम्मत तिथे बघायला मिळाली,कोकणस्थ ब्राम्हणान्च्या नावाचे बरेच बोर्ड दिसले.त्यामागे कारण काय ते समजले नाही,बहुतेक लोक सध्या सान्गलीचे रहिवासी आहेत.कर्नाळी त्यान्चे मुळ गाव आहे किवा कसे ते समजले नाही.तिथे नळाच्या पाण्याखाली चिखलाचे पाय धुतले,भागवतान्च्या पायाचे ड्रेसिन्ग केले.टपरीवर चहा घेतला,बरेच फोटोही काढले नन्तर गावाबाहेर असलेल्या कुबेरभन्डारी मन्दिरात आलो.तिकडे जातानाच एका टेम्पोवाल्याशी लिम्बपुरा पर्यन्त जाण्याचे ठरवुन ठेवले.
या क्षेत्रस्थळी शिवशन्कर भगवान विष्णू च्या रुपात प्रगट झालेले आहेत.भन्डारेश्वराच्या शाळुन्केच्या ठिकाणी पाणी आहे.महाकालीचे मन्दीर आहे त्या मन्दिराच्या तळघरात योगी अरविन्द{पॉन्डेचरीचे} यान्चे तपस्या स्थळ आहे.शान्त ध्यान मन्दीर आहे.एक शिवपिन्डी आहे. योगीजीन्ची तसबीर आहे. या ठिकाणी नर्मदेला ७०/८० पायर्‍यान्चा छान बान्धीव घाट अहिल्याबाई होळकरनी बान्धलेला आहे. स्वच्छ सुन्दर घाट,शीतल सुन्दर स्वच्छ निर्मल नर्मदाजल. मन प्रसन्न झाले.भोजनाची वेळ होईपर्यन्त हे सारे बघितले,कपडेही वाळवले. भोजन झाल्यावर रिक्षाने लिम्बपुराला आलो. तिथे एका मारुतीगाडीतुन दोन वाजता गरुडेश्वरला आलो. जुन्या धर्मशाळेच्या कॉमन हॉलमध्ये आसन लावले.येथे रानडेबाई,राजवाडेबाई भेटल्या.त्या थोड्या आजारी झाल्याने चारपाच दिवसापासुन येथे मुक्कामाला होत्या आणि आता श्रीराम महाराज त्यान्ची परिक्रमेची बस घेउन आले की त्यान्च्या बरोबरच परिक्रमा पुर्ण करणार होत्या.त्यान्च्या सान्गण्यावरुन मी श्रीराम महाराजान्शी फोनवर बोलले,ते दोन दिवसानी गरुडेश्वरला येणार आहेत. इथेच भावसार,जोशी,सवदीही भेटले. नाशिकचे शिवानन्दस्वामी{शिव शिव बाबा} यान्चे दर्शन झाले,बाबा नी येथे दत्तयाग केला आज दत्तजयन्तीला त्याची पुर्णाहुती आहे.बाबानी आम्हाला दोघाना एकेक शाल दिली,भोजनप्रसादही मिळाला.आशीर्वादाचा मोठा भाग्याचा योग आज गरुडेश्वरसारख्या तीर्थक्षेत्री दत्तजयन्तीच्या पवित्र दिवशी आमच्या सारख्या अतिसामान्य भक्तान्च्या नशिबात होता,हे नक्की पुर्वजन्मीचे पुण्य. श्री.जगन्नाथ कुन्टेही भेटले,त्यान्चाही आशीर्वाद मिळाला.
आज चन्द्रग्रहण असल्याने रात्री भोजन नव्हते. वासुदेवानन्दसरस्वती महाराज यान्च्या समाधीचे दर्शन घेतले,अभिषेकाची पावती केली. काही परिक्रमावासी ग्रहण सुटल्यावर रात्री नर्मदास्नान करुन आले,तेवढया रात्री त्यानी पुजापाठही केला.क्रमशः

प्रतिक्रिया

सुजित पवार's picture

8 Jul 2012 - 3:42 pm | सुजित पवार

श्री.जगन्नाथ कुन्टे यान्च्या ४ परिक्रमा अधिच झल्यात, ते तुम्हला ४ थ्या परिक्रमेत भेटले कि अता ५ वि करत आहेत?

नमस्कार सुजित.
जगन्नाथ कुन्टे गरुडेश्वरला दत्तजयन्ती उत्सवासाठी आले होते.परिक्रमा करत नाहीत.ते माझ्या नणन्देच्या घरी नेहेमी येतात मेहुण्यान्च्या ओळखीचे आहेत त्यामुळे आमची ओळख आहे.