तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-१८

खुशि's picture
खुशि in भटकंती
2 Jul 2012 - 1:53 pm

अन्कलेश्वरला घरच असल्याने मजाच होती. मिनुने ह्यान्च्या वाढदिवसानिमित्त श्रीखन्ड आणले होते पण पोटदुखिने तिचे मामा बेजार झाले होते थोडेसे खाल्ले.निशाला ,{ह्यान्ची बहीण मिनुची आई} फोन करुन अन्कलेश्वरला ये सान्गितले,रात्रीच्या बसने निघुन ती लगेच सकाळी आली सुद्धा.
सकाळी डॉक्टरकडे जाउन ह्याना तपासुन आणले,मी दिलेली औषधे बरोबर आहेत असे डॉक्टर म्हणाले.त्यामुळे बरे झाले. पुण्याच्या भागवतान्चा फोन होता,ते आणि त्यान्च्याबरोबरचे सहा जण मिनुच्याच घरी येणार आहेत.कारण अन्कलेश्वरला आश्रमासारखी काही सोय नाही.मिनुला ते येणार म्हणून खुप आनन्द झाला.मिनुचे घरमालक श्री. सिन्ग यानाही येणार्‍या पाहुण्यान्बद्दल सान्गितले.ते म्हणाले ,परिक्रमावासि लोगोन्की सेवा करनेका ये मौका सौभाग्यसे आया है,वे लोग हमारे घरमे रहेन्गे और आप सब लोग भोजन हमारे यहा करेन्गे. यावर काय म्हणणार? हो म्हटले.
ठरल्या प्रमाणे दुसर्‍यादिवशी भागवतान्चा फोन आला,मग हे आणि सिन्ग त्यान्ची गाडी घेउन त्याना घेण्यासाठी गेले.काहीजण रिक्षात आणि काही सिन्ग यान्च्या गाडीत असे घरी आले.श्री. अशोक भागवत,सौ. विद्या भागवत,सौ. लिला शिन्दे,श्री. अशोक माढेकर,श्री. गोवर्धन गोसावी,श्री. अरुण सवदी असे सहाजण आले.माढेकर,गोसावी,सवदी याना सिन्ग यान्च्या घरी आणि बाकी सर्व मिनुकडे राहिले.सन्ध्याकाळी भागवतान्चे मित्र श्री. जाधव हे औरन्गाबादहुन आले,ते रत्नसागर पार करुन पुढे भरुचपर्यन्त आमच्या बरोबर येणार होते,मग आम्ही निशाला म्हटले की तू सुद्धा चल.ती चालेल म्हणाली. रात्री सिन्ग यान्च्याकडे भोजनाचा बेत अगदी फक्कड होता,पुर्‍या खीर फ्लॉवरचा रस्सा जिरा राइस आणि चुरम्याचे लाडू्. हसत खेळत भोजन झाले,गप्पा झाल्या.उद्या कठपोर; नर्मदामैय्या आणि रत्नसागर{अरबी समुद्र} सन्गम.
सकाळी इतक्या जणान्च्या आन्घोळी,कपडे होईपर्यन्त दहा वाजुन गेले.एकीकडे स्वयम्पाकही झाला.साधा बेत,वरण-भात भाजी पोळी.जेवण झाल्यावर निघालो.आम्ही दहाजण होतो एक बारासीटर गाडी केली.प्रथम रामकुन्ड राममन्दिर पाहिले.खरेतर हा पुर्वीचा स्मशान घाट.आता कुन्डाच्या एका बाजुला राममन्दिर बान्धुन तिथे परिक्रमावासीन्साठी सोय केली आहे,आश्रमात अन्नक्षेत्र आहे. श्रीराम सीता लक्ष्मण यान्च्या सन्ग्मरवरी मनोहर मुर्ती आहेत.आम्ही गेलो त्यावेळी देवाची विश्रान्तीची वेळ होती पण तिथल्या महन्तानी पडदा बाजुला करुन आम्हाला दर्शन घडवले. नर्मदेहर.रामदर्शनानन्तर गेलो बलबला किन्वा बुलबला कुन्ड बघायला.एक छानसा बगिचा,त्यात एक हनुमान मन्दिर आणि थोड्या अन्तरावर आहे बलबला कुन्ड यामधील पाण्याचा रन्ग पाढुरका गढुळ आहे आणि पाण्यात असन्ख्य बुडबुडे फुटत असतात,उकळी फुटल्या प्रमाणे. पाणी गरम असेल असे वाटले पण नव्हते.भुगर्भवायूमुळे बुडबुडे येत असतात.भाबड्या लोकाना चमत्कार वाटतो. नन्तर गेलो हासोट येथे सुर्यकुन्ड दर्शनास.एक शिवमन्दिर आहे,पण कुन्डाबद्दल जास्त माहिती मिळाली नाही.तिथुन खिचडीवालेबाबा आश्रम हनुमान मन्दिरात आलो.येथे परिक्रमावासीना राहण्याची सोय आहे.अन्नक्षेत्र आहे.तिथे चहा मिळाला,तो घेउन पुढे निघालो.
चार वाजता कठपोरला पोहोचलो.रिक्षातुन उतरुन दोन कि.मि. चालुन रैनबसेरात पोहोचलो.तेथिल महाराजानी आम्हा दहाजणाना एक स्वतन्त्र खोली दिली,खोलीच्या खिडक्या-दाराला दरवाजे नव्हते. नवीन बाम्धकाम असल्याने नुसत्या भिन्ती आणि वरती स्लाबचे छप्पर होते आणि थन्डीवार्‍या पासून बचावासाठी तेच महत्त्वाचे आणि पुरेसे होते.
हे ,जाधव गोसावी महाराजाना परिक्रमावासी लोकान्च्या नावान्ची लिस्ट करणे,नावेच्या प्रवासासाठी प्रत्येकी ५०रू.वर्गणी गोळा करणे वगैरे कामात मदत करायला गेले.महाराज शिकलेले नाहीत आणि उद्या पार जाण्यासाठी गर्दीही खुप आहे.त्यामुळे अशी मदत करणे खुप आवश्यक होते.
रात्री खिचडीचा भोजनप्रसाद होता.ओम्कारेश्वर ते कठपोर हा १४००कि.मि.अन्दाजे परिक्रमेचा पहिला टप्पा आज पुर्ण झाला.उद्या नावेत बसुन उत्तर किनार्‍यावर गेलो की परिक्रमेचा पुढचा टप्पा सुरु होणार.मैय्या! आपल्या लेकराना साम्भाळून तुच तो त्यान्च्याकडुन पुर्ण करुन घेणार आहेस. नर्मदे हर. वन्दे नर्मदाम. क्रमशः

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

2 Jul 2012 - 3:57 pm | मुक्त विहारि

मजा येत आहे वाचायला

विजय_आंग्रे's picture

3 Jul 2012 - 10:41 am | विजय_आंग्रे

_/\_ नर्मदे हर...
वाचतोय..!
ओम्कारेश्वर ते कठपोर हा अन्दाजे १४००कि.मि. परिक्रमेचा पहिला टप्पा पूर्ण करायला, तुम्हाला साधरण किती दिवस (कालावधी) लागले.

विलासराव's picture

3 Jul 2012 - 3:51 pm | विलासराव

काहीतरी चुकतय खुशीताई,

>>>ओम्कारेश्वर ते कठपोर हा अन्दाजे १४००कि.मि. परिक्रमेचा पहिला टप्पा पूर्ण करायला, तुम्हाला साधरण किती दिवस (कालावधी) लागले.

ओम्कारेश्वर ते कठपोर हे अन्दाजे ७५० किमी आहे. मी हे अंतर २६ दिवसात पार केले होते. खरतर २४ दिवसात कारण २ दिवस मधे आराम केला होता.

स्पंदना's picture

3 Jul 2012 - 4:26 pm | स्पंदना

नर्मदेवर हर!

विटेकर's picture

3 Jul 2012 - 5:04 pm | विटेकर

नर्मदे हर !,

आम्ही २-३ जण येत्या १५ ओगस्ट्च्या आठवड्यात ओंकारेश्वरला जावे असे म्हणतोय..

५/६ दिवसाची छोटी परिक्रमा करायची आहे.. कुठेपर्यन्त चालू?

कोठून सुरुवात करावी? ओन्कारेश्वरच असे नाही ...कोठूनही सुरुवात करता येईल.

पावसाळ्याचे दिवस काही फारसे योग्य नव्हेत, पण कधीतरी सुरुवात तर करायला हवी ना?

आपल्याला फोनवर बोलता येईल का?

आम्ही वय वर्षे ४०/४५ च्या दरम्यान आहोत आणि पुण्यात आय टी मध्ये काम करतो.

- सुहास

09881476020

 

नमस्कार सुहास.
चातुर्मासात परिक्रमा करत नाहीत. १५ ऑगस्टला श्रावण महिना आहे,चातुर्मासातील दुसरा महिना त्यामुळे परिक्रमा करता येणार नाही. त्याशिवाय त्यावेळी पाऊस असेल तर नर्मदामैय्याला मोठा पुर येतो,जणू सन्तापाने मैय्या थयथयाट करत असते.ओम्कारेश्वरला धरण अगदी जवळ आहे त्यामुळे वाढत्या पाण्याचा धोका जास्त असतो.तरीही ओम्कारेश्वरला दर्शनाला जायला हरकत नाही.तिथे गजानन महाराज भक्तनिवास राहण्यासाठी सर्वोत्तम आहे. ओम्कार मान्धाता द्विपाची सात कि.मि. परिक्रमा करता येईल.ओम्कारेश्वर मन्दिरा समोरुन छान बान्धीव रस्ता आहे.रस्त्याच्या बाजुने सम्पुर्ण गीता लिहिलेली आहे. वाटेत नर्मदा-कावेरी सन्गम आहे.रुणमुक्तेश्वराचे,गौरीशन्कराचे,झोपलेल्या हनुमानाचे,राजराजेश्वरीचे अशी मन्दिरे आहेत्.ओम्कारेश्वर गावातही बरेचकाही बघण्यासारखे आहे. जितेन्द्रशास्त्री हे मराठी पुजारी आहेत ते पुजा अभिषेक व्यवस्थित करतात.त्यान्च्याकडे ओम्कारेश्वराचा माध्यान्ह नैवेद्य असतो. मुख्य म्हणजे ते अमुकच दक्षिणा द्या असा आग्रह धरत नाहीत. पुणे इन्दोर रेल्वे आहे,इन्दोरला स्टेशन जवळ सरवटे बस स्थानकावरुन ओम्कारेश्वर साठी बस मिळते.

विटेकर's picture

20 Jul 2012 - 5:47 pm | विटेकर

आम्ही आमचा कार्यक्रम दिवाळी नंतर ठरवला आहे, पुन्हा मदत लागेलच .