तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-२६

खुशि's picture
खुशि in भटकंती
11 Jul 2012 - 6:20 pm

आज सकाळी सहा वाजता अन्धारातच अम्बाजीमातेला प्रणाम करुन नानी अम्बाजी सोडले.विनोबा एक्सप्रेस फास्ट निघाली,७कि.मि. वर हरीपुरा गावात एका शाळेच्या ओट्यावर बसलो.पाणी पिवुन विश्रान्ती घेत होतो,तिथे भुराभाई पटेल यानी आम्हाला पाहिले आणि लगेच चहा घेउन आले पण न बोलता उभे राहिले,भागवतानी विचारपुस केली तेव्हा मोठ्या सन्कोचाने ते म्हणाले,आप पढे-लिखे;बडे घरके लगते हो हम गरीब है दुध नही है बिना दुधका चाय कैसे दे दे? हे अ‍ॅकुन परान्जपे उठले,त्याना मिठी मारुन म्हणाले;नही नही भाई हम सब भाई-भाई है दुधकी जरुरत नही यही चाय पिलाओ. भुराभाईना आनन्द झाला त्यानी लगेच सर्वाना स्टीलच्या कपबशीतुन चहा दिला.परिक्रमावासीना काचेच्या कपातुन तिकडे चहा देत नाहीत कारण चिनीमातीची भान्डी निशिद्ध मानली जातात आणि ती शुभ कामाला वापरत नाहीत,परिक्रमावासीना मोठा मान असतो ती मैय्याची सेवा असते म्हणुन खरेतर काशाच्या पेल्यातुन चहा द्यायला हवा पण गरिबाकडे ती भान्डी नसतात म्हणून स्टीलच्या कपबशा. हे सर्व मला भुराभाईनी मी विचारल्यावर सान्गितले.किती मोठा भाव. नर्मदे हर.
भुराभाईन्चा हार्दिक निरोप घेउन पुढे निघालो.भरवाडा गाव आले,तिथे विनोदचन्द्र भील या शिक्षकानी त्यान्च्या घरी बोलावले,त्यान्च्या घरातील सगळ्यानी अगदी म्हातार्‍या आजी-आजोबानीसुद्धा आम्हाला नमस्कार केला,आम्ही सर्वजण अगदी सन्कोचुन गेलो,कितीही भाबडी श्रद्धा. आम्ही नमस्कार करु गेलो तर ते मागे सरकले नही नही आप पन्डीत{ब्राम्हण} और परिकम्मावासी हमको पाप लगेगा. निरुत्तर होतो आपण अशावेळी.
पुढे मेणन नदी लागली.पोटरी एवढे पाणी आणि बरेच दगडधोन्डे होते,पाय निसटत होते,केली पार. नवग्राम आले.तिथे असवन नदी होती पण तिच्यावर सान्डवा होता.त्यामुळे प्रश्नच नव्हता.पुढचा रस्ता शेताशेतातुन होता.गढपुरिया गाव आले,रणछोडराय मन्दिरात दर्शन घेतले्ए गाव बर्‍यापैकी मोठे आहे. गावातुन हायवेवर आलो. तिथे जीप मिळाली,वागछा येथे शिवमन्दिरात आलो.छोटेसे सुबक मन्दीर आहे,सभोवती बाग आहे.येथे त्याबागेत एका ठिकाणि वेलीचा सुरेख मान्डव करुन चारी बाजुना सुद्धा वेली पसरवुन स्त्रियाना स्नाना साठी आडोसा तयार केला आहे.स्नान कपडे धुणे करुन मैय्याची पुजा आरती केली,वागेश्वर महादेवाचे दर्शन घेतले.
येथे सुरेशचन्द्र महाराज नावाचे तरुण उच्चशिक्षीत सन्यासी आहेत.आमचे आवरेपर्यन्त भाजी करुन पोळ्यान्ची कणीक मळून ठेवली होती.दोघीनी पोळ्या केल्या,सर्वान्चे भोजन झाल्यावर निघालो. रस्त्यावर लगेच टेम्पो मिळाला.२५ कि.मि. वरील कवाट येथे कामनाथ महादेव मन्दिरात मुक्कामाला आलो. येथे अन्नक्षेत्र आहे.त्यामुळे पुजा-आरती,भोजन आणि झोपणे.
आजही अन्धारातच निघालो. वाटेत अजिबात न थाम्बता पाच कि.मि.वरील चिचबा गावातील निवासी कन्या आश्रम शाळेत आलो. तेथील शिक्षिका कोकिळाबेन यानी चहा दिला. अर्धातास थाम्बुन विनोबा एक्सप्रेस निघाली.८/९कि.मि. चालुन रेन्धवा गावाबाहेरील हनुमान मन्दीर,नर्मदा अन्नकुटीर मध्ये आलो. भारतीमहाराज म्हणाले,माताजी पाकसिद्धी हम करेन्गे आप आराम करो,थक गये हो.
मन्दिराजवळून बन्धोईनदी झुळुझुळू वाहात होती,स्वच्छ निर्मळ पाणी. सर्वानी स्नान -कपडे धुणे केले. हनुमानमन्दिरात मैय्याची पुजा-आरती केली.भोजनप्रसाद घेउन महाराजान्चा निरोप घेउन निघालो. दोन कि.मि.वर छ्कताल गाव आले. येथे गुजराथ राज्य सम्पुन मध्यप्रदेश सुरु झाले.
छकताल येथे जीप केली,उमराळी येथे आलो तिथे जीप बदलुन सोन्डवा येथे पोहोचलो,सन्ध्याकाळचे सहा वाजले होते.उत्तरतटावरील शुलपाणीच्या झाडीतील पहिले गाव.लक्ष्मीनारायण,हनुमान मन्दिरात आसन लावले.तिथे ओम्कारेश्वरचा रीतेश दुबे हा तेथिल रघुनाथ मन्दीर वेदपाठशाळेचा विद्यार्थी पुजापाठ करण्यासाठी येउन राहिला आहे.
भागवत गेल्या परिक्रमेच्यावेळी ज्या किराणादुकानदार राठोड यान्च्या कडे जेवले होते तेच आजही भोजनाची व्यवस्था करणार आहेत. श्री. परमानन्द धाकेड हे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर भेटायला आले.त्यानी त्यानी आदिवासी कन्या निवासी शाळेत झोपावे असे सान्गितले पण त्या मुलीन्ची गैरसोय होऊ नये म्हणुन आम्ही देवळातच रहाणे पसन्त केले.भोजन झाल्यावर आम्ही दोघे,भागवत दोघे आणि लिलाताई असे लक्ष्मीनारायणाच्या देवळात आणि गोसावी,माढेकरकाका रीतेश बरोबर त्याच्या खोलीत असे झोपलो. नर्मदे हर.
हा शुलपाणीच्या झाडीचा प्रदेश आहे,धोका नसला तरी दाट जन्गल आहे म्हणुन धाकेड साहेबानी पहाटे आमच्या साठी बोलेरो गाडी दिली,त्यान्च्या येथील एक शिक्षिका सौ.कुशवाह याना मिटीन्ग साठी बडवानीला जायच्याच होत्या म्हणुन त्यान्च्याच बरोबर त्यानी आम्हाला नीसरपुर पर्यन्त जाण्याचा सल्ला दिला,त्याप्रमाणे पहाटे पाच वाजता आम्ही निघालो,डही कडूनचा रस्ता खराब असल्याने अलिराजपुर कुक्षी मार्गे नीसरपुरला सकाळी सात वाजता पोहोचलो.
नीसरपुरला एक डॉ. कनोजिया हे.एम.डी. फिजिशियन आहेत.ते गेली ३५वर्ष ह्या अगदी खेडेगावात जनसेवा करत आहेत.त्या सेवाभावी मानवाला भेटुन धन्यता वाटली.तेथुन पाच कि.मि. वरील कोटेश्वरयेथील दगडूमहाराज अखन्ड रामधून आश्रमात आलो.आसन लावले. सुन्दर बान्धीव घाटावर नर्मदामैय्याच्या सुखकर जलाने स्नान केले.पुजापाठ केला. भोजन प्रसाद झाल्यावर सर्व परिसर पाहिला.मुळ कोटीनाथ मन्दिरात दर्शन घेतले,कनकबिहारी मन्दिरात गेलो.तेथील कमलदास महाराज १०० पेक्षा जास्त वयाचे आहेत,त्यान्च्याकडे वेदपाठशाळा आहे,मोठी गोशाला आहे. महाराजान्चे दर्शन घेतले. हे कोटेश्वर तीर्थही बुडीत क्षेत्रात आहे. आताच येथे मैय्याचे पात्र इतके प्रचन्ड आहे मग आणखी पाणी वाढले म्हणजे किती आणि कसे होईल?क्रमशः

प्रतिक्रिया

सुजित पवार's picture

11 Jul 2012 - 8:20 pm | सुजित पवार

वाचतोय