तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-२०

खुशि's picture
खुशि in भटकंती
4 Jul 2012 - 4:07 pm

सकाळी स्नान पुजा आरती झाल्यावर नास्ताकरुन नास्ता कसला पोटभर जेवणच झाले,पुरी भाजी इडली चटणी जिलेबि खमण लागेल त्याला वरणभात असे सगळे केले होते.श्री. आणि सौ.मान्डके यान्चा निरोप घेउन निघालो.आज मान्डकेनी आमच्या साठी सुमो गाडी दिली होती,भरुचमधील सर्व ठीकाणे दाखवुन गाडी आम्हाला मन्गलेश्वरला सोडणार होती.
गायत्री मन्दिर नर्मदाकिनार्‍यावर एका टेकडीवर आहे.मन्दिरापासुन मैय्यापर्यन्त सुरेख बान्धीव घाट आहे.स्वामीनारायण मन्दिर अक्षरधाम मन्दिरा सारखेच आहे. निलकन्ठेश्वर मन्दिरही खुप सुन्दर आहे.इथेही मैय्याकडे जाण्यासाठी सुन्दर घाट आहे.परिक्रमावासीना राहण्याची आणि भोजन प्रसादाची सोय आहे.त्यानन्तर ओसारा या ठिकाणी महाकाली मन्दिरात आलो. हे मन्दिर फक्त मन्गळवारी दर्शनासाठी खुले असते.माता महाकाली पावागडला जातेवेळी येथे फक्त एक दिवस राहिली होती म्हणून फक्त मन्गळवारी दर्शन होते अशी आख्यायिका आहे.
त्यानन्तर शॉर्टकटने मन्गलेश्वरला आलो त्यामुळे शुक्लतीर्थला जाता आले नाही.मन्गलेश्वरला शशीबेन जोशी यान्च्या घरी आलो.स्वतः शशीबेन आता नाहीत पण ज्योतीबेन,कमलाबेन,बोनीबेन यानी अगदी हसतमुखाने सर्वान्चे स्वागत केले.कमलाबेन अन्ध आहेत पण सर्व काम अगदी केरवारे सुद्धा डोळस माणूस काय करेल इतके निगुतिने करतात.त्यान्च्या घरी ही परिक्रमावासीन्ची सेवा पिढ्यान्पिढ्या चालु आहे.येणार्‍या प्रत्येकाला भोजन मिळते,पडवीत राहण्याची सोयही आहे.आज एकादशी असल्याने फराळाचे होते.भगर,दाण्याची आमटी,साबुदाण्याची खिचडी,ताक आणि केळी असा बेत होता.आमचा उपास नव्हता तरीही फराळ दिलाच.सर्व भगिनी इतक्या प्रेमळ आहेत.खुप छान वाटले.या कुटूम्बाबद्दल सुहास लिमये यान्च्या नर्मदेहर हर नर्मदे या पुस्तकात वाचले होते अगदी तसेच हे कुटुम्ब अगत्यशील आहे.कमलाबेननी त्यान्च्या भावाकडे आवर्जुन जा असे सान्गितले आणि त्याना तसा फोनही केला.जोशी भगिनीन्चा भावपुर्ण निरोप घेउन विनोबा एक्सप्रेस पुढे निघाली.
आता आमचे लीडर होते पुण्याचे श्री. अशोक भागवत.त्यानी गेल्याच वर्षीही पायी परिक्रमा केलेली होती त्यामुळे त्याना रस्ते माहित आहेत.कबीरवडाचे दुरुन दर्शन घेतले कारण ते स्थान पात्राच्या मधोमध आहे आणि परिक्रमा करत असताना तिकडे नियमाप्रमाणे जाता येत नाही. नन्तर भारद्वाज आश्रम पाहिला.भारद्वाजमुनीनि येथे तपस्या केली.मोठी गो शाळा,परिक्रमावासीन्ची निवास व्यवस्था आहे.तिथुन कमलाबेनचे मामेबन्धू श्री. धनन्जय जोशी यान्च्या घरी गेलो.तिथे चहापाणी झाले त्यानी प्रत्येकाला नर्मदामातेचा फोटो,निरान्जनाच्या वातीसाठी कापसाचा पेळू आणि उदबत्या दिल्या.
विनोबा एक्सप्रेस निघाली मुक्कामाच्या ठिकाणाकडे.वाटेत फुलान्चीच शेते होती.झेन्डू,लालगुलाब,पायस,आपल्याकडील कुन्दा या सुवासिक पान्ढर्‍या फुलाना इकडे पायस म्हणतात.७/८कि.मि.वरील झणोरका परा धर्मशिला या गावी मिनी शिर्डी या साईधाम आश्रमात आलो.आश्रम खरोखरच आधीच्या शिर्डीतिल द्वारकामाईप्रमाणे आहे.खाली वीटा लावुन केलेली जमीन वरती पतर्‍याचे छप्पर. छोटासा सुन्दर बगिचा.सुन्दर निर्मळ वातावरण.वाटले इथेच राहावे,हीच खरी शिर्डी आणि हेच खरे साईधाम.साईबाबाना असाच आश्रम अभिप्रेत असणार कारण ते किती साधे होते.
हा आश्रम साईराम शिवकुमार उर्फ साईप्रेमावतार यान्चा आहे.ते नियमितपणे शिर्डीला उलटे चालत जातात.महाराज गावाला गेले होते पण त्यान्चि पत्नी आणि मुला-मुलीने छान स्वागत केले. त्यान्ची मुलगी एम कॉम एमसीए शिकली आहे आणि आता एमफिल ची तयारी करते आहे मुलगा बारावीत आहे. सन्ध्यारती झाल्यावर गरम गरम मुगाच्या खिचडीचा साईप्रसाद मिळाला.उद्या नारेश्वरला प्रयाण. क्रमशः

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Jul 2012 - 7:46 pm | मुक्त विहारि

मस्त लिहीत आहात..