तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-२१

खुशि's picture
खुशि in भटकंती
5 Jul 2012 - 2:01 pm

आज गीता जयन्ती,पहाटे उठुन सर्व आवरुन मैय्याची आणि साईबाबान्ची पुजा आरती केली आणि नन्तर गीतेचा बारावा आणि पन्धरावा अध्याय म्हटले. नन्तर चहा घेउन माताजी,मुले यान्चा निरोप घेउन साईबाबाना प्रणाम करुन मिनी शिर्डी साईधाम सोडले आणि विनोबा एक्सप्रेस पुढे निघालो.
झणोर पर्यन्त साधारणपणे सात कि.मि. चाललो,तिथे दोन मोटरसायकलस्वारानी लिफ्ट दिल्याने विद्याताई भागवत आणि लिलाताई गोजरे या नान्द पर्यन्त गेल्या.बाकी आम्ही सर्वजण पायी गेलो. नान्द पर्यन्तचा रस्ता चान्गला होता.तिथुन एका घराजवळून शेतातुन,टेकड्या चढत उतरत चालत होतो चालताना एक मोर आमच्या बरोबर जवळ जवळ दीडएक कि.मि. चालत होता त्याला जवळचे चणे दाणे घातले नन्तर चॉकलेटचे तुकडे घातले तर तेही खाल्ले मोठे नवल वाटले.वाटेत एक छोटी नदी लागली तिला फारसे पाणी नव्हते ती पार केल्यावर थोड्याच वेळात सोमज,दिलवाडा लागले तिथे चणे-गूळ,खाउन पुढे निघालो हायवे लागला होता. तीनएक कि.मि. चालल्यावर ओज गाव लागले तिथे रस्त्यालगतच मिरा आश्रम होता अकरा वाजले होते पण त्या आश्रमात काही व्यवस्था नव्हती पुढे जाणे क्रमप्राप्त होते.
उन चढायला लागले होते १४/१५कि.मि. चाल झाली होती विद्याताई दमल्या होत्या भागवत म्हणाले तुम्ही सर्वान्चे सामान घेउन रिक्षाने पुढे जाउन नारेश्वरला भक्तनिवासात खोल्या घ्या आम्ही मागुन चालत येतो,म्हणुन एक रिक्षा केली सर्वान्चे सामान आणि आम्ही दोघे,विद्याताई,लिलाताई असे नारेश्वरला श्रीरन्गावधुत आश्रमात आलो. दोन खोल्या घेतल्या. आमचे आवरेपर्यन्त बाकीसर्वजण आले. भोजनप्रसाद घेउन कपडे धुण्याचा कार्यक्रम पार पाडला.
सन्ध्याकाळी पुनित आश्रम पाहण्यासाठी गेलो.तिथे नर्मदा मन्दिर पन्चकुबेरेश्वर मन्दिर आहे.सन्गमरवरी मन्दिर समुह आहे.भक्तनिवासही आहे. मैय्याच्या समोरच्या तिरावर मणीनागेश्वर आणि भालोद दिसत होते.आठदिवसापुर्वी भालोदला श्री.शरदचन्द्र प्रतापे महाराजान्कडे मुक्काम होता.
नारेश्वर महात्म्य.:- हे पवित्र ठिकाण म्हणजे पुराणकालीन कपर्दिकेश्वर महादेव तीर्थक्षेत्र. वेळोवेळी नर्मदेला आलेल्या पुरामुळे जमिनीत गाडले गेले होते.सरदार नारोशन्कर हे शिवभक्त होते त्याना लागोपाठ तीन दिवस स्वप्न द्रुष्टान्त झाला आणि मग त्याप्रमाणे खोदकाम केल्यावर ही शिवपिन्डी मिळाली. मग सरदार नारोशन्कर यानी त्यावर मन्दिर बान्धले,छोटेसे सुबक मन्दिर आहे. नारोशन्कर यान्च्या नावावरुन नाव पडले नारेश्वर.
कालान्तराने या स्थानाकडे दुर्लक्ष झाले आणि सभोवती जन्गल वाढले.जनलोकान्पासुन दुर जाउन साधना करावी म्हणून श्रीरन्गावधुत महाराज या घनदाट जन्गलात वास्तव्यासाठी आले.या भागाला त्या काळी देहरा म्हणत.आसपासच्या सात गावान्चे इथे स्मशान होते.महाराज आले त्यावेळी त्याना जन्मजात एकमेकान्चे हाडवैरी असलेले नाग आणि मोर इथे एकमेकान्शी खेळताना दिसले आणि हा शुभ सन्केत ही देवभुमी आहे असे म्हणुन महाराजानी मन्दिरा समोरील कडूनिम्बाच्या झाडाखाली झोपडी बान्धुन राहण्याचे ठरवले व त्याप्रमाणे ते राहु लागले.
महाराजाना तिथे पहाटे आणि सन्ध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घन्टानाद आरती अ‍ॅकु येत असे आणि भरजरी वस्त्रे घातलेले काहीजण न्रुत्य गायन करताना दिसत,महाराज आपल्या झोपडीच्या ओट्यावर पडून हे पहात पण मराराज उठून बसले की ते द्रुश्य नाहिसे होत असे.अशी आख्यायिका समजली. काही दिवसानी महाराजान्च्या मातोश्री त्यान्च्या जवळ राहण्यास आल्यावर तिथे मोठी झोपडी बान्धली.लोकाना भेटणे सत्सन्ग करणे सुरु केले.१९२५ साली मार्गशीर्ष वद्य चतुर्थीला महाराज या ठिकाणी रहाण्यास आले.
सध्या इथे महाराजान्चे भव्य समाधीमन्दिर आहे.मातोश्रीन्ची मुर्ती आहे सुन्दर बाग,ध्यानकुटीरे,भक्तनिवास,भोजन शाळा वगैरे वास्तू आहेत. बरेच उत्सव येथे होतात,भक्तान्ची मान्दियाळी सदैव लागलेली असते.
नारेश्वरला सान्गलीचे देशपान्डे हे बुजुर्ग ग्रुहस्थ सायकलवरुन परिक्रमा करणारे भेटले.क्रमशः

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

5 Jul 2012 - 4:24 pm | मुक्त विहारि

वाचत आहे..

सुजित पवार's picture

5 Jul 2012 - 5:15 pm | सुजित पवार

पोच पावति

सातबारा's picture

6 Jul 2012 - 9:14 am | सातबारा

वाचत आहे..

- हेच म्हणतो.