तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-१९

खुशि's picture
खुशि in भटकंती
3 Jul 2012 - 6:33 pm

सकाळी स्नान पुजा करुन नावा जेथुन सुटतात त्या ठिकाणी गेलो.रैनबसेरापासुन ते अन्तर दीड दोन कि.मि. असावे.सर्व अन्तरे मी अन्दाजाने लिहिली आहेत,नक्की किती असेल कोण जाणे.ओम्कारेश्वर ते कठपोर आम्ही वीस दिवसात आलो कारण बर्‍याच वेळा वाहनाचा उपयोग केला.एका तासात तीनएक कि.मि. आणि उन चढल्यावरतर ह्यापेक्षाही कमी चालणे होत असे.दिवसभरात आम्ही २०/२५कि.मि. चालत असू. तर तिथे बरीच गर्दी होती,भरती येण्यास बराच अवकाश होता,नावाडी म्हणाले ११वाजता भरती सुरु होईल. मग तिथे बसुन गप्पा-गाणी सुरु केली.बसने परिक्रमा करणार्‍या ग्रुपमधल्या महिला लोकगितातुन नर्मदामैय्याचा उगमापासुन सन्गमापर्यन्तचा प्रवास गात होत्या,खुप गोड गिते होती.
भरतीची वेळ झाल्यावर महाराज आले आणि त्यानी कोण कितीजण कोणत्या नावेत बसणार याची यादी करु लागले.एकेका नावेत ३०/४० जण नावेच्या क्षमतेप्रमाणे बसणार होते.आमचा सारा ग्रुप एकाच नावेत बसणार होता.एकुण आठ नावा होत्या. सर्व नावा मैय्याच्या काठावर ठेवलेल्या होत्या.भरती सुरु झाल्यावर पात्रातुन पाणी आणुन नावान्च्या खाली टाकुन जागा निसरडी करत होते,नन्तर सगळेमिळून त्या नावा ढकलत पात्रात घेउन गेले,खुपच मेहनतीचे काम होते.
त्यानन्तर आमची नावेत चढण्याची कसरत सुरु झाली. बुट काढुन पिशवीत टाकले आणि एकमेकाना साम्भाळत चिखलातुन नावेपर्यन्त गेलो,नाव बरीच ऊन्च होती,तिच्यात चढण्यासाठी एक टायर बान्धलेला होता त्यात पाय ठेवुन कसेबसे चढलो एकदाचे नावेत.कपडे चिखलाने बरबटले,थोडेफार भिजायलाही झाले.आमच्या नावेत ४३जण होतो.पण मजा आली.
सन्गमाच्या दिशेने जलप्रवास सुरु झाला.मैय्या कधी शान्त तर कधी उछलकुद करुन तिची नवनवीन रुपे दाखवत होती.भरतीच्या समेवरतर नाव थोडावेळ लाटान्वर नर्तनच करत होती,मोठमोठ्या लाटा उसळत होत्या,सर्वाना समुद्रस्नान घडले. एका ठिकाणी नावाड्याने सान्गितले सन्गम आला,पुजा करा म्हणून समजले नाहीतर मैय्या कोणती आणि रत्नसागर कोणता हे कळतच नव्हते. नावाड्याने सर्वान्च्या कुपीतिल अर्धे नर्मदाजल सागराला अर्पण करुन त्याच अर्ध्या कुपीत समुद्रजल भरुन दिले.लोकानी आणलेले नारळ नावाड्याने ठेवुन घेतले पण बाकी प्लास्टिकच्या थैल्यातील चुनरी वगैरे सामान आम्ही त्याना पाण्यात टाकू दिले नाही आमच्या नावेपुरतेतरी आम्ही सर्वानी मिळून जल प्रदुषण होणे टाळले.उदबत्ती लावुन मैय्याची पुजा आरती केली. नावाड्याला यथाशक्ति दक्षिणा दिली.अदल्या दिवशी नावेत बसण्यासाठी प्रत्येकी ५०रु. महाराजान्कडे दिले होते कारण नावान्चे व्यवस्थापन तेच बघतात,सरकारी मदत मिळत नाही.
दुपारी बारा ते चार असा प्रवास झाला.चार वाजता नावेतुन उतरण्याचा अवघड प्रकार झाला.जवळजवळ एक कि.मि. चिखलातुन एकमेकाना साम्भाळून कसेतरी बाहेर पडलो.त्यानन्तर खडकाळ रस्त्याने दोनएक कि.मि. चालुन रिलायन्सच्या गेट नम्बर २वर पोहोचलो. तिथे चिखलाने भरलेले हातपाय धुतले.थोड्याच वेळात श्री.अरुण मान्डके यानी गाड्या पाठवल्या. हायवेने ४५कि.मि. वरील भरुचला त्यान्च्या एबीसी एल कम्पनीक्वार्टरच्या बन्गल्यावर पोहोचलो.
श्री. अरुण मान्डके हे भागवतान्च्या ग्रुपमधील शिरगोपीकर यान्च्या भावाचे सासरे.एबीसीएल कम्पनीत मोठ्या हुद्दायावर आहेत.मोठे आदरातिथ्य झाले,चहा घेउन प्रथम स्नान कपडे धुणे करुन मग मैय्याची सायम्पुजा आरती केली.भोजनाला भरली वान्गी,फ्लावरबटाटा रस्सा,वरणभात पोळ्या आणि गोड शिरा असा छान बेत होता.मान्डकेन्चा बन्गला खुप मोठा आहे त्यामुळे सर्वान्ची आरामात सोय झाली.उद्यापासुन उत्तर किनार्‍याने परिभ्रमण परिक्रमा सुरु. क्रमशः

प्रतिक्रिया

सुजित पवार's picture

3 Jul 2012 - 10:22 pm | सुजित पवार

नुकतेच हर नर्मदा वाचले. आनि आपला अनुभव पन वाच्तोय. खुप इच्चा होते अता मला पन हि परिक्रमा करायचि.