तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-१५

खुशि's picture
खुशि in भटकंती
28 Jun 2012 - 2:30 pm

स्नान पुजारती करुन निघणार तोच महाराज म्हणाले,नास्ता केल्याशिवाय जायचे नाही,त्यानी स्वतः उभे राहुन पोहे बनवुन घेतले. स्कन्देश्वराची शास्त्रोक्त पुजा पहाटेच झाली होती.तिथे एक मामा आहेत थोडे अपन्ग आहेत पुजेच्या तयारीची जबाबदारी त्यान्ची असते. ह्यान्चे पोट दुखत होते दोनतीन दिवसापासुन.तर त्या मामानी त्यान्चा फोन नम्बर दिला आणि म्हणाले रस्त्यात जास्त त्रास झाला तर फोन करा मी गाडी घेउन येइन मग आपण दवाखान्यात जावू.दुखणे अन्गावर काढू नका.अशी सगळी प्रेमळ माणसे. नास्ता चहा घेउन विनोबाएक्स्प्रेस पुढे निघाली.
साधारण एक कि.मि.वर कान्दरोज गाव आहे.आमच्या बरोबर काल कार्तिकेश्वर आश्रमात वस्तीला असलेले एक बुजुर्ग परिक्रमावासी चालत होते,साधारण २/३कि.मि. चालल्यावर एका ठिकाणी त्यानी एका डेअरीतुन दुध घेतले आणि एका घरात फक्तदुधाचा फक्कड चहा करायला दिला,आम्ही पुढे निघालो होतो तर म्हणाले,मैय्याजी आप लोग पन्डीत हो {ब्राम्हण आहात} आपको चाय पिलाना बडा पुण्यका काम है इसलिये आपकेलियेही ये दुध लिया है चायपिकेही आगे बढिएगा. मग आमचा नाईलाज झाला.मध्यप्रदेश,गुजराथ मध्ये ब्राम्हणाना फार आदराने वागवले जाते.आमच्या सारख्या जात-पात न मानणार्‍यान्ची अशावेळी फार पन्चाईत होते. असो. नर्मदेहर.
साधारणपणे तीन कि.मि. चाललो नावडोगाव आले.दोन रस्ते फुटले होते,दुकानात चौकशी केली डाव्या हाताच्या रस्त्याने जायचे होते,त्याच दुकानात बिस्किटे,साबण वगैरे घेतले आणि पुढे निघालोंअन्तर तीन कि.मि.वर वडीयातलाव गाव आले,तिथे गौआश्रम आहे.श्रीक्रुष्णाचे मन्दिर आहे,दर्शन घेतले तेथिल दुकानदाराने आम्हाला थन्डपाण्याचे पाऊच दिले. नर्मदेहर. तिथुन पुढे एक कि.मि.वर वेलुग्रामला जाणारा फाटा लागला पण आमच्या लिस्ट मध्ये असलेला आशाघाटचा आसा आश्रम तर दिसला नव्हता त्यामुळे हे वेलुग्राम वेगळे असेल म्हणुन आम्ही तिकडे न जाता सरळ निघालो.तीनएक कि.मि. चाललो असु,हान्चे पोट खुपच दुखायला लागले,त्याना चालवेना.निर्मोही आश्रम अजुन बराच लाम्ब होता आणि एखाद्या मोठ्या गावात जाणेच अशा परिस्थितीत योग्य होते.
काहीजण तिथे उभे होते ते बसची वाट पहात होते, उमल्ला गाव येथुन १५कि.मि. होते त्या गावाहुन १०कि.मि.वर राजपारडी हे तालुक्याचे ठिकाण होते मग आम्हीही उमल्ला येथे जाण्याचे ठरवले.थोड्याच वेळात एक सहासिटर विक्रम रिक्षा आली तिने उमल्ला येथे आलो. आता राजपारडीला जायचे होते,एखादे वाहन मिळावे म्हणून वाट बघत रस्त्यावर उभे होतो,एक पोलिस जीप आमच्या जवळ येउन थाम्बली आणि त्यातील ट्राफिक इन्स्पेकटरने आम्हाला नर्मदेहर केले आणि विचारले पेहचाना नही क्या? आम्ही खरेच ओळखले नव्हते,एवढ्या दिवसाच्या प्रवासात कुणा पोलिसाची ओळख झाल्याचे स्मरत नव्हते,नाही आम्ही मान हलवली.ते इन्स्पेक्टर म्हणाले मै नगीनभाई आप हमारे घर आये थे.खरच की तेव्हा ते युनिफॉर्ममध्ये नव्हते आणि आता कडक युनिफॉर्म होता कसे ओळखणार?
त्यानी इकडुन कसे काय आलात विचारले ह्यान्च्या पोटदुखीबद्दल सान्गितले ते म्हणाले चला राजपारडीला मग बसलो जीपमध्ये.बोलता बोलता आम्हाला नन्तर भालोदला जायचे आहे असे म्हटले तर नगीनभाई म्हणाले राजपारडीहुन भालोद फक्त ७कि.मि. आहे तेव्हा तुम्ही आजच भालोदला जावू शकाल आम्ही ठीक आहे म्हटले,पोट दुखायला लागल्यावर लगेचच त्याना गोळी दिली होती त्यामुळे त्याना आता थोडे बरे वाटत होते म्हणुन राजपारडीला अजुन काही गोळ्या घेउन भालोदला जाण्याचे ठरवले.राजपारडीला नगीनभाईन्च्या पोलिसचौकीत पोहोचलो.
पाणी पिवुन मी समोरच्याच मेडिकल दुकानातुन गोळ्या घेउन आले.जेवण्याची वेळ झाली होती हलके अन्न म्हणुन नगीनभाईनी जिरा राइस मागवला आणि आम्हाला खायला लावला,बिसलरी पाण्याच्या दोन बाटल्याही दिल्या.एवढेच नाहीतर एका रिक्षावाल्याला पैसे देउन आम्हाला भालोदला सोडण्यास सान्गितले. अशी सज्जन,मोठ्या मनाची माणसे मैय्या आम्हाला वारन्वार भेटवीत होती.
राजपारडीला चौकीत बसलो असताना एक भयन्कर प्रकार बघायला मिळाला मन सुन्न करणारा. मोठा गडबड गोन्धळ उडाला आणि पोलिस एका माणसाला गच्ची पकडून घेउन आले,काय झाले आम्ही घाबरुनच गेलो.त्या माणसाने म्हणे एक गरिब आदिवासी मुलगी विकत घेतली होती अवघ्या ५०,००० रुपयाना.त्या मुलीच्या गावातील काही जणानी त्याला रन्गेहात पकडुन त्यान्च्यातील मध्यस्थासह पकडले होते.ती मुलगी तिचे कुटुम्बीयही होते,मुलगी फारतर १४/१५ वर्षान्ची असावी्आ प्रकार पाहुन आम्हीतर हादरुनच गेलो.गुजराथ सारख्या राज्यातही असले प्रकार होतात?बाप रे.
नगीनभाईनी आम्हाला रिक्षात बसवुन ताबडतोब रवाना केले.दोन वाजता भालोदला श्री.शरदचन्द्र प्रतापे महाराजान्च्या दत्तकुटीरमध्ये पोहोचलो.महाराज नव्हते ते बदलापुरच्या बापट गुरुजीन्च्या परिक्रमे बरोबर गेले होते. महाराजान्चे शिष्य राहुल,सोमण,आणि नाशिकच्या विनयनगरमधील रहिवासी खगेन्द्रबुवा यानी स्वागत केले त्यानी महाराजाना फोन केला,महाराज म्हणाले परान्जपेना सान्गा मी आल्याशिवाय जायचे नाही.ते उजैनीला होते.
हात-पाय धुवुन जेवायला बसलो,वरण-भात भाजी गरमगरम पोळ्या.अगदी घरच्यासारखे मराठमोळे जेवण.अन्तरात्मा त्रुप्त झाला. क्रमशः

प्रतिक्रिया

राजो's picture

28 Jun 2012 - 2:39 pm | राजो

एकाच प्रकरणात संपवुन टाका... वैताग आला आहे..

धन्यवाद.तुम्ही वाचु नका.

शिल्पा नाईक's picture

28 Jun 2012 - 3:16 pm | शिल्पा नाईक

छान लिहिता आहात. प्रदेश माहीत नाही, पण त्याने फरक पडत नाही इतक प्रभावी वर्णन वाटतय.

उदय के'सागर's picture

28 Jun 2012 - 4:02 pm | उदय के'सागर

छान... हा भाग जरा इतर भागांपेक्षा वेगळा वाटला, परिक्रमेबद्दल जरा कमी माहिती पण एकंदरीत छान, असेही अनुभव येउ द्या...

विजय मुठेकर's picture

28 Jun 2012 - 4:13 pm | विजय मुठेकर

छान... खुशी तै, प्रवास वर्णन खूप छान करता तुम्ही. पण तुम्ही परिक्रमा करत असताना (म्हणजे चालत असताना) नामस्मरण, भजन, गप्पा वगैरे काही करत असाल ना, बाकीच्या परिक्रमावासीयाबरोबर.......... तेही अनुभव सान्गा की आम्हाला................ तेवढेच परिक्रमा पुण्य (घरबसल्या)

पैसा's picture

28 Jun 2012 - 11:35 pm | पैसा

तुम्ही परिक्रमा करताना फार कठोर नियम घालून घेतले नाहीत हे बरं झालं. बरं नाही, अति दमायला झालंय अशा वेळी पायी चालत रहायचा हट्ट बरोबर नाहीच.