तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा भाग-१७

खुशि's picture
खुशि in भटकंती
30 Jun 2012 - 6:02 pm

भालोदला पुण्याच्या निखिल वाळिम्बेची भेट झाली.तसेच चन्द्रकान्तविचारे यान्ची भेट झाली,विचारे सायकलवर परिक्रमा करत होते.रात्रीच्या भोजनाच्या वेळी सर्वान्ची एक पन्गत करुन खिचडीचे पातेले मधोमध ठेवून बसलो,कुर्‍डया पापड,लोणचे,तळलेले मिरचीचे सान्डगे असा छान मराठमोळा बेत होता.महाराजही आमच्याच बरोबर बसले होते,मोठ्या मजेत हास्यविनोद करत जेवणे झाली नन्तर चान्दण्यात गप्पाही झाल्या.खुप मजा आली.
पहाटे उठलो,काकड आरती झाल्यावर अन्गण झाडुन सडा-रान्गोळी केली,स्नान पुजा आरती करुन नास्त्यासाठी पोहे केले. चहा-पोहे खाऊन निघालो,निखिल आज राहणार होता,विचारे सायकलवर जाणार होते त्यामुळे आम्ही दोघेच निघालो.
मैय्याकिनार्‍याने खुप दलदल असल्याने गावातुन रस्त्याने जाणे क्रमप्राप्त होते,महाराज आणि बाकी सर्वान्चा निरोप घेउन,नर्मदेहर म्हटले आणि विनोबाएक्स्प्रेसचा प्रवास पुढे सुरु केला.साधारणपणे ३कि.मि. गेल्यावर एक नदी लागली नदी ओलान्डून पलिकडे एक रस्ता दिसत होता आणि एक आम्ही उभे होतो त्या किनार्‍याने वरच्या बाजुने एक रस्ता होता कोणता रस्ता आमचा होता? नदीला गुढग्यापर्यन्त पाणी असावे असे वाटत होते,पाण्याला ओढही बर्‍यापैकी दिसत होती काय करावे ह्या विचारात होतो तितक्यात विचारे आले,त्यानी आधीही परिक्रमा केलेली असल्याने त्याना रस्ता माहित होता,नदीपलिकडचा रस्ता आमचा होता. बुटमोजे काढून हातात घेतले,मी एका हाताने विचारेन्ची सायकल धरली आणि नदी पार केली.आधी विचारे भालोदला राहाणार होते पण मग त्यान्च्या मनात विचार आला,वाटेत नदी आहे परान्जपे आणि वहिनी दोघेच आहेत,त्याना माहीत होते नदीला पाणी असते आणि म्हणुन त्यानी लगेच निघायचा विचार केला आणि ते आले. फक्त एक दिवसाची ओळख तरी त्याना आमच्याबद्दल एवढे वाटले,हीच मैय्याची क्रुपा.
नदी पार केल्यावर विचारे पुढे गेले,अर्थात मला जाऊ का? असे विचारुनच ते गेले. नदीपलिकडच्या रस्त्याला चिखल होता कारण नदीतुन ट्रक्टर,बैलगाड्या जात असल्याने चिखल झाला होता,बुट घालण्यासाठी बसायला जागा नव्हती म्हणुन थोडे अन्तर तसेच चालावे लागले.एक वस्ती लागली,झोपडीतिल माताजीना विचारुन त्यान्च्या ओट्यावर बसलो,हातपाय धुतले,तो पर्यन्त त्या माताजीनी चहा केला मैय्या तुझ्या लेकरान्चे कौतुक करावे तितके कमीच आहे. नर्मदेहर.
पुढे निघालो.४कि.मि.वर अविधा गाव आले.तिथे रामेश्वराचे प्राचिन मन्दिर आहे.दर्शन घेतले,ओट्यावर बसलो.तिथे डेअरीला दुध घालण्यासाठी आजुबाजुच्या गावातुन लोक आले होते,एका टेम्पोत डिग्री लावुन दुध सन्कलीत केले जात होते.रामेश्वर मन्दिराच्या आवारात एक खोली होती,एका ग्रुहस्थानी ती खोली उघडली आणि आम्हाला तिथुन भान्डे घेउन त्या शेतकर्‍यान्कडुन दुध घेउन चहा करुन प्या असे सान्गितले.ती खोली परिक्रमावासीन्साठी आहे,तिथे काही भान्डी,वातीचा स्टोव्ह होता पण आम्ही थोड्यावेळापुर्वीच चहा घेतला होता म्हणून नको म्हटले.
अविधा बर्‍यापैकी मोठे गाव आहे,पुढे निघालो. साधारणपणे ३/४ कि.मि. गेलो रस्त्याच्या कडेला एक बोर्ड दिसला मढी-तरई ३कि.मि. आम्हाला जगदीशमढीला जायचे होते आणि ते झगडियाला होते,हे वेगळे असेल म्हणुन आम्ही पुढे निघालो. नवीन रेल्वे लाइन टाकण्याचे काम चालु होते,एका बान्धकाम चालु असलेल्या पुलाजवळ थोडे विश्रान्ती घ्यावी म्हणुन थाम्बलो,उन चढायला लागले होते,थकवाही वाटू लागला होता.दहा वाजुन गेले होते.
कैलास प्रजापति नावाचा मुलगा आम्हाला पाहुन थाम्बला,आपुलकीने आमची चौकशी केली,म्हणाला मढीचा रस्तातर मागे राहिला,आम्हाला झगडियाला जायचे आहे म्हटल्यावर त्याने स्वतःचा मोबाईलनम्बर दिला आणि काही वाटले तर फोन करा असे सान्गुन गेला. थोडावेळ बसुन आम्ही पुढे निघालो. दोनेक कि.मि. नन्तर कराड गाव आले,रस्त्यावर कैलास प्रजापती आमची वाट बघत उभा होता,आग्रहाने आम्हाला घरी घेउन गेला त्याच्या आईने हसुन स्वागत केले थन्ड पाणी दिले.जेवण करण्याचा आग्रह केला पण ह्यान्चे पोट आज पुन्हा दुखायला लागले होते त्यामुळे नको म्हटले. मग चहा घेतला.कैलासने आमच्या पाण्याच्या बाटल्या थन्ड पाण्याने भरुन दिल्या,म्हणाला हन्डपम्पाचे पाणी पिऊ नका,अक्वागार्डचे पाणी देतो.अशी अगत्यशील माणसे आहेत.
कराडगावातुन कैलास प्रजापती आणि त्याच्या आईचा निरोप घेउन पुढे निघालो.दोनेक कि.मि. वर वाघपुरा गाव आले,इथुन जगदीशमढीचा रामधुन आश्रम आणखी तीन कि.मि. दुर होता.बारा वाजले होते,ह्यान्चे पोटही दुखत होते,वाघपुराला हायवे होता आणि इथुन अन्कलेश्वर १५कि.मि. होते.अन्कलेश्वरला आमची भाची राहते तिच्याकडेच आम्हाला नन्तर जायचेच होते,म्हणुन आम्ही आश्रमात न जाता सरळ अन्कलेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला.वाघपुराच्या बसस्टॉपवर उभे राहिलो. एका मारुती गाडीतुन अन्कलेश्वरला आलो.अन्कलेश्वरच्या राजपिपला चौकडीवर सदानन्द होटेलजवळ आमचे जावई श्री.ओन्कार कर्वे आम्हाला घेण्यासाठी आले. वाटेत एका ठिकाणी कोल्डड्रिन्क पिवुन दोन कि.मि. चालत आमच्या भाचीच्या मिनूच्या घरी आलो.
मिनूला खुप आनन्द झाला म्हणाली,मामाचा वाढदिवस आज माझ्या घरी साजरा होणार.अरेच्चा! खरेच की,आज ह्यान्चा वाढदिवस आहे.आम्ही विसरलोच होतो. क्रमशः

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

30 Jun 2012 - 6:20 pm | स्पंदना

नर्मदे हर!
कशी माणस जोडली जातात ना खुशी ताई? एका दिवसाची ओळख ती काय अन कोणी तुमच्या साठी स्वतःचा ठरलेला प्लान सोडुन आधि निघतो. रस्त्याला भेटलेला मुलगा पुढे जाउन तुमची वाट पहातो. खर सांगु एव्हढा माणुसकीचा अविष्कार बस आहे तुम्हा आम्हाला विरघळायला.
तिन्ही भाग उत्तम. अस वाटतय एक चालण सोडल तर मस्त पाहुणचार चाललाय नर्मदेच्या काठाला. भाग्यवान आहात. अन रहालही.

विजय_आंग्रे's picture

30 Jun 2012 - 6:21 pm | विजय_आंग्रे

वाचतोय...