युद्ध - कोणाचं कोणाशी

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
29 Dec 2010 - 12:27 am

हे काय चाललंय, काही समजत नाही, विचारांच्या भुंग्यांनी डोकं पोखरुन टाकलं होतं, आधिच घरची ही एवढी कामं आ वासुन पुढे उभी होती त्यात हे अजुन काय. त्याच्या सारख्या सॆनिकाला या सगळ्याचा आता खरंतर उबग आला होता. गेली काही वर्षे सगळं व्यवस्थित चालु होतं, आजुबाजुच्या इतर राज्यांच्या सतत चालु असलेल्या लढाया आणि नॆमित्तिक युद्धं या बद्दल तो नेहमीच त्या राज्यातल्या मित्र व नातेवाईकांबरोबर बोलत असे. पण आता त्यांच्या समस्या त्याला आता आपल्या समोर उभ्या असलेल्या दिसत होत्या, आपल्या वाटत होत्या. त्यानं बाकी सगळ्यांना सुचविलेले काही महत्वाचे काही विनोदी मार्ग आता त्याच्याच भोवती फेर धरुन नाचत आहेत असं त्याला वाटत होतं, पण या सगळ्याला घाबरेल तो मोदद कसला.

मोददला त्याच्या वडिलांनीच शिकवलं होतं आल्या प्रसंगाला न घाबरता तोंड द्यायला. त्याचं आयुष्य त्याच्या पत्रिकेत दिल्याप्रमाणे, त्याची रास व्रुश्चिक होती, आणि या राशीला संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला असतो. अर्थात हे मोदादनं वाचलेलं होतं. त्याच्या या ज्योतिष, देव, धर्म या गोष्टींवर विश्वास नव्हताच.

आजची लढाई ही चालु तर होती पण ती होती तात्विक पातळीवर म्हणजे त्याच्या अधिकार कक्षेच्या बाहेरची, पण मोददला ह्या गोष्टी त्याच्या बुद्धीच्या बाहेरच्या कधीच वाटल्या नव्हत्या. तसा तो त्याच्या सॆन्यात फक्त एक रथि होता पण वास्तविकता तर ही होती की त्याच्याच सॆन्यातले नाही तर ब-याच शत्रुसॆन्यातले देखील महारथी त्याला सामोरं जाणं टाळत.

चालु असलेल्या लढाईची मोददला काही दिवसांपुर्वी थोडी कल्पना आलेली होती, त्याचे विचार फक्त तलवारी किंवा भाल्यांच्या कक्षेत कधीच बसणारे नव्हते, तो नेहमी समोरच्या डोळ्याला जखम करण्यापेक्षा त्या डोळ्यात असणा-या त्याच्या कुटंबाच्या दिसणा-या शेवटच्या प्रतिमेवर जास्त लक्ष द्यायचा. समोरच्या डोळ्यांत डोळे घालुन पाहिले की होणारी जखम जास्त विषारी असते हे त्याला नेहमीच माहीत होतं. गदेनं डोकं फोडण्यापेक्षा त्या डोक्याच्या आतल्या विचारांची दिशा बदलुन त्याला गोंधळवुन लढायला जास्त मजा येतं हे त्याला आवडायचं.

मोददनं आपल्या वडिलांबरोबर जंगलात ब-याच वेळा जंगली जनावरं पाहिली होती, जवळुन, लांबुन. आपण त्या वाघापासुन लांब असतो त्याला दिसत नाही तरी तो कसा रागावतो, ओरड्तो याचं त्याला नेहमीच आश्चर्य वाटायचं. पण बरीच वर्षे त्या जंगलात घालवल्यावर त्याला पण हल्ली वाघा-सिंहाचे वास येत, त्याचा हात नकळत कंबरेला लावलेल्या तलवारीकडे जाई. तसाच जशी त्या वाघाची नखं बाहेर निघत त्याच्या पंजातुन.

पण या वेळी कसं काय आपण बेसावध राहिलो याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याच्या दुस-या मनानं त्याला या टाळता न येणा-या भविष्याची थोडी चुणुक दाखविली होती काही काळापुर्वी. त्या कडे त्यानं मुद्दाम दुर्लक्ष केलं होतं की नव्या संसाराच्या, नव्या घराच्या गडबडीत तो हे विसरुन गेला होता हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं.

क्रमशः

कथाजीवनमानराहणीनोकरीप्रकटनविचारअनुभवप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

नूस्ताच सस्पेन्स लीवलाय.. त्याच असं झाल होत आणी तसं झाल होत.. हे व्हायच आन ते असायच.... ह्यांव झालं अनं ट्यांव घडून गेल.. विचार चक्रातून भानावर आलो आन डोक सून्न झालं... त्याला हे आवडाय्च आन ते पटाय्च आन बेसावध राहिलो याचं त्याला आश्चर्य बी वाटून गेल... इत्यादी....

आधिच घरची ही एवढी कामं आ वासुन पुढे उभी होती त्यात हे अजुन काय. त्याच्या सारख्या सॆनिकाला या सगळ्याचा आता खरंतर उबग आला होता.
लय झाक लाइन हाय.

-तीस मार खान

५० फक्त's picture

29 Dec 2010 - 12:03 pm | ५० फक्त

नाही हो सुपर हिरो नाही, एका साध्या अधिकार शुन्य पण बुद्धिमान सॅनिकाची कथा आहे ही.

खरंतर ही गोष्ट - एक होतं हाय फाय राज्य अशी सुरु करणार होतो, पण काही बंधनं आआहे,कथेला थोडी वास्तवाची जोड आहे.

पण तुम्ही सुचवताय तसं ही कथा साय-फाय किंवा सुपर हिरो पण करता येईल, आणि तसं झालं तर सगळ्यांपेक्षा मलाच जास्त आनंद होईल.

आस व्हय ? मंग जास्त आनंदी न बनता पूढचा लेख पट्कन लीवून टाका बघू ? आन त्यात थोडं जास्त लांबीच आन माहीतीपूर्ण लीवा... कोम्डी ४ आण्याची आन मसाला १ रूपय्चा आसले काय ते करू नका औंदाला..... कस्सं ?

आधिच घरची ही एवढी कामं आ वासुन पुढे उभी होती त्यात हे अजुन काय. त्याच्या सारख्या सॆनिकाला या सगळ्याचा आता खरंतर उबग आला होता.
लय झाक लाइन हाय.

प्राजु's picture

29 Dec 2010 - 8:40 am | प्राजु

बरं! पुढे??

सांगेन, प्राजुताई, युद्धाच्या पुढच्या तारखा दोन्ही बाजुंनी ठरवलेल्या आहेतच.

युद्धाची परिस्थिती जशी जशी पुढे जाईल आणि विविध सत्यं / असत्यं बाहेर येत जातील तशी तशी कथा पुढं सरकत जाईल.

फक्त या सगळ्यांत मोददचा बळी जाउ नये ही इच्छा.

हर्षद.

आत्मशून्य's picture

11 Jan 2011 - 10:31 am | आत्मशून्य

युद्धाच्या पुढच्या तारखा दोन्ही बाजुंनी ठरवलेल्या आहेतच.

आँ दोन्ही बजून तारखा पडल्यात ? हे यूध्द हाय का लगीन ?

फक्त या सगळ्यांत मोददचा बळी जाउ नये ही इच्छा.

-देवाक काळजी

नमस्कार,

प्रतिसादक वाचकांचे अतिशय आभार व वाचनमात्रांना पण धन्यवाद.

या लेखमालिकेचा दुसरा भाग इथं आज प्रकाशित केला आहे, वाचुन प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती.

http://misalpav.com/node/16270