बळी [शतशब्दकथा]

निओ's picture
निओ in जनातलं, मनातलं
8 Oct 2017 - 8:50 am

रणरणतं ऊन, तापलेला रस्ता. सामसूम सोसायटी. हा रस्त्याच्या कडेने चाललेला....उपाशीपोटी. काहीतरी खायला मिळेल या आशेवर.

समोर एक मुलगी त्याच्याकडेच पाहत राहिलेली. हा बावरला. भलतीकडे आल्यासारखे वाटले. जवळच्या झाडाच्या आडोशाला गेला. कानोसा घेऊ लागला. अजून माणसं जमली. सारे रोखून त्याच्याकडे पाहत होते. कुजबुजत होते. हा घाबरला, अंग चोरू लागला.
..................................

लोक जवळ आले. हा टकामका त्यांच्याकडे पाहत होता. त्याला समजायच्या आत दणादण् दणके त्याच्या अंगावर कोसळले. नजरेसमोर अंधारी आली. कळवळला. जमिनीवर गडाबडा लोळू लागला. दणके वाढले. आचके देऊन एकदाचा शांत झाला.
.................................

एकाने काठीवरून त्याचे वेटोळे बाहेर फेकले.
"चुकी तुझी नाही, आमची पोरं निर्धोक राहावी म्हणून तुझा बळी घेतला", तो पुटपुटला.

कथासमाजजीवनमानप्रकटनविचारलेखबातमीअनुभवमत

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

8 Oct 2017 - 9:04 am | उगा काहितरीच

चांगली कथा म्हणायला मन धजावेना ! :-(

आपल्याकडे सापांना दिसला रे दिसला की मारायची प्रवृत्ती आहे. पण आता सर्पमित्रांना बोलावण्याचीही चांगली पद्धत सुरू झाली आहे हे बरे आहे.

कथा आवडली.

अभिजीत अवलिया's picture

8 Oct 2017 - 12:52 pm | अभिजीत अवलिया

कथा आवडली.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Oct 2017 - 1:50 pm | अमरेंद्र बाहुबली

खुप आवडली कथा. मु देखील सर्पमित्र आहे त्या मुळे जास्तच भावली.

पुंबा's picture

9 Oct 2017 - 12:10 pm | पुंबा

उत्तम शशक

इनिगोय's picture

9 Oct 2017 - 1:22 pm | इनिगोय

हुश.. साप होताअसं क्षणभर वाटलं.आणि मग ते वाटणंही चूक वाटलं.
छान जमलीय.

निओ's picture

23 Oct 2017 - 11:50 pm | निओ

उगा काहितरीच, एस सर, अभिजीत अवलिया, सौरा, अमरेंद्र बाहुबली, ईनिगोय....धन्यवाद!