आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ९

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
20 Nov 2014 - 5:17 pm

आठव्या डावात आनंदने निर्णायक विजय खेचून आणणे आवश्यक असताना नीरस बरोबरी झाली.
मधल्या एका विश्रांतीनंतर आज नवव्या डावात आनंद 'डू ऑर डाय' परिस्थितीत आहे.
काळी अथवा पांढरी मोहोरी न बघता त्याने विजयासाठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे अन्यथा सामना पुरे १२ डाव देखील होणार नाही अशी (चेन्नै साधार) भीती वाटते! :(
काळ्या मोहोर्‍यांकडून खेळताना आनंदने कायम बरोबरीचे ध्येय ठेवल्यासारखे आतापर्यंतच्या डावांत वाटत आले आहे.
आज आनंद पुन्हा एकदा जोमदार प्रयत्न करेल अशी आशा ठेवूयात आणि डावाकडे वळूयात.
अजून १५ मिनिटे आहेत. तोवर कोणीतरी पट लावा रे!! :)

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

20 Nov 2014 - 5:26 pm | बहुगुणी
चतुरंग's picture

20 Nov 2014 - 5:32 pm | चतुरंग

बर्लिन डिफेन्स! बर्लिनची भिंत काही हलायला तयार खेळतोय्दोघेही वेगाने खेळत आहेत दीड मिनिटात १० खेळ्या झाल्यात!

संजय क्षीरसागर's picture

20 Nov 2014 - 5:37 pm | संजय क्षीरसागर

.

प्रसाद गोडबोले's picture

20 Nov 2014 - 5:51 pm | प्रसाद गोडबोले

माझ्या मते ती स्टॅन्डर्ड खेळी आहे बर्लिन मध्ये

संजय क्षीरसागर's picture

20 Nov 2014 - 5:54 pm | संजय क्षीरसागर

आता हत्ती बाहेर काढणं जिकीरीचं होतं

प्रसाद गोडबोले's picture

20 Nov 2014 - 6:02 pm | प्रसाद गोडबोले

माझ्या मते हत्ती हा एच ६ नंतर जी ६ असाच बाहेर काढायचा प्लान असतो डायरेक्ट पांढर्‍याच्या कॅसलीन वर अ‍ॅटॅक !

संजय क्षीरसागर's picture

20 Nov 2014 - 6:14 pm | संजय क्षीरसागर

पण या प्रकारात आपलीच प्यादी आपल्याला अडथळा होतात असं वाटतं.

चतुरंग's picture

20 Nov 2014 - 6:13 pm | चतुरंग

मोहोर्‍यांचा विकास साधणे हे मुख्य ध्येय असते कॅसलिंग करण्यात एका खेळीचा टेंपो जातो..

संजय क्षीरसागर's picture

20 Nov 2014 - 6:16 pm | संजय क्षीरसागर

ती कायमची डोकेदुखी होईल.

मग्नुस बरोबरेसाठीच खेळतोय की काय?

बहुगुणी's picture

20 Nov 2014 - 5:43 pm | बहुगुणी

कळलं नाही!

प्रसाद गोडबोले's picture

20 Nov 2014 - 5:53 pm | प्रसाद गोडबोले

कारण जितक्या लवकर पीसेस कॅन्सल होतील तितक्या लवकर डाव ड्रॉ होईल अन मग्नुस ला घरीजाऊन उद्याच्या अवघड डावाची तयारी करता येईल ...

आजचा डाव ड्रॉच होणार ... उद्या आनंद काही तरी भन्नाट करेल अशी अपेक्षा आहे !

बहुगुणी's picture

20 Nov 2014 - 5:52 pm | बहुगुणी

आता तरी ही मॅच लाईव्ह दाखवताहेत

धावत जौन एनडीटीवी चे तिन चॅनल पाहिले .
नाय दिसल. :-(

चतुरंग's picture

20 Nov 2014 - 6:14 pm | चतुरंग

http://www.sochi2014.fide.com/

थोडे स्क्रोल करुन खाली गेलात की मध्यभागी पट दिसेल. पीटस्विडलरची कॉमेंट्री सुद्धा छान असते...

चतुरंग's picture

20 Nov 2014 - 6:17 pm | चतुरंग

घड्यालात मागे पडलाय जवळपास २३ मिनिटांनी! आनंदने तेराव्या खेळीनंतर त्याला विचारात पाडले आहे.
ओके ई६ प्यादे पुढे ढकलले मॅग्नुसने. आता ते प्यादे अडचणीचे ठरु शकते त्यामुळॅ आनंदने त्याचे मोहोरे बचावात रोखायला हवेत.

संजय क्षीरसागर's picture

20 Nov 2014 - 6:22 pm | संजय क्षीरसागर

ई६ प्याद्यामुळे मोठा लफडा होणार असं दिसतंय!

आनन्दा's picture

20 Nov 2014 - 6:33 pm | आनन्दा

अरे काय धन्दे? आम्ही घरात खेळायचो तसे खेळतायत वाटते. तीन वेळा?

चतुरंग's picture

20 Nov 2014 - 6:33 pm | चतुरंग

का राव? हॅ आपल्याला नाही आवडले.... :(

आतिवास's picture

20 Nov 2014 - 6:34 pm | आतिवास

काही कळलं नाही आज!

संजय क्षीरसागर's picture

20 Nov 2014 - 6:33 pm | संजय क्षीरसागर

.

बॅटमॅन's picture

20 Nov 2014 - 6:34 pm | बॅटमॅन

काय कटकट आहे भेंडी. ड्रॉ??????

आनन्दा's picture

20 Nov 2014 - 6:37 pm | आनन्दा

बहुधा त्या मूव वर सगळे अवलंबून होते, मॅग्नुसला दोन घोड्यांच्या सहाय्याने आक्रमण करायचे होते, तर आनंदला राजाच्या सहाय्याने ते तिथेच थांबवायचे होते.. शेवटी ड्रॉ.

नाही तुला, नाही मला घाल %^%#^#

चतुरंग's picture

20 Nov 2014 - 6:50 pm | चतुरंग

मॅग्नुससाठी धक्कादायक होता! त्याने तयारी केली होती त्याप्रमाणे डाव झाला नाही त्याने एफ ६ असे प्यादे पुढे टाकणे अपेक्षिले होते.
त्याचे ई६ वरचे प्यादे आणि दोन घोडी याच्या जोरावर आनंदची राजाची बाजू चेपून तिथे प्याद्यांची संख्या वाढवायची आणि नंतर मोहोरी मारामारी करुन एंडगेमला घुसायचे..परंतु आनंद आणि टीमने आज वेगळाच पवित्रा घेतला.

उरलेल्या ३ डावतले दोन डाव पांढर्‍याचे आहेत त्यासाठी काही खास तयारी आनंद आणि टिमने केली आहे हे नक्की!
आनंद अगदी कंफर्टेबल वाटतोय प्रेस काँन्फरंसमधे...

प्रसाद गोडबोले's picture

20 Nov 2014 - 7:27 pm | प्रसाद गोडबोले

उरलेल्या ३ डावतले दोन डाव पांढर्‍याचे आहेत त्यासाठी काही खास तयारी आनंद आणि टिमने केली आहे हे नक्की!
आनंद अगदी कंफर्टेबल वाटतोय प्रेस काँन्फरंसमधे

येस्स ... माझाही तसाच अंदाज आहे ! उद्या काहीतरी भन्नाट पहाय्ला मिळेल अशी आशा आहे :)

जेपी's picture

20 Nov 2014 - 6:59 pm | जेपी

एवढ्या लवकर ड्रॉ
स्कोर काय झाला.

बहुगुणी's picture

20 Nov 2014 - 7:37 pm | बहुगुणी

कार्लसन ५- आनंद ४

जेपी's picture

20 Nov 2014 - 8:09 pm | जेपी

:-(

आनंदला तीन पैकी २ गेम्स जिंकायलाच पाहिजेत आणि एक ड्रॉ झाला तरी हरकत नाही. त्याला आता एकही गेम हारता येणार नाही.

कार्लसननं तीनही गेम ड्रॉ केले तरी त्याला काही फरक पडत नाही. तो एक गेम हारला तरी दोघं इक्व्कल होतील. आणि तीन पैकी एक जरी जिंकला तर विषयच संपला.