आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ५

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
14 Nov 2014 - 5:21 pm

दुसर्‍या विश्रांती सत्रानंतर आज पाचवा डाव खेळला जाईल.
आनंदला जर सामना जिंकायचा असेल तर आजचा डाव अनेक कारणांनी अतिशय महत्त्वाचा आहे.

एकतर गुणसंख्या २-२ अशी समान आहे आणि आनंदची आज पांढरी मोहोरी आहेत.
शिवाय उद्याचा डाव सहावा आहे तिथे सामना निम्मा संपतो. नियमानुसार पुढचा निम्मा सामना सुरु होताना मोहोर्‍याच्या रंगांची आदलाबदल होते त्यामुळे पुन्हा सातव्या डावातही आनंदची मोहोरी काळीच असणार आहेत!
त्यामुळे आजचा डाव जिंकणे त्यानंतर ६ आणि ७ हे दोन्ही डाव बरोबरीत सोडवणे हे आनंदसाठी अतिशय चांगले ठरेल.
कारण त्यापुढच्या पाच डावात आनंदकडे ३ वेळा पांढरी मोहोरी असणार आहेत.

याउलट मॅग्नुसचा मनसुबा आजचा डाव बरोबरीत सोडवून पुढचे दोन्ही डाव, किमान एकतरी, जिंकणे असा असणार आहे.
त्यामुळे ५, ६ आणि ७ हे तीनही डाव अतिशय निकराने लढले जाणार आहेत यात शंका नाही!

गेल्या स्पर्धेच्या वेळी आनंद पाचवा डाव हरला आणि त्यानंतर त्याची आत्मविश्वास पातळी इतकी खालावली की तो त्या मानसिकतेतून वरती येऊ शकलाच नाही. यावेळी तसे दिसत तरी नाहीये. त्यामुळे आनंद आज आक्रमक असणार. पुन्हा
एकदा डी४ आणि शार्प वेरिएशन बघायला मिळणार का आणखीन काही धक्कादायक?

दहाच मिनिटात डाव सुरु होतोय, चला बघूयात!

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

14 Nov 2014 - 5:29 pm | चतुरंग

येऊन बसले आहेत. डाव सुरु होतोय. आणि डी४ ने डाव सुरु झाला!

चतुरंग's picture

14 Nov 2014 - 5:30 pm | चतुरंग

डिफेन्स पुन्हा एकदा.

आतिवास's picture

14 Nov 2014 - 5:35 pm | आतिवास

पट कोण टाकतंय धाग्यात? :-)

मृत्युन्जय's picture

14 Nov 2014 - 5:48 pm | मृत्युन्जय
आनन्दा's picture

14 Nov 2014 - 6:04 pm | आनन्दा
चतुरंग's picture

14 Nov 2014 - 6:30 pm | चतुरंग

मोकळा मोकळा झालाय. मॅग्नुस घड्याळात पुढे आहे फक्त १४ मिनिटे घेतली आहेत त्याने. आनंदने ४७ मिनिटे घेतली आहेत. आनंदने पटाच्या मध्यातले डी आणि ई स्तंभ घेतेलेत.परंतु स्थिती तशी समसमान आहे.

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2014 - 6:54 pm | संजय क्षीरसागर

कोण पहिली चूक करतं यावर आता सगळं अवलंबून आहे.

चतुरंग's picture

14 Nov 2014 - 7:02 pm | चतुरंग

थोडे पोझीशनल अ‍ॅडवांटेज आहे. तो कदाचित वजीर विरुद्ध दोन हत्ती असे काँबिनेशन खेळायचा प्रयत्ब करेल असे वाटते अन्यथा डाव ड्रॉकडे जाण्याची शक्यता मोठी!

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2014 - 7:12 pm | संजय क्षीरसागर

एकच धमाल उडवून दिली आहे!

आनन्दा's picture

14 Nov 2014 - 7:25 pm | आनन्दा

तरी पण सध्या डाव आनंदकडे झुकलेला वाटतो..

शिवाय हल्यात त्याचा उंट, आनंदच्या घोड्यापेक्षा जास्त प्रभावी ठरेल.

आता तर आनंदच पॉन स्ट्रक्चर पूर्ण बिघडलंय!

ओ संक्षी, कार्लसनकडे तर ऊंटच नाहीय..! तरी मी विचार करतोय की तुम्ही जगाच्या उलटे का बोलत आहात.. पण आता कळले.

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2014 - 7:44 pm | संजय क्षीरसागर

मी मधून पाहायला सुरुवात केली, त्यामुळे चूक झाली.

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2014 - 7:24 pm | संजय क्षीरसागर

मला वाटतं कार्लसननं इनिशिएटीव घेतलायं!

मोदक's picture

14 Nov 2014 - 7:30 pm | मोदक

वजिर गेले..

आनन्दा's picture

14 Nov 2014 - 7:31 pm | आनन्दा

बरोबरीकडे वाटचाल.

आनन्दा's picture

14 Nov 2014 - 7:32 pm | आनन्दा

पण हे सगळे इंडिकेटर्स व्हाईटला अ‍ॅड्व्हाण्टेज दखवत आहेत..

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2014 - 7:34 pm | संजय क्षीरसागर

ही विल लीड द शो!

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2014 - 7:38 pm | संजय क्षीरसागर

Now white is a pawn down, but he controls almost the whole board. It will not be easy to covert, but the ball is in Black's court - trying to find good moves in not an easy position. Carlsen played so fast the opening that almost gave the impression that he has analyzed everything in this variation and we are heading to a rather uneventful draw. It does not look so now!

केदार-मिसळपाव's picture

14 Nov 2014 - 7:38 pm | केदार-मिसळपाव

आनंद पांढर्‍या सोंगट्यांनी खेळतोय.

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2014 - 7:43 pm | संजय क्षीरसागर

मी मधून पाह्यला सुरुवात केली त्यामुळे चूक झाली! माझ्या वरच्या सगळ्या कमेंटस आनंदच्या बाजूनं आहेत!

आता खरी मजा आहे.. प्रत्यक्ष मारामारी केल्याशिवाय पर्याय नाही.

आनंद येवढा वेळ का घेतोय ! टाइम प्रेशर मधे येणार कि काय ?

सुजित पवार's picture

14 Nov 2014 - 7:53 pm | सुजित पवार

आनंद टाइम प्रेशर मधे येउन काहि चुक नाहि केल म्हन्जे मिळवलि. हत्तिने ते प्यादा माराय्चा प्रयत्न करेल काय?
एकाच घरात हत्ति नि उन्ट असेल्यामुळे दोन्हि हलवता येत नाहि आहेत

मोदक's picture

14 Nov 2014 - 8:01 pm | मोदक

ड्रॉ..??

आनन्दा's picture

14 Nov 2014 - 8:02 pm | आनन्दा

ड्रॉ?

सुजित पवार's picture

14 Nov 2014 - 8:03 pm | सुजित पवार

ड्रॉ झाला....

पालव's picture

14 Nov 2014 - 8:04 pm | पालव

ड्रॉ झाला....

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2014 - 8:07 pm | संजय क्षीरसागर

ही कूड ट्राय फॉर अ वीन.

संजय क्षीरसागर's picture

14 Nov 2014 - 8:09 pm | संजय क्षीरसागर

Interesting game, where Anand had deep ideas, but Carlsen parried them successfully

मुक्त विहारि's picture

15 Nov 2014 - 6:53 am | मुक्त विहारि

मिपाकरांनो