आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १०

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
21 Nov 2014 - 5:27 pm

५-४ असा एकागुणाने आनंद मागे. १२ डावांपैकी आज दहावा डाव.
दहाव्या आणि बाराव्या डावात आनंदची पांढरी मोहोरी.
सस्पेन्स याहून जास्त काय असू शकतो?
आज विशीला सुलतानढवा करावा लागणार. कोणते ओअपनिंग? कोणत्या हिकमती? मॅग्नुसचा बचाव आणि घड्याळाशी होणारी स्पर्धा यातून आनंद कसा मार्ग काढणार?
आनंदची घोड्यावरची पक्की मांड त्याच्या कामी येईल की उंटाचा कल्पक वापर त्याला तारुन नेईल?
चला या प्रश्नांची उत्तरे शोधायला बघूयात डाव १०!!
मित्रांनो पट लावा रे कोणीतरी!!!

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

दोघेही पटावर हजर आहेत. कोणती मूव डी ४ का ई ४ का आणखी काही?

कालच्या डावाचं काय विश्लेषण केलं तज्ज्ञांनी - याबद्दल थोडं लिहाल का? अर्थात आजच्या डावात वेळ मिळाला तर!

चतुरंग's picture

21 Nov 2014 - 5:31 pm | चतुरंग

सुरुवात. ग्रुनफेल्ड डिफेन्स! एक अत्यंत शार्प वेरिएशन्स असलेली लाईन प्रचंड थिअरी असलेली आणि भरपूर गुंतागुंत निर्माण करु शकणारी. जबर युद्धाची नांदीच!

पहिल्या दहा खेळ्या ३ मिनिटात झाल्यात..

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 5:40 pm | प्रसाद गोडबोले

पट ?

आतिवास's picture

21 Nov 2014 - 5:42 pm | आतिवास

तो दुसरीकडे पाहाव लागतोय सध्या तरी!

आतिवास's picture

21 Nov 2014 - 5:42 pm | आतिवास

* पाहावा

चतुरंग's picture

21 Nov 2014 - 6:15 pm | चतुरंग

एन ई४ सारखी खेळी झटपट करुन अजून आपण थिअरीतच असल्याचे मॅग्नुस भासवतोय (ब्लफ) करतोय! :)
आनंदची स्थिती चांगली आहे आता वजीर सी १ मधे आला तर उंट + वजीर काँबिनेशनने एच ६ प्याद्यावर हल्ला होतोय. दोन उंट आणि एक घोडा याच्या सहाय्याने आनंद राजाच्या बाजूला हल्ला करणार असा एकूण रोख दिसतोय..

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 6:16 pm | संजय क्षीरसागर

निर्णायक गेम होईल असं वाटतंं.

केदार-मिसळपाव's picture

21 Nov 2014 - 6:53 pm | केदार-मिसळपाव

बघुया आता वजीर मारामारी कि अजुन काही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वजिरावजिरी अटळच का ?

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 6:56 pm | संजय क्षीरसागर

तो नेहेमी `आता निर्णय घ्यायलाच हवा' अशी स्थिती आणून गेम उकंठावर्धक करतो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 6:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मारामार्‍या करुन आनंद ड्रॉकडेच जातोय असं होतं.
मग त्या पांढर्‍या मोहर्‍यांचा काय उपयोग ?

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 7:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद आपला प्यांदीच्या भरवशावर धमक्या मारतो
ना धड त्याचा वजीर होतो ना आनंद म्याच जिंकतो.
कर बाबा आज काहीतरी ! :(

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 7:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद डीवरील प्यादे सरकवतो की बळी देईल.
आणि मग हत्तीने उंटाचा बळी ?

-दिलीप बिरुटे

केदार-मिसळपाव's picture

21 Nov 2014 - 7:30 pm | केदार-मिसळपाव

एच-६ वरचा उंट जाउ शकतो.

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 7:35 pm | संजय क्षीरसागर

उंटानं जी-२ प्यादं घेईल!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 7:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मॅग्नुस लेखा इतका काय विचार करतोय. तु काहीही खेळ
आम्ही बरोब्ररी करु..तु खेळ फक्त आता. अर्धा तास झाला
आता खेळशील तेव्हा खेळशील, माझे धाग्यावर धागे वाचून झाले
तु आपला ढिम्मच. :(

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 7:40 pm | संजय क्षीरसागर

कार्लसननं खरंच ती मूव केली. धन्य झालो!

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 7:42 pm | प्रसाद गोडबोले

?

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 7:54 pm | संजय क्षीरसागर

तुम्ही म्हणता तसंच झालंय! एकोणिसावी मूव बी: डी-४ दिसतीये, मला मधेच बी : जी*२ दिसली होती!

फक्त तुम्हालाच नव्हे. इथे पण असेच दिसले आणि त्याबद्दल कॉमेंटेटर आश्चर्य व्यक्त करत होते.

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 8:12 pm | संजय क्षीरसागर

आयला, मी क्षणभर स्तंभितच झालो होतो!

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 7:39 pm | प्रसाद गोडबोले

आनंदला डी मधल्या पासर पॉन चे अ‍ॅडव्हान्टेज आहे , जर ते शेवटपर्यंत टिकवुन ठेवले तर आज आनंद जिंकणारच !

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 8:04 pm | प्रसाद गोडबोले

आता तर बिशप पेयर आहे ! :)

आता जिंकलाच पायजेल आनंद !!

केदार-मिसळपाव's picture

21 Nov 2014 - 7:44 pm | केदार-मिसळपाव

बी-एफ-३ का?

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 7:45 pm | प्रसाद गोडबोले

१९ वी खेळी नकी काय झाले कळाले नाही :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज माझ्या नेटचा प्रॉब्लेम आहे की चेसडॉमचा काय समजेना.
कधी मॅग्नुसची वेळ कमी दिसते तर कधी आनंदची.

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 8:10 pm | प्रसाद गोडबोले

माझ्या इथे आनंदकडे २८ मिनिटे आहेत तर कार्ल्या कडे एक तास ३३ मिनिट !!

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 8:13 pm | संजय क्षीरसागर

आणि कार्लसनचा, आनंदची वेळेत कोंडी करण्यावर.

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 8:16 pm | संजय क्षीरसागर

मगाशी कार्लसनकडे १.३३ तास होते आणि आता ४७ मिनीटं!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 8:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमावशा जवळ आली की असंच होतं वाटतं.
उगं माझ्याशी वाद नका घालू अं.श्रद्धाळु कुठले म्हणुन. ;)
(ह.घ्या)

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 8:22 pm | संजय क्षीरसागर

माझ्या इथे आनंदकडे २८ मिनिटे आहेत तर कार्ल्या कडे एक तास ३३ मिनिट !!

स्वामी संकेतानंद's picture

21 Nov 2014 - 8:08 pm | स्वामी संकेतानंद

आजतरी जिंक रे आनंदा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 8:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जिंकेल असे वाटते. म्हणजे डावावर सध्या चित्र असे दिसते की आनंदचं पारडं भारी.
पण जिंकेपर्यंत माझा कॉन्फीडन्सच नैये .

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 8:20 pm | संजय क्षीरसागर

एकदम धमाल होणार आहे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 8:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि दोनही उंट शाबूत ठेवून डी प्यांदीच्या भरवशावर मॅग्नुसचा एक हत्ती आनि एक उंट घ्यावा.
मग आनंदचा कॉन्फीडन्स वाढेल नै तर अजूनही आनंदचा देवावरच विश्वास जास्त आहे असं वाटतं. ;)

-दिलीप्ल बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 8:29 pm | संजय क्षीरसागर

सर, असं लपलप का होतंय?

कार्लसनची २५ वी मूव आता निर्णायक ठरणार आहे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 8:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्हाला आनंद जिंकावा वाटत नै ये का ? डावावर लक्ष केंद्रीत करा.
आता मॅग्नुसने डी वरच्या प्यादीला हत्तीनी घेरलं आहे.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 8:42 pm | संजय क्षीरसागर

मी कुणाच्याही बाजूनं नाही!

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 8:30 pm | प्रसाद गोडबोले

डी मधल्या प्याद्यासाठी कार्लसन उंट हत्ती असा एक्स्चेन्ज करायचा विचार करतोय की काय ?

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 8:35 pm | संजय क्षीरसागर

बी : ई ५ खेळेल!

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 8:39 pm | संजय क्षीरसागर

निर्णायक क्षणी कार्लसन बरोबर तीच मूव खेळला!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सत्तावीसव्या चालींनी आनंद ब्याक आलाय असं वाटतंय मला.
डाव निसटतोय आनंदच्या हातातून... :(

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

21 Nov 2014 - 8:45 pm | प्रसाद गोडबोले

येस्स सर :(

डी चे प्यादे गेले तिथेच ड्रॉ झाला डाव :(

संजय क्षीरसागर's picture

21 Nov 2014 - 8:45 pm | संजय क्षीरसागर

मजा आली!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 8:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विश्वनाथ आनंद खुप मोठा आहे, मी बोलणं म्हणजे मला माहिती आहे, लहान तोंडी मोठा घास घेतोय.
पण प्यादीच्या भोवती मॅग्नुसने लक्श केंद्रीत केलंय तर किमान त्या बदल्यात हत्तीसारखे मोठे मोहरे
आनंदला सपोर्ट घेऊन टीपता येऊ नये, मग काय उपयोग त्या महाखेळींचा.

आनंदचे डावावर वर्चस्व होते आणि जिंकता जिंकता म्याच ड्रॉला गेला. एवढंच मला कळलं. :(

-दिलीप बिरुटे

दोन्ही गेम्स आनंदला जिंकणं भाग आहे आणि कार्लसनला गेम्स फक्त ड्रॉ झाल्या तरी चालण्यासारखं आहे.

कार्लसन एक गेम हारला तरी फारतर मॅच टाय-ब्रेकरमधे जाईल (तिथे काय करतात चतुरंग जाणे). पण मुळात, जिंकायलाच हवं असं दडपण त्याला नाही. त्यामुळे आता इतक्या प्रेशरखाली आनंद कसा खेळतो हे बघणं रंजक होईल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2014 - 8:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झटपट चालीत ना जीवंत झालेला वजीर आनंदला मदत करु शकला.
शीट डाव चालला बरोबरीकडे.. बोअर.

-दिलीप बिरुटे

रामपुरी's picture

21 Nov 2014 - 10:47 pm | रामपुरी

रंगतदार खेळ झाला. २४ व्या चालीत हत्ती डी २ ऐवजी प्यादे ए ३ खेळला असता तर कितपत फरक पडला असता बघायला हवे. कारण मग काळा हत्ती लगेच ई पट्टीत येऊ शकला नसता आणि पुढची हत्ती डी १ खेळी सुद्धा करायची गरज पडली नसती.