आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
18 Nov 2014 - 5:29 pm

कालचा डाव तुफान झाला. कार्पोव कोर्चनॉयच्या सर्वात जास्त खेळींच्या डावापाठोपाठचा दुसर्‍या क्रमांकाचा!
शेवटी अर्थातच मॅग्नुसने विनाकारण ताणले. त्याने टाटा स्टील स्पर्धेत एका खेळाडूवर घोडा-हत्ती वि. हत्ती अशा काँबिनेशनने मात लावली होती त्यामुळे तो कालही आशावादी होता. परंतु काल आनंद त्याला पुरुन उरला.
शब्दशः "कुठे आनंदचा ऐरावत आणि कुठे मॅग्नुसची तट्टाणी!" अनुभवायला मिळाले!! ;)

चला आजचा आठवा डाव कमालीचा रंगतदार होणार. आनंदसाठी जिंकणे जवळपास अनिवार्य. कारण आता उरलेल्या पाच डावात त्याची पांढरी मोहोरी तीन वेळा असणार आहेत. आज त्याने १ गुण मिळवूण बरोबरी केली की सामना पुन्हा पूर्ण खुला होईल आणि मग पुढल्या दोन पांढर्‍या पैकी एकत्री जिंकून आणि उरलेल्या दोन काळ्या डावाअत बरोबरी करुन स्पर्धा जिंकता येईल. अर्थात हे म्हणणे सोपे आणि घडवून आणणे महाकठिण आहे.

बघूयात आज आनंद कोणती सुरुवात करतो ?

क्रीडाप्रतिभा

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

18 Nov 2014 - 5:34 pm | चतुरंग

डी ४ ने सुरुवात झाली. दोघेही अजून थिअरीत आहेत. ३ -३ मिनिटात ८ खेळ्या झाल्यात.

जरा वेगळी करुन आनंदला विचारात पाडले आहे. आनंद आता शार्प पोझीशन कशी टिकवता येईल याच्या विचारात आहे. कारण तीच जिंकण्याची संधी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2014 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद जिंकला पाहिजे.... उगाच चुका करु नको भो.
आज जिंकण्यासाठी खेळ भो...

-दिलीप बिरुटे

आतिवास's picture

18 Nov 2014 - 6:21 pm | आतिवास

कार्लसनपेक्षा जास्त वेळ लागतोय आनंदला प्रत्येक डावात!

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2014 - 6:26 pm | प्रसाद गोडबोले

आज जिंकायलाच हवा आनंद !

आनंदच्या काळ्या घरातील उंटाने घोडा मारून आणि नंतर वजीर उंटाच्या जोरावर मॅग्नुसच्या राजाजवळ जाणे शक्य आहे का..?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2014 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदची डावावर पकड़च नै असे वाटत राहते. वेळ कमी आहे कर बाबा आक्रमण जरा. उग चिवट खेळतो आणि डाव निसटुन जातो.

सुजित पवार's picture

18 Nov 2014 - 6:50 pm | सुजित पवार

१ तासाने आनन्द मागे आहे...असे नेह्मिच कसे होत आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2014 - 6:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेळ खुप कमी राहतोय आणि मग चूक करुन बसतो आणि मग एक तर डाव बरोबरीत सोडविण्यासाठी प्रयत्न करावा लागतोय नै तर पराभवाचा सामना करावा लागतोय. काय गणित असतील त्यांचे देव जाणो.

-दिलीप बिरुटे

सुजित पवार's picture

18 Nov 2014 - 6:58 pm | सुजित पवार

आनन्द चा घोडा कसा मेला?

मलाही तोच प्रश्न पडला होता.
QH7+ KF8 व QH8+ अस होवु शकल नसत का?

लक्षात आल ,. काही फायदा नसता झाला.

मोदक's picture

18 Nov 2014 - 7:01 pm | मोदक

का..?

सुजित पवार's picture

18 Nov 2014 - 7:02 pm | सुजित पवार

कसा मेला?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2014 - 7:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय चाललंय राव हे.. नुसती मारामारी. सेम पोझीशन्स.

-दिलीप बिरुटे

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2014 - 7:47 pm | प्रसाद गोडबोले

झाला ड्रॉ :(

आनंदभाऊ , आता परत बाऊन्स ब्यॅक कधी करणार ? :(

आदूबाळ's picture

18 Nov 2014 - 7:51 pm | आदूबाळ

ड्रॉ झालापण??

आतिवास's picture

18 Nov 2014 - 7:53 pm | आतिवास

अजून नाही; पण तीच शक्यता दिसतेय!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2014 - 8:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रटाळ सामना.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

18 Nov 2014 - 9:11 pm | बॅटमॅन

ब्वॉर्र, ड्रॉ तर ड्रॉ. पण स्कोर काय झाला शेवटी?

रामपुरी's picture

18 Nov 2014 - 9:19 pm | रामपुरी

मज्जा नाही आली

चतुरंग's picture

18 Nov 2014 - 10:04 pm | चतुरंग

आजचा डाव नीरस झाला. स्कोर ४.५ वि ३.५
मी काल म्हंटले तसे आनंदची इतकी शक्ती कालच्या साडेसहा तास चाललेल्या डावाने काढून घेतली की आज तो तितकासा आक्रमक राहू शकला नाही ही एक शक्यता आहेच.
त्याशिवाय आनंदनेही आज काही गोष्टी चाचपून बघितल्या असाव्यात. आज मॅग्नुस ज्या वेगाने खेळत होता त्यावरुन त्याने सिसिलिअन आणि क्वीन्स मधली बरीच वेरिएशन्स शेवटपर्यंत खेळून बघितलेली आहेत हे आनंदला समजले आहे.
उद्या विश्रांतीचा दिवस आहे. परवा काळ्या मोहोर्‍यांनी खेळताना बरोबरी करायची आणि दहावा डाव जिंकायचा असा प्लॅन करावा लागणार.
बाकी तयारी आणि स्टॅमिना या दोन्ही बाबतीत मॅग्नुस वरचढ दिसतोच आहे. त्यामुळे आता आनंदला धक्का तंत्र वापरणे जरुरीचे आहे. दहाव्या आणि बाराव्या डावात वेगळे ओपनिंग खेळायची तयारी आनंदने करावी अशी अपेक्षा आहे. कारण त्याशिवाय ही कोंडी फुटणे अवघड दिसते आहे!

vikramaditya's picture

18 Nov 2014 - 10:13 pm | vikramaditya

वयातील अंतर आनंदला भारी पडत असावे आणि त्याची दमछाक होत असावी. आमचा आपला एक अंदाज.

बाकी तज्ञ सांगतीलच. काही म्हणा "उम्र का तकाजा है"