आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ७

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
17 Nov 2014 - 5:48 pm

मागच्या डावातल्या सिसिलिअन नंतर आनंदने पुन्हा एकदा बर्लिन डिफेन्स निवडलाय! हा मॅग्नुसचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे आनंदने कोणते विरिएअशन सुट्टीच्या दिवसात तयार केले आहे हे बघायची उत्सुकता आहे. आनंद वेगाने खेळतोय त्यामुळे तयार होऊन आलाय हे नक्की. आज त्याला किमान बरोबरी करावीच लागेल अन्यथा सामन्याचे पारडे बरेचसे मॅग्नुसच्या बाजून झुकेल हे नक्की.
चला डाव बघूयात.

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

17 Nov 2014 - 5:51 pm | प्रसाद गोडबोले

पट कुठाय ?

चतुरंग's picture

17 Nov 2014 - 5:54 pm | चतुरंग

बाजूला किल्लेकोट केलाय. आनंदने किल्लेकोट केलेला नाही त्याऐवजी मोहोर्‍यांची प्रगती करण्यावर भर दिलाय. त्याची दोन प्यादी हँगिंग आहेत परंतु उंट घोडा आणि हत्ती चांगले प्रगत आहेत. वजिराच्या बाजूला एक प्यादे जास्त आहे परंतु ते डबल आहे. मॅग्नुसला थोडे अ‍ॅडवांटेज आहे परंतु आनंद तसा अडचणीत नाहीये.

रमताराम's picture

17 Nov 2014 - 5:54 pm | रमताराम

अजून अर्धा तासही झाला नाही आणि दोघांच्या १९ खेळ्या झाल्यात. दोघेही झटपट ड्रॉ मारायच्या तयारीने आलेत की काय?

मोदक's picture

17 Nov 2014 - 6:00 pm | मोदक

मॅग्नुसचा एकूण रागरंग बघता तो थोडे प्रेस करुन बघेल आणि फार काही हाती लागेल असे दिसले नाही तर तो बरोबरीत जाणार. आनंदकडे एक प्यादे जास्ती असले तरी तो जिंकण्याची शक्यता फारच कमी आहे.

दोन वेळा सुरुवात करायची संधी मिळून कार्लसनने बरोबरी स्वीकारली तर त्याचा पुढे त्याला तोटा होईल. त्यामुळे आज तो सहजी बरोबरी मानणार नाही - असा एक अंदाज. पण संधी किती आहे याचा मला अंदाज येत नाहीये.

सुजित पवार's picture

17 Nov 2014 - 6:57 pm | सुजित पवार

आनन्द इतका वेळ का घेतोय?

आनन्दा's picture

17 Nov 2014 - 6:59 pm | आनन्दा

तो बहुधा फुल प्रूफ प्लॅन बनवायचा प्रयत्न करतोय.

मला तरी आत्ता आनंद वरचढ दिसतो.

गौरी लेले's picture

17 Nov 2014 - 7:57 pm | गौरी लेले

जबरदस्त इन्टरेस्टींग चाललाय डाव

सुजित पवार's picture

17 Nov 2014 - 8:01 pm | सुजित पवार

एवढि उत्कठा मला कधि चेस्स पाह्ताना होइल असे वाटले सुद्धा नाहि होत...

रमताराम's picture

17 Nov 2014 - 8:34 pm | रमताराम

इंट्रेस्टिंग येन्ड गेम व्हनार. वर वर पाहता आनंदची बाजू डावी दिसते पण लेकाचा निवांत दिसतोय. प्याद्यांचा खेळ कसा करतोय त्यावर अवलंबून आहे. शेवटाल्ला प्यादी कशी महत्त्वाची ठरतात याची शिकवणी होणार आज आपली.

प्रसाद गोडबोले's picture

17 Nov 2014 - 8:47 pm | प्रसाद गोडबोले

अगदी अगदी हेच म्हणतो

खाल्लीन आनंदने तो चांगला निर्णय होता की नाही हे थोड्या वेळाने समजेल.
परंतु मूळ प्लॅन बरहुकूम असे काही आनंद करु शकेल हे मॅग्नुसने ध्यानात घेतले नव्हते हे नक्की. त्यामुळे एका घोड्याच्या जोरावर तो किती उड्या मारु शकेल हे बघायला हवे.
आनंद हा जगातल्या सर्वोत्तम बचावपटूंमधला एक समजला जातो त्यामुळे मला तरी तो ही स्थिती वाचवू शकेल असे वाटते.

चतुरंग's picture

17 Nov 2014 - 9:45 pm | चतुरंग

सरळसरळ दणकट प्लॅन नाहीये त्यामुळे तो आता डाव "दळण" मोडमध्ये नेतोय. अतिताणाने/थकव्याने आनंद काही चूक करेल आणि डावात काही घडू शकेल असे बघणे, काहीच झाले नाही तरी आनंदची एवड्।ई शक्ती शोषून घेणे की उद्याच्या पांढर्‍या मोहोर्‍यांनी असलेल्या आनंदच्या डावात त्याच्याकडे पुरेशि शक्ती शिल्लक राहता काम नये!

संजय क्षीरसागर's picture

17 Nov 2014 - 9:48 pm | संजय क्षीरसागर

जोपर्यंत कार्लसन इतर मोहोरी हालवतोयं तोपर्यंत आनंदला प्यादी पुश करायचा चान्स नाही. तस्मात त्याच्या पॉन अ‍ॅडवांटेजचा उपयोग नाही. आणि निव्वळ घोडा आणि हत्तीनं कार्लसन मात करु शकत नाही.

केदार-मिसळपाव's picture

17 Nov 2014 - 9:55 pm | केदार-मिसळपाव

आनंद आता ए घरातले प्यादे बी घरात आणायचा प्रयत्न करतोय.

केदार-मिसळपाव's picture

17 Nov 2014 - 9:56 pm | केदार-मिसळपाव

मारायचा नाही बहुधा.

चतुरंग's picture

17 Nov 2014 - 9:57 pm | चतुरंग

बॉडीलँग्वेजमधून आनंदला डिप्रेस करायचा प्रयत्न करतोय. निवांत पायावर पाय टाकून बसणे, मारलेल्या दोन ऊंटांशी एका हाताने चाळा करत राहणे असले प्रयोग तो करतो आहे! :)
आनंदने बी प्यादे ५ वरती टाकून काहीतरी निश्चय केल्याचे दाखव्ले आहे.

दाखवले आहे!

चतुरंग, तुम्हाला एक साधासा प्रश्न आहे. कार्लसन असाच टाईमपास करत खेळत राहिला आणि आनंदला (दर वेळी) विचार करावाच लागला (कारण त्याचा नाईलाज आहे) तर, निव्वळ वेळ संपली म्हणून आनंद हरु शकेल काय?

निव्वळ वेळ संपली म्हणून आनंद हरु शकेल काय?
हो. पण अशी वेळ येणार नाही. हा विश्वविजेतेपदाचा सामना आहे.

संजय क्षीरसागर's picture

17 Nov 2014 - 10:30 pm | संजय क्षीरसागर

म्हणून काय झालं? आनंदकडची वेळ कार्लसनच्या आधी संपणारच !

रामपुरी's picture

17 Nov 2014 - 10:43 pm | रामपुरी

मला म्हणायचं होतं कि ते ज्या पातळीवर खेळत आहेत तिथे अशी वेळ येत नाही. वेळेचं भान या पातळीवरच्या खेळाडूंना असणं अतिशय प्राथमिक आहे.

चतुरंग's picture

17 Nov 2014 - 10:24 pm | चतुरंग

वेळ संपत नाही. कारण साठाव्या खेळीनंतर प्रत्येक खेळीला वेळ अ‍ॅड होतो. शिवाय नियमाप्रमाणे जर भाकड खेळ्या केल्या की ज्यातून काहीच निष्पन्न होऊ शकत नाहीये तर सामना नियंत्रकाला खेळ थांबवून बरोबरी जाहीर करता येते.
अशा सलग किती खेळ्या कराव्या लागतात हे मला आठवत नाहीये परंतु असा नियम आहे हे नक्की!

आणि नियंत्रक फक्त ड्रॉ डिक्लेअर करु शकेल, हार-जीत नाही.

तस्मात, माझ्या मते कार्लसन आनंदला उगीच झुंझवत राहाणार आणि ड्रॉ तर कार्लसनला केंव्हाही फायदेशीर आहे.

रामपुरी's picture

17 Nov 2014 - 10:50 pm | रामपुरी

हा डाव आनंदने जिंकण्याची शक्यता अतिशय कमी आहे. जवळजवळ नाहीच

संजय क्षीरसागर's picture

17 Nov 2014 - 10:50 pm | संजय क्षीरसागर

माझ्या विचारांशी हा कमेंटेटर सहमत आहे!

Surprisingly or not, Carlsen started putting practical problems for black, playing fast against Vishy's clock!

संजय क्षीरसागर's picture

17 Nov 2014 - 11:00 pm | संजय क्षीरसागर

आनंदकडे १६ मिनीटं आहेत आणि कार्लसनकडे ५२!

संजय क्षीरसागर's picture

17 Nov 2014 - 11:02 pm | संजय क्षीरसागर

शेकहँड करावा लागणारे.

रामपुरी's picture

17 Nov 2014 - 10:45 pm | रामपुरी

५० निरर्थक खेळ्या (ज्यात प्यादे एकदाही हललेले नाही अशा) नंतर डाव ड्रॉ होतो.

केदार-मिसळपाव's picture

17 Nov 2014 - 10:01 pm | केदार-मिसळपाव

बी-७ वरच्या राज्याला सरकवण्याचा आणि ८ व्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार

आतिवास's picture

17 Nov 2014 - 10:41 pm | आतिवास

उजव्या कोप-यात घड्याळाच्या खाली काळा घोडा आणि पांढरं प्यादं दिसतंय आणि पांढ-या प्याद्याच्या डोक्यावर निळ्या अक्षरांत २ हा अंक दिसतोय. याचा अर्थ काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Nov 2014 - 10:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

काळ्याकडे एक घोडा कमी आहे आणि पांढर्‍याकडे दोन प्यादी कमी आहेत.

आतिवास's picture

17 Nov 2014 - 10:49 pm | आतिवास

"Elementary, my dear Watson" !! :-)

रामपुरी's picture

17 Nov 2014 - 10:52 pm | रामपुरी

पांढर्‍या राजाला मागच्या पट्टीत ढकलून काळा राजा बी४ ला आणणं कितपत योग्य/फायदेशीर आहे?

संजय क्षीरसागर's picture

17 Nov 2014 - 11:11 pm | संजय क्षीरसागर

माझ्या मते आनंद हारल्यात जमा आहे.

चतुरंग's picture

17 Nov 2014 - 11:20 pm | चतुरंग

डाव ड्रॉ झालाय. फक्त काही खेळ्यांचा डाव बाकी आहे..

रामपुरी's picture

17 Nov 2014 - 11:24 pm | रामपुरी

अल्मोस्ट देअर

संजय क्षीरसागर's picture

17 Nov 2014 - 11:27 pm | संजय क्षीरसागर

आणि आनंद लॉस ऑफ टाईमनं हारणार नाही का?

संजय क्षीरसागर's picture

17 Nov 2014 - 11:25 pm | संजय क्षीरसागर

मी तर बेहद्द खूष त्याच्या बुद्धीमत्तेवर!

संजय क्षीरसागर's picture

17 Nov 2014 - 11:39 pm | संजय क्षीरसागर

हा काय रुल आहे त्याची कल्पना नाही. तस्मात, आनंद लॉस ओफ टाइमनं हारणार नाही. सामना ड्रॉ होईल.

रामपुरी's picture

17 Nov 2014 - 11:39 pm | रामपुरी

असो!!!

उगीच स्मायल्या टाकण्यात अर्थ नाही

रामपुरी's picture

17 Nov 2014 - 11:50 pm | रामपुरी

जे तुम्हाला माहीत नाही ते जगात दुसर्‍या कुणाला माहीत नसावं हा नियम आहे काय? बळंच... :) :) :)
तुमचा स्वभाव माहीत असल्याने गप्प बसावं हे बरं. चुकून जरा जास्त महत्व दिलं तुमच्या प्रतिक्रियांना. असो...

कारण इतकं दिव्य उत्तर दिल्यावर काय बोलणार?

५० निरर्थक खेळ्या (ज्यात प्यादे एकदाही हललेले नाही अशा) नंतर डाव ड्रॉ होतो.

रामपुरी's picture

18 Nov 2014 - 12:02 am | रामपुरी

अशक्य आहे.
बरं बरं असूदे!

चतुरंग's picture

17 Nov 2014 - 11:44 pm | चतुरंग

मगाधरनं आम्ही काय कोकलत होतो? तरी बळंच....

वेळ संपू शकते का? त्यावर तुम्ही हे उत्तर दिलंय :

वेळ संपत नाही. कारण साठाव्या खेळीनंतर प्रत्येक खेळीला वेळ अ‍ॅड होतो.

जर दोघांना सारखाच वेळ मिळाला तर टाइम डिफरन्स काँस्टंट राहणार असा साधा तर्क होता.

चतुरंग's picture

17 Nov 2014 - 11:56 pm | चतुरंग

पण त्याने वेळ कोणाचीच संपत नाही कारण दर खेळीला अ‍ॅड होते ना?

संजय क्षीरसागर's picture

17 Nov 2014 - 11:52 pm | संजय क्षीरसागर

ड्रॉचं प्रपोजल कसं देतात ते सांगू शकाल का?

चतुरंग's picture

17 Nov 2014 - 11:55 pm | चतुरंग

दोघेही चांगले खेळले परंतु नंतर उगीचच्या उगीच डाव लांबवून कार्लसनने अखिलाडूपणाने त्याचे फ्रस्ट्रेशन आनंदला चेंबवण्यात काढले. आनंद उद्या उट्टं काढतोय बघा!! उद्या कार्लसन दाबून मार खाणार!!! :)

रामपुरी's picture

18 Nov 2014 - 12:04 am | रामपुरी

डाव केव्हाच ड्रॉ झाला होता

रमताराम's picture

17 Nov 2014 - 11:56 pm | रमताराम

आनंदने एक काम चांगले केले. अखेर कार्ल्यालाच ड्रॉ साठी मूव करायला लावली. अन्यथा हत्ती घोडा एक्स्चेंज मारून त्याला एकाहुन अधिक वेळा ड्रॉ घेता आला असता. पण मॉरल विक्टरीसाठी त्याने 'चल, तू मला थकवून हरवायच्या गमजा करतोस ना, चल बघू काय करतोस ते' असा च्यालेंज देत एक्स्चेंज न घेता डाव चालू ठेवला.

चतुरंग's picture

17 Nov 2014 - 11:58 pm | चतुरंग

एक्सचेंज ड्रॉ होत नाही.. हत्ती राजाने मात होते!!

रमताराम's picture

18 Nov 2014 - 12:43 am | रमताराम

:) थिअरेटिकली होते हो, पण 'आनंद' वर होण्याची शक्यता किती.

चतुरंग's picture

18 Nov 2014 - 1:05 am | चतुरंग

चांगली प्रॅक्टिकली होते...सोपी असते..

रमताराम's picture

18 Nov 2014 - 10:11 am | रमताराम

चूक माझी आहे. घोड्याऐवजी हत्ती लिहलंय मी वर. हत्तीसह १००% असतेच की एक पट्टा धरून ठेवून सहज चेपता येते. घोड्यासह फक्त कोपरा गाठावा लागतो आणि तिथेही स्टेलमेटचा धोका मोठा असतो

चतुरंग's picture

18 Nov 2014 - 9:54 pm | चतुरंग

एक घोडा आणि राजा यांनी मात होऊ शकत नाही, एक उंट आणि राजाने देखील नाही.
म्हणून तर शेवटी एक घोडा राहिल्यावर बरोबरी मान्य झाली ना? नाहीतर आनंदने हत्तींची ती मारामारी होऊच दिली नसती.

दोन घोडी आणी राजा किंवा दोन उंट आणि राजा यांनी मात होऊ शकते परंतु तेदेखील अतिशय कठिण आहे.

रामपुरी's picture

19 Nov 2014 - 5:22 am | रामपुरी

दोन उंट आणि राजाने मात अगदीच सोपी आहे. योग्य बचाव केल्यास दोन घोडे आणि राजाने ५० खेळ्यांचा नियम पाळून मात अशक्य आहे. अर्थात पटाच्या स्थितीवर ते अवलंबून आहे.

रामपुरी's picture

18 Nov 2014 - 1:58 am | रामपुरी

पण 'आनंद' वर होण्याची शक्यता १००%.
कशीही पोझिशन असेल तरी जास्तीत जास्त १६ खेळ्यांमध्ये.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Nov 2014 - 12:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

माझ्यामते १६ खेळ्यांचा नियम अधिकृत नाही. मिपाकरांनी भाषांतरित केलेली बुद्धिबळ नियमावली वाचावी.

रामपुरी's picture

18 Nov 2014 - 9:25 pm | रामपुरी

हत्ती आणि राजा विरूद्ध राजा एवढेच पटावर असतील तर कितीही प्रतिकूल स्थिती मध्ये, अगदी अचूक खेळी करूनही जास्तीत जास्त १६ चालींमध्ये मात होऊ शकतो. जशी राजा आणि वजीर विरुद्ध राजा या स्थिती मध्ये जास्तीतजास्त नऊ चालीत मात होऊ शकते, राजा, उंट आणि घोडा विरुद्ध राजा या स्थिती मध्ये जास्तीतजास्त पस्तीस चालीत मात होऊ शकते.

रामपुरी's picture

17 Nov 2014 - 11:57 pm | रामपुरी

मागच्या डावाप्रमाणे यावेळी चूक न करता उंटाने प्यादी मारल्याने वाचला आज आनंद. पण मागच्या सामन्याप्रमाणे एंडगेम मध्ये कार्लसनसमोर हार मानली नाही यातच 'आनंद'.

जेपी's picture

18 Nov 2014 - 6:55 am | जेपी

समालोचन आवडल.
कार्लसनप्रमाणे इथ काही लोक आपलच घोड पुढे दामटवु लागेल ते पाहुन मजा *wink*
स्वभावाला इलाज नाही.