आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ९
लेखनप्रकार
आठव्या डावात आनंदने निर्णायक विजय खेचून आणणे आवश्यक असताना नीरस बरोबरी झाली.
मधल्या एका विश्रांतीनंतर आज नवव्या डावात आनंद 'डू ऑर डाय' परिस्थितीत आहे.
काळी अथवा पांढरी मोहोरी न बघता त्याने विजयासाठीच प्रयत्न करणे आवश्यक आहे अन्यथा सामना पुरे १२ डाव देखील होणार नाही अशी (चेन्नै साधार) भीती वाटते! :(
काळ्या मोहोर्यांकडून खेळताना आनंदने कायम बरोबरीचे ध्येय ठेवल्यासारखे आतापर्यंतच्या डावांत वाटत आले आहे.
आज आनंद पुन्हा एकदा जोमदार प्रयत्न करेल अशी आशा ठेवूयात आणि डावाकडे वळूयात.
अजून १५ मिनिटे आहेत. तोवर कोणीतरी पट लावा रे!! :)
वाचने
7320
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
बर्लिन डिफेन्स! बर्लिनची भिंत काही हलायला तयार खेळतोय्दोघेही वेगाने खेळत आहेत दीड मिनिटात १० खेळ्या झाल्यात!
In reply to पुन्हा एकदा by चतुरंग
.
In reply to आनंदनं कॅसलींगची फॅसिलिटी गमावली! by संजय क्षीरसागर
माझ्या मते ती स्टॅन्डर्ड खेळी आहे बर्लिन मध्ये
In reply to माझ्या मते ती स्टॅन्डर्ड खेळी by प्रसाद गोडबोले
आता हत्ती बाहेर काढणं जिकीरीचं होतं
In reply to ते असेल पण by संजय क्षीरसागर
माझ्या मते हत्ती हा एच ६ नंतर जी ६ असाच बाहेर काढायचा प्लान असतो डायरेक्ट पांढर्याच्या कॅसलीन वर अॅटॅक !
In reply to माझ्या मते हत्ती हा एच ६ नंतर by प्रसाद गोडबोले
पण या प्रकारात आपलीच प्यादी आपल्याला अडथळा होतात असं वाटतं.
In reply to आनंदनं कॅसलींगची फॅसिलिटी गमावली! by संजय क्षीरसागर
मोहोर्यांचा विकास साधणे हे मुख्य ध्येय असते कॅसलिंग करण्यात एका खेळीचा टेंपो जातो..
In reply to बर्लिनमध्ये by चतुरंग
ती कायमची डोकेदुखी होईल.
मग्नुस बरोबरेसाठीच खेळतोय की काय?
कळलं नाही!
In reply to मॅग्नसने वजीर का बळी दिला.... by बहुगुणी
कारण जितक्या लवकर पीसेस कॅन्सल होतील तितक्या लवकर डाव ड्रॉ होईल अन मग्नुस ला घरीजाऊन उद्याच्या अवघड डावाची तयारी करता येईल ...
आजचा डाव ड्रॉच होणार ... उद्या आनंद काही तरी भन्नाट करेल अशी अपेक्षा आहे !
आता तरी ही मॅच लाईव्ह दाखवताहेत
In reply to एन डी टी व्ही वर by बहुगुणी
धावत जौन एनडीटीवी चे तिन चॅनल पाहिले .
नाय दिसल. :-(
http://www.sochi2014.fide.com/
थोडे स्क्रोल करुन खाली गेलात की मध्यभागी पट दिसेल. पीटस्विडलरची कॉमेंट्री सुद्धा छान असते...
घड्यालात मागे पडलाय जवळपास २३ मिनिटांनी! आनंदने तेराव्या खेळीनंतर त्याला विचारात पाडले आहे.
ओके ई६ प्यादे पुढे ढकलले मॅग्नुसने. आता ते प्यादे अडचणीचे ठरु शकते त्यामुळॅ आनंदने त्याचे मोहोरे बचावात रोखायला हवेत.
In reply to आज मॅग्नुस by चतुरंग
ई६ प्याद्यामुळे मोठा लफडा होणार असं दिसतंय!
अरे काय धन्दे? आम्ही घरात खेळायचो तसे खेळतायत वाटते. तीन वेळा?
का राव? हॅ आपल्याला नाही आवडले.... :(
In reply to डाव ड्रॉ झाला!! by चतुरंग
काही कळलं नाही आज!
.
काय कटकट आहे भेंडी. ड्रॉ??????
बहुधा त्या मूव वर सगळे अवलंबून होते, मॅग्नुसला दोन घोड्यांच्या सहाय्याने आक्रमण करायचे होते, तर आनंदला राजाच्या सहाय्याने ते तिथेच थांबवायचे होते.. शेवटी ड्रॉ.
नाही तुला, नाही मला घाल %^%#^#
मॅग्नुससाठी धक्कादायक होता! त्याने तयारी केली होती त्याप्रमाणे डाव झाला नाही त्याने एफ ६ असे प्यादे पुढे टाकणे अपेक्षिले होते.
त्याचे ई६ वरचे प्यादे आणि दोन घोडी याच्या जोरावर आनंदची राजाची बाजू चेपून तिथे प्याद्यांची संख्या वाढवायची आणि नंतर मोहोरी मारामारी करुन एंडगेमला घुसायचे..परंतु आनंद आणि टीमने आज वेगळाच पवित्रा घेतला.
उरलेल्या ३ डावतले दोन डाव पांढर्याचे आहेत त्यासाठी काही खास तयारी आनंद आणि टिमने केली आहे हे नक्की!
आनंद अगदी कंफर्टेबल वाटतोय प्रेस काँन्फरंसमधे...
In reply to आजचा ड्रॉ by चतुरंग
उरलेल्या ३ डावतले दोन डाव पांढर्याचे आहेत त्यासाठी काही खास तयारी आनंद आणि टिमने केली आहे हे नक्की! आनंद अगदी कंफर्टेबल वाटतोय प्रेस काँन्फरंसमधेयेस्स ... माझाही तसाच अंदाज आहे ! उद्या काहीतरी भन्नाट पहाय्ला मिळेल अशी आशा आहे :)
एवढ्या लवकर ड्रॉ
स्कोर काय झाला.
कार्लसन ५- आनंद ४
:-(
आनंदला तीन पैकी २ गेम्स जिंकायलाच पाहिजेत आणि एक ड्रॉ झाला तरी हरकत नाही. त्याला आता एकही गेम हारता येणार नाही.
कार्लसननं तीनही गेम ड्रॉ केले तरी त्याला काही फरक पडत नाही. तो एक गेम हारला तरी दोघं इक्व्कल होतील. आणि तीन पैकी एक जरी जिंकला तर विषयच संपला.
पट