आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ६

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
15 Nov 2014 - 6:38 pm

आज यायला उशीर झालाय. डाव सुरु होऊन जवळपास तास झालाय. कालचा डाव बरोबरीत गेला. आज मॅग्नुस निकराचा प्रयत्न करतोच आहे. डाव सिसिलिअन ने सुरु झाला.

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Nov 2014 - 7:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, मलाही उशीर झाला डाव बघायला वजीरावजीरी झाली वाटतं. म्हणजे डाव बरोबरीकडे जाणार आता ?
अरे कुठे गेली मंडळी ? कुछ तो बोलो :)

-दिलीप बिरुटे

सुजित पवार's picture

15 Nov 2014 - 7:05 pm | सुजित पवार

काल आनन्दचा हत्ति नि उन्ट मग्नुस च्या हत्तिच्या समोर होते. आज तिच उन्टाचि जागा घोड्याने घेतलि आहे...
आज पन ड्राव करनार का हे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Nov 2014 - 7:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेम सेम पोझीशन आहे असं वाटतं. कालच्या सामन्यात आनंद मानसिकदृष्ट्या कार्लसनपेक्षा वरचढ असूनही बरोबरीसाठीच आनंदने जास्त प्रयत्न केले. :(

-दिलीप बिरुटे

परंतु त्याला असलेले अ‍ॅडवांटेज पूर्ण गुणात बदलणे अवघड आहे.

शिवाय पुढे आलेले हत्ती ही मॅग्नुसची बलस्थाने आहेत. तर वजिराच्या बाजूचे दुहेरी प्यादे हे कमकुवत आहे. मॅग्नुसने राजाच्या बाजूला हत्ती आणि उंटाने रेटायला सुरुवात केली की आनंद वजिराच्या बाजूला प्यादी सरकवून मॅग्नुसला कोंडीत पकडणार.

मॅग्नुसच्या कणाकणाने होणार्‍या प्रगतीला खीळ कशी घालायची हा आहे. त्याची सगळी मोहोरी अशा जागांवर आहेत की त्याने हालचाल केली की तो झुग्झ्वांग मधे जाणार.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Nov 2014 - 7:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे

झुग्झ्वांग ??

चतुरंग's picture

15 Nov 2014 - 7:24 pm | चतुरंग

राजाच्या बाजूला हत्तींची मारामारी करुन उंट पुढे रेटायचे आणि आनंदची एच ६ आणि जी ७ वरची दुबळी प्यादी मटकावून स्वतःची एफ आणि जी प्यादी रेटणे.

चतुरंग's picture

15 Nov 2014 - 7:27 pm | चतुरंग

मॅग्नुस काय करतोय त्याप्रमाणे जात राहणे असेच शक्य आहे. प्रत्येक ठिकाणी बचाव शोधून काढणे कठिण आहे. कारण मॅग्नुसच्या थ्रेट्स थेट नाहीयेत अतिशय सटल म्हणतात तशा आहेत. त्यामुळे होते काय की कोणत्याही क्षणी तो रोख बदलून वेगळाच प्लॅन बनवू शकतो.

चतुरंग's picture

15 Nov 2014 - 7:32 pm | चतुरंग

आणि जी ६ वरचा घोडा अशी दोन मर्मस्थाने आहेत. आनंद डी स्तंभात हत्ती आणून तिथून डि ३ असा घुसू शकतो. मॅग्नुसला ते थोपवणे भाग आहे. त्यामुळे त्याने सी२ मधे उंट आणला. आता आनंद हत्ती परत जी ८ मधे नेणार..

सुजित पवार's picture

15 Nov 2014 - 7:33 pm | सुजित पवार

आज दोगेहि ड्रा साठि खेलत आहेत कि काय असे वाटत आहे...

चतुरंग's picture

15 Nov 2014 - 7:37 pm | चतुरंग

मॅग्नुस जिंकण्यासाठीच खेळतोय. त्याला अ‍ॅडवांटेज सुद्धा आहे. अणि त्याला आजचा आणि उद्याचा डाव आघाडी मिळवण्याची उत्तम संधी आहे असे असताना तो सहजासहजी बरोबरीत जाणार नाहीच! आनंदला आज जास्तितजास्त बरोबरी मिळू शकेल..जिंकायची शक्यता नाहीच...

चतुरंग's picture

15 Nov 2014 - 7:41 pm | चतुरंग

ए प्यादे ढकलत ३ र्‍या घरापर्यंत आणले आहे. प्लॅन समजत नाहीये. त्याला ए पट्टीतून काही फार करता येईल असे दिसत नाहीये. राजाच्या बाजूने मॅग्नुसने प्यादी ढकलायला सुरुवात केली आहे. आनंदची घुसमट करायला बघणार तो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Nov 2014 - 7:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि त्यामुळे तो काही चूक करेल ?

-दिलीप बिरुटे

आतिवास's picture

15 Nov 2014 - 7:45 pm | आतिवास

हीच शंका आहे!

सुजित पवार's picture

15 Nov 2014 - 7:49 pm | सुजित पवार

आनन्दचा वेळ खुप कमि राहिला आहे अता त्याला मारामारि करावि लागेल ना...

चतुरंग's picture

15 Nov 2014 - 8:11 pm | चतुरंग

स्विडलर आणि क्रामनिक आलेत. चँपिअनशिपच्या स्पर्धेतले दोन खेळाडू, त्यातला एक माजी जगज्जेता, समालोचनासाठी येणे हे या स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करते! :)
क्रामनिकच्या एक्सपर्ट कॉमेंट्स ऐकण्यासारख्या आहेत. त्याच्यामते विशीने चांगला खेळ केला तर त्याला वजिराच्या बाजूला चांगला प्रतिहल्ला निर्माण करता येण्यासारखे आहे..

सुजित पवार's picture

15 Nov 2014 - 8:17 pm | सुजित पवार

आधिच गेलेत ना दोघान्चे?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Nov 2014 - 8:35 pm | विश्वनाथ मेहेंदळे

पण त्याची बाजू आहे कि पटावर ;-)

संजय क्षीरसागर's picture

15 Nov 2014 - 8:34 pm | संजय क्षीरसागर

आनंदचं एच प्यादं जाण्याच्या मार्गावर आहे.
जर कार्लसन, प्याद्याचा वजीर करण्याची थ्रेट घडवू शकला तर जिंकेल.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

15 Nov 2014 - 8:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे

च्यायला... हरला :-(

संजय क्षीरसागर's picture

15 Nov 2014 - 8:45 pm | संजय क्षीरसागर

आता आनंदला ७ वा गेम जिंकावाच लागणार, नाही तर अवघड आहे.

आनंदच्या शेवटच्या तीन मूवज (मला तरी) अनाकलनीय होत्या.

संजय क्षीरसागर's picture

15 Nov 2014 - 8:48 pm | संजय क्षीरसागर

Anand has realised that trapping the bishop is not possible, so the position is objectively lost, and it is too late to do something...

चतुरंग's picture

15 Nov 2014 - 9:09 pm | चतुरंग

घोड्याने ई५ वरचे प्यादे मारुन आनंदला जोरदार प्रतिहल्ल्याची संधी होती.ती त्याने गमावली तिथेच डाव गेल्यासारखा होता. ती संधी त्याने घेतली असती तर मात्र हत्तींची मारामारी वेळेवर होऊन धोकादायल ई प्यादे पटावरुन गेले असते आणि डाव बरोबरीत नक्कीच सोडवता आला असता.
असो. आता पुढल्या डावात सोमवारी आनंदला जिंकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण तोही डाव जर मॅग्नुसने जिंकला तर स्पर्धा गमावल्यासारखीच आहे.
स्पर्धेच्या या पातळीत अशा संधी गमावणे परवडणारे नाही! आनंद मानसशास्त्रीय दृष्ट्या मॅग्नुस एवढा कणखर राहिलेला नाही हे सत्य मान्य करुन अनुभव आणि डायनामिक खेळ, टॅक्टिकल पोझीशन्स याच्या जोरावरच त्याला वाट काढायला लागणार आहे.
आजच्यासारखी पोझीशन मॅग्नुसला देणे म्हणजे सिंहाच्या गुहेत स्वत:हून जाऊन बसण्यासारखे आहे!