आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
9 Nov 2014 - 5:30 pm

आज काय बघायला मिळणार? कालचा ग्रुन्फेल्ड? चला बघूयात

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 5:31 pm | चतुरंग

क्या बात है! आज लढाई बघायला मिळणार. पहिल्या चार खेळ्या कॉपीबुक. मॅग्नुसचा किल्लेलोक राजाच्या बाजूला पूर्ण

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 5:33 pm | चतुरंग

सुपर ग्रँडमास्टर्स स्पर्धांमधून अतिशय प्रसिद्ध!

कारण ई५ वर्च्या प्याद्याला जोर, कारण मग डी५ असे प्यादे खेळता येईल

कालपासुन चेक करतोय.पण भारतात कुठल्याही चॅनेलवर प्रक्षेपण होत नाही.मोबल्यावर दिसत नाही.
कंमेट्री करक राहा तेवढाच आनंद

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Nov 2014 - 6:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
रमताराम's picture

9 Nov 2014 - 5:51 pm | रमताराम

आलो एकदाचा. आज मिपा बराच वेळ लॉगिन करूच देईना. आमच्या ब्राउजरने काही काशी केली बहुतेक.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 5:52 pm | चतुरंग

दहाव्या खेळीला त्याने ७ मिनिटे घेत्ली आहेत. मॅग्नुस त्याचा वजिराच्या बाजूचा घोडा एफ१ आणि मग जी ३ असा आणणार असे वाटते आहे बहुदा.
आनंदने त्याचा घोडा डी७-एफ८ मार्गे ई६ वरती आणायचा विचार पक्का केलाय ..

रमताराम's picture

9 Nov 2014 - 6:06 pm | रमताराम

वर्षी आनन्दला बर्लिन'ने बराच त्रास दिला होता. यावर्षी तो तयारीत असेल अशी अपेक्षा आहे.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 6:07 pm | चतुरंग

अजून तरी कंफर्टेबल वाटतोय.

रामदास's picture

9 Nov 2014 - 6:13 pm | रामदास

अजून मॅग्नुस खुर्चीवर रांगत नाहीय्ये. (कालच्या खेळात एकदा हा पडतो का काय असं वाटलं होतं.)ही सुरवात जर्रा डल वाटते आहे.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 6:18 pm | चतुरंग

पोकरफेस आहे! आनंदला देखील सहजासहजी वाचता येत नाही....

त्याला जर बर्मुडा घालून यायला परवानगी मिळाली तर तो ते सुद्धा करेल! :)

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 6:20 pm | चतुरंग

काळ्याच्या काळ्या उंटाची घुसमट हा प्लॅन...आनंद ए ५ खेळला आणि मॅग्नुसचे प्यादे थोपवले

कृपया पुढे कॉमेंट्री करा.

रामदास, आपण व्हिडिओ कोठे पाहत आहात?

रामदास's picture

9 Nov 2014 - 6:28 pm | रामदास

कालचीच लिंक आहे

बळी कोणाचा ?

रमताराम's picture

9 Nov 2014 - 6:38 pm | रमताराम
बहुगुणी's picture

9 Nov 2014 - 6:48 pm | बहुगुणी

धन्यवाद!

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 6:37 pm | चतुरंग

डाव सोपा करण्याकडे कल आहेच मॅग्नुसचा. चेन्नैप्रमाणेच तो ग्राइंडिंग खेळणार, तासन्तास खेळून समोरच्याला वेअराउट करणे हे तंत्र..

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 6:39 pm | चतुरंग

मारले न जाता मोहरी पटावरुन जाण्याचे दुर्मिळ दृष्य बघायला मिळते आहे...

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 6:42 pm | चतुरंग

या प्रायोजकांचा ब्रेक सुरु झाला की त्यांचा लेगब्रेक करायची इच्छा होते. अरे खेळ चाललाय आणि मधेच तुमचे विडिय्यो कशाला? पण काय पैसा बोलता है!!

रमताराम's picture

9 Nov 2014 - 6:44 pm | रमताराम

रंगाशेट, यावेळी तुम्ही नाही म्हणून आमची तानिया पण आली नाही. आता तुम्ही रिटायरमेंट मागे घेतली आहे तर तिला परत आणणे ही तुमची जबाबदारी आहे. :P

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 6:48 pm | चतुरंग

म्हणजे आनंदच्या बोर्डावरचा वजीर ही तुमची खरी 'क्वीन' नाहीये तर!! ;)

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 6:47 pm | चतुरंग

रंगाचे उंट शिल्लक म्हणजे लढाईची नांदी. आता काळ्याचा प्रयत्न सगळी प्यादी काळ्या घरात आणून उंटाची हालचाल मर्यादित करणे आणि त्याच्या विरुद्ध प्रयत्न मॅग्नुसचा.
मॅग्नुसने ए पट्टीतला हत्ती ए ३ असा आणला...कुठे न्यायचाय हा हत्ती?
बहुतेक ई ३? डबल करणे

रमताराम's picture

9 Nov 2014 - 6:52 pm | रमताराम

आनंदच्या वजीराच्या मदतीने तीन प्यादी सी पट्टीवरून पुढे सरकू पाहतायत त्याला पायबंद घालणे हा हेतू असू शकेल. यावर आनंदने डी प्यादे मारून हत्तीला धोका निर्माण केला तर वजीराने ते प्यादे घेऊन मध्य भागावर वर्चस्व निर्माण करणे शक्य होईल. पण समोर तीन प्यादी हल्ल्याला तयार असताना वजीर थेट समोर नेणे कितपत शहाणपणाचे होईल कोण जाणे.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 6:54 pm | चतुरंग

नव्हे कदाचित डी३ असू शकेल म्हणजे मग डी प्याद्याने ई प्यादे मारुन स्तंभ मोकळा करुन घेणे..

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 6:52 pm | चतुरंग

हत्ती फक्त रांगेतून हलवून न नेता थेट आहे त्याच स्तंभातून पुढे आणून आडव्या पट्ट्यांचा ताबा घेणे असा रोख बर्‍याचदा दिसायला लागला आहे...

रामदास's picture

9 Nov 2014 - 6:57 pm | रामदास

आणि दोन प्यादी साट्यालोट्यात

रमताराम's picture

9 Nov 2014 - 6:58 pm | रमताराम

प्यादी एक्स्चेंज करून मधल्या पट्टीवर नियंत्रण मिळवण्याचा हेतू साध्य झाला कार्ल्याचा. वजीर ती पट्टी ताब्यात ठेवून आहेच. हत्ती त्याच्या जोडीला येऊन हल्ला करू शकतो. पण आता प्यादे तिथे नसल्याने ही शक्यता कमी झाली. घोडा हटवून हत्ती थेट जी पट्टीत नेऊन राजावरच्या हल्ल्याची तयारीही करता येईल.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:02 pm | चतुरंग

घोडा एच ४ मधे आलाच आहे.शिवाय वजिराला थेट एच ५ कर्ण मोकळा आहेच, हत्ती जी ३ मधे आला तर सरळ तीन मोहोरी राजाच्या दिशेने चाल करणारी असतील.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:00 pm | चतुरंग

लागलाय असे वाटते ...एक चाल करुन एखादा रोख दाखवायचा आणि समोरच्याला वेगळ्याच दिशेने न्यायचे आणि नंतर सामान्यपणे प्रेडिक्टेबल चाल न करता वेगळेच काही खेळायचे ...

रामदास's picture

9 Nov 2014 - 7:04 pm | रामदास

किंमत किती ?

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:07 pm | चतुरंग

गेम हा मॅग्नुसचा प्रांत नाही असे समजले जाते परंतु हा देखील साचेबद्ध विचार ठरु शकतो...आनंद्ला टॅक्टिकल गेम्स आवडतात म्हटल्यावर मॅग्नुस त्याच्याच मैदानात येऊन खेळणारच नाही असेही नाही.. अनदर अनप्रेडि़क्टेबिलिटी!!

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:04 pm | चतुरंग

आनंदने व्जिरावर हल्ला केला हत्ती डी८ मधे आणून..आता मॅग्नुस वजीर ई२ मधे नेतोय का हत्ती मधे घालतोय?

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:08 pm | चतुरंग

बी एच ६ आणि हत्ती जी ३ राजाच्या नाड्या थेट आवळल्या जाण्याचा धोका!!

रमताराम's picture

9 Nov 2014 - 7:16 pm | रमताराम

तीनही अ‍ॅनलिसिस एंजिन्स हे वेरिएशन तपासत नाहीयेत. त्यांच्याकडे हत्ती जी-३ मात्र आहे. अर्थात उंट एच-६ ला घो जी-६ हे उत्तर आहेच.

रमताराम's picture

9 Nov 2014 - 7:16 pm | रमताराम

नाही चालणार.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:14 pm | चतुरंग

घड्याळात दणकट आहेत त्यामुळे या डायनामिक पोझीशन मधे भरपूर विचार करणे शक्य आहे...

रामदास's picture

9 Nov 2014 - 7:22 pm | रामदास

उध्दवजींकडे बघू की आनंदच्या निर्बळी वजीराकडे .

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:38 pm | चतुरंग

निर्बळी नाही हो. तो कधीही एफ ७ असा येऊ शकतोच खेळात परंतु बाकी चिल्लिपिल्ली मोहोरी जर बचाव करु शकत असतील तर वजिराला कशाला इरेस घाला?

बहुगुणी's picture

9 Nov 2014 - 7:44 pm | बहुगुणी

ते 'निर्बळी'उपहासाने वजीरापुढे लावले असेल का रामदासांनी? त्यांना उद्धवजींना ते विशेषण लावायचं होतं बहुतेक असं वाटून गेलं क्षणभर! :-)

रमताराम's picture

9 Nov 2014 - 7:41 pm | रमताराम

निर्बळी काय म्हणून? घोडा ए-फ-४ साठी मोठा आधार आहे त्याचा. तिथे एक्स्चेंज झाले की थेट कार्ल्याच्या राजावर मोर्चे बसतील.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:36 pm | चतुरंग

बचाव नीट सुरु आहे. आता हत्ती जी ३ मधे आलाय तर घोडा जी ६ मधे आणला की काम भागते. गरज पडल्यास उंटाने घोडा मारुन पोझीशन मोकळी करता येईल.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:41 pm | चतुरंग

आता मॅग्नुस उंट कुठे नेतोय ते बघायचे..का वजीर मागे घेऊन एच प्यादे मुसंडी मारणार?

मी आलोच. कुकर चढवतो गॅसवर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2014 - 7:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाट पाहतो या लवकर. एकटे रंगाशेठवर लोड नका टाकू.
मी वाचतोय. समालोचन.

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

9 Nov 2014 - 7:45 pm | रमताराम

पायलीभर भात जास्त चढवा. गेम संपला की येतो, पोस्ट-मॅच अ‍ॅनलासिस करू या. :p

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:47 pm | चतुरंग

आणि सोबत घुटक्या घुटक्याने अ‍ॅनालिसिस ;)

घुटक्या घुटक्याने अ‍ॅनालिसिस >> =))

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:46 pm | चतुरंग

:)

संजय क्षीरसागर's picture

9 Nov 2014 - 7:45 pm | संजय क्षीरसागर

त्याची मोहरी अत्यंत स्ट्रॅटेजिक पोझिशनला असून त्याच्या खेळाला एक निश्चित दिशा आलीये.

आहेत हे नक्की परंतु थ्रेट वाटते तितकी घातक नाहीये. बचाव अगदी शक्य आहे आणि आनंद बचाव किंग आहे!!

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:00 pm | चतुरंग

आता प्याद्याने उंट मारला तर घोडा एफ ४ घेऊन वजिरावर हल्ला करणार असे दिसते..

Carlsen remains calm and tries to improve slowly because black can't actually do anything on the open file. This is the first time in the game I see Anand some real pressure. So far he defended superbly.

पण बचाव करायला लागणं ही मूळातच अवघड परिस्थिती आहे.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:45 pm | चतुरंग

आता आनंद हत्ती डी७ असा आणेल आणि व्जिरावरचा ताण कमी करेल. शिवाय मॅग्नुसचा हत्ती डी१ असा चाल करुन आलाच तर दुसरा हत्ती ड्डी८ येऊ शकतोच..

रामदास's picture

9 Nov 2014 - 7:46 pm | रामदास

मी आलो की रंगाशेठ जातील किचनमध्ये . रविवार आहे ना .

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:48 pm | चतुरंग

पहिला चहा मॅच सुरु व्हायच्या आधी झाला सुद्धा! रविवार असतोच तसा विश्रांतीचा!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2014 - 7:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी धाग्यात पट टाकलाय पान उघडायला जड जात असेल तर सांगा काढून टाकतो.

-दिलीप बिरुटे

उघडायला लागत नाहीये!

रामदास's picture

9 Nov 2014 - 8:22 pm | रामदास

प्रभू मास्तरांची सुरक्षीत खिडकी आठवली

http://www.misalpav.com/node/28480

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2014 - 7:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राहीलेल्या पंचेचाळीस मिनिटात किती चाली खेळाव्या लागतील ?
की वेळेचं तसं काही नाही ?

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 7:58 pm | चतुरंग

प्रत्येकी चाळीस असतात. त्यामुळे राहिलेल्या ४५ मिनिटात २० चाली करायच्यात आनंदला आणि १९ मॅग्नुसला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2014 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, आनंदने उंट फुकट दिला नसेल बॉ.
पाहु पुढं काय होतं. :(

-दिलीप बिरुटे

घोडा एफ ४ आणून वजिरावर हल्ला करता येईल का?

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:05 pm | चतुरंग

ई स्तंभ मोकळा करुन घेतलान आता हत्ती ई६ मधे येणार!! पुन्हा वेगळाच प्लॅन...मॅग्नुस ताल सारखा खेळतोय का?

ताल की चाल

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:16 pm | चतुरंग

डिसेप्टिव गेमप्लॅन्स!!

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:07 pm | चतुरंग

आता आनंदला हत्ती डी७ असा घेता येत नाही कारण मगहहत्तीने ई८ असा चेक आणि मग आनंदच्या हत्तीने मारामारी केळी की वजिराने ई ८ वरचा हत्ती मारुन मेट!!

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:09 pm | चतुरंग

दबा धरुन बसलाय मॅग्नुस बोर्डावरती!! आज आनंदच्या बचावाचा कस लागणार!!

एच प्याद्याला पट्टी मोकळी करुन देणार की काय मॅग्नुस? त्याला बर्‍याच मुव्ज आहेत त्यामुळे आनंदचे काम कठिण होते आहे!!

संजय क्षीरसागर's picture

9 Nov 2014 - 8:21 pm | संजय क्षीरसागर

कार्लसननं डावावर नियंत्रण मिळवलंय.

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:19 pm | चतुरंग

हत्ती ई६ मधे आला. आता वजीर एफ ६ आणून आनंद वजिरावजिरीला आमंत्रण देणार का? एफ ४ वरचे प्यादे बिनजोरी आहे त्यामुळे त्याचा विचारही करावा लागेलच..परिस्थिती कालच्यापेक्षा कठिण आहे :(

माझीही शॅम्पेन's picture

9 Nov 2014 - 8:19 pm | माझीही शॅम्पेन

मला वाटताय सोचीत (ह्या) डावात आनंदची जबरदस्त गोची झालीय

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:23 pm | चतुरंग

एच ६ असे प्यादे सरकवून आनंदला वेंट ओपनिंग करुन ठेवावे लागणार अन्यथा दोन्ही हत्ती मागच्या पट्टीत अडकून पडतील आणि वजीर अतिताणाचा बळी ठरेल!!

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:25 pm | चतुरंग

ई४ मधे येणार आणि पुढच्या खेळीला हत्ती ई७!! थ्रेट्स सरळ आहेत पण बचाव कसा?

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:27 pm | चतुरंग

आधी प्यादे घेणार! म्हणजे मग एक पॉन डाउन असल्याचा मानसिक तणाव बचावाच्या कठिणपणात भर घालेल..

माझ्या मते त्याचं सगळं लक्ष फक्त एका घरावर केंद्रित आहे : E-7! आनंदची एक चूक आणि डाव जाईल.

संजय क्षीरसागर's picture

9 Nov 2014 - 8:34 pm | संजय क्षीरसागर

.

त्याची उणीव आता भासेल . पण हे अत्यंत दवणीय विधान आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Nov 2014 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा. वजीर काय प्रेशर आणतो बघु या.
हत्ती घेईल का आनंद.

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:32 pm | चतुरंग

वजीर डी७ खेळला. आता हत्ती ई४ येणार. त्याला आनंदचे उत्तर एच ६ असे असेल आणि मग राजा एफ ८!

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:34 pm | चतुरंग

मॅग्नुस प्रॉफिलॅकमुव्ह्,ऊव्ज करतो हे जे काल म्हंट्ले होते त्याचा पुरावा. सद्यस्थितीत काळा जेरबंद आहे तोवरच बचावाची तयारी करुन घेणे म्हणजे बॅकरँक चेक्स बसणार नाहीत! क्या बात है!! मॅग्नुस इज ऑस्सम!!

रमताराम's picture

9 Nov 2014 - 8:36 pm | रमताराम

+१

जेपी's picture

9 Nov 2014 - 8:38 pm | जेपी

माताय,
असली जबरा कंमट्री फक्त जेष्ठ मिपाकरच करु शकतात.
कंमेट्री चालु राहु द्या.

संजय क्षीरसागर's picture

9 Nov 2014 - 8:39 pm | संजय क्षीरसागर

कार्लसनचा राजा अभेद्य स्थितीत गेलायं! आता तो हल्ला करायला मोकळा आणि आनंदला फक्त बचावाशिवाय पर्याय नाही!

चतुरंग's picture

9 Nov 2014 - 8:43 pm | चतुरंग

एका रस्त्यावर तीन अवजड वहाने आणली आहेत मॅग्नुसने!! काम चालू रस्ता बंद!!! :)