आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ४

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
12 Nov 2014 - 5:30 pm

पहिल्या तीन डावातच दोन डाव निकाली निघालेत यापेक्षा जास्त उत्सुकता ताणणारे अजून काय असू शकते?
आज चौथा डाव मॅग्नुस पांढर्‍या मोहोर्‍यांनी खेळणार. कोणती सुरुवात असेल ई४ का अजून काही?
डाव सुरु व्हायला जेम्तेम एक मिनिट आहे चला बघूयात !

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

12 Nov 2014 - 5:34 pm | बहुगुणी

पट.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2014 - 7:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनपूर्वक आभार. :)

अतिशय शार्प वेरिएशन्स असलेली ओपनिंग थिअरी. आनंद त्यातला एक माहिर खेळाडू समजला जातो.
मॅग्नुसचा किल्लेकोट झालाय आनंदचा राजा पुढच्या खेळीत किल्लेकोटात जाईल. ५ मिनिटात ७ खेळ्या झाल्यात. वेग चांगलाच आहे.

रमताराम's picture

12 Nov 2014 - 5:38 pm | रमताराम

लै दिसांनी सिसिलियन चा गेम बघायला मिळतोय.

चतुरंग's picture

12 Nov 2014 - 5:43 pm | चतुरंग

डी५ असा मोक्याचे ठाणे धरुन ठेवायला बघणार. नंतर सी प्यादे पुढे येऊन पटाचा मध्य मजबूत करणार.
आनंदचे पर्याय - उंट जी ४ येऊ शकतो, किल्लेकोट करु शकतो.

सिसिलियन डिफेन्सने डाव सुरु झालाय.
या व्हिडिओ ट्युटोरियलची आठवण झाली.

(बुद्दीबळाविषयी इंटरेस्ट पण मोजकीच माहिती असणार्‍या माझासारख्यांसाठी ही सिरीजच माहितीपूर्ण आहे)

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2014 - 5:53 pm | केदार-मिसळपाव

बघुया..

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2014 - 5:55 pm | केदार-मिसळपाव

दोन्ही किल्लेकोट करायची शक्यता जिवंत ठेवलिये.
हत्ती येणार लवकर खेळात.

चतुरंग's picture

12 Nov 2014 - 5:56 pm | चतुरंग

किल्लेकोट करण्यात वेळ आणि टेंपो दोन्ही न घालवता सरळ मोहोरी पुढे आणण्यावर भर दिलाय म्हणजे त्याची कॉन्फिडन्स लेवेल उत्तम आहे. शिवाय दोन्ही बाजूपैकी कोठेही किल्लेकोट करता येईल अशी शक्यता ठेवली आहे. मेग्नुस शुड कीप गेसिंग!

आनंद कॅसल करेल तर शॉर्ट कॅसल करेल असे वाटते आहे.

तदुपरि- मॅग्नसच्या शेंटस घोड्याची पोझिशन लय महत्त्वाची. तिकडं मारामारी होणार का?

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2014 - 6:02 pm | केदार-मिसळपाव

हत्तीचा मार्ग मोकळा केला. आता त्याला घोड्याच्या बळाने उंट एफ-३ ला आणता येइल.

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2014 - 6:05 pm | केदार-मिसळपाव

त्याने ङ्हो घोडा आणला एफ-३ ला.
आनंद ला राजच्या बाजुने सावध व्हावे लागेल. वजीर एच-७ वर रोखला आहे कार्लसन चा.

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2014 - 6:14 pm | केदार-मिसळपाव

राजाला जागा केली आणि इ पट्टा नजरेत आणला.

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2014 - 6:28 pm | केदार-मिसळपाव

आनंद डी-४ आणि इ-५ वरुन चिंतीत आहे.

चतुरंग's picture

12 Nov 2014 - 6:34 pm | चतुरंग

जी ५ मधे येण्यापासून रोखले आनंदच्या एच ६ खेळीने. आणि ही एक वेटिंग मूव देखील आहे पांढर्‍याचा प्लॅन जाणून घेण्यासाठीची.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2014 - 6:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परिस्थिति वाटते ?

चतुरंग's picture

12 Nov 2014 - 6:54 pm | चतुरंग

डायनामिक आहे. आनंदचे वजिराचे प्यादे आय्सोलेटेड आहे. त्याचा जी४ वरचा उंट मॅग्नुसला त्रासदायक ठरायच्या आतच तो हुसकावून लावायला त्याने वजीर एफ १ मधे आणलाय. मॅग्नुसचा रोख हा डाव सोपा करण्याकडे आणि नंतर वजिराचे प्यादे खाण्याकडे असेल. आणि आनंद त्याला संधी मिळू नये यासाठी प्रयत्नशील.

चतुरंग's picture

12 Nov 2014 - 6:55 pm | चतुरंग

रसिकांनी धागा पुढे चालू ठेवा मी दोन तासांनी येऊ शकेन बहुदा. आनंदला शुभेच्छा! :)

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2014 - 7:01 pm | केदार-मिसळपाव

म्हणजे डी-१ वरचा दबाव त्याने अप्रत्यक्ष कायम ठेवलाय.
मारामारी टाळतोय सध्या.

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2014 - 7:07 pm | केदार-मिसळपाव

आनंद च्या उंटाला मागे ढकलतोय आणि स्वतःचे मोहोरे पुढे आणतोय.

अनुप ढेरे's picture

12 Nov 2014 - 7:12 pm | अनुप ढेरे

मला नव्यानेच कळालेली माहिती शेअर करतोय. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी.
पटाखाली हुडिनी, कमोडो आणि स्टॉकफिश ही जी नावं आहेत त्यांना इंजिन्स म्हणतात. ते एक एक कॉप्युटर प्रोग्राम्स आहेत जे प्रत्येक खेळी नंतर पटाला अ‍ॅनालाईज करत असतात. त्यातून एक आकडा निघतो जो धन(positive) अथवा ऋण असू शकतो. धन आकडा पांढर्‍याच्या पारड्याला झुकणारा डाव आहे अस दर्शवतो. आकडा ऋण असेल तर डाव काळ्याच्या पारड्यात झुकणारा आहे. जेवढा मोठा आकडा डाव तितका जास्तं त्या पारड्यात झुकला आहे. -३ म्हणजे काळ्याच्या बाजूला झुकला आहे खूप. +३ म्हणजे पांढर्‍याच्या बाजूला.

अनुप ढेरे's picture

12 Nov 2014 - 7:14 pm | अनुप ढेरे

सध्या आकडा -०.१ आहे. थोडासा काळ्याच्या बाजूला झुकलेला डाव आहे आत्ता.

आदूबाळ's picture

12 Nov 2014 - 8:43 pm | आदूबाळ

आयला असंय काय! धन्यवाद!

याचं युनिट काय असतं? लिमिट्स/रेंज काय असते?(उदा. -५ ते +५)

अनुप ढेरे's picture

12 Nov 2014 - 9:42 pm | अनुप ढेरे

युनिट असतं का ते नाही माहित, पण युनिटची गरज वाटत नाही. गेल्या म्याचमध्ये ४ वगैरे आकडा बघितला आहे. पण पूर्ण रेंज नाही माहिती.

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2014 - 7:29 pm | केदार-मिसळपाव

म्हणजे आता मोहरे कमी करतोय तो.

अशक्त चाल म्हणतायेत तज्ञ.

केदार-मिसळपाव's picture

12 Nov 2014 - 7:46 pm | केदार-मिसळपाव

हत्ती अथवा घोडा डी-४ आणणार का? किंवा सी-५ खेळणार?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2014 - 8:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ड्रा कड़े चालला सामना

संजय क्षीरसागर's picture

12 Nov 2014 - 9:10 pm | संजय क्षीरसागर

प्याद्याचा वजीर होईल अशी धमकी.
कारण या दोन दिग्गजात केवळ वजीर आणि घोड्यानं मात, आणि ते ही सद्य स्थितीत असंभव आहे.
आनंदच्या डी-प्याद्याला बढत शक्य आहे त्यामुळे तो बरोबरी मान्य करणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Nov 2014 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तरी निकाल लागेल का ? प्यादे वजीर होईल हीच धमकी आनन्द देईल ?

संजय क्षीरसागर's picture

12 Nov 2014 - 10:36 pm | संजय क्षीरसागर

Anand is happy with the result, Carlsen has nothing to be sorry about, and the match is getting more and more exciting!

रामपुरी's picture

12 Nov 2014 - 10:41 pm | रामपुरी

त्या एकमेव थ्रेटवर सगळा गेम होता!
:) :) :)

अवांतर: इंग्लिश वाक्य ChessDom वरुन चोप्य्पस्ते. ज्याचं श्रेय त्याला द्यायला शिका श्री श्री

चतुरंग's picture

12 Nov 2014 - 10:39 pm | चतुरंग

आता खेळानंतरच्या पत्रकारपरिषदेमध्ये खेळीमेळीने डावाचे विश्लेषण सुरु आहे! :)
या परिषदेत पत्रकारांनी डोकेबाज प्रश्न विचारायला बंदी असते की काय कोण जाणे?
मागे एकाने आनंदला विचारले होते "पुढच्या डावात तुझी स्ट्रॅटेजी काय असेल??:
आनंद : "सीरिअसली? डू यू बिलीव दॅट आय शुड डिस्कस धिस हिअर?"
डाव जिंकल्यावर किंवा हरल्यावर आता तुला कसं वाटतंय? हा आणखी एक गाढव प्रश्न, अरे कसं वाटणार?
ऑब्विअस आहे ना?
पण ते एक मस्त मनोरंजन असते यात वाद नाही!

पहाटवारा's picture

12 Nov 2014 - 11:17 pm | पहाटवारा

आनंद मस्त खेचतो.. गॅरी कास्पारोव विचित्र पण भारी बोलतो मुलाखतींमधे..
मागे एक हा संवाद पाहिला होता तूनळीवर जिथे ऊत्तम मुलाखतकारालाहि त्याने एकदम निरुत्तर केले होते ..
-पहाटवारा

मुक्त विहारि's picture

12 Nov 2014 - 10:54 pm | मुक्त विहारि

आनंद जिंकला की बरोबरी?

आम्हाला फक्त निकालाशी मतलब.

गणेशा's picture

13 Nov 2014 - 12:04 am | गणेशा

असेच म्हणतो, हे कसल काय बोलतात कळतच नाही.

मित्रांबरोबर संगीताच्या कार्यक्रमाला जाणरे आणि तिथे गेल्यानंतर, पुस्तक वाचनांत दंग होणारे...

असो,

ही सगळी भली मंडळी चर्चा करतात, त्यातल्या खेळीमेळीच्या वातावरणातच आपल्याला रस.

बाद्वे...व्यनि केला आअहे.

जेपी's picture

13 Nov 2014 - 4:46 am | जेपी

काय निकाल आहे.

मुक्त विहारि's picture

13 Nov 2014 - 4:57 am | मुक्त विहारि

असो...

बहुगुणी's picture

13 Nov 2014 - 4:57 am | बहुगुणी

दोघांनाही १/२ गुण मिळाला.

४ डावांनंतर प्रत्येकी २ गुण (दोन बरोबरीत सुटले, दोघांनी प्रत्येकी १ डाव जिंकला)

मुक्त विहारि's picture

13 Nov 2014 - 5:00 am | मुक्त विहारि

असेच ना?

बहुगुणी's picture

13 Nov 2014 - 5:06 am | बहुगुणी

हो

जेपी's picture

13 Nov 2014 - 6:36 am | जेपी

धन्यवाद...