मरण, मृत्यू वगैरे वगैरे

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
2 May 2012 - 11:41 pm

युजींसंदर्भात मित्रांशी होणार्‍या बोलण्‍यात नेहमी हा मुद्दा येतो की युजींमध्‍ये युनिक असं काय ? मला जे त्यांच्यातलं
युनिक जाणवतं ते म्हणजे किंचीतही गूढ अर्थ मागे न ठेवता सोप्या शब्दांच्या मदतीने प्रश्नाला भिडणे. खूप सुरुवातीच्या काळात युजींचा पवित्रा संवाद सुलभ होता, त्या वेळचा हा संवाद. मृत्यू म्हणजे नेमकं
काय या प्रश्नाचा युजींनी कुठल्याही गूढ अर्थाशिवाय घेतलेला हा धांडोळा.

-----------------------------------------------------

प्रश्न: मृत्यू म्हणजे काय?
युजी: मी कदाचित शंभर वर्षै जगू शकतो आणि न जाणो डॉक्टर्स आणि बायॉ‍लॉजिस्टस् एखादी गोळी शोधून काढतील जी मला आणखी शंभर वर्षे.. कदाचित दोनशे, अडीचशे वर्षे जगवेल. मी अडीचशे वर्षे जगतोय, तरीही एकदिवस हे सगळं संपणार आहे. जे सुरु होतं, ते संपतं.
पण तुम्हाला याची भीती वाटत नाहीच. तुम्हाला भीती आहे ती तुमच्या आतली संरचना, रुप संपणार आहे. तुमच्यामध्‍ये
असलेली संरचना, ते रुप कोणतं आहे? ही विचारांची संरचना नष्‍ट होत असण्याची भीती म्हणजे दुसर्‍या शब्दांत मृत्यू. सातत्य
संपतंय. तुमच्या आत असं काय आहे जे तुम्ही टिकवून ठेऊ इच्छिता? मला सांगा. यानंतर आपण सर्वजण जे टिकवून ठेऊ
इच्छितो ते काय आहे? हे शरीर तर तुम्ही ज्या देशात जन्मला असा त्यानुसार, किंवा ज्या परंपरांमध्‍ये तुम्ही वाढला त्यानुसार
जाळलं जाईल किंवा दफन केलं जाईल. भारतात ते तुम्ही जाळता, इथे तुम्ही ते दफन करता. पारशांमध्‍ये प्रेत गिधाडांना खायला घालतात. तुम्ही मृतदेह तसाच ठेऊ शकत नाही, बरोबरय की नाही? तुम्हाला हे शरीर कितीही आवडत असो ते तुम्ही तसंच ठेवणार नाही. तर तुम्हाला हे शरीर नष्‍ट करावंच लागतं, ते नष्‍ट करण्‍याची साधने कोणती का असेनात. त्यांना काहीही महत्त्व नाही. पण मरणानंतरही टिकवून ठेवण्‍याची इच्छा असलेलं, तुम्हाला टिकून राहिल असं अपेक्षित असणारं काय आहे?

प्रश्न: मृत्यूनंतर पुन्हा एखादं जीवन नाही का?
युजी: होय, हेदेखील फार महत्त्वाचं आहे. असं पहा, मी गेल्यानंतर काहीही शिल्लक रहाणार नाही असं मी म्हणालो तर, ते एक मत आहे, तुमच्यासाठी ते एक विधान आहे. दुसरा कुणी म्हणेल की माझा पुनर्जन्म होणार आहे. मला माझे मागचे जन्म
माहित आहेत आणि मला माहित आहे मी पुन्हा जन्माला येणार आहे. ख्रिश्चन परंपरेनुसार, तुम्ही स्वर्गात जाता. सर्व धर्मांमध्‍ये
सर्व प्रकारची मते, सिद्धांत आणि धारणा आहेत. ती असोत, पण हा शारीरिक, क्लिनिकल मृत्यू हे जीवनातलं तथ्‍य आहे, आणि
कुठल्यातरी प्रकारे आपण या शरीराची विल्हेवाट लावणार आहोत - कशी ते बिलकुल महत्त्वाचं नाही. सर्वात महत्त्वाचा प्रश्न
म्हणजे, मरणानंतरही टिकून राहिल असं तुम्हाला वाटतं ते काय आहे?

प्रश्न: असं म्हणतात की विचार टिकून रहातात.
युजी: होय, पण ती संरचना आहे; ती परंपरा आहे. तथाकथित मानवी जाणीव ही विचारांची संरचना आहे. आपण मागील
पिढ्यांपासून पुढील पिढ्‍यांकडे ती सोपवली आहे. पेशीय संरचनादेखील ती पुढे सुरु ठेवत आहे - पिढ्यान् पिढ्यांपासून. आपण ती पुढे सोपवत आहोत.

प्रश्न: मग मागे फक्त विचारच रहातात का?
युजी: आपण केलेले सर्व विचार, आपल्याला आलेले सर्व अनुभव शिल्लक रहातात.
ठिक आहे, आपण मुद्याला चिकटूनच राहू आणि मृत्यू म्हणजे काय ते आपण शोधून काढू. मृत्यू म्हणजे काय? तु मला सांग.
एक डॉक्टर म्हणून, क्लिनिकल मृत्यू म्हणजे शरीराचा शेवट हे तुला माहित आहे आणि तीच वास्तविकता आहे.

प्रश्न: एक डॉक्टरच्या नजरेने मृत्यू वैद्यकिय संज्ञांद्वारे मृत्यू समजून घ्‍यावा लागतो.
युजी: होय. कारण आपण मानवी अवयवांचं प्रत्यारोपण करतोय आणि कायदेविषयक प्रश्न टाळण्‍यासाठी आता वकील लोक सुद्धा मृत्यू म्हणजे काय त्याची पुन्हा एकदा व्याख्या करीत आहेत. जीवन विज्ञान म्हणजे, तुला माहित असेल, नाडी, ह्रदयाची स्पंदने आणि ब्रेनव्हेव्ह्ज चालू असणे. यापैकी सगळं थांबलं तरीही, ब्रेनव्हेव्ह्ज शिल्लक रहातील तोपर्यंत जीवनही सुरुच रहातं. रॉबर्ट केनेडीच्या केसमध्‍ये असं म्हणतात की, खर्‍याखुर्‍या क्लिनिकल मृत्यूनंतरही सात तास ते जीवंत होते. ह्रदयाची धुगधुगी आणि नाडी बंद पडल्यानंतरही ब्रेनवेव्ह्ज चालू राहिल्या. आणि जेव्हा ब्रेनव्हेव्ह्जदेखील बंद पडल्या तेव्हा केनेडींना मृत घोषित करण्‍यात आले.
जीवन - जीवनातील जाणीव सुरु रहाते, विचारांच्या रुपात नव्हे. मी जर तुझ्‍या डोक्यात ठोसा मारला, तु तुझी शुद्ध हरवशील. त्याचा अर्थ विचारांची संरचना काम करीत नाहिय, पण त्याच वेळी शरीर जीवंत आहे. या ना त्या प्रत्येक वेगळ्या मार्गाने ते कार्यरत आहे. हे सगळं वगळता, तरीही मृत्यू म्हणजे काय? आपण फार लवकर या प्रश्नावर चर्चा करीत आहोत. तुम्ही सर्वजण तरुण आहात आणि तुम्हाला या प्रश्नाशी काही घेणंदेणं नाहीय. हा बौद्धीक प्रश्न आहे असं समजा.

प्रश्न: हो, मी आत्ता म्हणणारच होतो मृत्यू म्हणजे काय ते मला समजलेलं नाहीय.
युजी: तुम्ही म्हणता मृत्यू म्हणजे काय ते तुम्हाला कळत नाही. मृत्यू समजून घेण्‍याचा प्रयत्न करतंय ते काय आहे? माझ्या
आतमध्‍ये प्रश्न विचारणारा कुणीतरी आहे आणि तो प्रश्न विचारतोय. मी त्याला विचार करणारा किंवा प्रश्नकर्ता म्हणू इच्छित
नाही. आपण हे असं ठेऊन पाहू - एक प्रश्न आहे; माझ्‍या आतमध्‍ये हा प्रश्न उद्भवला आहे: मृत्यू म्हणजे काय? तर मी हा प्रश्न
कसा समजून घेऊ शकतो? मी हा प्रश्न ज्यातून समजून घेईल ती प्रक्रिया कोणती?
प्रश्न: मला काही कळत नाहीय.
युजी: मृत्यू समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या मरणाचा क्षण आल्याशिवाय जीवन म्हणजे काय ते आपल्याला
बिलकुल समजू शकणार नाही. दुसर्‍या शब्दात सांगायचं म्हणजे, माझ्या आतमध्‍ये कार्यरत असलेली संरचना - वैचारिक संरचना, समजून घेऊ इच्छिणारा प्रश्नकर्ता आपल्याला समजू शकणार नाही. काय उरतं, काय शिल्लक रहातं हे समजून घेण्‍यासाठी ही वैचारिक संरचना, हा प्रश्न विचारणारा संपणं अतिशय आवश्‍यक आहे.
हा तत्वज्ञानातला प्रश्न नाही. हा कुणा आध्‍यात्मिक वक्त्याने घेतलेला धांडोळा नाहीय. हा खूपच सोपा प्रश्न आहे.. पण त्याचवेळी तो खूप अवघडदेखील आहे. त्यामुळे मला तो स्वत:च माझ्यासाठी तो समजून घ्‍यायचा आहे. मृत्यू म्हणजे काय ते माझं मला समजून घ्‍यायचं आहे. जगात कुणीही दिलेल्या उत्तरांशी मला काहीही घेणंदेणं नाही.

प्रश्न: अनेक सिद्धांत आहेत, हे खरं.
युजी: मला त्यात स्वारस्य नाही. मी जेव्हा मरेन, तेव्हा मला त्या सिद्धांतांमध्‍ये स्वारस्य घेता येणार नाहीय. वास्तविक मृत्यूपूर्वी अर्धातास आपण कोमात जाऊ किंवा आपली शुद्ध हरपते, आणि त्यावेळी मृत्यू म्हणजे काय हे मला बिलकुल समजून घेता येणार नाहीय. तर मग टिकून रहाण्‍याचा प्रयत्न करतंय ते काय आहे? आपल्याला आपला प्रश्न माहित आहे: मृत्यूनंतर काय टिकून राहिल?

प्रश्न: भूतकाळातील अनुभव.. ते सर्व अनुभव.

युजी: ते आपण पिढ्यान पिढ्यांपासून पुढे सोपवतोय ते एकत्रित ज्ञान आहे. त्यामुळं मी टिकून राहिन किंवा माझा पुन्हा जन्म
होईल असा त्याचा अर्थ होत नाही.

प्रश्न: पण माझा मुख्य प्रश्न...
युजी: तोच विचारतोय मी तुला. मी स्वत:ला तो प्रश्न विचारुन पहातोय. मला जाणून घ्‍यायचंय: ज्याचा शेवट होईल असं काय
आहे?
प्रश्न: मला कळत नाहीय. मी त्याचं विश्लेषण करुन पहातोय, पण मला ते करता येत नाहीय.
युजी: कसल्यातरी प्रकारच्या सातत्यामध्‍ये आपलं स्वारस्य आहे, बरोबरय ना?
प्रश्न: बरोबर.
युजी: कारण, असं पहा, आपण नेहमी टिकून रहात असतो. ही विचारांची संरचना आहे. ही तारेला तार जुळण्‍याची प्रक्रिया, ही संपते तेव्हा, तुम्हाला त्यात काहीही करता येण्‍यासारखं नसतं. तुम्ही काही औषधे शोधून काढू शकता आणि आणखी शंभर
वर्षांपर्यंत जगू शकता. तेव्हाही, लक्षात येतंय ना, पेशी विरुन जातील आणि पूर्ण शरीर टाकाऊ होईल. त्यामुळं मृत्यू हे जीवनाचं तथ्‍य आहे.
तर, मृत्यू म्हणजे काय हे मी माझ्‍यासाठी कसं शोधू शकतो? मला जाणून घ्‍यायचंय, तुझ्‍याकडून जाणून घ्‍यायचंय - मृत्यू
म्हणजे काय?

प्रश्न: मला माहित नाही, काहीही उत्तर येत नाहीय.
युजी: जीवन म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय ते मरु दे. हे पूर्णपणे त्याच्याशीच संबंधित आहे - दोन्हीही. जीवन आणि मृत्यू या दोन वेगवेगळ्या गोष्‍टी नाहीत. त्यामुळे आपण मृत्यूचा मुद्दा सोडून देऊ. तो मागाहून येईल. जीवन म्हणजे काय? जीवनाचा काही हेतू आहे की नाही ते मला जाणून घ्‍यायचं नाहीय. त्या सगळ्या जीवन म्हणजे काय या प्रश्नावर थापलेल्या कल्पना आहेत. अस्तित्त्वाला अर्थ असो की नसो, मला त्याच्याशी काही करायचं नाही. जीव शास्‍त्रज्ञ, तत्वज्ञ, मानसशास्‍त्रज्ञ, वैज्ञानिक यांनी केलेल्या सर्व व्याख्‍या असतानाही, जीवन म्हणजे काय ते मला शोधून काढायचं आहे.

प्रश्न: मी जीवंत आहे हे मला माहित आहे, कारण मला मन आहे जे प्रश्न विचारतंय.
युजी: तु त्या केंद्रबिंदूवर पहातोयस. त्यावर तु पाहू शकत नाहीस. तु ज्याबद्दल बोलतोयस ना, ते केंद्र फक्त तु ऐकलेली, किंवा तु अनुभवलेली, किंवा तुझा विश्वास असलेलीच उत्तर देण्‍याच्या कामाचं आहे. मला सांगण्‍यासाठी, किंवा माझ्‍या प्रश्नाचं उत्तर देण्‍यासाठी, तु त्याकडे कसं पाहू शकतोस? मला सांग: तुझ्या जीवनाकडे पाहण्याचं आणि जीवन म्हणजे काय ते मला सांगण्‍याचं ते साधन काय आहे? हा मी विचारलेला तोच मागचा प्रश्न आहे - तुम्ही जीवंत आहात हे तुम्हाला कसं कळतं? हा वेगळा प्रश्न नाही. मी तोच प्रश्न दुसर्‍या शब्दात विचारलाय - जीवन म्हणजे काय?

प्रश्न: मला वाटतं, मी जीवंत आहे.
युजी: तुला वाटतं तु जीवंत आहेस? ते तर ज्ञान आहे, हो ना? जीवन म्हणजे काय त्याची तुझी एक संकल्पना आहे.

प्रश्न: इतर वेगळं काय सांगावं ते मला कळत नाहीय.
युजी: मी तुला गोंधळात टाकत नाहीय. ठिक आहे! मला माहितीय त्यानुसार, तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा तुम्ही जीवंत असता. जेव्हा तुम्ही बोलत नसता, मला नव्हे, तेव्हाही तुम्ही स्वत:शी, स्वत:बद्दल बोलत असता. हे सारखंच आहे. तुम्ही ज्याला जीवन म्हणता, ते हेच. त्यामुळं जीवन हा शब्द म्हणजे जीवन नव्हे. जीवन हा शब्द एक मेलेला शब्द आहे.
थोडं थांबून पहा. तुम्ही एका जीवंत गोष्‍टीकडे तुमच्या आतील एका मृत संरचनेद्वारे पहाण्‍याचा प्रयत्न करताय - मला ते सांगण्‍याचं तर सोडूनच द्या. हे बघ, एका जीवंत गोष्‍टीकडे एका मृत गोष्‍टीद्वारे, एका मृत साधनाद्वारे पाहाणे, शक्य नाही.

प्रश्न: जीवन हा शब्द जीवन नाही?
युजी: तो मृत शब्द आहे. जीवन हा शब्द जीवन नाही. ठिक आहे, आपण हेच वेगळ्या प्रकारे बघू. तुम्ही जेव्हा बोलण्‍याचा प्रयत्न करता, 'मी श्वास घेतोय' असं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमच्या श्वासामध्‍ये खंड पडलेला असतो.

प्रश्न: माझ्या श्‍वासात?
युजी: हो, तुझ्या श्वासात. फक्त ऐक. जेव्हा तु श्वास घेतोस तेव्हा, त्याच वेळी मी श्वास घेतोय असं तु म्हणू शकत नाहीस. तु हे करुन पहा, साधंच आहे - तु नेहमीच श्वास घेत रहातोस. ‍तु मला बोलतोस तेव्हा, तिकडे तुझ्या श्वासात खंड पडलेला असतो.

प्रश्न: आपण बोलतो तेव्हा, आपण...
युजी: तु श्वास थांबलास, पहिलंस ना. माझ्याशी बोलण्‍यासाठी तु तो वाव वापरलास. तु हे करुन पहा.

प्रश्न: खरंच मी श्वास थांबवला होता का?
युजी: ऐक, तुम्ही जे आवाज काढता, भाषा - मग ती इटालियन, फ्रेंच किंवा जर्मन, कोणतीही भाषा असो - तो एक आवाज आहे. तो फक्त आणि फक्त साधा आवाज आहे. हे आवाज तुम्ही कसे, कोणत्या लकबीने काढता ते मला माहित नसेल तर, मला ती भाषा कळत नसते. पण वापराच्या सर्व बाबतीत, ही भाषा - इटालियन मानू - ही फ्रेंच पेक्षा बिलकुल वेगळी ‍नाहीय. फ्रेंच ही भारतातल्या कोणत्याही भाषेपेक्षा वेगळी नाहीय. तुम्ही शब्द कसे योजता, आवाज कसे काढता त्यावरुनच भाषा वेगवेगळ्या ठरतात. समजतंय ना?
त्यामुळं तुम्ही तुमचा विचार करीत असता आणि तुम्ही त्यावेळी आवाज करीत नाहीय असे तुम्हाला वाटत असेल तेव्हाही स्वरयंत्र आत काम करीत असते. तुम्ही तुमच्या बिछान्यावर शांत पडलेले असता तेव्हाही तुमच्या स्वरयंत्राची हालचाल सुरुच असते. विचार करणे हा आवाज आहे; शब्द हा एक आवाजच आहे. मला हे सांगायचंय की, हे पहा हा मायक्रोफोन. मायक्रोफोन हा शब्द ती वस्तू नाहीय. फुल हा शब्द फुल नाहीय.
त्यामळं तुम्ही काढताय तो आवाज तुम्ही पूर्वीपासून ऐकलेली गोष्‍ट आहे. तुमच्या आईने किंवा कुणीतरी तुम्हाला सांगितलं की, तो मायक्रोफोन आहे, हा माणूस आहे, ही बाई आहे, हा पक्षी आहे आणि असलं बरंच कितीतरी. त्यामुळं तुम्ही कुणाकडेतरी पहाता तेव्हा, तुम्ही ती आठवण परत आणताय. तुम्ही जो आवाज ऐकलाय तो: हा माणूस आहे म्हणण्‍याशी संबंधित आहे. तो तुम्ही मला सांगा किंवा स्वत:ला सांगा, ते सारखंच आहे. तुम्ही कोणताही शब्द वापरा, तो तुमच्या स्मारणामध्‍ये येतो आहे. तुम्ही तो ओळखला आहे.

प्रश्न: होय, विचार करणं म्हणजे हेच.

भाषासमाजजीवनमानकृष्णमुर्तीप्रकटनलेखमाध्यमवेधभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

3 May 2012 - 12:10 am | बॅटमॅन

म्हणजे देकार्तचे "Cogito ergo sum" म्हणजेच "I think, therefore I am", इथेच यूजी येऊन पोहोचले म्हणायचे तर. बरोबर आहे, लॉजिकल आहे. माझेही असेच वैयक्तिक मत आहे.

सॉरी... सॉरी..
बायॉलॉजी ऑफ एन्लायटन्मेंट मधल्या एका प्रकरणाचा हा मधलाच कुठलातरी भाग असून तो मध्‍येच अचानक थांबवला आहे. मूळ संवाद भलामोठा आहे.

अरे यकु.. तू अन्य धाग्यात एका ठिकाणी माझे म्हणणे "नोट युअर सेंटेन्सेस" म्हणून खूण करुन ठेवले होतेस.

त्या संदर्भास घेऊन आता हा लेख वाचून मला असं म्हणायचंय की मी युजीविरोधक नाहीच आहे मुळी.

ते म्हणतात त्यातला हा तू वर दिलेला भाग अत्यंत रोचक आणि स्ट्रेटफॉरवर्ड विचार देणारा आहेच..

त्यामुळे मी याच्याशी सहमतच..

फक्त सर्वाच्या शेवटी तो जाणीवेचा पिंजरा, भिंत, छत, कातळ.. काही नाव दे.. पण तो आहे.. त्याच्या आत जे काही धडपडायचे ते धडपडा..

ती मर्यादा आहे. युजी असोत किंवा तू मी..

>>>त्या संदर्भास घेऊन आता हा लेख वाचून मला असं म्हणायचंय की मी युजीविरोधक नाहीच आहे मुळी.

--- नै.. नै.. नै.. युजीविरोधक/ समर्थक असं काही नाही. काल अनुवाद अर्धवट होता, त्यातले काही मुद्दे लक्षात होते. तेवढ्यातच तुमच्या प्रतिसादात इथं युजी ज्या दिशेने जात आहेत तीच दिशा दिसली, त्यामुळं नोट करा म्हणालो होतो :)

बाकी ठिकच.

मुक्त विहारि's picture

3 May 2012 - 2:43 pm | मुक्त विहारि

सगळे विचार डोक्यावरून गेले....

जावूदे प्रत्येक गोष्ट समजलीच पाहिजे असे थोडीच आहे...

बाकी आपले जीवनांत एकच तत्व...

" जो डर गया, समझो वो मर गया..... कब है होली? कब?कब?"

न घाबरता जीवनाच्या सप्तरंगात न्हावुन निघुया...

सस्नेह's picture

3 May 2012 - 3:30 pm | सस्नेह

>>>मृत्यू म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा युजींनी कुठल्याही गूढ अर्थाशिवाय घेतलेला हा धांडोळा.<<<<<
बापरे ! एवढा द्राविडी प्राणायाम करूनही नेमकं 'मृत्यू म्हणजे नेमकं काय' याचा नाही ब्वा उलगडा झाला ! कुनाला झाला असल्यास कृपया विशद करावे.
यापेक्षा 'वासांसि जीर्णानि..' बरंच सोपं वाटतय...

सस्नेह's picture

3 May 2012 - 3:30 pm | सस्नेह

>>>मृत्यू म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचा युजींनी कुठल्याही गूढ अर्थाशिवाय घेतलेला हा धांडोळा.<<<<<
बापरे ! एवढा द्राविडी प्राणायाम करूनही नेमकं 'मृत्यू म्हणजे नेमकं काय' याचा नाही ब्वा उलगडा झाला ! कुनाला झाला असल्यास कृपया विशद करावे.
यापेक्षा 'वासांसि जीर्णानि..' बरंच सोपं वाटतय...

शिल्पा ब's picture

4 May 2012 - 2:04 am | शिल्पा ब

मेरी गो राउंड!!

यकु's picture

4 May 2012 - 2:27 am | यकु

सब माया है
नाही का? ;-)

तिमा's picture

3 May 2012 - 9:26 pm | तिमा

आधी 'आभासी उपकरणन' चे तिन्ही भाग आणि त्यावर 'हे' वाचून मी मेलोय. त्यामुळे मृत्युचा अर्थ मला पूरेपूर कळलाय.

मुक्त विहारि's picture

3 May 2012 - 9:33 pm | मुक्त विहारि

लय भारी...

कर्ण's picture

4 May 2012 - 7:27 pm | कर्ण

हा युजीं कोण ...????????????