सात वेळा मेलेला माणूस "The Dead Man"

rushikapse165's picture
rushikapse165 in जनातलं, मनातलं
28 Nov 2020 - 11:16 am

खेळ.खेळ म्हणजे खेळच.मग तो कुठलाही असो.आजकाल एक नवा ट्रेंड चाललाय,काय तर,90'Kids.तसा मी काही नव्वदच्या दशकातील नाही.आणि नसलो तरी मी काही दुर्देवीही नाही,कारण माझा जन्म तो २००० सालचा,त्यामुळे संगत होती ती नव्वदच्याच दशकाची.
तो काळही तसाच होता.T.V.नावाचा प्रकार तितकासा सगळ्यांकडे नसायचा.त्यात त्यावेळच्या रामानंद सागरांच्या रामायण आणि श्रीकृष्ण या मालिकांनी अगदी दशक उलटल्यानंतरही आपलं वर्चस्व प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं होतं,आणि त्यामुळे ज्याघरी T.V.त्याघरी संध्याकाळी गर्दी हे ठरलेलं.आणि दुसरं काय तर?क्रिकेट,त्यावेळी क्रिकेट म्हणलं की सचिन अाणि सचिन म्हणलं की क्रिकेट,एवढंच गणित.आणि आमचं काहीतरी वेगळंच असायचं,शक्तिमान,सोनपरी आणि बरंच काही.
पण जरा कळायला लागलं आणि एक नवा शब्द कानावर पडला आणि तोच शब्द जिभेवरु रेंगाळायचा WWF.होय आज जरी ते WWE असलं तरी तेव्हा ते WWF च होतं.अगदी भांडणं करायची म्हटली तरी चल WWF खेळू,हेच बोलायचं.
या WWF च वेड लागलं ते काही थोडक्याच खेळाडूंमुळे.त्यातलाच एक "The Undertaker".काहीसा वेगळाच दबदबा होता या माणसाचा.नुकतंच या माणसाने त्यावेळचं WWF आणि आत्ताच्या WWE ला रामराम ठोकला.३० वर्षांची कारकिर्द संपली.माझ्या वयापेक्षाही मोठी कारकिर्द होती या पठ्ठयाची.खरतर तितकीशी माहिती आजही नाही याबद्दल,पण या माणसाची चाहत कधी लागली ते कळालच नाही,पण का लागली,त्याला मात्र एकच उत्तर अफवा.होय 'अफवा'.
काय तर म्हणे,हा माणूस सात वेळा मरुन जिवंत झालाय.एकदा तर म्हणे याला मेला असा समजून पुरुन टाकण्यात आला होता,मग याच्या बायकोने त्या जागेवर जाऊन पूजा केली म्हणजे त्यांच्या परंपरेनुसार.तब्बल सहा दिवस पूजा केल्यानंतर सातव्या दिवशी याने जमिनीतून हात बाहेर काढला,मग याला वर खेचून घेतले.एकदा तर असंही ऐकलंय की या माणसाची जीभ कापली गेली होती आणि या माणसाने शेळीची वा अन्य कुठल्यातरी प्राण्याची जीभ लावली.
एकदा तर म्हणे हा माणूस सातवेळा मेलाय.एकदा तो जमीन फाडून वर आला,दुसर्‍यांदा वेगळंच काही,अश्या तब्बल सात पद्धती.पण एक मात्र नक्की त्यावेळी हे अगदीच खरं वाटायचं,कारण त्याला फक्त पडद्यावर बघूनच एवढी भिती वाटायची,की कधी कधी तर कोणाचे अंगवस्त्र अोले व्हायचे.कारण हा माणूस अंधारातून यायचा,नेमकं याला एवढ्या अंधारात दिसतं कसं?हे देखील एक आश्चर्यच.कधी हा रिंगणाच्या खालून अचानकच प्रकट व्हायचा,कधी रिंगणात थेट कोणाच्यातरी मागे असायचा.नेमका हा काय प्रकार ते आजही कोडंच.
कधी पुण्या-मुंबईहून नातेवाईक यायचे,त्यावेळी त्यांची मुलं पत्ते घेऊन यायची,चक्क WWF च्या खेळाडूंची.ती पत्ते खेळताना हा अंड्या म्हणजेच अंडरटेकर आमचा हुकमाचा इक्का ठरायचा.
साधारण आठवणीतला अंडरटेकर म्हणजे त्याच्याबद्दलच्या अफवा.तसा तो आजही "Dead Man" म्हणूनच अोळखला जातो.मी तर माझ्या आठवणीत त्याला तब्बल सात वेळा मारलाय.आणि तुम्ही?
ज्याला पडद्यावर बघून आजपण भिती वाटते,असा हा पठ्ठया.सातवेळा मरुन जिवंत झालेला हा एकमेव अवलिया."The Dead Man Undertaker."

बालकथाव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणक्रीडामौजमजाप्रकटनलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

सामान्यनागरिक's picture

28 Nov 2020 - 12:21 pm | सामान्यनागरिक

ते WWF मधे जे काही दाखवतात ते खरं असतं? मला तर ते व्यवस्थीत बसवलेल्या नाटकासारखं वाटायचं.
नंतर या खेळाला काही नियम आहेत की नाही हेच कळायचं नाही.

नंतर लक्षात आलं की त्यात दाखवलेले प्रेक्षक सुद्धा मंदबुद्धी असतात. त्या नंतर ते पहाणं सोडुन दिलं!
डिस्ने ची कार्टुन बघुन त्यापेक्षा जास्त चांगली आणि उत्त म करमणुक होते.

आधी ते खरं वाटायचं,पण मग नंतर कळायला लागलं तसं फक्त मनोरंजन म्हणून त्याकडे बघायचो.एकंदरीतच कार्टून मीही बघतो.पण शेवटी लहान असताना या अंडरटेकरने मनावर अधिराज्य गाजवलं होतं,असा तर विस्मृतीत नाही जाणार तो.म्हणून हे.शेवटी WWE १००%खरं नाही,हे तर जगजाहीरच.

साहना's picture

29 Nov 2020 - 11:12 am | साहना

१००% सर्व काही नकली असते. अर्थांत लोक आधीपासून शक्तिशाली असल्याने थोडाफार असली मार ते खाऊ शकतात.

जॉन स्टोइस्स्ल हे माझे अमेरिकेतील सर्वांत प्रिय पत्रकार. जॉन आपल्या आधीच्या कारकीर्दींत ग्राहक विषयांचे पत्रकार होते. WWF हे संपूर्ण पाने खोटे असले तरी ते सार्वजनिक रित्या ते मेनी करत नसत त्यामुळॆ अनेक मुलांची फावणूक होत होती. एका पैलवानाला स्टोसेल ह्यांनी प्रश्न विचारला आणि त्या पैलवानाच्या सरळ स्टसेल ह्यांचा कानशिलात लगावली.

हा एपिसोड पहा : https://www.youtube.com/watch?v=g3kip8_3z-A

ह्या व्यतिरिक्त मी आजपर्यंत कधीही टीव्ही वर WWE पहिली नसली तरी प्रत्यक्षांत एकदा पहिली आहे. सर्व काही विनोदी आणि मूर्खपणाचे आहे. पुरुष मंडळीचा नेहमीच मूर्खपणा आहे !

पुरुष मंडळीचा मुर्खपणा असं नाही,ती प्रत्येकाची आवड असते.एव्हाना मलाही महिलांच मालिका बघणं नाही आवडत.मग मी त्याला काय म्हणू? पण असो मी त्या लिंकवर गेलो होतो.हे खोटं आहे,हा अगदीच १००% नाही,कारण शेवटी तेही पैलवानच आहेत.आणि ते कानशिलात लगावणे म्हणजे शेवटी आरोपाचा अस्विकार करणेच होय.पण WWE बघणे हा काही पुरुषांचा मुर्खपणा नाही.@साहना

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Nov 2020 - 1:47 pm | अमरेंद्र बाहुबली

अंडरटेकर, रेमिस्टीरीओ, ट्रीपल एच, बटीस्टा....

किती नावं घ्यायची अजून!

प्रसाद_१९८२'s picture

28 Nov 2020 - 3:40 pm | प्रसाद_१९८२

यातली बरिचशी गुपिते उघड केली.

होय,शेवटी अफवाच.त्या उघड होणारच.

उन्मेष दिक्षीत's picture

28 Nov 2020 - 4:24 pm | उन्मेष दिक्षीत

हिटमॅन हार्ट चे 'माय रिअल लाईफ इन कार्टून वर्ल्ड ऑफ रेसलिंग' हे ५०० पानांचे पुस्तक आहे. खुप भारी आहे. त्याच्यात सगळं काही लिहिलं आहे त्याने इंजुरीज, रिजल्ट्स, ट्रॅवल, टायटल्स, कॅरेक्टर्स बद्दल. विन्स मॅकमोहन ची आयडिया होती अंडरटेकरची.

व्वा!एकदातरी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

टवाळ कार्टा's picture

28 Nov 2020 - 6:23 pm | टवाळ कार्टा

ते व्व्फ वाले पत्ते खुप खेळलोय....अगदी शाळेत वर्ग सुरु असतानाही....तेव्हा ५० पैशाला एक असे पोस्टर मिळायचे, शाळेत त्याचा व्यापार चालायचा =))
बाकी "कधी कधी तर कोणाचे अंगवस्त्र अोले व्हायचे" हे चुकीचे लिहिले आहे....त्याचा अर्थ भलताच आहे =))

ते अंगवस्त्र अोले होणे म्हणजे केवळ उपमा आहे.तसं ती पत्ती त्यावेळी इथे मिळायची नाहीत.मग पुणे-मुंबईहून आलेल्या नातेवाईकांची मुलं ती घेऊन यायची मग खेळायचो,त्यामुळे विकत घेण्याची वेळच नाही आली.बाकी पोस्टर तर आजपण तसेच आहेत भिंतींवरती.असो त्यावेळी हे सगळं खरं आहे हे वाटायचंच.

तुषार काळभोर's picture

28 Nov 2020 - 8:27 pm | तुषार काळभोर

आमच्याकडे ९५ मध्ये टिव्ही होता पण केबल नव्हती. ९६ मधे केबल आल्यावर पण काही दिवस स्टार स्पोर्ट्स नव्हतं. ज्या वर्गमित्रंकडे होतं, त्यांच्याकडून रसभरीत वर्णने ऐकून मनात एक कल्पना चित्र तयार झाले होते. कार्डमध्ये दिसणारे चेहरे आणि कुस्त्यांची ऐकलेली मसालेदार वर्णने ऐकून मनातल्या मनात ते पाहिलं जायचं.
मग पुढे कधी स्टार sports दिसायला लागल्यावर WWE पाहिलं. ऐकून जेवढं विस्मयकारक वाटलं, तेवढं नसलं तरी मनोरंजक ठासून होतं. त्याविषयी चर्चा व्हायच्या. वाद व्हायचे. त्यावेळी हल्क हॉगन, Hitman, अंडर टेकर, योको झोना, बिग शो हे स्टार होते.

पुढं सहस्रक उलटताना शालेय जीवन संपलं आणि मग WWE चं कौतुक कमी झालं. पण कधीतरी HHH, रे मिस्टरियो, द रॉक यांच्या मॅची बघितल्या.

आता काही वाटत नाही. वरिजनल असतं तरी वाटलं नसतं. scripted आहे म्हणून आवडत नाही, असंही काही नाही.

होय,आम्ही तर कधीकधी डंबेल्स उचलायचा प्रयत्न करायचो.कार्ड्सवरुन मग त्यांची रॅंकिंग बघून खेळायचं,मज्जा यायची.पण मग नंतर त्यातून निरस व्हायला लागला.पुन्हा बघायला लागलो त्याच कारण म्हणजे रोमन रेन्स आणि काही अंशी जाॅन सीना.त्यावेळी तर अगदीच ब्लॅक&व्हाईटवर पण पाहिलंय.पण आता मात्र वसतीगृहात आलो तर पुन्हा WWE कडे आकर्षण कमी झालं.असो.

नेत्रेश's picture

1 Dec 2020 - 2:37 am | नेत्रेश

त्या वयात अंगवस्त्र म्हणजे भारीच - :) :) हा हा...

लेख आवडला.

rushikapse165's picture

1 Dec 2020 - 3:43 pm | rushikapse165

मनापासून धन्यवाद!