कविता माझी

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
17 Nov 2016 - 11:10 am

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
या मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||धॄ||

मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या
घेण्यासाठी आम्हा सार्‍यांच्या पडतात उड्या
लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने
पाचशे हजाराची नोट बंद केली ||१||

कविता माझीकवितासमाजजीवनमान

मनाच्या खिशात...

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जे न देखे रवी...
14 Nov 2016 - 12:37 pm

समर्थकांच्या देशात
सर्वत्र मंगल वातावरण आहे,
प्रत्येक माणूस अतिशय आनंदात आहे,
देशप्रेमाची लाट आहे,
विजयाचा जयघोष आहे!

विरोधकांच्या देशात लुटालूट, दंगे,
अराजक माजलय, लोक मरत आहेत,
पोरं उपाशी, रुग्ण रस्त्यावर आहेत,
सर्वत्र फक्त आक्रोश आहे!

आपण आपलं चाचपून बघावं,
खिशात किती कॅश आहे,
मनात किती संतोष आहे,
किती असंतोष आहे!

कविता माझीवावरकविता

एक तू

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
9 Nov 2016 - 7:39 pm

मुरलीधर बन्सीधर
प्रेमसागर तू मनोहर
शामघन हरिहर
गोपाल तू भोळा

किसन तू मनमोहन
गिरिधर भाविकांचा
द्वारकाधीश नृपवर
माखनचोर गोपिकांचा

रूक्मिणीच्या वरा
तू यशोदरचा कान्हा
मीरेचा राणा
राधेच्या मोहना

स्त्रिमनाचा वेध
फ़क्त तुलाच जमेल
म्हणून 'नौछावर'
प्राण केले तुझ्यावर

कविता माझीकविता

तू आणि मी

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
5 Nov 2016 - 4:05 pm

अशी एक फक्त कल्पना असावी.
सोनेरी त्या क्षणाला एकांताची साथ असावी...!
गुलमोहराचा बहर,
आणि तिथेच आपली भेट असावी...!
जसे एखाद्या पाखराची,
गोड ड्रीम डेट असावी...!
तू मात्र,,,
आवडत्या आकाशी रंगाच्या,
पोशाखात असावी...!
आकाशालाही हेवा वाटावा,
इतकी तू सुंदर दिसावी...!
निरोप घेतांना डोळ्यांमध्ये,
अश्रूची एक झलक असावी...!
डोळ्यामधले भाव जाणूनी,
नाजुकशी ती मिठी असावी...!
जीव ओतला तुझिया पायी,
आशा तुझीही हीच असावी...!
एकमेकांची साथ अशी ही,

कविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताशृंगारप्रेमकाव्यरेखाटन

प्रारब्ध

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
2 Nov 2016 - 1:55 pm

प्रारब्ध

मुक्त आम्ही मृगद्वय
विहरत होतो रानावनात
कांचन वल्कले भरली
सीतेच्या मनात

टाकुनी मंत्र मरीच
शिरला सख्याच्या तनात
मोहवुनी रामास
केला त्याने घात

रामाच्या हाती
पारध सख्याचे झाले
आठवणीच्या ज्वाळेत
मी मात्र सती गेले

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

कुशी

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
2 Nov 2016 - 11:53 am

कुशी

अलगद जेंव्हा तू वळतो कुशीवर
रात्र पण करवट घेते
अनावर होते झोप अन
डोळ्यात स्वप्न उतरते

स्वप्नात जेंव्हा तू उतरतो
पहाट अपुरी पडते
वियोगाच्या कल्पनेने
झोप माझी उडते

देईन साथ मी कल्पांतापर्यंत
देशील ना तू पण ?
विचाराने या मी
रोज कुशी बदलते

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

तुझ्या आठवणीत...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
1 Nov 2016 - 2:47 pm

तुझ्या आठवणीत...

बहरलेल्या वेलीवर
एक कळी खोळंबली
तुझ्या आठवणीत ति
अजून नाही उमलली

गाभाऱ्यातील ज्योत
मंदपणे तेवली
तुझ्या आठवणीत
हळूच लवलवली

आभाळातील चांदणी
रात्रभर गुरफटली
तुझ्या आठवणीत
पहाटे ति चमचमली

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

स्मरशील का?

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
31 Oct 2016 - 11:25 am

स्मरशील का?

सदोदित आईच्या कुशीत
कधी माझ्या कुशीत शिरशील का?

सदोदित आईच्या मागे मागे
कधी माझ्या मागे फिरशील का?

सारे हट्ट आईला सांगतोस
कधी कधी मला मागशील का?

साऱ्या गुजगोष्टी आईला सांगतोस
कधी कधी मला सांगशील का?

पोटासाठी दूरदेशी मी
कधीतरी मला स्मरशील का?

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

क्षणाचे सोबती....

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
29 Oct 2016 - 8:28 am

क्षणाचे सोबती....

कशाला हवेत नगारे नौबती
आपण सारे क्षणाचे सोबती

जुळुनी येती जेव्हा प्रेमाची नाती
कशाला हवीत रक्ताची नाती

नुसतेच फोफावती वृक्ष सारे
भगवंताच्या माथी तृणाचीच पाती

वृथा तळपती सूर्याची किरणे
तिमिरात तळपती समईच्याच ज्योती

रोवून दाव एकतरी निशाण
जगात आहेत मोजकेच जगज्जेती

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

स्वप्नातले कोंकण

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
28 Oct 2016 - 8:32 am

स्वप्नातले कोंकण

साधेच घर माझे , छोटेसे अंगण
त्यात अवतरले, सारे वृक्षगण

अंगणात माझ्या, तुळशी वृंदावन
माथ्यावर दूर्वा, दुडदुडतो गजानन

अंगणात माझ्या, कर्दळीचे पान
घालतो मांडव, संतुष्ट होई सत्यनारायण

नारळ सुपारी डुले, आहे त्यास मान
नैवेद्याला सजते, केळीचे पान

परसदारी फुलती फुले, दारी आंब्याचे तोरण
शंकरास वाहते, बेलाचे पान

स्वप्न माझे साधे, सदाहरित कोंकण
त्यात असावे घरकुल माझे छान

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक