खरं तर ड्युअल (Duel) हा चित्रपट खूप आधी देखील पाहिला होता, आवडलाही होता. परवा घरचे इंटरनेट मुसळधार पावसामुळे बंद पडले असल्यामुळे हार्ड डिस्क टीव्हीला जोडून पुन्हा एकदा पाहिला.
स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित ड्युअल (१९७१) हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या जीवघेण्या संघर्षावर आधारित आहे, ज्यामध्ये भय, मानसिक तणाव आणि अस्तित्वाची झुंज यांच्यापासून निर्माण झालेल्या थराराने पुरेपुर भरलेला आहे. हा चित्रपट स्पिलबर्गचा केवळ दुसराच पूर्ण लांबीचा चित्रपट असून, त्याने त्याच्या कारकीर्दीची ठोस पायाभरणी ह्याद्वारे केली.