मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गंगा दशहरा

नूतन ·

विद्याधर गोखले यांनी पंडितराज जगन्नाथ हे संगीत नाटक १९६० मधे लिहीले होते. भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार यांनी गायलेली नाट्यगीते सुदंर आहेत. वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून पंडितराज ओळखले जातात.

नूतन 28/05/2025 - 11:28
जय गंगे भागीरथी..फार सुंदर पद प्रतिसादाबद्दल आभार

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज ज्येष्ठ लागला. असं ! मग ? मग काही नाही, मी भूतकाळात गेले. पावसाळी वातावरण .सकाळी १० चा सुमार. मंदिराचं सभागृह, मध्यभागी प्रवचनकारांची बैठक मांडलेली. त्यावर बसण्यासाठी आसन. पुढ्यात चौरंग मांडलेला. त्यावर आच्छादन घातलेलं .आमच्या काकू.. हो.. आमच्या शेजारी रहायच्या नं , म्हणून आमच्या. तर कीर्तनचंद्रिका सौ. पद्‌मावतीबाई देशपांडे ... आसनावर विराजमान होत आणि खड्या स्वरात, हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगा असा गजर सुरु होई. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत रोज सकाळी पंडितराज जगन्नाथ यांच्या जीवनचरित्रावर आख्यान होई आणि दशमीला समाप्ती होई.

वारी !!!

किल्लेदार ·

हिमाचल उत्तराखंड भागात अशी देवस्थाने व वारी सोहळा बरेच ठिकाणी असतो. प्रचि अप्रतिम तसेच वर्णन सुद्धा. नुकताच अम्रीकेत जाऊन आलो. वरील प्रचि मधली काही फळे फुले तिथेही आढळली.

श्वेता२४ 27/05/2025 - 12:29
आणि वर्णन शैलीही छानच....रानमेवा फोटोतून उचलून तोंडात टाकावासा वाटला...फोटोंचा कोलाज करण्यापेक्षा वेगवेगळे टाकायला हवे होते ....स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असेल का.....

लेख वाचता वाचता आणि सुंदर प्रचि बघताना सगळा सोहळा डोळ्यासमोर आणलात!! शीर्षक वाचुन जरा गंडलो होतो, म्हटले वारी तर १९ जूनला आहे आपल्या विठुरायाची!! लेख लवकरच कसा आला?

Bhakti 28/05/2025 - 14:24
सुंदर ठिकाण, सुंदर छायाचित्रे,सुंदर लिहिलंय. स्वर्ग वाटत आहे! वर्णनात सरस्वती?? कशी?
सरस्वती आणि मोरखंडा गंगा या नद्यांच्या संगमावरचा चिंचोळा लाकडी पूल ओलांडून वारी पुढे निघते.

किल्लेदार 28/05/2025 - 17:03
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.

In reply to by किल्लेदार

श्वेता२४ 28/05/2025 - 18:01
पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. हा हा हा ....भारी....

चित्रगुप्त 30/05/2025 - 08:00
व्वा. काय सुंदर आहेत जागा आणि त्यांचे फोटो. डोळे आणि मन तृप्त झाले. या जागेची माहिती पूर्वीसारखे पाय चांगले बळकट असताना मिळाली असती तर जरूर गेलो असतो. अनेक आभार आणि पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा.

अकिलिज 30/05/2025 - 17:04
फोटू अप्रतिम. खासकरुन कुठेही मानवांची गर्दी दिसणार नाही याची विशेष काळजी घेतलेली दिसतेय. वर्णनही सुंदर. '' बारीक झालेली वारीची रेष या सर्व गर्दीला कवेत घेऊन टम्म फुगते.'' - व्वा. क्या बात है. असेच लेख येऊद्यात. मनापासून शुभेच्छा.

में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात.

पुस्तकं..

आजी ·

युयुत्सु 26/05/2025 - 14:45
मी पण मूळचा पुस्तक-वेडा पण आता युटयूबला पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ मानतो- कारण केवळ एकरेषीय ज्ञानग्रहणापेक्षा दृक-श्राव्य ज्ञानग्रहण केव्हाही उत्तम! काही विषय पुस्तकं वाचून शिकायला किती वर्षे लागली असती माहित नाही, पण युटयूबमुळे अनेक अवघड गोष्टी कधी कळायला लागल्या लक्षातच आलं नाही. त्यातही भारतीय सादरकर्ते आणि शिक्षक यांच्यापेक्षा पाश्चात्य शिक्षक मला जास्त प्रभावीपणे या माध्यमाचा वापर करतात. इतकं की त्यामुळे आता आमच्या आय० आय० टी० मधले अनेक "विद्यार्थीप्रिय" प्राध्यापक सुद्धा आता रटाळ वाटतात.

कंजूस 26/05/2025 - 15:26
पुस्तक वाचनवेड आवडलं. मलाही होतं आणि अजूनही आहे. पण चांगली वाचनालये जवळ असल्याने संग्रह करावा लागला नाही. जी काही आहेत ती संदर्भ ग्रंथ किंवा स्वस्तात मिळालेली घेतली आहेत. पुढे ती रद्दीतच जाणार हे निश्चित.

किल्लेदार 27/05/2025 - 10:47
मलाही लहानपणापासूनच पुस्तकांची गोडी लागली त्यात चांदोबा, चंपक आदी मराठी आणि बऱ्याचश्या हिंदी कॉमिक्सचा समावेश होता. हिंदी सुधारण्यात तर कॉमिक्सनी सिंहाचा वाटा उचललाय. कॉमिक्स फार पूर्वी लायब्ररीला दान करून टाकली असली तरी दोन कपाटं भरून पुस्तकं आजही आहेत. एक खाणा साडेतीनशे - चारशे नॅशनल जिओग्राफिकच्या अंकांनी खच्चून भरलाय. पूर्वी कुणाला पुस्तक दिलं की त्याची नोंद एका पिवळ्या "पोस्टइट" कागदावर करून तो मी बाहेरच्या दाराच्या आतल्या बाजूला चिकट वून ठेवत असे . त्यामुळे दर वेळी प्रत्येकाला घरातून बाहेर पडताना बाहेर गेलेल्या पुस्तकांची यादी, पुस्तक नेल्याची तारीख नेणाऱ्याच्या नावासकट दिसायची. पुस्तकं निमूटपणे परत केल्या जायची.

आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात. जेव्हा माणसाला छपाईचं तंत्र अवगत नव्हतं तेव्हा मौखिक परंपरेने ज्ञान मिळवले जात होते. आपले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपनिषदे,ही मौखिक परंपरेने चालत आलेली आहेत. नंतर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली. या ग्रंथांचे लेखक अज्ञात आहेत, म्हणून त्यांना अपौरुषेय असं म्हटलं जातं.

रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग |

चामुंडराय ·
लेखनविषय:
काव्यरस
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची क्षमा मागून. रात्रंदिन आम्हां ट्रॅफिकचा प्रसंग | हॉर्नचे आवाज आणि धूर ||१|| "रोड रेज" चे जीवा होतसे आघात | तरी दामटतो आपुले वाहन नित्य ||२|| मी म्हणे ह्या प्रदूषणाचिया बळे | अवघ्यांचे काळें केले तोंड ||३||

परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची

युयुत्सु ·

nutanm 25/05/2025 - 03:39
फारशी काही कळली नाही पण सांगायचे मुद्दे तथ्य फार थोडेच वाटले, खास काही वाटत नाही . स्पष्टवक्ते पणाबद्दल क्षमस्व.

nutanm 25/05/2025 - 03:39
फारशी काही कळली नाही पण सांगायचे मुद्दे तथ्य फार थोडेच वाटले, खास काही वाटत नाही . स्पष्टवक्ते पणाबद्दल क्षमस्व.
लेखनविषय:
लेखनप्रकार
परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची (काही सत्य घटनांवर आधारीत) पूर्वप्रसिद्धी - https://www.misalpav.com/node/8447 शेवटी एकदाचा मॉन्सुन येऊन ठेपला आणि मला विद्यापीठात चालायला जायची हूक्की आली. गाडी काढली आणि विद्यापीठ गाठले. छत्रपतींच्या पुतळ्याजवळ गाडी पार्क करून बाहेर पडलो आणि बारीक तुषार अंगावर येण्यास सुरुवात झाली होती. तोंडाने मल्हारच्या सुरांचे नोम-तोम आळवत चालायला सुरुवात केली.

चुकलो का मी?

अनन्त्_यात्री ·

मारवा 24/05/2025 - 21:41
वायफळाचा मळा उन्हाळी मृगजळ शिंपून वाढविला मी काय सुंदर कल्पना आहे तुमच्या निवडक कवितांचा एक तरी संग्रह प्रकाशित व्हायला हवा असे मनापासून वाटते. इतक्या पावसाळी छत्र्या सारख्या कविता सर्वत्र उगवत असताना तुमच्या अनोख्या सुंदर कविता आनंद देऊन जातात.

In reply to by सोत्रि

मिसळपाव 25/05/2025 - 07:59
दोघाना +१. काहीतरी सुरेख कल्पना असते याच्या कवितांमधे. कधीमधी डोक्यावरून जातात. पण पुढच्या कवितेची उत्सुकता असते. हे असलं काही आमच्या डोचक्यात कधीच का येत नाही हो म्हणतो मी! असो. दुसर्‍या कोणाच्या येतंय आणि ते वाचायला मिळतंय हेही नसे थोडके. अ. यात्रीसायबा, तुझ्या या अशा सुरेख रचनांबद्दल थ्यांकू हां. ता. क. प्राची-अश्विनी कुठे गायबल्येय कोण जाणे. ती पण असं काही अनवट लिहून जाते. मुक्तछंदात असतं.

युयुत्सु 02/06/2025 - 10:47
नाही, नाही रे, चुकलास तू नाही! अधांतरातली पहाट शोधताना दिसले जे स्वप्न त्या पंखांना तो भटकण्याचा कैफ वेगळा — ठाऊक जगा नाही नाही रे, चुकलास तू नाही! छंदबेड्या तोडून जो मुक्त गुंजला भ्रमरासम स्वच्छंद रमला मळलेल्या वाटा टाकूनी जगणे ठाऊक जगा नाही नाही रे, चुकलास तू नाही!

दिवास्वप्न पाहत असताना अधांतराची भक्कम भूमी सोडुनी थोडा भटकत गेलो चुकलो का मी? वायफळाचा मळा उन्हाळी मृगजळ शिंपून वाढविला मी पीक पाखरे खाऊन गेली चुकलो का मी? वृत्त, छंद, गण बेड्या तोडून भ्रमरासम स्वच्छंदपणे मी फिरता, रेखीव वाट विसरलो चुकलो का मी? विस्मरणाची गडद सावली झाकोळत जरी होती तरी मी स्मरणरंजनी वाहत गेलो चुकलो का मी?

बाजाराचा कल : २६ मेचा आठवडा

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : २६ मेचा आठवडा ==================== मंडळी, विअर्ड विक्स यांनी "बाजाराचा कल" हे सदर परत चालू करण्याबद्दल सूचना केली होती. म्हणून हे सदर परत चालू करत आहे. मधल्या काळात युयुत्सु-नेटची दोन भावंडे जन्माला आली. त्यात एक मॉडेल KNN algorithm वापरून तयार केले आहे. त्याचा अभ्यास चालू आहे. दूसर्‍या मॉडेलमध्ये युयुत्सुनेट-१ मध्ये वापरलेल्या फिचर-सेटपेक्षा पूर्णपणे वेगळी फिचर वापरली आहेत. त्याचा वापर मी इण्ट्रा-डे साठी करतो.

कॉपल पांडे जी एस - भाग ३

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 30/05/2025 - 00:26
शशी, तुमची विनंती निश्चितच मान्य आहे. 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेतील भाग ३ वर माझा अभिप्राय आणि त्यातून शिकण्यासारखे काही मुद्दे खालीलप्रमाणे: भाग ३: कला, करुणा आणि नेतृत्वाचा आदर्श या तिसऱ्या भागातून कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अधिक ठळकपणे समोर येतात, जे केवळ त्यांच्यातील एका सैनिकालाच नव्हे, तर एका संवेदनशील, कलाप्रेमी आणि दूरदृष्टीच्या माणसाला अधोरेखित करतात. प्रारंभी, कॉर्पल पांडेचा विंग कमांडर ओक यांना भेटण्याचा आणि 'मी तुम्हाला जेव्हा भेटतो, तेव्हा काहीतरी होतं आणि तुमचा चेहरा आनंदी दिसत नाही!' असे मिश्किलपणे बोलणे, हे त्यांच्यातील मोकळेपणा आणि निखळ स्वभाव दर्शवते. यातून त्यांच्यातील मानवी संबंध जपण्याची हातोटी दिसून येते. बालगंधर्व कला दालनातील आर्ट एक्झिबिशनमध्ये विंग कमांडर ओक यांना गणवेशात बोलावण्याची पांडेची विनंती, हे त्याच्यातील अभिमान आणि आदराचे प्रतीक आहे. तो केवळ एक विद्यार्थी नाही, तर आपल्या संस्थेचा आणि आपल्या कलेचा अभिमान बाळगणारा एक सच्चा कलाप्रेमी आहे. प्रदर्शनात आल्यावर कॉलेज स्टाफने पांडेबद्दल व्यक्त केलेले गौरवोद्गार महत्त्वाचे आहेत: "GS मुळेच आम्हाला मॅनेजमेंटशी लढण्याचं धाडस मिळालं" आणि "आजचं आयोजन GS मुळेच शक्य झालं." यातून पांडे केवळ कलाकृती करणारा कलाकार नाही, तर एक प्रभावी संघटक, नेतृत्वकर्ता आणि इतरांना प्रेरणा देणारा व्यक्ती असल्याचे सिद्ध होते. त्याचे संवादकौशल्य आणि विचार स्पष्ट करण्याची क्षमता पाहून त्याला 'प्रशिक्षकासारखा' मानला जातो, हे त्याच्या बौद्धिक क्षमतेचे द्योतक आहे. या भागातील सर्वात हृदयस्पर्शी आणि महत्त्वाचा प्रसंग म्हणजे अहमद गुलाम कुम्हार या भूज भूकंपग्रस्ताला पांडेने दिलेला पाठिंबा. स्वतः सर्वस्व गमावलेल्या एका कलाकाराला पुन्हा उभे करण्यासाठी पांडेची धडपड, हे त्याच्यातील उत्कट करुणा आणि सामाजिक बांधिलकी दाखवते. त्याने 'आल्म्स' (भिक्षा) न घेणाऱ्या कुंभाराला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योग्य मार्ग दाखवला, हे त्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनाचेही दर्शन घडवते. विंग कमांडर ओक यांच्याकडून मोठमोठ्या उद्योगपतींना (अनु आगा, राहुल बजाज) शिफारसपत्र घेण्याची त्याची कल्पना, हे त्याच्या दूरदृष्टी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची चतुराई दर्शवते. पत्राच्या शेवटी पांडेने स्वतःच्या सुंदर अक्षरात लिहिलेली ओळ — "आम्ही सैन्यात असूनही कलेची प्रशंसा करू शकतो. पण अशा कलाकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार यांच्या कलाकृतींना आपल्यासारख्या बड्या श्रीमंत कला रसिकांनी पुढे आणलं नाही, तर मग कोण येईल?" — हा या भागाचा आत्मा आहे. ही ओळ केवळ एक विनंती नसून, कला आणि कलाकारांप्रती समाजाची जबाबदारी अधोरेखित करणारी एक सशक्त भावनिक साद आहे. ही ओळ पांडे यांच्यातील कवी मन, त्यांच्या भावनांची खोली आणि कलेविषयीची त्यांची तळमळ स्पष्ट करते. लेखकाला यामुळे पांडेचे मोठेपण पूर्णपणे समजून येते आणि ते थक्क होतात, हे साहजिकच आहे. अखेरीस, आर्ट एक्झिबिशनमध्ये डॉ. भटकर यांनी विंग कमांडर ओक यांच्या 'नाडी शास्त्रावरील' पुस्तकाची प्रशंसा करणे आणि त्यांना भाषण देण्यास सांगणे, हा प्रसंग अनपेक्षित असला तरी, तो लेखकाच्या ज्ञानाची आणि प्रतिभेची ओळख करून देतो. पण या प्रसंगाचा मुख्य उद्देश म्हणजे विंग कमांडर ओक यांनी पांडेबद्दल व्यासपीठावरून व्यक्त केलेले उद्गार: "तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे." हे शब्द पांडेच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी आदरांजली आहे. या भागातून शिकण्यासारखे काय काय आहे? * नेतृत्व केवळ उच्च पदांवर नसते: कॉर्पल पांडेने दाखवून दिले की, नेतृत्व हे केवळ पदाने येत नाही, तर ते कृतीने, विचाराने आणि इतरांना प्रेरित करण्याच्या क्षमतेने सिद्ध होते. तो केवळ एक कनिष्ठ सैनिक नसून, एका कला प्रदर्शनाचा यशस्वी आयोजक आणि स्टाफला प्रेरणा देणारा व्यक्ती आहे. * करुणा आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व: पांडेने भुज भूकंपातील पीडित अहमद कुंभाराला केलेली मदत, हे केवळ गरजूंना मदत करण्यापलीकडचे, तर त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आपले काम पूर्ण झाल्यावर तो फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत नाही, तर समाजातील दुर्बळ घटकांसाठीही तो संवेदनशील असतो. * कला आणि मानवता यांचा संगम: पांडेने कलेचा उपयोग केवळ स्वतःच्या आनंदासाठी न करता, सामाजिक बदलासाठी आणि इतरांच्या उन्नतीसाठी केला. त्याचे पत्र कलेच्या माध्यमातून समाजाला जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. * प्रभावी संवाद आणि दूरदृष्टी: मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने लेखकाकडून शिफारसपत्र मागितले, हे त्याच्या दूरदृष्टीचे आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. त्याच्या बोलण्यातला आणि पत्रातल्या शब्दांतील प्रामाणिकपणा समोरच्या व्यक्तीला प्रभावित करतो. * आत्मसन्मान आणि साधेपणा: 'आल्म्स' न घेणाऱ्या कुंभाराला मदत करणे आणि स्वतःच्या पदावर असूनही (कॉर्पल) लेखक त्याला मित्र मानतात, ही बाब त्याला सर्वोच्च सन्मान वाटते, हे त्याच्यातील आत्मसन्मान आणि साधेपणाचे दर्शन घडवते. * अनपेक्षित क्षमतेची ओळख: विंग कमांडर ओक यांना 'नाडी शास्त्रावरील' पुस्तकामुळे मिळालेली अनपेक्षित ओळख, हे दर्शवते की आपले काम आणि कर्तृत्व कधी-कधी अनपेक्षित मार्गाने समोर येते आणि त्याची दखल घेतली जाते. हा भाग कॉर्पल पांडेच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी उंचावतो आणि वाचकाच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण करतो. ही केवळ एका सैनिकाची कथा नाही, तर एका असामान्य माणसाच्या संवेदनशील आणि कर्तृत्ववान प्रवासाची गाथा आहे. पुढील भागाची मी आतुरतेने वाट पाहत आहे, आपला विद्याधर

शशिकांत ओक 02/06/2025 - 00:51
: "तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे." हे शब्द पांडेच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी आदरांजली आहे.“

वायुसेनेतील आठवणी -

कॉपल पांडे जी एस – भाग ३

“कला आणि करुणेचा साक्षात सिपाही – कॉपल पांडे”

"मेन लाईक जीएस पांडे आर जीनियस अँड दे आर अबव्ह ऑल एक्सपेक्टेशन्स."

(“जीएस पांडेसारखे माणसं असामान्य बुद्धिमत्तेची असतात आणि सर्व अपेक्षांच्या पलीकडे जातात.”) माझं मन पुन्हा भूतकाळात हरवलं… दुपारी २ वाजता मी ऑफिसमधून बाहेर पडत होतो. पवार, ऑफिस बॉयने माझ्या कारमध्ये ब्रीफकेस ठेवली. रियर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं तर कुणीतरी सावधपणे माझ्या दिशेने येत होतं.

खगोलविश्वातील अढळ तारा: नारळीकर सर!

मार्गी ·

युयुत्सु 21/05/2025 - 18:19
स्टीफन हॉकींगचा मूळ पेपर मी वाचला आहे. पण तो सापडत नाहीये. स्टीफन हॉकींगने हवा काढून घेतल्यामुळे या थिअरीचं हसं झालं, असं जाणकार म्हणतात. मला असं कळलं की खुद्द आयुकामध्ये पण या विषयावर कुणी काम करत नाही.  Helge Kragh, "Cosmology and Controversy: The Historical Development of Two Theories of the Universe", Princeton University Press, 1997, page 385

सौंदाळा 21/05/2025 - 18:51
सुंदर आठवणी. त्यांनी पाठ्वलेल्या पत्राचा फोटो टाकू शकाल का? तुमचे खगोल विषयक लेख, आवड यामागची प्रेरणा नारळीकर सरच आहेत तर. डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

कंजूस 21/05/2025 - 21:17
हा लेख विशेष आवडला. ----------- हॉकिन्स यांनी स्टेडी स्टेट सिद्धांताला विरोध केला आणि गणिताने पटवलं की हा सिद्धान्त चुकीचा आहे. परंतू हॉकिन्स यांचेही बरेच आडाखे चुकीचे निघाले आणि ते त्यांनी मागे घेतले होते. बिग बँग सिद्धा चुकीचा असून शकतो. त्या वेळी कोण होतं पाहायला? खरंच विश्व एका बिंदूत सामावलेले होतं का? विश्व अनादीही असू शकतं. अनंत आहे मानतो तर अनादि मानायला काय अडचण आहे?

कंजूस यांच्या बरोबर सहमत. खरंच विश्व एका बिंदूत सामावलेले होतं का? विश्व अनादीही असू शकतं. अनंत आहे मानतो तर अनादि मानायला काय अडचण आहे? डाॅ नारळीकर हे उत्तुंग व्यक्तीमत्व नेहमीच प्रेरणादायक असणार आहे.

मार्गी 22/05/2025 - 16:39
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! @ युयुत्सु जी, अच्छा! हो. बिग बँग थिअरी मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. किंबहुना विज्ञान आपल्याला आपण किती सूक्ष्म आहोत, किती क्षुद्र आहोत हेच सांगतं! त्यामुळे बिग बँग किंवा स्टेडी स्टेट ह्या फक्त थिअरीजच आहेत. सत्य फार लांब आहे. @ सौंदाळा जी, हो ना, इथे देणार होतो पण सापडतच नाही आहेत! :( @ बाजीगर जी, छानच!

युयुत्सु 22/05/2025 - 17:44
बिग बँग थिअरी मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. > मुद्दा असा आहे की स्टेडी स्टेट थिअरी नाकारली गेली आहे आणि याचा इतिहास वर दिलेल्या संदर्भात आहे. स्टीफन हॉकींग rejected it because he found it inconsistent and self contradictory.

नमस्कार. डॉ. जयंत नारळीकर गेले! अनेकांना ज्यांच्यामुळे खगोलशास्त्र कळालं ते नारळीकर सर! विदेशात उच्च पदावर असूनही प्रवाहाविरुद्ध भारतामध्ये विज्ञान प्रसारासाठी आलेले नारळीकर सर! संशोधक, शिक्षक आणि विज्ञान प्रसारक! त्यांना दोनदा भेटण्याचा मला योग आला होता. त्यांची पत्रंही आली होती. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. तो दिवस स्पष्ट आठवतो. २२ जानेवारी १९९५! परभणीतल्या अ. भा. साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस. माझ्या एका मोठ्या मित्राने मला "प्रेषित" ही नारळीकर सरांची कादंबरी घ्यायला सांगितलं. तेव्हा माझं वय दहा होतं.

स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित "ड्युअल (Duel)"

प्रचेतस ·

कपिलमुनी 21/05/2025 - 13:39
ह चित्रपट पूर्वी टीव्हीवर कधीतरी पाहिला होता. खिळवून ठेवतो . या थीम च्या बर्‍याच कॉपीज नंतर निघाल्या . हा सर्वात बेस्ट .. ओजी आहे

कपिलमुनी 21/05/2025 - 13:39
ह चित्रपट पूर्वी टीव्हीवर कधीतरी पाहिला होता. खिळवून ठेवतो . या थीम च्या बर्‍याच कॉपीज नंतर निघाल्या . हा सर्वात बेस्ट .. ओजी आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
खरं तर ड्युअल (Duel) हा चित्रपट खूप आधी देखील पाहिला होता, आवडलाही होता. परवा घरचे इंटरनेट मुसळधार पावसामुळे बंद पडले असल्यामुळे हार्ड डिस्क टीव्हीला जोडून पुन्हा एकदा पाहिला. स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित ड्युअल (१९७१) हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या जीवघेण्या संघर्षावर आधारित आहे, ज्यामध्ये भय, मानसिक तणाव आणि अस्तित्वाची झुंज यांच्यापासून निर्माण झालेल्या थराराने पुरेपुर भरलेला आहे. हा चित्रपट स्पिलबर्गचा केवळ दुसराच पूर्ण लांबीचा चित्रपट असून, त्याने त्याच्या कारकीर्दीची ठोस पायाभरणी ह्याद्वारे केली.