चुकलो का मी?
लेखनविषय:
दिवास्वप्न पाहत असताना
अधांतराची भक्कम भूमी
सोडुनी थोडा भटकत गेलो
चुकलो का मी?
वायफळाचा मळा उन्हाळी
मृगजळ शिंपून वाढविला मी
पीक पाखरे खाऊन गेली
चुकलो का मी?
वृत्त, छंद, गण बेड्या तोडून
भ्रमरासम स्वच्छंदपणे मी
फिरता, रेखीव वाट विसरलो
चुकलो का मी?
विस्मरणाची गडद सावली
झाकोळत जरी होती तरी मी
स्मरणरंजनी वाहत गेलो
चुकलो का मी?
वाचने
2507
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
भन्नाट कविता आहे !
In reply to भन्नाट कविता आहे ! by मारवा
+१००
In reply to +१०० by सोत्रि
दोघाना +१
नक्कीच
प्रतिसाद देणाऱ्या
कवीता आवडली....
नाही, नाही रे, चुकलास तू नाही
व्यर्थी अधिकची अर्थ वसे
कविता मस्त आणि प्रेरणा देणारी