मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओलसर क्षण...

निशांत_खाडे ·
लेखनविषय:
पावसाची सुरुवात नेहमीच अनाहूत असते — नवे नभ, जुना ओळखीचा ओलसर वास घेऊन येणारा वारा, अन् अवचित उगम पावलेली नवीन आठवण, जशी एखादी शब्दावाचून उमजलेली कविता, जी वाचली नाही, पण आत कुठेतरी कायमची ठसलेली आहे. पावसाचा स्पर्श म्हणजे केवळ थेंबांचा ओलावा नव्हे — तर काळाचा एक अतिसूक्ष्म आविष्कार. काही वेळा वाटतं, जसे तिच्या अस्तित्वाच्या सीमारेषा पाण्यात विरघळल्या आहेत, ज्याचा अर्थ अजूनही टिकून आहे, माझ्या आत खोल दडलेला. तीही तशीच भासायची — क्षणागणिक, जणू एखादी अंतर्मुख लय, स्वतःच्या विचारांत गुंतलेली. कधी खळखळून हसायची अन् त्या हसण्यात क्षण कानू स्थिर, स्तब्ध व्हायचे त्या स्थिर क्षणांच्या काही आठवणी

कोकणातील तुमच्या स्वप्नातील एक फार्म हाऊस !

kvponkshe ·

कर्नलतपस्वी Wed, 06/04/2025 - 18:49
अंजर्ले येथे एका होम स्टे मधील भूतपूर्व मालक बनाम मॅनेजर ,वरिष्ठ नागरीक यांनी शिळोप्याच्या गप्पा मारताना आपल्या वेदना व्यक्त केल्या. ही संपत्ती वाडवडिलार्जीत होती. मुलग्ये पुणे मुंबई कडे जाऊन चाकरमानी झाले. परतायला तयार नाही. संपत्ती वृद्धापकाळामुळे ठिकठाक ठेवणे कठीण. मनुष्यबळ नाही. वृद्धापकाळ वाडवडिलार्जीत मातीत जावा व शहरातील खुराड्यात रहायचे नव्हते म्हणून मालकाचे नोकर होणे पसंत केले.

सुबोध खरे Wed, 06/04/2025 - 19:10
शहरात राहणाऱ्या माणसाने गावी आपले घर असावे म्हणून गुंतवणूक अजिबात करू नये या निर्णयापर्यंत आम्ही १० वर्षांपूर्वीच आलो आहोत. गावची (कोकणची) माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी हे वाक्य टाळ्या मिळ्वण्यापुरतेच ठीक आहे. शहाण्या माणसाने असे अतिरिक्त पैसे कुठेतरी ( बाजारात, म्युच्युअल फंडात किंवा तत्सम गुंतवणुकीत गुंतवावेत) आणि त्याच्या व्याजावर आयुष्यभर कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी पंचतारांकित सोयीचं लाभ घ्यावा. या निष्कर्षाप्रत आम्ही सर्व भाऊ आलेलो आहोत. आमचे वाडवडिलोपार्जित उत्तम देखभाल केलेले घर कोकणातील श्री क्षेत्र परशुराम येथे असूनहि वर्ष वर्ष तेथे जाणे होत नाही. परंतु सात चुलत भावांमध्ये कोणीतरी जात येत असल्यामुळे घर उत्तम स्थितीत आहे. ते मध्यवर्ती ठेवून आजूबाजूला सर्वत्र पर्यटन करणे सोयीचे होते. त्यातून कोकणचा जाण्यायेण्याचा प्रवासखर्च वजा जाता मुंबईत उत्तम हापूस आंबे स्वस्त मिळतात हि वस्तुस्थिती. एकंदर कोकणात माणसांच्या उपलब्धतेबद्दलची स्थिती चिंताजनकच आहे. एकंदर माणसांना काम नाही हि रड असली तरी वेळेवर कामाला माणसे मिळत नाहीत आणि मिळणारी माणसे कामाची नाहीत. हि वस्तुस्थिती आहे.

कंजूस Wed, 06/04/2025 - 20:18
वस्तुस्थिती आहे तरी स्वप्ने पाहणाऱ्यांची कमतरता नाही. हिंदी सिनेमात पैका मिळवणाऱ्या कलाकार, निर्मात्यांनी आलेला पैसा गुंतवला, त्यांचे विश्वासू गडी कायमचे ठेवलेत. पैसे खर्च करतात. त्यांचे पाहून इतर काही जण हा उद्योग करतात आणि कंटाळतात किंवा फसतात.

In reply to by कंजूस

कंटाळले तरी मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर गार गार वाटतय असे म्हणणारे असतात

कपिलमुनी गुरुवार, 06/05/2025 - 11:22
रग्गड पैसा आणि वेळ असल्याशिवाय असाल्या भानगडीत पडूच नये . फार्म हाउस , हिल स्टेशन बंगला , रीसोर्ट मध्ये व्हिला असल्या भानगडीत पडू नये . सामान्य माणसाला तरूणपणी वेळ मिळत नाही आणी म्हातारपणी तिथे सोयी नसतात.. हवे तेव्हा भाड्याने घेउन राहावे .. अगदि महिनाभर भाड्याने घेतले तरी परवडते आणि हौस पण होते .

कपिलमुनी गुरुवार, 06/05/2025 - 11:31
एका मित्राने मुळशी मध्ये बांधलेल्या घराचे खिडक्या दरवाजे नेले होते . वॉचमन परवडत नव्हता . मग शेजारच्या वाडीतील एका बाईल स्वछतेला सांगितले , पावसाळ्यात तीची भिंत पडली म्हणून तीच सहकुतुंब राहायला आली .. ते पण ह्याला महिन्याने कळले :) माझे बालपण तळेगावला गेले तिथे बर्याच मुंबैकरांची सेकंड होम आहेत .. सगळीकडे सेम स्टोरी

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 06/05/2025 - 17:04
कथानायकाचे नाव मस्त आहे. आणि शेवटी घेतलेला निर्णय सुद्धा बरोबर आहे. जिथे आपण स्थायिक नाही तिथे घर घेउ नये. उगाच २-३ वर्षे बॅंगलोर किवा हैद्राबादला नोकरी होती म्हणुन तिकडे फ्लॅट घेणारे आणि आता पस्तावणारे खुप पाहिलेत. काहीनी तर नुकसानीत सुद्धा विकुन टाकले आहेत. काही वर्षांपुर्वी असेच नाशिकला घरे/बंगले घ्यायचे फॅड आले होते. अगदी मार्केटिंग म्हणुन विकांताला बिल्डरचे लोक जीपने जायची/यायची सोयही करायचे मुंबईतुन. आता ते चालु आहे की नाही माहीत नाही.

फार्म हाऊस की नुसतीच हौस??????? हा मुवि यांचा लेख आठवला. माझ्या सविस्तर प्रतिक्रिया त्यात आहेत. माझ्या वैवाहिक आयुष्याची दिशाच बदलली या प्रकरणाने

शेती पहावी करुन- श्रीनिवास पंडित शहरी माणसांना खेड्याबद्दल, शेतीबद्दल एक अनामिक आकर्षण असतं. मोकळी हवा, मोकळा ढाकळा निसर्ग, संथ जीवनशैली, डोलणारी शेतं, शेतावरचं चंद्रमौळी घर, रात्रीचं पिठूर चांदणं अशा अनेक आकर्षणामुळे अनेकांना खेड्यात जाऊन राहावं, शेती करावी, शहरातील चाकोरी मोडून जगावं असं वाटत असतं. नोकरी-धंदा करून हाताशी जादा पैसा आला की, तीव्र होत जाते. पण शेती करणं हे काय दिव्य असतं हे बहुतेकांना माहीत नसतं. एक शहरी माणूस आपल्या सर्व रोमँटिक कल्पनांसह शेती करू लागल्यानंतर काय काय घडतं, शहरी समज, कल्पना यांची कशी वासलात लागते? शेती करण्याच्या विचाराने हुरळून गेलेला माणूस नंतर कसा हबकून जातो ? या साऱ्या अनुभवाने त्यात काय बदल होतो? … लेखकाने संवेदनशीलतेने मांडलेला स्वतःचा अनुभव! संगीत, साउंड डिझाईन: अक्षय वैद्य, रेकॉर्डिंग स्टुडिओ: युफोनी स्टुडीओ, पुणे https://snovel.in/product-details/26/sheti-pahavi-karun

कंजूस Fri, 06/06/2025 - 17:59
यावरून आठवलं - गोसेवा करण्याची कुणाला हुक्की येते. एकाचं घर आणि आंगण होतंच तर गाय ठेवावी विचार आला. त्याला सल्ला मिळाला की कुणाकडे आजारी गाय असेल तर त्यांच्याकडे जाऊन सेवा कर आणि अनुभव घे. मग गाय विकत आणून अंगणात बांध. आजारी गायीचं जमलं की मग पुढे काही झालं तुमच्या गायीचं तर डगमगायला होणार नाही. तसं जिथे घर बांधायचं आहे तिथे कुठे भाड्याने राहून बघा की काय अडचणी येतात आणि मग रुळलात की विचार पक्के होतील किंवा बदलतील किंवा हौस फिटलेली असेल.

लेखनप्रकार
साहित्य आणि ललिता यांचे नुकतेच लग्न झालेले. दोघंही आयटी मध्ये बऱ्यापैकी पगारावर होते. पुण्यात साहित्यला त्याच्या आईबाबांनी एक फ्लॅट घेऊन दिलेला होता, हां थोडे कर्ज होते त्यावर, पण साहित्य आणि ललिता ते फेडत होते . साहित्यचे आईबाबा वेगळे राहणार होते, त्यामुळे ललिताला घरातील खरे खुरे डस्टबिन कुठे ठेवायचे हा प्रॉब्लेम नव्हता. साहित्य आणि ललिता याचे एक स्वप्न होते. कोकणात थोडी शेती आणि कौलारू घर असावे. घराला अंगण असावे. त्यात छान वेगवेगळी फुलझाडे असावीत. पडवीत झोपाळा असावा.

अमेरिकन पक्षी भाग -१

कर्नलतपस्वी ·
प्रिय मिपाखरांनो, एक महीना अम्रीकेत फिरलो. अंदाजे चाळीस तास पक्षीदर्शन करण्यासाठी भटकत होतो. जवळपास अडिच हजार फोटो काढले. पंचवीस जी बी ची ऐशी की तैशी केली. काही फोटो तुम्ही बघावेत म्हणून डकवले आहेत. जाता पंढरीसी या लेखात ऋणनिर्देश केला आहेच. सर्व चित्रफिती पंचेचाळीस सेकंदचीच आहे व मेमरी पंचवीस ते तीस एम बी आहे. निकाॅन डि एस एल आर डी ३४०० छायाचित्रक वापरला. मस्त मजा आली. आता विसाव्याचे दिन..... बघा तुम्हांला आवडते का. आवडल्यास अजून फोटो आहेत ते सुद्धा डकवेन.

तियानानमेन चौरस्ता: 4 जून 1989 पासून काय शिकणार

विवेकपटाईत ·

कपिलमुनी Wed, 06/04/2025 - 12:54
हा लेख म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे . हे माझे वैयक्तिक मत आहे . जे मांडण्याचा भारतीय संविधानाने मला हक्क दिला आहे. उद्या मी / कोणीही सामान्य नागरीक बिंनधास्तपणे सांगू शकतो , मि. मोदी / फडणवीस / बॅनर्जी / यादव / केजरीवाल -- तुम्ही चुकत आहात , तुमचे मत मला पटले नाही. ही लोकशाही आहे .

स्वधर्म Wed, 06/04/2025 - 15:53
brain rot हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीचा २०२४ सालचा वर्ड ऑफ द इयर का आहे, हे स्पष्ट केल्याबद्दल आभार _/\_ हा शब्द हेन्री थोरो याने वॉल्डन या पुस्तकात १८५४ साली पहिल्यांदा वापरला होता.

सौन्दर्य गुरुवार, 06/05/2025 - 23:28
"आता सीआयए ने पुन्हा डॉलर, मीडिया आणि लालची नेत्यांचा वापर करून एका पाळीव कुत्र्याला यूक्रेनच्या सत्तेवर बसविले आणि त्याला रशियावर भुंकण्यासाठी सोडून दिले. यूक्रेन आणि रशिया युद्धाची किंमत मोजत आहे" - एखाद्या देशावर दुसर्या देशाने हल्ला केल्यास त्यावर पहिल्या देशाने प्रतिकार करायचा की नाही हे आधी स्पष्ट करा. चीनमध्ये जे काही घडले, त्याला जबाबदार कोण? ते बरोबर की चूक हे काळच ठरवतो. आजच्या ह्या घडीला ते बरोबरच आहे असे वाटते , पण त्याची तुलना इतर क्षेत्रातील घडामोडींशी, देशांशी करून ते कसे चूकच आहे हे सांगण्याचा प्रयत्न फसला आहे .

माहितगार Sat, 06/07/2025 - 08:00
श्री. पटाईत सरांच्या उपरोक्त धागा लेखापासून प्रेर्ना घेऊन आम्ही "युरोमेरीका आणि रशिया प्रदीर्घ हित संघर्ष हा लेख पाड्ला.

आज सकाळी उद्यानात भ्रमंती करताना मला एका निवृत अधिकार्‍याने ने 4 जूनला तियानानमेन चौरस्त्यावर जमलेल्या लोकशाही समर्थकांवर चीन ने जी कठोर कार्रवाई केली होती, त्यावर माझे मत विचारले. मी त्याला उलट प्रश्न केला, जर चीन ने तेंव्हा कठोर कार्रवाई केली नसती तर, आज चीन आर्थिक आणि सैनिक दृष्टीने शक्तिशाली झाला असता का? चीनच्या लोकतंत्र समर्थकांना अमेरिका आणि यूरोपियन देशांची फूस होती. त्यांच्या उद्देश्य चीनचे केंद्रीय नेतृत्व कमकुवत करून जमले तर चीनचे तुकडे करण्याचा होता. पण चीनच्या कम्यूनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी स्वतचे निजी स्वार्थ विसरून देश हितासाठी कठोर कार्रवाई केली.

जाता पंढरीसी-२ (संपादित)

कर्नलतपस्वी ·

प्रचेतस गुरुवार, 06/05/2025 - 07:01
हा भागही आवडला. तुम्ही अमेरिकेत इकडे तिकडे न फिरता स्थानिक भागांत फिरत पक्षीनिरीक्षण केले आणि आपली आवड जपली हे फार आवडले.

चौथा कोनाडा Sat, 12/20/2025 - 14:38
"पालवी, बघ तरूंची फुलाया लागली दुर चाफ्याची फुले गुणगुणाया लागली" या ओळी अतिशय सुंदर आहेत.. आंजा वर शोधले असता कवि सापडला नाही ... आता उत्सुकता लागून राहिली आहे. पूर्ण कविता असेल तर जरूर डकवणे (वेगळा धागा काढला तर मस्तच ) तू नळी वरील पक्षांचा व्हिडो पहिला ... सुंदरच ! मिशिगनचे पक्षीविशेष छानच ... कर्नल साहेब, तुमच्या पक्षी व्यासंग थक्क करतो. या धाग्याचा पक्षांशी संबंध जोडून एक वेगळंच औचित्य साधलं आहे. या प्रतिभेचे कौतुक केलेच पाहिजे.

https://www.misalpav.com/node/52913 मिपावर छायाचित्र डकवणे जिकीरीचे काम,माझी मुलगी, टर्मिनेटर भौ,कंजूस भौ यांनी शिकवण्याचा,मदत करण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. इमगौरी बरोबर कुंडली जुळली होती प्रपंच मांडला पण बिचारी चार महीन्यापुर्वी मरून गेली.(Veteran MIPAKAR कंजूस suggested and helped me in learning IMGUR application. I learned Imgur software and finally succided in posting photos on MIPA.

दवणे एक असणे !!!! दवणे एक जगणे !!!!!!!!!!!!!!

मारवा ·

गवि Wed, 06/04/2025 - 08:02
" पंचसंवेदनांचा साक्षात्कार "
दवणे की गटणे ?? ;)
प्रतिभावंतांना अनुकुल भुमी मिळाल्यास त्यांची प्रतिभा नक्कीच बहरत असावी.
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे असे म्हणणारे ते हेच का? जीवनोन्नतीचे सहा सोपानवाले गुरुजी किंवा केतकी पिवळी पडली वाले स.त. ?

In reply to by गवि

मारवा Wed, 06/04/2025 - 17:21
पुलं यांना भेटलेले गटणे हे खरं म्हणजे बालपणीचे दवणे हेच होते. परंतु त्यांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी पुलं यांनी नाव आणि इतर तपशील बदलले होते. वास्तव पुलं नि रेखाटल्यापेक्षा फार कटू असे होते. गटणे मोठे आल्यावर देखील त्यांच्यात कुठलाच सुधार झाला नाही. उलट केस.अधिकच बिघडत गेली......

अभिरुप Wed, 06/04/2025 - 18:54
प्रा. प्रवीण दवणे सरांचे लेखन म्हणजेच चित्रपट गीते, कविता या तर सुंदर असतातच परंतु त्यांचे लेख, त्यांची ओजस्वी शैलीमधील व्याख्याने सुद्धा खूप सकारात्मक आणि प्रेरणादायक असतात. सरांनी शिक्षक आणि विद्यार्थी दोहोंसाठी खूप मोलाचे लेखन करून ठेवले आहे.

चित्रगुप्त Mon, 06/09/2025 - 07:41
लई मंजे लईच भारी हो. 'साटल्य' हा शब्द लई मंजे लईच आवडल्या गेला आहे. आमचा एक मित्र दवणेगुर्जींचा फ्यान आहे, त्याला हा लेख पाठवला आहे. आम्ही अद्याप गुर्जींचे काहीही वाचलेले नाही, पण हा लेख वाचून अदमास आला. इनोद म्हणून काहीतेरी वाचले पाईजेल. आणि मळमळण्यावर काय आउशीद, ते अगुदरच धुंडून ठिवले पाईजेल. (इथे चुकून 'काहीतेरी' टंकले गेले पण हा अवतार जास्त आवडला 'तेरी' पासून सुरु होणारी वाक्ये आठवली म्हणून) आता वाचवत नाही !!!! आता लिहीवत नाही ! दिलसे निकली है बस एक ही आवाज !!!!!!! बस कर पगले ! अब रुलायेगा क्या !!! ही ही ही ही. ....अस्सल भारी लेख.

कर्नलतपस्वी Mon, 06/09/2025 - 10:51
ललित लेखातले काव्य नि कवितेतून लालित्य जपत, चित्रमय भाषेनं अनेक स्मरणचित्रे कवितेतून व्यक्त झाली. स्मरणलुब्धतेचा एक दुर्मिळ सुगंध त्यांच्या शब्दचित्रात्मक कवितेला येतो. शब्दचित्राला अगदी अचानक नात्यांच्या निसटत्या स्पर्शाची, बालपणीच्या हरवलेल्या अंगणाची, आजीच्या पैठणीच्या कालपटाला जुळवणाऱ्या धाग्यांची ऊब मिळते...नि वाटते... या कविता म्हणजे कृष्णधवल स्मरणाचा अल्बमच इथेच कवितेला पर्यायी शब्द मिळाला."शब्दचित्र". शांताबाई शेळके,साहित्याच्या सर्व क्षेत्रात आपल्या पाऊलखुणा सोडून गेलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व. "तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामीनी",या कवीता टर्न्ड गीताच्या शब्दांनी लक्ष वेधले व त्याचा इतीहास वाचून कवितांचे सामर्थ्य कळाले. त्यांच्या इतर साहित्याचा मागोवा घेताना श्री प्रवीण दवणे यांची ओळख, म्हणजे "कवितेतल्या शांताबाई ",या पुस्तकाद्वारे झाली. नंतर ग्रेस,सुरेश भट,सुधीर मोघे,भैरप्पा यांचे साहित्य वाचताना हे नाव मागे पडले. आपला लेख वाचून पुन्हा हे नाव वर आलयं,पुढील खरेदी यांच्याच साहित्याची. लेख आवडला. धन्यवाद. आवांतर- उमेदीची सर्व वर्षे हिन्दीभाषीक प्रदेशात गेल्यामुळे माय मराठीचे प्रेम कमीच किंबहुना नाहीच मिळाले. आता विसाव्याच्या क्षणी मराठी साहित्याचा अस्वाद घेत आहे.

प्रातःस्मरणीय दवणे जेव्हा प्रातःस्मरणीय पदवीस प्राप्त झाले नव्हते त्या काळातला हा प्रसंग आजही मनकातळावर नाजुक स्मृतींनी कोरला गेलाय. दवणेंचे गुरुवर्य वपुलं बाल दवणेंना म्हणाले गुरुवर्य : " प्रवीण, मराठी वाचकांच्या अभिरुचीची घसरण आता बघवली जात नाही रे " प्रवीण : " काय होतय गुरुवर्य नेमकं " गुरुवर्य : " डाचतोय रे मला डाचतोय हा टचटचीत शब्द , हा शब्द म्ह्टला की वाचकांना तेच का आठवावे वहीनींची ती ....... हे ऐकुन प्रवीण कावराबावरा झाला, खर म्हणजे थोडासा लाजला सुद्धा मनातल्या मनात मग त्याने मनाशी चंग बांधला टचटचीत ला मी एक नवी जोडी देणार .

माझी ९५ वर्षीय क्रश - डेक्कन क्वीन

फारएन्ड ·

अनन्त्_यात्री Tue, 06/03/2025 - 09:30
*दख्खन राणी* *कवी - वसंत बापट* ~~~~~~~~~~~~~~ दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत सुंदर मानव तुंदिल अंगाचे गालिचे गुलाब शराबी रंगाचे ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी गोजिरवाणी लाजिरवाणी पोरटी घेऊन पोटाशी कुशीत दख्खन राणी ही चालली खुशीत निसर्ग नटला बाहेर थाटात पर्वत गर्वात ठाकले थाटात चालले गिरीश मस्तकांवरून आकाशगंगांचे नर्तन गायन झेलून त्यांचे नुपूर घुंगुर डोलती डौलात दुर्वांचे अंकुर मोत्यांची जाळी घालून भली रानाची चवेणी जाहली प्रफुल्ल दख्खन राणीला नव्हती दखल ड्यूकचे नाकड सरळ अजस्त्र राहिले उभे हे शतके सहस्त्र त्याच्याही पाषाण हृदया कळाली सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी नीला तो तलाव तांबूस खाडी ती पांढरा प्रपात हिरवी झाडी ती अवतीभवती इंद्राची धनुष्ये दख्खन राणीत मुर्दाड मनुष्ये दख्खन राणीच्या कुशीत पोटात बुडाली जाणीव चहाच्या घोटात किलवर चौकट इसपिक बदाम फेकीत फेकीत जिंकित छदाम नीरस पोकळ वादांचे मृदंग वाजती उगाच खमंग सवंग खोलून चंची पोपटपंची करीत बसले बुद्धीचे सागर दख्खन राणी ही ओलांडे डोंगर धावत्या बाजारी एकच बालक गवाक्षी घालून बसले मस्तक म्हणाले "आई गं, धबधबा केवढा पहा ना चवेणी, पहा हा केवडा ढगांच्या वाफेच्या धूसर फेसात डोंगर नहाती पहाना टेसात" म्हणाली आई "पूरे गं बाई, काय या बेबीची चालली कटकट" दख्खन राणीचा चालला फुंफाट दख्खन राणीच्या पोटात कुशीत शेकडो पिले ही चालली खुशीत मनाने खुरटी दिसाया मोठाली विसाव्या तिसाव्या वर्षी ही आंधळी बाहेर असू दे उन वा चांदणे संततधार वा धुक्याचे वेढणे ऐल ते पैल शंभर मैल एकच बोगदा मुंबई पुण्यात दख्खन राणी ही चालली वेगात ... दख्खन राणी ही चालली वेगात... !!

कंजूस Tue, 06/03/2025 - 11:20
आम्ही कधी डेक्कनने गेलो नव्हतो. पण धावणारी निळी पांढरी पाहिली आहे. तसेच ती पाहून लोक घड्याळात वेळ लावायचे म्हणे. बाहेरून चांगलीच दिसे. आता तो चमकदार रंग जाऊन भद्दा हिरवा रंग दिला आहे. म्हणजे बाहेरून बेकार. आतली ओळख ही प्रत्यक्ष जाऊन झाली नाही तरी मराठी विनोदी साहित्यातून झाली. "डेक्कनचे प्रवासी" अशा लेखातून आतील प्रवासी कसे असतात, आख्खी गाडीच खरेदी केल्यासारखे वागतात वगैरे. ९५ चे'सेलब्रेशन' मध्ये गाडी दाखविलीच नाहीये, बहुतेक मंथली पासहोल्डरचे प्रवासी मात्र दिसत आहेत.

खूप छान. राणीला ६५ वर्षे झाली तेव्हा मोठा कार्यक्रम झाला होता तो पाहिला होता. अनेक गाड्या कल्याण जंकशनला थांबायच्या पण डेक्कन क्वीन पुर्वी थांबायची नाही, ह्याचे काहीतरी कारण होते. गाडीतील खानपान सेवेचा डबा अगदी खास असायचा. ८७/८८ साली इंद्रायणी चालु झाली. दिसायला राणीसारखीच, वेळही तेवढाच घ्यायची. खाजगी बस कंपन्यांच्या सेवा आल्या आणि दक्खनच्या राणीचे आकर्षण हळूहळू कमी झाले.

सुबोध खरे Wed, 06/04/2025 - 11:46
WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे. लष्करात असताना विविध ठिकाणी जाण्यासाठी भरपूर फिरती होत असे त्यापैकी एकदा देवळाली (नाशिक) हून परत येताना कलकत्ता मेल च्या ए सी २ टियर ने येत होतो. इगतपुरीला लोको पायलट ची परवानगी घेऊन (लष्कराचे ओळखपत्र गळ्यात असल्याने अनेक वेळेस अशा इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे) इगतपुरी ते कसारा प्रवास या इंजिनात बसून झाला. इंजिनने केवळ ब्रेक सोडले तर गाडी ६० च्या वर वेग घेऊ लागते हे लोको पायलट ने दाखवले आणि म्हणून घाटात सहजासहजी वेगात नेली जात नाही. डेक्कन क्वीनच्या प्रथम वर्गाने प्रवास मी १९७२ साली केला होता. त्यानंतर चार पाच वेळेस हा प्रवास केला आहे सुरुवातीला प्रशस्त २ X २ सीटचा प्रथम वर्ग होता नांतर वातानुकूलित कुर्सीयान आले. डेक्कनक्वीन च्या उपाहारगृहात बसून गप्पा मारत प्रवास करणे हा एक अद्वितीय अनुभव आहे हे खरं. दुसऱ्या वर्गात सुद्धा २ X ३ अशी बसण्याची सोय होती ती जाऊन आता ३ X ३ झाल्यावर फारच अडचण होते. हि २ X ३ सोय डेक्कन क्वीन मध्ये इतर गाड्यांपेक्षा बराच जास्त काळ होती पण नंतर तिथे पण ३ X ३ आली. जास्त प्रवासी जातात परंतु सहाच्या सहा प्रवाशांना अडचण होते. मुलुंडला राहत असल्याने डेक्कन क्वीन ने जाणे गैरसोयीचे असल्याने आताशा जाणे होत नाही. पण ज्यांनी तिच्यातून प्रवास केला आहे त्या सगळ्यांच्या मनात या गाडीची खास जागा आहे हे खरं.

फारएन्ड Sun, 06/08/2025 - 00:41
धन्यवाद लोकहो! WCM ५ मालिकेतील "लोकमान्य" या इंजिनातून प्रवास करण्याचे भाग्य मला लाभले आहे >>> हे फार भारी आहे. या इंजिनाला एक वेगळाच भारदस्त लुक होता. https://www.irfca.org/gallery/Locos/Electric/wcm1_to_6/wcm5_pune_trip_shed_Apr03.jpg.html? तो २ बाय २ चा प्रशस्त पहिला वर्ग आठवतोय मलाही. मी एकदोनदा गेलो होतो. मुंबईला एकदा ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा परतताना मी या पहिल्या वर्गाने डेक्कनने येणार याचे मला त्या ट्रेनिंगइतकेच अप्रूप होते. डायनिंग कारमधे बसून खाण्याच्या अनुभवाबद्दलही सहमत.

मनो Mon, 06/09/2025 - 04:18
१९६६ सालची फिल्म इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याने याच विषयावर केलेली ही क्लिप पहा, अनेक जुन्या गोष्टी दिसतील. Pure Gold. https://m.youtube.com/watch?v=3vcRKHJg8WI

प्रचेतस Wed, 06/11/2025 - 15:10
तुमची जशी डेक्कन क्वीन, तशी आमची सिंहगड एक्सप्रेस. पिंपरी चिंचवडला राहत असल्यामुळे डेक्कन क्वीनने जाणेयेणे कधीच जमले नाही. मात्र सिंहगड एक्सप्रेसने प्रवास करण्याचे भाग्य खूपदा लाभले. त्यातही तेव्हा ती भारतातली पहिली डबलडेकर ट्रेन. फार मजा यायची त्या दोन मजली रेल्वेत.

आधीच क्लिअर करतो. ती ९५ वर्षांची आहे. मी नाही

😄

डेक्कन क्वीन

फारएन्ड ·

कर्नलतपस्वी Tue, 06/03/2025 - 08:20
गप्प राहून सुद्धा बरेच काही सांगून जातात. दख्खन च्या राणीच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजही राणी आपल्या चाहत्यांना, "कशासाठी पोटासाठी , खंडाळ्याच्या घाटासाठी" बोराटे वाट लागलीय. १९७४ मधे पहिला आगगाडीत बसलो होतो. ते ही याच गाडीत बसायचे भाग्य लाभले होते. तेव्हा बोलघाट एखाद्या षोडशवर्षीय अवखळ नवयुवती सारखा वाटला. अर्थात आम्ही सुद्धा ......

फारएन्ड Tue, 06/03/2025 - 08:41
हा लेख उडवता आला नाही. पण पूर्ण लेखही स्वतंत्र प्रकाशित केला आहे. https://www.misalpav.com/node/52965 कर्नलतपस्वी - धन्यवाद.

Deccan Queen

वायुसेनेतील आठवणी – भाग ४ "शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

वायुसेनेतील आठवणी – भाग ४

"शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे" "सर, आर यू द नेफ्यू ऑफ कॅप्टन पी.एन. ओक? हू वॉज इन आझाद हिंद फौज विथ नेताजी सुभाषचंद्र बोस?" (“सर, तुम्ही कॅप्टन ओक यांचे पुतणे आहात का? जे नेताजींसोबत आझाद हिंद फौजेत होते?”) "यू नेव्हर मेंशनड टू मी व्हाईल इन पुणे! इट्स डन डील… आय विल गो टू कॅप्टन ओक सर टू सॅल्युट हिम!" (“तुम्ही हे पुण्यात असताना कधी सांगितलंच नाही!

वकीलाना टाटा-बायबाय

युयुत्सु ·

Bhakti Mon, 06/02/2025 - 15:26
होय,कालच युवालचा ए.आय ची मुलाखत ऐकत होते.ए.आय ला सर्व नियम माहिती आहे.तुम्हाला केस लढवताना काही नियम आठवत नाही, त्याबाबत ए आय तुम्हाला हरवू शकेल.असा काहीसा तो मतितार्थ होता.

कंजूस Mon, 06/02/2025 - 15:53
नियम सर्वांना ठाऊक असतात पण नियमांच्या व्याख्येत गुन्हा कसा बसत नाही हे तक्रारदार आणि साक्षीदारांच्या उलट तपासणीत त्यांच्या उत्तरांतून कोर्टाला दाखवून देण्याचे काम आरोपीचे वकील करतात. मग संशयाचा फायदा मिळतो. हे काम एआइ करणार नाही.

In reply to by कंजूस

गवि Mon, 06/02/2025 - 18:11
असहमत. नेमका कोणता नियम / उपनियम/ कलम इथे वापरले तर आशिलाची अलगद आणि कमीतकमी वेळात सुटका होईल किंवा सर्वात वेगवान न्याय मिळेल हे अनेक वकिलांना माहीत नसू शकते. याचा अनुभव घेतला आहे. अनेक दशके अडकलेली केस नवीन वकिलाने एक वेगळेच कलम मांडून झटक्यात क्लोज करवल्याचे बघितले आहे. AI ला कमी मानण्यात अर्थ नाही. मनुष्य हवाच पण त्याला फक्त यंत्राला योग्य प्रश्न विचारता येणे इतकेच मुख्य स्किल पुढे आवश्यक म्हणून उरणार आहे.

In reply to by गवि

कंजूस Tue, 06/03/2025 - 05:48
दोन अर्जांचा विचार करू... १. भाडेकरूला दिलेली जागा घरमालकाने परत मिळवणे. २. सोसायट्यांमध्ये पार्किंगसंबंधी होणारे वाद. सभासदाने त्याचे पार्किंगसह फ्लॅट भाड्याने दिल्यावरही भाडेकरूस सोसायटी सभासद तसे करू देत नाहीत. याबाबत स्पष्ट कलमे असली तरीही कित्येक वर्षे खटले चालतात. क्रमांक (१) बद्दल काहीही कलमे लावून खटले दाखल करतात आणि त्यातल्या आरोपांचे खंडन/समर्थन यातच वेळ जातो. मान्य असलेली कलमे तोडली आहेत याबद्दल एकही मुद्दा नसतोच. यात एआइ काय घंटा मदत करणार?

In reply to by युयुत्सु

कंजूस Tue, 06/03/2025 - 06:06
याबाबत एक उदाहरण.... हल्ली उंच इमारतीत (५-८ मजली करुया) आगी लागतात तेव्हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना जिन्याने वर जाण्यात अडचण येते कारण तिथे रहिवाशांनी चपला स्टँड किंवा इतर वस्तू ठेवलेल्या असतात. तर अशा घटना घडल्यावर काही सोसायटींनी असे सामान काढणे किंवा केलेले बांधकाम काढण्याच्या नोटिसा पाठवल्या. ( ही जागा सोसायटीची आहे हे कलम असतेच) .तर याला उत्तर देताना 'ही जागा सोसायटीची कशी नाही' यावर वकिली उत्तर नसतेच पण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला त्रास देण्यासाठी आणि आकसाने ही कारवाई केली आहे असा खटला लावतात. खटले चालतात ते आरोपांचे खंडन करण्यात . मूळ मुद्दा बाजूलाच राहिला...की जिने मोकळे करा. तर इथे एआइ काय घंटा मदत करणार? सामान तसेच राहाते आणि निकाल लागेपर्यंत काहीही होत नाही. सामान ठेवून जागा आवडणाऱ्याला हेच पाहिजे असते. २. एका सोसायटीत तळमजल्यावर एका डॉक्टरने नर्सिंग होम काढून इमारतीच्या आवारातील मोकळ्या जागेत गॅस सिलिंडर, कॉक्स इत्यादी सामान टाकले. सोसायटीने नोटिस दिली की विनापरवाना जागा वापरात आहात. यावर " ही जागा वापरल्याने सभासदांना काय अडचण आहे ते सांगा असा मुद्दा लावला. शिवाय हे आरोग्यसेवेचाच भाग आहे. तर अशा खटल्यात सोसायटीला एका कमिटी मेंबराला सुनावणीच्या वेळी पाठवावे लागते. खर्च आहेच. तर इथे एआइ येणार मदतीला धावून.

गवि Mon, 06/02/2025 - 18:12
@युयुत्सु याही पुढे जाऊन न्यायाधीशांच्या जागीच AI येईल, याबद्दल काय वाटते?

In reply to by गवि

युयुत्सु Mon, 06/02/2025 - 18:54
लोकअदालत प्रमाणे काही खटले ए०आय० न्यायाधीशाकडे पाठवले जाऊ शकतात. त्यामुळे न्यायालयांवरचा ताण वेगाने कमी होऊ शकतो. इशु फ्रेमिंगसाठी (आरोप निश्चिती साठी) पण ए० आय्०चा उपयोग होऊ शकतो

In reply to by युयुत्सु

कंजूस Tue, 06/03/2025 - 10:54
एकदा सह्याद्री चानेलवरती तीन निवृत्त न्यायाधिशांना बोलावून प्रश्न विचारले होते. हौ. सोसायटीचे विवक्षित खटले असतात ते बरेच वर्षे चालतात आणि बरेचसे एकाच टाइपचे असतात. त्यावर ते म्हणाले की जवळपासच्या वीस पंचवीस सोसायट्यांनी एकत्र येऊन प्रश्न सोडवावे म्हणजे काम सोपे होईल. न्यायालयापुढे अर्ज आला की तो दाखल करून घ्यावा लागतो व केस चालू राहते. इथे एआइ काम करत नसून वादी, प्रतिवादींनी परस्पर मार्ग काढायचा असतो.( पण अहंपणामुळे काम होत नाही. एआइ काय निकाल देऊ शकत नाही. सुचवू शकेल पण ऐकून घेण्याची तयारी हवी ना?)

In reply to by युयुत्सु

मिसळपाव Mon, 06/02/2025 - 20:08
याचं LLM कोण करेल? कोणी करावं? कोणी केलं तर तुम्ही/आम्ही ते विश्वासार्ह मानू? ए. आय. च्या ताब्यात संपूर्णपणे देण्यापेक्षा त्याचा एक साधन म्हणून वापर करणं जास्त योग्य होईल का? मूल काही हिंदू / मुस्लिम म्हणून जन्माला नाही येत. ते ज्या कुटुंबात/समाजात वाढतं ते कुटूंब / तो समाज त्याला हिंदू किंवा मुस्लिम करतात. तद्वतंच, कुठलंही ए.आय. टूल - चॅट जीपीटी / जेमिनी / ग्रॉक वगैरे कुठलंही - जगातली सग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ळी माहीती संदर्भासाठी वापरून नि:पक्षपणे नाही तयार होत. त्याला ओपनएआय / गूगल / एक्स तयार करतात. यातले धोके दिसताहेत. पण सोशल मिडीयातले, रिल्स मधले, न्यूज / अपडेट फीडमधले धोके पण माहीत असून त्याबद्दल काही केलं जात नाहीये. तसंच ईथे पण होईल. ए. आय. उत्तम साधन आहे हे नि:संशय. ते कोणा हाती आहे ते, कसं विकसित केलं जातंय ते चिंताजनक आहे. ------------------------------------------------------------- टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

स्वधर्म Mon, 06/02/2025 - 20:15
सध्या शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे वकील, न्यायालयातले कारकून, न्यायाधीश सगळेच ढिले आहेत. त्यामुळे अशिलांचा भयानक वेळ जातो शिवाय न्याय होत नाही. ए आय आले तर खूप चांगले होईल. मी सध्या एका ए आय प्रोजेक्टमधे काम करत आहे आणि अर्थ लावण्याच्या बाबतीत ए आय परिपूर्ण नाही, पण ८०% बरोबर आहे. माणसांचे अनेक संदर्भ शोधण्याचे काम अक्षरशः क्षणात होते.

ए.आय मुळे टाटा बायबाय करावा लागेल अशी अनेक क्षेत्रे आहेत- जवळपास सगळीच. कोणीतरी जात्यात आहे तर इतर सगळे सुपात आहेत. पण सगळे कधीनाकधी जात्यात ढकलले जाणारच आहेत. मग जसा वकिलांना टाटा-बायबाय असा लेख लिहिला तसे अमक्याला टाटा-बायबाय, तमक्याला टाटा-बायबाय असे लेख लिहिणार की काय? :)

कर्नलतपस्वी Tue, 06/03/2025 - 06:04
न्याय व्यवस्थेत ए आय आल्यास न्यायाधीशांना टावेल, टोपी, नारळ देता येईल का? कारकून ए आय ला विचारून न्याय निवाडा करू शकेल काय,? LLB (Lover of Last Bench) कृपया हलकेच घ्या. लेखक,कंटेट रायटर, कवी,चित्रकार हे सुद्धा मोडीत निघण्याच्या तयारीत आहेत. ( ए आय ला विचारले की तू काय काय करू शकतो तेव्हां तो म्हणाला अहं ब्रह्मास्मी)

युयुत्सु Tue, 06/03/2025 - 07:10
गुंतागुंत कमी असलेल्या खटल्यामध्येच ए० आय० न्यायाधीश होऊ शकेल. पण आपल्याकडे न्यायव्यवस्था सर्वात संथपणे स्वतःला सुधारते. त्यामुळे प्रगत राष्ट्रात ही कल्पना रूळेपर्यंत आपण स्वस्थ बसायला हरकत नाही. कदाचित तिथे रूळली तरी आपल्याकडे स्वीकारली जाईलच असे नाही. जे चालकरहित गाड्यांचे झाले तेच इथे भारतात पण होऊ शकते. पण अनेक छोटे देश ही कल्पना अमलात आणू शकतात. आपल्याकडे केसलॉचे डेटाबेस शोधता आले तरी खुप होईल

In reply to by युयुत्सु

रामचंद्र Tue, 06/03/2025 - 10:38
केसलॉचे डेटाबेस शोधता आले तरी> जिथं किरकोळ तांत्रिक स्वरूपाचंच काम असतं पण कर्मचारी वेळकाढूपणा करतात, चहापाणी म्हणत पैसे उकळतात अशी न्यायालयीन तसेच महसूल खात्यातील, नगरपालिका, इ. मधील बरीचशी जनतेशी संबंधित कामं एआयकडून सहज करवून घेता येतील. मात्र हे काम करणारा कर्मचारी लोकांची अडवणूक करण्याची शक्यता आहेच.

कंजूस Tue, 06/03/2025 - 11:03
संपत्तीचे वारसांत आणि संदिग्ध वारसांत ( यांना वारस म्हणायचे का नाही असे) वाटप कसे करणार? एआइ ते कसे करणार? तर अशा काही गोष्टी वाचून त्यावरून सुचवणार. उदाहरणार्थ - एका माणसाकडे आठ प्राणी (घोडे/ऊंट/गायी... वगैरे)होते. तो मेल्यावर त्यांच्या तीन मुलांत ते वाटायचे होते. मुलं भांडली पण वाटप ठरेना. एका महाजनाकडे गेले. त्याने त्यांच्याकडच्या एक प्राणी त्यात घालून प्रत्येकाला तीन प्राणी दिले आणि ते मुलांना पटले. मग तो म्हणाला आता माझा मोबदला म्हणून माझ्या एका प्राण्याची किंमत तिघांनी वाटून द्या. तसे केले. तर हे एआइ करेल. पण पटवून घ्यायची तयारी हवी ना?

कपिलमुनी Tue, 06/03/2025 - 12:34
ए आय ची क्षमता अफाट आहे . मध्यंतरी ऑस्ट्रेलियाच्या एका फर्मने शक्य ते सगळे खटले, निकाल डिजिटल करून क्रॉल करून घेतले ( त्यांचा मेटाडेटा ) तयार करून घेतला . आता त्यांचा ए आय जर त्यंचा वकील खटला लढवत असेल तर सग्ळे संदर्भ , रेफरन्स क्ष्णात हजर करतो . आपण केस अपलोड केलि तर मेरीट सांगतो ( जिंकायची शक्यता वगैरे) ..

माहितगार Tue, 06/03/2025 - 18:30
१) अगदी अलिकडेच माझा एक मित्र मल्टीलेव्हल मार्केटींगच्या प्रकाराला भुलला होता, मल्टीलेव्हल मार्केटीन्गच्या बाबतीत कायदे काय सांगतात असे विचारले तर एआय ने व्यवस्थीत माहिती दिली. पण प्रत्येक वेळी एआय अचुकतेने करू शकेल किन्वा एआय नरेटीव्ह बाधीत नसतात असे नव्हे त्यामुळे ते प्रत्यक्ष वकीली सल्ल्याची जागा अद्यापतरी घेऊ शकणार नाहीत. २) सर्वसाधारणपणे पे वॉल्सच्या मागेअ असणारा जुन्या लीगल केसेसची माहिती उपलब्ध करणारा सॉफ्टवेअर सपोर्ट गेली पाच दहावर्षे पासून वकीलांना उपलब्ध आहेच एआय मुळे कदाचीत केसच्या मांडणीचे उर्वरीत काम आणि प्रुफ रिडीग भाषिक दुरुस्त्याण्चे काम सोपे होईल. यातून वकीलांचे काम पूर्ण बंद झाले नाहीतरी त्यांना असीस्टन्ट लोकांची गरज कमी भासेल आणि ज्या वकीलांकडे असीस्टंट नव्हते इंग्रजी भाषेत अंशत कच्ची होते ते इन्ग्रजीत अस्खलीत असलेल्याना चान्गली स्पर्धा देऊ लागतील ३) वकीलानी सबमीट केलेल्या केस्स्टदीज क्रॉसचेक करणे दोन्ही बाजूची परस्पर विरोधी बाजूण्च्या मांडणीची तुलना उपलब्ध करुन देणे आणि निकाल नाही पण निकालाचा रिपिटीटीव्ह भाग लिहिण्यातला वेळ वाचवणे हि कामे ए आय करु शकेल

In reply to by माहितगार

मारवा Tue, 06/10/2025 - 14:46
अगदी अलिकडेच माझा एक मित्र मल्टीलेव्हल मार्केटींगच्या प्रकाराला भुलला होता, मित्राच्या स्कीम मध्ये item काय होता? मी पाहिलेले काही मल्टिमार्केटिंग मध्ये विकले जाणारे items जपानी गादी Nutrition जादुई nutrition चा हजारो किमतीचा डबा Alkaline पाणी बनविणारी काही 2 का 3 लाखाची मशीन क्रिप्टो currency new launch झालेली मल्टिमार्केटिंग ची शाळा माहितीये मला item मध्ये interest वाटतो यंदा काय म्हणे ?

सुबोध खरे Tue, 06/10/2025 - 19:18
कृत्रिम बुद्धिमत्ते मुळे न्यायालयीन निकालांचे अनेक संदर्भ चुटकीसरशी हाती लागतात आणि आपल्याला हवा तो निवाडा न्यायालयात सादर करता येतो. परंतु जोवर न्यायाधीश आणि कायदे करणारी माणसेच आहेत तोवर न्यायसंस्थेत माणसांची गरज संपणारी नाही. कायद्याचा अर्थ कसा लावायचा हा पण एक भाग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या बाहेरचा आहे. उदा. १७ व्य वर्षी मुलीचे लग्न करून दिले तर तो गुन्हा आहे परंतु कुणीच तक्रार करत नसेल तर केवळ कायद्यावर बोट ठेवून त्या जोडप्याला विभक्त करायचे का? किंवा त्या नवऱ्याला बलात्काराच्या आरोपाखाली १४ वर्षे तुरुंगात पाठवायचे. अज्ञान मुलीशी संबंध ठेवला तर तो बलात्कार ठरतो. एकंदर समाजाची ठेवण पाहून तारतम्य बाळगून निकाल द्यायला लागतो यासाठी न्यायाधीशांना वैकल्पिक अधिकार दिलेले आहेत. अमेरिकेत तर एका राज्यात गुन्हा असणारी गोष्ट दुसऱ्या राज्यात सर्रास मान्यता प्राप्त आहे. उदा चरस पिणे. अशा स्थितीत जर माणूस शेजारच्या राज्यात चरस पिऊन आला आणि इकडे दंगा केला तर ती स्थिती कशी कायद्यात बसवायची याबद्दल बरीच धूसरता आहे. अर्थात हि अगदीच ढोबळ उदाहरणे आहेत. त्यातून जोवर येणाऱ्या न्यायाधीशांची आणि वकिलांची पिढी कृत्रिम बुद्धिमत्ता शिकून त्यात पारंगत होत नाही तोवर न्यायसंस्थेतून वकील जाणार नाहीत हे नक्की. यामुळे आता वकीलांना लवकरच "टाटा-बायबाय" करायची वेळ आली आहे हे विधान सध्या तरी अतिशयोक्त वाटतं.

In reply to by सुबोध खरे

गवि Wed, 06/11/2025 - 05:50
कायद्याचा अर्थ कसा लावायचा हा पण एक भाग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कक्षेच्या बाहेरचा आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातच सध्या काम असल्याने इथे विनम्र असहमती नोंदवू इच्छितो. उलट या गोष्टी खास करून AI अधिक चांगल्या हॅण्डल करेल. इट्स अ मॅटर ऑफ टाईम. अगदी तुम्ही दिलेली दोन उदाहरणे पाहिली तरी त्यात AI सहज त्या गोष्टी पाहून अधिक योग्य निर्णय घेऊ शकतो. मुळात AI हा मानवी ऐतिहासिक डेटा वरुनच "ट्रेन" होत असतो. आणि त्याच्याकडे प्रचंड डेटा एकावेळी शिकून त्यातले सर्व सूक्ष्म ताणेबाणे आत्मसात करण्याची शक्ती आहे जी आपल्यात नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे Wed, 06/11/2025 - 11:55
कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ सत्य काय ते सांगू शकेल. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कि निकाल देण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार ति च्याकडे नाही तोवर कृत्रिम बुद्धिमत्ता काहीही करू शकणार नाही जोवर निकाल देणे हे न्यायाधिशांच्या हातात आहे तोवर कृत्रिम बुद्धिमत्ता काहीही करू शकणार नाही. ज्यांनी प्रत्यक्ष न्यायालयात काम केलं आहे अशा वकिलांना विचारून पहा. जर न्यायाधीशांनी ठरवलं असेल कि आरोपीला जामीन द्यायचा नाही तर तुम्ही हवे तितके पुरावे आणा, जामीन नाकारला जातो. किंवा न्यायाधीशांनी ठरवले कि जामीन द्यायचा कि कितीही गंभीर गुन्हा असो जामीन दिला जातो. माझ्या स्वतःच्या केस मधेय सर्वोच्च न्यायालयात न्या बी एन श्रीकृष्ण यांनी माझ्याविरुद्ध असा पवित्रा घेतला होता कि लष्कराच्या बाबीत न्यायालयाने हस्तक्षेप करू नये म्हणून ते माझी केस परत संरक्षण मंत्रालयाकडे पाठवणार होते. त्यांना परोपरीने विनवले कि उच्च न्यायालयाने केस संरक्षण मंत्रालयाकडे पाठवलेली होती तरी सुद्धा न्याय झाला नाही. त्यावर त्यांचा एकच हेका चालू होता . शेवटी कसे बसे ते केस दाखल करून घेण्यास तयार झाले. केस दाखल केल्यावर त्यांनतर येणाऱ्या सर्वच्या सर्व नऊ खंडपीठानी मला लष्करी सेवेतून मुक्त करायला हवे हे माझे म्हणणे मान्य केले होते आणि शेवटी साडे तीन वर्षांनी निकाल माझ्या बाजूने लागला. माझ्याच रूममेटची केस दिल्ली उच्च न्यायालयाने परत संरक्षण मंत्रालयाकडे पाठवली त्यांनी सध्या आम्ही याला सेवामुक्त करू शकत नाही असा निर्णय दिला आणि तो दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केला. माझा हा मित्र अजूनही लष्करी सेवेत आहे लेफ्टनंट जनरल म्हणून. माझ्या सुदैवाने मुंबई उच्च न्यायालयाने संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे साफ नाकारले यास्तव सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले होते शेवटी सत्य तेच असते जे तुम्ही न्यायालयात सिद्ध करू शकाल अशा परिस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्ता काय करेल? अमेरिकेत ओहायो या राज्यात जर गर्भ हा फेलोपियन ट्यूब मध्ये असेल तर तो तेथून काढून गर्भाशयात रोपण करावा पण गर्भपात करायचा नाही असा कायदा केला होता. Ohio bill orders doctors to ‘reimplant ectopic pregnancy’ or face 'abortion murder' charges. Ohio introduces one of the most extreme bills to date for a procedure that does not exist in medical science. https://www.theguardian.com/us-news/2019/nov/29/ohio-extreme-abortion-bill-reimplant-ectopic-pregnancy. This is the second time practising obstetricians and gynecologists have tried to tell the Ohio legislators that the idea is currently medically impossible. Reimplantation is not physiologically possible. Women with ectopic pregnancies are at risk for catastrophic hemorrhage and death in the setting of an ectopic pregnancy, and treating the ectopic pregnancy can certainly save a mom’s life. आता जगभरात कुठेही असे रोपण यशस्वी होत नाही. ट्यूब मधील गर्भ वाढून शेवटी ट्यूब फाटते आणि प्रचंड रक्तस्त्राव होऊन आईचा जीव जातो यासाठी सध्या तरी गर्भपात हा केवळ एकच उपाय आहे. परंतु ओहायो राज्यात स्त्रीरोगतज्ज्ञाने जर गर्भपात केला तर त्याच्यावर सदोष मनुष्यवधाखाली खटला भरला जाईल. Another new crime, “aggravated abortion murder”, is punishable by death, according to the bill. यामुळे तेथील कित्येक स्त्रीरोगतज्ज्ञ तेथून गाशा गुंडाळून दुसऱ्या राज्यात व्यवसाय करायला गेले. यानंतर हा कायदा परत रद्दबातल केला आहे असे ऐकतो. आपल्याकडे एक कायदा आहे. आपल्या खाजगी वाहनात दुसऱ्या ( अज्ञात )माणसाला लिफ्ट देणे हा गुन्हा आहे. तम्ही खाजगी व्यवसाय करता असे गृहीत धरले जाईल. कायद्याचा असा अर्थ लावून नव्या मुंबईत एका माणसाला पोलिसांनी दंड केला होता. या सज्जन माणसाने पावडसात अडकलेल्या तीन नागरिकांना लिफ्ट देण्याचे दुष्कृत्य केले होते. न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे कायद्यानुसार असून त्याचा दंड कायम केला आणि अज्ञात माणसाला लिफ्ट देणे हा गुन्हा आहे असे मान्य केले https://www.moneycontrol.com/news/india/mumbai-man-fined-for-giving-lift-to-strangers-stuck-in-rain-2628691.html तेंव्हा आपली कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही हुषार असली तरी कायदे करणारे/ कायद्याचा अर्थ लावणारे गाढव असले तर काहीही करता येणार नाही.

विजुभाऊ Wed, 06/11/2025 - 09:48
ए आय ला एकच प्रश्न वेगळ्याप्रकारे विचारला तर वेगवेगळे उत्तर येते उदा: तंबाखू खाणे हे आरोग्यासाठी कसे चांगले आहे हा प्रश्न तमबाखू खाणे आरोग्यासाठी कसे वाईट आहे असा विचारला तर वेगळी उत्तरे येतात

युयुत्सु Wed, 06/11/2025 - 10:40
ए आय ला एकच प्रश्न वेगळ्याप्रकारे विचारला> मग बिघडले काय? ए० आय० सर्व बाजू (विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने) मांडतो. वकील पण (नीतिमत्ता बाजूला ठेऊन) असेच करतात. ए०आय० वर मानवी नीतिमत्ता लादणे मला तरी मान्य नाही.

ए० आय० ने अनेक क्षेत्रात धूमाकूळ घालत आपले पाय रोवले आहेत. ए० आय० मुळे आता वकीलांना लवकरच "टाटा-बायबाय" करायची वेळ आली आहे. असे झाले तर कायद्याच्या लढाया लढण्यासाठी उर्मट आणि स्वत:च्याच अशीलांचे रक्त पिणार्‍या, तसेच फसवणार्‍या वकीलांना मोठी जरब बसेल अशी चिन्हे आहेत. अर्थात अडाणी लोकांना ही जमात फसवत राहीलच... https://youtu.be/WoqcSIcdx-Y?si=FURG5R1kytIfSUeB