क्लीओपात्रा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
12 Mar 2020 - 6:26 am

क्लीओपात्राच्या सौंदर्याला
सीझरच्या नश्वरतेचा शाप
या भुताटकीच्या जगात
सगळेच हॅम्लेटचे बाप
*
व्हेनीसचे व्यापारी सारे
मासाचे भुकेले
रोमीयोचे शहाणपण
उगाळुन प्यायलेले
*
म्हणुन म्हणतो पोरी
बरे असते स्व:ताला जपलेले
ईथे सगळे वंशज सेक्सपीयरचे
तारुण्याला हपापलेले..

मांडणी

धनेश्वर

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Mar 2020 - 6:24 am

धनेश्वर भीतीवर खिळा ठोकत असतात
मुलगा विचारतो -बाबा आमच्या कॉलेजची २ दिवस महाबळेश्वरला ट्रिप जाणार आहे -मित्र मैत्रिणी आहेत मी जाऊ का?
धनेश्वर स्टूलावरून खाली उतरतात व खुर्चीवर बसतात
व अचानक हातातली हातोडी कपाळावर मारतात
त्यांच्या या विचित्र वागण्याने मुलगा घाबरतो व विचारतो अहो बाबा काय झाले असे का केले ?
त्यावर बाबा म्हणतात -अरे विशेष काही नाही -जुना प्रसंग आठवला -तुझ्या वयाचा असताना आमची पण सहल महाबळेश्वरला गेली होती -छान थंडगार वातावरण होते -रात्रीची वेळ होती -मला झोप येत नव्हती म्हणून मी व्हरांड्यातल्या खुर्चीवर वाचत बसलो होतो -

धोरणप्रकटन

तिरडी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Mar 2020 - 6:20 am

मे महिन्यात सारे जमले होते
राम मामा -वैशाली मामी त्यांची २ मुले -मधुकाका -वासंती काकू
राधा मावशी
आमरसाचा तुडुंब जेवण झालं होत
राधाक्कां सार आवरा आवर केली
मंडळी जमेल तशी मिळेल त्या जागेवर पडून घोरत होती
गोदाक्का ने मोकळी जाग शोधली व जमिनीला पाठ टेकवली व घोरु लागली
बाहेरून राम मामा आला त्यानं गोदाक्काला घोरताना पाहिलंत
तिच्या भोवती डास घोंघावत होते त्याने बाजूला पडलेली नवी कोरे पांढरी चादर तिच्या अंगावर टाकली
राधा मावशी बाजारात गेली होती तिने पूजेसाठी फुले हार बुक्का हळद कुंकू आणले होते

मांडणीप्रकटन

पावभाजी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
12 Mar 2020 - 6:11 am

घरात पावभाजी चा बेत असल्याने जोशीकाकूंच्या लक्षात येतेकी पावाची लादी घेण्यास त्या विसरल्या आहेत
लगबगीने त्या समोरच्या जनरल स्टोअर मध्ये गेल्या व पाव लादी व दुधाची पिशवी आदी किरकोळ खरेदी केली
दुकानदाराने ते सामान पातळ प्ल्यास्टीक च्या पिशवीत भरले व काकूंना दिले
बाजूलाच भाजेवाला असल्याने त्यांनी भाजी खरेदी केली व पिशवीत भरली व सॊसायटी कडे त्या निघाल्या
वाटेत वजन जास्त झाल्याने प्ल्यास्टीक ची पिशवी फाटली अन पावाची लादिने जमिनीकडे झेप घेतला पण जोशी काकूने चपळाईने पाव पडू दिला नाही अन सारे सामान छातीशी पकडत घर गाठले -

मांडणीप्रकटन

रँडम चॅट - लघुकथा

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
11 Mar 2020 - 10:55 pm

'पुढील स्थानक दादर' .लोकलमधल्या घोषणेमुळे मंदार भानावर आला. त्याच्यासाठीचा हा रोजचा प्रवास. समोरच्या माणसांना ढकलत तो दरवाज्यापाशी आला. नेहमीप्रमाणे त्याच्याच वयाचा एक मुलगा दरवाज्यापाशी आला होता. हाही दादरलाच उतरायचा. मंदारला बघून त्याने ओळखीचे हसू दिले. तशी काही फारशी ओळख नव्हती पण रोज पाहून चेहरे ओळखीचे झाले होते. अनोळखी असूनही
ओळखीचा होता तो! मंदार मात्र दरवाजातून बाहेर डोकावत होता. आज कोण जाणे काहीतरी बिनसले होते. उगाचच उदासीपणाचे मळभ दाटून आले होते. एवढ्यात दादर आले देखील.

कथालेख

सहावि सातवित असेन..बहुतेक

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
11 Mar 2020 - 8:06 am

सहावि सातवित असेन..बहुतेक
उन्हाळयाच्या सुट्या चालु झाल्या होत्या..
आमचे १०-१२ मित्रांचे टोळके बाळ पुंडलीक मित्राच्या वाड्यात दंगा करायला जमले होते...
वाडा चौसोपि व.मोठा. .. आत एक विठ्ठल मंदिर हि होते..सभामंडपात सारे जमलो होतो..
गप्पा चालु होत्या.. "अन आपण नाटक करु यात का?".चंद्या घाटपांडे म्हणाला..
सा~यांनी कल्पना उचलुन धरली.. पण कोणचे? .कुणालाच सुचेना
शेवटी "तुच एखादे नाटुकले लिहि..असा मला आग्रह झाला..
मित्रांच्या विश्वासाचा अन अज्ञानाचा फायदा घेत मी पण हो म्हटले..
रात्री विचार करीत अश्वथाम्याच्या कथेवर एक छोटे नाटुकले लिहिले...

नाट्य

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
11 Mar 2020 - 7:46 am

कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला
असा तो व्हायरस पुचाट
गेला घाबरून साहेबांना ||ध्रू||

आले आले ते परदेशी
घेवून आले व्हायरसला
खोकून शिंकून झाले बेजार
त्यांनीच आजार पसरवला
खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या
एकदा व्हायरसचा आवळा गळा
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||१||

कसला हा विषाणू व्हायरस
कोरोना नावाचा चायनाचा
थुंकू नका, हात तोंड धुवा
मास्क बांधा तुमच्या तोंडाला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||२||

काहीच्या काही कविताकैच्याकैकविताकविताविडंबनविनोदसमाजजीवनमानऔषधोपचारप्रवासमौजमजा

तिरुपती दर्शन (प्रवास ) भाग २

AKSHAY NAIK's picture
AKSHAY NAIK in भटकंती
10 Mar 2020 - 1:46 pm

नमस्कार मंडळी,
नुकतेच तिरुपती दर्शन सहल पूर्ण झाली. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणी जाणकार मंडळींचे मार्गदर्शन यामुळे कोणतीही अडचण न येता तिरुपती यात्रा विनासायास पूर्ण झाली. प्रवासात आलेले अनुभव आपल्यासोबत वाटून घेण्यासाठी हा प्रपंच करीत आहे.