श्री गणेश लेखमाला २०२३

1

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
11 Mar 2020 - 7:46 am

कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला
असा तो व्हायरस पुचाट
गेला घाबरून साहेबांना ||ध्रू||

आले आले ते परदेशी
घेवून आले व्हायरसला
खोकून शिंकून झाले बेजार
त्यांनीच आजार पसरवला
खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या
एकदा व्हायरसचा आवळा गळा
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||१||

कसला हा विषाणू व्हायरस
कोरोना नावाचा चायनाचा
थुंकू नका, हात तोंड धुवा
मास्क बांधा तुमच्या तोंडाला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||२||

कितीक आजार आले अन गेले
स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू पाहिले
चांगले खा प्या अन निट फिरा
सांभाळून आपल्या आरोग्याला
मंत्र हाच असे नाही दुसरे काही
व्हायरसपासून दूर रहायला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||३||

- पाषाणभेद
१०/०३/२०२०

काहीच्या काही कविताकैच्याकैकविताकविताविडंबनविनोदसमाजजीवनमानऔषधोपचारप्रवासमौजमजा

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

11 Mar 2020 - 8:30 am | चांदणे संदीप

पण तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. साहेब करुणाला 'गो' म्हटले. मग करुणा गेली. =))

सं - दी - प

नावातकायआहे's picture

11 Mar 2020 - 9:48 pm | नावातकायआहे

=))

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Mar 2020 - 8:34 am | ज्ञानोबाचे पैजार

पण ह्या साहेबांपेक्षा...... त्या साहेबांच्या शब्दाला जास्त वजन आहे.
पण ते मिठाची गुळणी धरुन बसले आहेत इतक्या महत्वाच्या विषयावर
पैजारबुवा,

खिलजि's picture

11 Mar 2020 - 7:19 pm | खिलजि

भारी वल्ली है त्यो .. त्याला बघूनच हसायला येते .. त्याच्या कविता तर अफलातून .. अजरामर केलंय राव ,, या इडियोने त्याला आणि आपल्या देशालासुद्धा ..