एक लोभसवाणा, देखणा ब्लॉग!
लेखनप्रकार
राम राम मंडळी,
आमचे मित्रवर्य धोंडोपंत यांच्या या ब्लॉगविषयी, न राहवून आज आम्ही इथे दोन शब्द लिहीत आहोत!
मंडळी, अंतरजालावर आजमितीस अक्षरश: शेकड्याने ब्लॉग उपलब्ध आहेत, त्यापैकीच धोंडोपंतांचाही एक ब्लॉग, तेव्हा त्यात विशेष काहीच नाही. अनेकांप्रमाणेच पंतही त्यांच्या ब्लॉगात लेखन करीत असतात, त्यांचे विचार मांडत असतात, तेव्हा त्यातही काही विशेष नाही. त्यांच्या ब्लॉगातील त्यांनी मांडलेले विचार कुणाला पटतील, कुणाला पटणार नाहीत, हेही ओघानेच आले.
परंतु एक गोष्ट मात्र त्यांच्या ब्लॉगविषयी अगदी आवर्जून लिहाविशी वाटते ती अशी की त्यांनी त्यांच्या ब्लॉगची केलेली सजावट अत्यंत सुरेख, अत्यंत देखणी आणि अत्यंत लोभसवाणी केली आहे!!
ब्लॉगची रंगसंगती (थीम), उजव्या बाजूच्या समासात असलेली एकापेक्षा एक सुरेख चित्रे आणि त्या चित्रांसंदर्भात त्यांनी केलेले दोन दोन ओळींचे निवेदन या गोष्टी लक्ष वेधून घेतात, मन प्रसन्न करतात!!
समर्थ, शिवछत्रपती, सावरकर, टिळक यांचे उल्लेख, तर कुठे गीतेतली संस्कृत वचने, कुठे परशुरामाच्या फोटोने साधलेला चित्तपावनपणा, तर कुठे विठोबा-रखुमाई, ग्यानबा-तुकारामांच्या नामसंकीर्तनात जागवलेला भागवत धर्म! कुठे व्याडेश्वर तर कुठे बल्लाळेश्वराच्या साक्षीने पाळलेले कुळाचार, कुळधर्म!
आणि इतर सर्व छायाचित्रे म्हणजे भरभरून केलेले कोकणदर्शन! कुठे भातशेती, तर कुठे आंबा-फणस-पोफळी, कुठे चिपळूणला वळसा घालून दाभोळकडे निघालेली वशिष्ठी (ही शिरुभाऊंच्या तुंबाडातील जगबुडी बरं का!), तर कुठे गुहागर, चिपळूण, कुठे आचरा मालवण, तर कुठे आमच्या देवबागचा हळूहळू देवबाग गिळू पाहणारा समुद्र, कुठे गोधन, तर कुठे नुकतीच कात टाकलेला एखादा राखणदार!
वा वा मंडळी! अतिशय सुरेख आणि प्रेक्षणीय ब्लॉग!!
जळ्ळं मेलं लक्षण ते! आम्हाला अशी सुरेख सजावट करता आली असती तर किती बरं झालं असतं!
धोंड्या, लेका तुझा हेवा वाटतो रे!
सध्या आमचा नीलकांत रजेवर गेला आहे, परंतु तो आल्यावर लवकरच काही दिवसात मिसळपावचे बाह्यरूप पालटायचे आहे तेव्हा शिंच्या तुझी मदत आम्ही नक्कीच घेऊ!
करशील ना आम्हालाही मिपाच्या सजावटीकरता मदत?
-- तात्या अभ्यंकर.
वाचने
14477
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
जळ्ळं मेलं
मी ही..
In reply to मी ही.. by प्राजु
+१
नक्कीच
आवडता ब्लॉग
वा!
सुंदर ब्लॉग!!
धोंडोपंतांची अनुदिनी
सहमत आहे...
ब्लॉग छानच .......
धन्यवाद
In reply to धन्यवाद by धोंडोपंत
श्रेय!
धन्यवाद!
तात्या, तु
धोंडोपंतांना जाहिर विनंति !!!
In reply to धोंडोपंतांना जाहिर विनंति !!! by रामोशी
हेच,
केशवराव, मामलेदार, तात्या
धन्यवाद !!
In reply to धन्यवाद !! by रामोशी
हेच,
सुंदर ब्लॉग
छान कल्पना
In reply to छान कल्पना by नितिन थत्ते
मिपा आहे
In reply to मिपा आहे by विसोबा खेचर
व्हय
In reply to मिपा आहे by विसोबा खेचर
ओके
पंतांचा
ब्लॉग
धन्यावाद तात्या!!