Skip to main content

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका

लेखक छत्रपति यांनी गुरुवार, 17/01/2008 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..? पायलटची बायको ... " गेलास उडत..." मंत्र्याची बायको ... "पुरे झाकी तुमची आश्वासनं." शिक्षकाची बायको ..."मला नका शिकवू..." रंगारयाची बायको ..."थोबाड रंगवीन." धोब्याची बायको ... " चांगली धुलाइ करीन." लोहाराची बायको ... "ठोकुन सरळ करीन." तेल विक्रेत्याची बायको ..." गेलात तेल लावत." न्हाव्याची बायको ... "केसाने गळा काप्लात की हो माझा." डेंटिसची बायको ... "दात तोडुन हातात देइन." शिंप्याची बायको ..."मल शिवलंस तर याद राख." अभिनेत्याची बायको ..."कशाला नाटक करता?" इति महेश....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4704
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवीन ________- असे शीर्षक वाचून आम्हाला काहीतरी वेगळेच वाटले.... :)

अरविन्द पुर्वी वाचलेले आहे.

कवीची बायको काय म्हणेल ते सांगा ना !

In reply to by धर्मराजमुटके

मीटरच तोडीन. यमकात हाणीन. मुक्तछंदात तुडवीन. शीर्षक गंडवीन. मुखडा रंगवीन, . . सगळ्यात शेवटी..... पाटणकरांपाशी नेऊन सोडीन हां.