✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दडपे पोहे

स
सृष्टीलावण्या यांनी
गुरुवार, 03/06/2008 - 07:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10645 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर गुरुवार, 03/06/2008 - 07:54 नवीन

वा!

वा! दडप्या पोह्यांची पाकृ अगदी यथासांग दिली आहे. वाचूनच पोट भरले! :) अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ येऊ द्यात... आपला, (पोहेप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 03/06/2008 - 09:20 नवीन

पाककृती चांगली दिसते आहे

पण आमच्याकडे थोडी वेगळी करत -म्हणजे कांदा, कोथिंबीर, इत्यादी बारीक चिरून खोबरे वगैरे घालून तसेच कच्चेच दडपून ठेवायचे, आणि मग वरून फक्त मोहरीची नेहमीची फोडणी शेंगदाणे घालून द्यायची. त्यात पोह्याचे (लाल) पापडही भाजून चुरा करून घालत.
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या गुरुवार, 03/06/2008 - 09:51 नवीन

आहाहा...

पोह्याचे पापड म्हटले की वडखळ नाका, पांढर्‍या कांद्याच्या माळा आठवतात. कालच पोपा खमंग भाजून तांदळाच्या खिचडीबरोबर खाल्ले. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
स
सुवर्णमयी गुरुवार, 03/06/2008 - 21:14 नवीन

मी पण

मी पण चित्रा म्हणते तसे दडपे पोहे करते. ही पाककृती थोडी वेगळी आहे, करुन बघेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
क
केशवराव Fri, 03/07/2008 - 01:24 नवीन

हे खरे दडपे पोहे.

चित्रा , तू सांगितलेस ते खरे दडपे पोहे.' त्यात पोह्याचे ( लाल ) पापडही --------- ' आता खरी मजा आली. ---------- केशवराव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 03/06/2008 - 09:24 नवीन

कच्चा चिवडा

आमच्या विदर्भात दडप्या पोह्यांची वैदर्भिय आवृत्ती म्हणजे कच्चा चिवडा.. फोडणी वगैरे काही नाही.. विस्तवाशी संबंध नाही.. म्हणजे "ग्रीन रेसिपी" !! पण जबरा !!! - सर्किट
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 03/06/2008 - 21:13 नवीन

कच्चा चिवडा

ह्म्म, आठवणी जाग्या झाल्या. मी घरी कधी हा चिवडा खाते तर प्रसन्न आणि मुले हे काय असा चेहरा करुन बघत असतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
विजुभाऊ गुरुवार, 03/06/2008 - 10:13 नवीन

हे दडपे पोहे नाहीत

ही तर साध्या चिवड्यची पा क्रु. दडपे पोहे म्हणजे कच्चे पोहे...त्याला नारळाच्या पाण्यात हलके भिज्वावे...त्यात भरपुर खोबरे ओले किसुन टाकावे.हिरव्यामिरचीचे तुकडे , लिंबु पिळावे,मीठ साखर मग त्याला फोडणी द्यावी..... पोहे नारळाच्या पाण्यात हलके भिजवुन ठेव्तात आणि ते नीट भिजावे म्हणून दडपुन ठेवतात्..म्हणुन याला दडपे पोहे म्हणतात.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 03/06/2008 - 21:16 नवीन

बरोबर विजुभाऊ,

मी प्रतिसाद बघत बघत जात होतो की नारळाचे पाणी आणि दडपून ठेवणे ह्या दोन्ही गोष्टी नसताना हे पोहे 'दडपे' कसे? आणि तुमचा प्रतिसाद भरुन पावला! सृष्टीताई, नारळाच्या पाण्याशिवाय आणि दडपून ठेवल्याशिवाय ती चव येत नाही हो! माझी बायको हे पोहे छान करते. (आईच्या हातचे तर खासच असतात पण अजून जवळजवळ १० महिने तरी वाट बघावी लागणारः(() चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सृष्टीलावण्या Sun, 03/16/2008 - 08:08 नवीन

मला वाटते इजुभाव,

तुम्ही हे नारळाच्या पाण्यात दडपता हे जाड पोहे आणि मी लिहिलेय ते पातळ पोह्याविषयी. इथेच सर्व घोळ झाला आहे. आम्ही कोकणातले असूनसुद्धा जेवणात फार नारळ वापरत नाही. म्हणून जाड पोह्यांऐवजी पातळ पोहे वापरतो. आता जर पातळ पोहे नारळाच्या पाण्यात दडपले तर लगदाच होईल. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सृष्टीलावण्या गुरुवार, 03/06/2008 - 10:22 नवीन

हाहाहा

मंडळी, मीठ साखर मी पारच विसरले होते.. इजुभाव.. आम्ही करतो ते पोहे लांज्याकडचे.. तुम्ही म्हणताय ते अष्टागारातले... फरक असायचाच... . . परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
स
सृष्टीलावण्या गुरुवार, 03/06/2008 - 10:29 नवीन

ते त्या त्या परिसरावर अवलंबून असते...

कुलाबा जिल्ह्यात, चिंचेचे जास्त उत्पादन. म्हणून पोह्यात चिंच घालून कोळाचे पोहे करतात. हातखंबा, संगमेश्वर पर्यंत नारळाची झाडे जास्त म्हणून खोबरे जास्त वापरतात पण लांजा, राजापूरकडे सुपारीचे उत्पादन जास्त आणि नारळाची झाडे कमी म्हणून स्वैपाकात खोबरे कमी वापरतात. . . . परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 03/06/2008 - 19:10 नवीन

हो ना विजुभाऊ

ही तर साध्या चिवड्यची पा क्रु. दडपे पोहे म्हणजे कच्चे पोहे...त्याला नारळाच्या पाण्यात हलके भिज्वावे...त्यात भरपुर खोबरे ओले किसुन टाकावे.हिरव्यामिरचीचे तुकडे , लिंबु पिळावे,मीठ साखर मग त्याला फोडणी द्यावी..... अगदी खरं....आणि थोडी कोथिंबिर आणि आणखी आंबटपणा हवा असल्यास टॉमॅटो घालावा....
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर गुरुवार, 03/06/2008 - 22:36 नवीन

मी लहानपणी कोणाकडे तरी दही व कच्चा कांदा घातलेले....

खाल्ले आहेत. पण फोडणी हाच प्रभावी घटक होता.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 03/06/2008 - 23:53 नवीन

वेगळी पण छान आहे..

विजूभाऊ नी लिहिल्याप्रमाणे दडपे म्हणजे दडपून केलेले.. प्रथम १/२ तास पातळ पोहे नारळाचे पाणी शिंपडून दडपून ठेवावे. नंतर खमंग फोडणी (मोहरी, जिरे, हिंग्,हळद) त्यात हिरव्या मिरच्या, कडिपत्ता, कांदे, भाजलेले शेंगदाणे घालून त्यावर घालावे. नंतर मेतकूत, मीठ्,साखर,लिंबू घालून कालवावे. सर्व्ह करताना वरील तयार पोहे, त्यावर ओले खोबरे आणिकोथिंबीर घालून द्यावे.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 03/07/2008 - 21:37 नवीन

स्वाती

माझ्या घरी कांदाही कच्चाच असतो..तो फोडणीत नसतो..बाकी क्रुती सेम्...आणि मेतकूट नाही खाल्ले त्यात घालून आता ६ महिने वाट पाहेन मेतकूट आणेपर्यंत...
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Sun, 03/16/2008 - 11:20 नवीन

ताकातले

आमच्याकडे ताकातले दडपे पोहे असतात. ताकात दडपून त्यात मीठ, साखर, तीखट/मिरच्या; वरून फोडणी आणि पेण/पनवेल हून आणलेले पोह्याचे पापड भाजून वर कुस्करून टाकायचे. ह्यापेक्षा जास्त शब्द आणि जिन्नस याची गरजच नाही!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 04/22/2008 - 16:09 नवीन

आमचेही दडपे पोहे. [हे पोहे आम्ही दडपून ठेवत नाही :)))))))) ]

साहित्य:- २ वाट्या पातळ पोहे, २ मध्यम आकाराचे कांदे, ३ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी खोवलेला नारळ, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. कृती:- प्रथम पोहे ओव्हन मध्ये किंवा गँसवर भाजून घ्यावेत, पोहे थंड झाल्यावर हाताने ते चुरुन ठेवावेत. एका वेगळ्या डिश मध्ये चिरलेला कांदा घ्यावा, त्यात मीठ व मिरची चुरडून घालावी, नारळ , कोथिंबीर घालावी, व सर्वात शेवटी चुरडलेले पोहे घालावेत व मिश्रण एकत्र करावे. हे पोहे लगेचच खावे म्हणजे मस्त कुरकुरीत लागतात. हा प्रतिसाद मी माझ्या पुतणीच्या वतीने देतोय. कारण, मला खाता येतं. बनवता येत नाही. :)))))))) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा