मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झेप

अर्चना देशमुख · · जनातलं, मनातलं
एकदा सहज TV समोर बसून कार्यक्रम बघत होती. आणि केव्हा लक्ष दुसरी कडे केंद्रित झाले समजलेच नाही .आणि मी त्या विचार मधे गुरफ़टून गेले. अमेरिकेत आल्यावर मला एकच प्रश्न नेहमी असायचा की इथे आल्या नंतर मुलींच्या अभ्यासचे कसे व्हायचे? मी ठाण्याला होते तेव्हा ही जबाबदारी बिनदिक्कत निभवायची मला कधीही ह्या गोष्टींची चिंता नसायची. मी दिवसभर साँस बहुच्या सीरियल आणि माज्या कीटी पार्ट्या पण एन्जॉय करायची. मुलिंचा अभ्यास तर माझ्या डाव्या हाताचा खेळ असायचा. अमेरिकन स्कुल च्या अँड़्मिशनचे दिव्य पार पाड्ल्यानन्तर मी जेव्हा तिचा अभ्यासक्रम बघितला तेव्हा मलाच जास्त टेंशन आले आणि मी चिंताग्रस्त झाली. अभ्यास कठिन नव्हता पण अभ्यासाची पध्हत मात्र निराळी होती. माझी थोरली जी पाचवीत आहे .तिला सुरवातीला शाळेमध्ये खूप त्रास होत होता. तशी ती होलिक्रॉस कॉन्वेंट स्कुलची असल्या मुळे इंग्लिशचा प्रोब्लेम नव्ह्ता. मी वीचार करीत होते की सुरवात कशी आणि कुठून करावी? तीला कसे समजवावे की जेन्हेकरून तिला त्रास होणार नाही. मनात सारखा विचार असायचा की तिचा तो त्रास कसा कमी करावा, तिला कशा प्रकारे मदत करावी?. असा विचार करता करता तिचा अभ्यास केव्हा सुरु झाला आणि त्या अभ्यासाचा शेवट केव्हा झाला हे माझ्या लक्षात येइपर्यंत तिने आकाशात मोठी "झेप" घेवून तिने मला चकित केले.

वाचन 4316 प्रतिक्रिया 0