सुरापुराण - प्रथम अध्याय..
ॐ नमो सुरादेवते | क्लेशहारिणी जगन्माते |
जी आम्हा नशेप्रत नेते | अखंड नमन करितो तिज ||१||
जे तुझे परमभक्त | मूढ ज्यांस बेवडे म्हणत |
मद्यपी ते सदोदित | तव स्तुती करती अहर्निशी ||२||
जरी त्यांनी अनेक लिहिली | स्तुतिपर काव्ये तुजप्रती भली |
ना तुझी पोथी लिहिली | म्हणून हा ग्रंथप्रपंच ||३||
जरी हा अनिकेत मूढमती | काव्यात मुळीच नाही गती |
खरीच जी तुजवर भक्ती | ग्रंथ तडीस नेईल हा ||४||
म्हणोन मी ऐसे म्हणतो | तुझे चरणतीर्थ आधी प्राशितो |
त्यावरीच हा ग्रंथ लिहितो | सुरेख होईल नि:संशय ||५||
तेव्हा आता माते | तूच माझिया हस्ते |
लिहावेस ह्या ग्रंथाते | कृपा करावी भक्तांवर ||६||
ह्या ग्रंथाचे करोनि पठण | भक्तांस होईल परमानंद |
आणि जे अज्ञानी जन | तुझी महती जाणतील की ||७||
ह्या प्रथमाध्यायी कथिले | ग्रंथाचे प्रयोजन भले |
पुढील अध्यायांचे खरे | प्रयोजन आता सांगतो ||८||
स्कॉच व्हिस्की व्होडका वाईन | रम ब्रॅंडी आणि जीन |
तव रूपांचे करीन वर्णन | बिअर ऍबसिंथ यांचेही ||९||
ताडी माडी नारंगी मोसंबी | जी तुझी देशी रूपे भली |
अन् काजूची जी फेणी | यांना कसे विसरू बरे ||१०||
भक्त तुझे जे बेवडे | खंब्यानंतरही राहती खडे |
त्यांची लक्षणे त्यापुढे | येतील लोकहो साकल्ये ||११||
माते तुझे जे मंदिर | जन ज्यास म्हणती बार |
भक्तांचे तेथे नाना प्रकार | तेथे काय करती सांगेन ||१२||
साजर्या होती ज्या पार्ट्या | चारचौघात अथवा एकट्या |
त्यातील गोष्टी लहान्-मोठ्या | त्याही कथेन मी ||१३||
कळस चढवीन त्यावरी | तुझी कृपा होते ज्यावरी |
त्याच्या काया-मनाची स्थिती खरी | काय होते वर्णीन ||१४||
तुझी कृपा ओसरल्यावर | येतो जो हँगओव्हर |
भयानक जो प्रकार | कैसा तो सांगेन ||१५||
अनिकेत हा जोडोनि कर | विनंती करितो एकवार |
टाळण्या हा हँगओव्हर | नशेत सदा रहावे ||१६||
प्रथमाध्याय हा येथे | संपवितसे दारूमाते |
जवळ घेई बालकाते | अव्हेर त्याचा करू नको ||१७||
-इति प्रथमोध्यायः
वाचने
6371
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अफाट!
In reply to अफाट! by विसोबा खेचर
नक्कीच...
In reply to नक्कीच... by अनिकेत
झकास रे अनिकेता!
लैच भारी
कझास.... माफ करा, झकास.......
कुठे आहेत तुझे पाय?
सुरेख
अरे वा
मदिरासप्तशती!
वा ! अनिकेता
In reply to वा ! अनिकेता by धमाल मुलगा
:)))
दुसरा अध्याय
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
दुसरा अध्याय.....
पतियाळा!!